अयोध्येतील भव्य राममंदिरामधील मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा दूरचित्रवाणीवरून पाहा, त्या दिवशी धार्मिक कार्यक्रमांत सामूहिकपणे सहभाग नोंदवा, अशी आवाहने होत असताना महाराष्ट्र सरकारने ‘श्री रामलल्ला प्राण- प्रतिष्ठा दिन’ या दिवसाची सुट्टी जाहीर केली. हा धर्मनिरपेक्षतेवर घाला आहे, अशी प्रतिक्रिया तेव्हा काही जणांकडून उमटली आणि या आक्षेपासह सुट्टीच्या घोषणेवर हरकत नोंदवणारी याचिका कायद्याच्या चौघा विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे दाखल केली. मात्र, विशेष बाब म्हणून कोणत्याही दिवशी सुट्टी जाहीर करण्याचा अधिकार राज्य सरकारला ८ मे १९६८ रोजी केंद्रीय गृहखात्याने काढलेल्या अधिसूचनेने दिलेला आहे आणि त्याच अधिकाराचा स्पष्ट उल्लेख राज्य सरकारच्या परिपत्रकातही आहे, या तांत्रिक मुद्द्यावर ती याचिका फेटाळली गेली. या विद्यार्थ्यांचा धर्मनिरपेक्षतेबाबतचा आक्षेपही राजकीयद़ृष्ट्या प्रेरित आणि गैरलागू ठरवला गेला. आता तो सोहळा यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर तरी धर्मनिरपेक्षतेची आठवण देणे हे काही नेहमीच राजकीयदृष्ट्या प्रेरित ठरणारे नसते, याचे भान ठेवण्यास हरकत नसावी.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा