पृथ्वीचा तिसरा ध्रुव मानल्या गेलेल्या एव्हरेस्टवर २९ मे १९५३ या दिवशी मानवाचे पहिले पाऊल पडले. कॅ. जॉन हंट यांच्या नेतृत्त्वात शेर्पा तेनसिंग नोर्गे आणि सर एडमंड हिलरी यांनी हा इतिहास घडविला. एव्हरेस्टची ही प्रथम चढाई सगळ्यांच्याच लक्षात राहिली. एव्हरेस्टवर चढाई झाली, आता पुढे काय या शोधात असताना, इतर अष्टहजारी शिखरे गिर्यारोहकांना साद घालू लागली. त्यानंतर अल्पाईन पद्धतीने अष्टहजारी शिखर चढाईचा ट्रेण्ड सुरू झाला. १९५० ते १९७५ पर्यंत गिर्यारोहणामध्ये ही स्थित्यंतरे घडत गेली; आणि यात ब्रिटिश अमेरिका, जर्मनी ऑस्ट्रिया, इटली ही राष्ट्रे आघाडीवर होती. याच वेळी युरोपातील एक राष्ट्र गिर्यारोहणातील या घडामोडींवर लक्ष ठेवून होते. दुसऱ्या महायुध्दात भरडले गेल्यामुळे आणि रशियाच्या प्रभावाखाली असल्यामुळे त्याच्या गिर्यारोहणावर बंधने होती.

अफगाणिस्तानमधील हिंदुकुश पर्वतामध्ये त्याच्या मोहिमा आणि सराव सुरू होता. पण अष्टहजारी उंचीचे वलय लाभलेल्या हिमालय आणि काराकोरम पर्वतरांगापासून मात्र त्याला वंचित रहावे लागले. पण बंधने उठली आणि गिर्यारोहणासाठीचे स्वातंत्र्य जेव्हा मिळाले तेव्हा या देशातील गिर्यारोहकांनी गिर्यारोहणात स्थित्यंतर घडवले. शिवाय स्वत:च्या कर्तबगारीवर जागतिक गिर्यारोहणात दबदबा निर्माण केला. त्या राष्ट्राचे नाव म्हणजे “पोलंड”.

Credai MCHI organized 32nd Property fair at jio World Center in bkc
बीकेसीत आजपासून तीन दिवसीय मालमत्ता प्रदर्शन, एकाच ठिकाणी घरखेरदीचे पर्याय उपलब्ध होणार
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
mahajyoti obc loksatta news
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय : ‘महाज्योती’चे ५ जिल्ह्यांत ‘उत्कृष्टता केंद्रे’ स्थापन होणार…
devendra fadnavis likely visit davos
दावोसमध्ये पुढील आठवड्यात जागतिक आर्थिक परिषद; सात लाख कोटींचे करार अपेक्षित
Mahakumbh mela 2025 (2)
Maha Kumbh Mela 2025: स्मशानवासीन ‘अघोरी’ साधूंचा इतिहास काय सांगतो?
chandrapur tirupati balaji loksatta news
बालाजी मंदिरात सशस्त्र दरोडा, पुजाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून…
bjp devendra fadnavis stand on dhananjay munde resignation as minister post
धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद भाजपवर अवलंबून

हेही वाचा…गांधीद्वेष आजही का उरतो?

क्रिकेटविश्वात एके काळी वेस्टइंडिज किंवा फुटबॉलमध्ये ब्राझीलने जशी मक्तेदारी सिद्ध केली अगदी तशीच १९८० च्या दशकात पोलंडच्या गिर्यारोहकांनी गिर्यारोहणात वर्चस्व गाजविले. आंद्रेज झ्वाडा, वोयटेक कुर्टिका, मासेज बार्बेका, वांडा रुटकिविज, जर्झी कुकुजका, अंद्रेज झोक, झ्यागा हेनरीच, टादेक पिओत्रॉस्की, अशी पोलिश गिर्यारोहकांची मोठी यादीच तयार होईल. या यादीतील आणखी एक प्रमुख नाव म्हणजे “क्रिझिस्तोफ वेलिकी!”. पोलिश गिर्यारोहकांच्या गिर्यारोहणातील ज्या स्थित्यंतराविषयी मी बोलत आहे ते म्हणजे, “हिवाळी मोसमातील आरोहण!”. १९७० च्या दशकात आंद्रेज झ्वाडा यांच्या नेतृत्त्वात “नोशाक” या शिखरावर पहिले यशस्वी हिवाळी आरोहण झाले. कोणत्याही हिमशिखरावर हिवाळी मोसमात यशस्वी झालेली ही पहिली मोहीम ठरली. या मोहिमेमुळे आत्मविश्वास दुणावलेल्या पोलिश गिर्यारोहकांनी आणखी अवघड आव्हानाला हात घातला, “एव्हरेस्टची पहिली हिवाळी मोहीम”! एरवीही एव्हरेस्टवर चढाई ही अत्यंत कठीण श्रेणीतील मानली जाते. पण पोलिश गिर्यारोहकांनी थेट अशक्य वाटणाऱ्या आव्हानाला हात घातला होता.

या मोहिमेसाठी आंद्रेज झ्वाडा यांनी संघ निवडला आणि यातील आघाडीचे नाव होते, क्रिझिस्तोफ वेलिकी!”. या संघात त्यांची निवड होण्याचे कारणही तसेच होते. क्रिझिस्तोफ २३ वर्षाचे असताना, त्यांनी पोलंडमधील तात्रा पर्वतरांगेतील कझालनिका शिखरावर पाहिली हिवाळी मोसमातील यशस्वी चढाई केली. त्यानंतर हिंदुकुशमधील ७११६ मी. उंचीच्या “कोह-ए-शक्कोर” या शिखरावर अल्पाईन पद्धतीने यशस्वी चढाई केली. या मोहिमांचा अनुभव पाठीशी घेत क्रिझिस्तोफ यांनी १९७९ साली हिमालयातील आपली स्वतःची पहिली मोहीम केली. त्यांनी निवडलेले आव्हानही साधेसुधे नव्हते. जगातील दहावे उंच शिखर असलेल्या अन्नपूर्णावर त्यांनी चढाईचा प्रयत्न केला आणि तोही अन्नपूर्णाच्या दक्षिण कड्यावरून! अन्नपूर्णाचा दक्षिण कडा हे गिर्यारोहणातील अत्यंत कठीण आव्हान समजले जाते. ब्रिटिश गिर्यारोहक सर ख्रिस बोनिग्टन यांनी ज्या मार्गाने या कड्यावरून यशस्वी चढाई केली, तोच मार्ग वेलिकी यांनी चढाईसाठी निवडला आणि ७२०० मी. उंचीपर्यंत चढाई केली. हिमालयातील पहिल्याच प्रयत्नात एवढ्या कठीण आव्हानांला सामोरे जाणाऱ्या वेलिकी यांची दखल आंद्रेज झ्वाडा यांनी घेतली. उत्तम सांघिक कामगिरी आणि कुशल नेतृत्वाच्या जोरावर पोलिश संघाने एव्हरेस्टवरील पहिलीवहिली हिवाळी मोसमातील मोहीम यशस्वी केली. क्रिझिस्तोफ वेलिकी आणि लेसजेक सिची यांनी एव्हरेस्टचा शिखरमाथा गाठला.

यानंतर क्रिझिस्तोफ वेलिकी यांची गिरीरोहण कारकीर्द उत्तरोत्तर बहरत गेली. १९८४ साली ब्रॉड पीक या जगातील बाराव्या अष्टहजारी शिखरावर त्यांनी एकट्याने वेगवान चढाई केली. बेस कॅम्प ते शिखर माथा ते पुन्हा बेस कॅम्प अशी चढाई त्यांनी केवळ २२ तासात पूर्ण केली. कोणत्याही अष्टहजारी शिखरावर एकट्याने २४ तासांच्या आत चढाई करण्याची ही पहिलीच वेळ ठरली. आणि एक नवीन विक्रम आणि गिर्यारोहणातील स्थित्यंतर क्रिझिस्तोफ वेलिकी यांनी घडविले. अष्टहजारी शिखरांवर वेगवान चढाईचा पायंडा यानिमित्ताने पाडला गेला. आज अनेक गिर्यारोहक अशा वेगवान चढाया करत आहेत. पण अशा पद्धतीच्या चढाईचे जनक वेलिकी होते.

हेही वाचा…पुरस्काराआधीच पुस्तकवापसी…

कांचनजुंगा आणि ल्होत्से या जगातील तिसऱ्या आणि चौथ्या उंचीच्या शिखरावरही त्यांनी पहिले यशस्वी हिवाळी मोसमातील आरोहण केले. जगातील सर्व १४ अष्टहजारी शिखरांवर यशस्वी चढाई करणारे ते जगातील पाचवे गिर्यारोहक ठरले आहेत. प्रसिद्ध गिर्यारोहक मासेज बार्बेका, वांडा रुटकिविज, जर्झी कुकुजका, अंद्रेज झोक हे गिर्यारोहणातील संघ सहकारी म्हणून वेलिकी यांना लाभले.

१९९० नंतर त्यांनी अल्पाइन पद्धतीने आणि सोलो म्हणजेच एकट्याने चढाई करण्यावर भर दिला. यात धौलगिरी (नवीन मार्गाने सोलो चढाई), शिषापंगमा (नवीन मार्गाने सोलो चढाई), गॅशेरब्रम २ (नवीन मार्गाने सोलो चढाई), नंगा पर्बत (नवीन मार्गाने सोलो चढाई), यांचा सामावेश होतो. शिषापंगमावर पुन्हा एकदा त्यांनी ब्रॉड पीक मोहिमेप्रमाणे २४ तासात यशस्वी चढाई केली.

१९९६ साली केलेली नंगा पर्बत ही मोहीम त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात आव्हानात्मक मोहीम असे ते मानतात. १९९६ सालीच त्यांनी के टू शिखरावर यशस्वी चढाई केली. या मोहिमेत त्यांना ८४०० मी. उंचीवरील एका हिमभेगेत तंबूशिवाय मुक्काम करावा लागला. ही मोहीम संपवून ते नंगा पर्बतच्या पायथ्याला दाखल झाले. तेथे किंशोफर मार्गाने पोलिश संघ नंगा पर्बतवर चढाई करणार होता. पण आरोहणाचा मोसम निघून गेल्याने, संघातील इतर सदस्यांनी मोहीम आटोपती घेतली आणि परतीचा रस्ता धरला. पण इतक्यात हार न मानता चढाईचा निदान एखादा तरी प्रयत्न करायला हवा अस वेलिकी यांना वाटत होते. त्यांना साथ देण्यासाठी कोणीच तेथे नव्हते. पण वेलिकी यांनी एकट्यानेच किंशोफेर मार्गाने चढाई यशस्वी केली. नम्रपणे यशाचा स्वीकार करून “क्रिझिस्तोफ वेलिकी!” बेस कॅम्पवर पोहोचले आणि सर्व १४ अष्टहजारी शिखरांवर यशस्वी चढाई करणारे जगातील पाचवे गिर्यारोहक ठरले.

हेही वाचा…सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील खनिजे वाहून नेण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग?

त्यांच्या गिर्यारोहणातील भरीव कामगिरीची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. गिर्यारोहणातील ऑस्कर समजला जाणारा “पीओलेट दि ओर” जीवनगौरव पुरस्कार त्यांना देण्यात आला. प्रसिद्ध गिर्यारोहक रेनोल्ड मेसनेर यांच्यासोबत त्यांना “प्रिन्सेस अस्टुरियस अवॉर्ड फॉर स्पोर्ट”ने देखील सन्मानित करण्यात आले आहे. याच सोबत एक्सप्लोरर क्लबचा ’लोवेल थॉमस अवॉर्ड’, पोलंडचा “कमांडर क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ द पोलोनिया रेसीस्तीत्यूटा” असे पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत. त्यांच्या गिर्यारोहणातील भरीव कामगिरीची दखल खगोलशास्त्रज्ञांनीही देखील घेतली आहे. एका नव्याने शोधलेल्या लघुग्रहाला वेलिकी यांचे नाव देण्यात आलेले आहे.

हेही वाचा…शेतकऱ्यांना सक्षम करायचे आहे की कमकुवत?

असे हे जगप्रसिद्ध गिर्यारोहक “क्रिझिस्तोफ वेलिकी!” आपल्या सर्वांना भेटायला मुंबईत येत आहेत. निमित्त आहे, महाराष्ट्र सेवा संघ आयोजित, “गिरीमित्र संमेलनाचे.” १३ व १४ जुलै रोजी मुलुंड येथे हे संमेलन होणार असून क्रिझिस्तोफ वेलिकी यांचे अनुभव प्रत्यक्ष ऐकण्याची संधी महाराष्ट्र आणि भारतातील गिर्यारोहकांना मिळणार आहे. या संधीचा फायदा गिर्यारोहकांनी घ्यावा असे आवाहन गिरिमित्र संमेलनाच्या आयोजकांकडून करण्यात येत आहे. गिर्यारोहणात स्थित्यंतरे घडवणाऱ्या गिर्यारोहकाकडून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील आणि भारतातील गिर्यारोहण एका नवीन उंचीवर जाईल, यात शंका नाही!

Story img Loader