नौशाद उस्मान
‘मुंबई स्वयंपाकघर’ नावाच्या ग्रुपमध्ये रमज़ाननिमित्त मुस्लीम खाद्यपदार्थ पोस्ट करण्यावरून जे ट्रोलिंग झालं, मुस्लिमांविषयी आणि इस्लामविषयी जे म्हटलं गेलं, ते सगळं वाचून मन खूपच खिन्न झालं होतं. असंच काही महिन्यांपूर्वी ‘वाचन वेडा’ नावाच्या ग्रुपमध्येही मुस्लिम समाज व इस्लामविषयीच्या मराठी पुस्तकांविषयीची एक पोस्ट ग्लोबल लाईट पब्लिशर या अकाऊंटवरून बुशरा नाहीद यांनी केली होती, त्यांनाही ट्रोल केलं गेलं. हे सगळं होतं ते सर्वसामान्यांच्या मनात मुस्लिमांविषयी असलेल्या गैरसमजुतीतून. या गैरसमजुती असतात कारण हे दोन्ही समाज जोडणारा पूलच अस्तित्त्वात नाही. आणि याचाच वेगवेगळ्या गटांकडून फायदाही घेतला जातो. खरं म्हणजे जनसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांकडे दुर्लक्ष करण्यासाठी मुस्लिम समाजाविषयी, त्यांच्या संस्कृती व विचारसरणीविषयी अपप्रचार केला जातो आहे. अशावेळी मुस्लिम समाजाविषयीच्या गैरसमजुती दूर करुन त्या अपप्रचाराचा प्रतिवाद होणे गरजेचे आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे आज मुसलमान समजून घेणे आवश्यक आहे. सांस्कृतिक परिप्रेक्ष्यात कुणी मुसलमान समजून सांगत असेल तर तो एकप्रकारे माणसं जोडण्याचे, समाज जोडण्याचे, पर्यायाने देश जोडण्याचेच काम करत असतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा