नुकत्याच भारतीय निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारससंहितेनुसार महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यातील लोकसभा २०२४ साठीच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या आणि अशा प्रकारच्या निवडणुकांची कार्यवाही करण्यासाठी सर्वसाधारणपणे पाच ते सहा महिन्यांपासून सर्वच प्रशासकीय यंत्रणांची तारेवरची कसरत चाललेली असते. या प्रक्रियेत भारत निवडणूक निर्वाचन आयोगाचे शीर्षस्थ अधिकारी, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, निवडणूक निर्णय अधिकारी, पोलिस कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, आशा आणि अंगणवाडी कर्मचारी ही सगळी यंत्रणा अविरतपणे कार्यरत असते. पण ‘निवडणूक कर्तव्या’वर असलेल्या अन्य कर्मचाऱ्यांची गोष्टच निराळी!

मतदान घडवून आणण्याच्या प्रत्यक्ष प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन स्तरावरील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा, अन्य शासकीय व निमशासकीय आस्थापनांमधील अनेक सदस्यांचा सक्रिय सहभाग असतो. हे काम अगदी निवडणूकांचा निकाल पूर्णपणे जाहीर होईपर्यंत चाललेले असते. यात काही टप्प्यांत प्रशिक्षणाचाही समावेश असतो. लौकिकार्थाने हे काम किंवा त्यासंबंधीचा अनुभव हा नेहमीच त्रासदायक वा क्लेशकारकही असू शकतो. त्यात या कामात प्रशासन हे अगदी सुरुवातीपासून अंतर्भूत असल्याने त्यांच्या कामावरील ताणाचा भाग म्हणा किंवा कार्यपद्धतीचा भाग म्हणा, संवेदनशीलतेच्या बाबतीत कमालीचा आक्रसलेपणा जाणवत असतो.

congress government analysis Telangana caste Survey
अन्वयार्थ : जनगणना कधी?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
Why were local elections delayed in the state
राज्यात स्थानिक निवडणुका लांबणीवर का पडल्या? तिसरी बाजी कोणाची? 
BJP leader manoj tiwari interview
ते ‘रेवड्या’ वाटतात, आम्ही ‘मोफत’ देतो; भाजपा नेते मनोज तिवारींची ‘आप’वर टीका
intra party discord seen during protest against ec organized by pune congress
काँग्रेसच्या आंदोलनात कार्यकर्ते वेठीला? शहरातील पक्षांतर्गत विसंवाद चव्हाट्यावर
Sharad Pawar, Ajit Pawar share stage at Baramati event
शरद पवार-अजित पवार पुन्हा एकाच व्यासपीठावर; ‘व्हीएसआय’च्या सर्वसाधारण सभेत उद्या उपस्थिती

हेही वाचा…महिला मतदार ‘संविधानाची देणगी’ राखणार का?

त्यामुळेही असेल, हे जिकिरीचे काम टाळण्यासाठी काही महाभाग कसोशीने प्रयत्नशील असतात. निवडणूक-कर्तव्याचे आदेश ज्या आस्थापनांमधून निर्गमित होतात त्या विभागातील उच्चपदस्थांच्या खनपटीला बसून, त्यांच्याशी आपुलकीचे आणि अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करून ही मंडळी अलगदपणे या कामातून आपली सुटका करून घेतात! मग ज्यांना खरोखरच वैद्यकीय कारणांमुळे हे काम करणे शक्य नाही त्यांच्याही माथी मात्र हे काम मारले जाते, हा बहुधा सगळ्याच ठिकाणचा अनुभव असतो. जे निसटतात ते मात्र विचित्र आनंद मनात ठेवून वावरत असतात. असो. याआधी कधीही, मला या प्रक्रियेतून सुटका करून घेण्याचा कधीच मोह झाला नाही. अगदी दहा- बारा वर्षांपूर्वीपासून मधुमेह या आजाराने त्रस्त असतानाही अगदी आनंदाने हे काम पार पाडले होते. त्यातच नोव्हेंबर २०२३ नंतर ‘अस्थमा’ या आजाराचे निदान झाल्याने अगदी नम्रपणे विनंतीपूर्वक संबंधित अधिकाऱ्यांना या गोष्टीची कल्पना देऊन, त्यासंबंधीची डॉक्टरांची निदान चाचणीची प्रत व त्या अनुषंगाने घेत असलेल्या औषधांची माहिती व कागदपत्रे सादर केली आणि या कामातून वगळण्याची विनंती केली.

तरीही यंदाच्या या निवडणुकीच्या प्रक्रियेत चौथ्या टप्प्यातील अहमदनगर ३७ या लोकसभा मतदारसंघातील २२७ या विधानसभा क्षेत्रातील ‘शिंपोरा’ या गावात मतदान केंद्राध्यक्ष म्हणून माझी नेमणूक झालीच… पण हा अनुभव सुखद म्हणावा असा होता!

हेही वाचा……आणि ‘आपल्या’च देशांत अहमदिया ठरले गैरमुस्लीम

या निवडणुकीच्या कामाचा भाग म्हणून वेळ पडली तर अगदी दुर्गम भागातही निवडणूक कर्तव्य पार पाडावे लागते. अशा वेळी अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत आपल्याला जुळवून घ्यावे लागते. आपल्या जीवन जगण्यासाठीच्या कोलाहलात कमाल आणि किमान गरजा अंतर्भूत असतात. अशा वेळी सर्व भौतिक सुविधांपासून दूर राहून स्वत:ला आहे त्या परिस्थितीत जुळवून घेणे हे मोठे आव्हान असते. या सर्व बाबी व अनुभव सकारात्मक जीवन जगण्यासाठी सुद्धा एक शिदोरी असते.

मतदानाच्या आदल्या दिवशी कर्जत येथील मुख्यालयात सकाळी आठ वाजता उपस्थित राहून मतदानासंबधीचे सर्व साहित्य तपासून घेतले व दुपारी बारा वाजता नेमून दिलेल्या सहकाऱ्यांसोबत राशीन करपडी बाभुळगाव असा प्रवास करत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंपोरे या १९५० साली स्थापन झालेल्या शाळेत दाखल झालो. कर्जत या तालुक्यातील गावापासून साधारणपणे ३० ते ३२ किलोमीटर अंतरावरील नगर जिल्ह्यातील हे अगदी शेवटचे गाव. तालुका कर्जत असला तरी हे गाव सोलापूर, पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले आहे. त्यात व्यापारी दृष्ट्या भिगवण आणि बारामती ही जास्त सोयीची व्यापारपेठ. संपूर्ण कर्जत तालुक्यात पाण्याचे अतिशय दुर्भिक्ष आहे. कर्जत – जामखेड हा शेतीच्या दृष्टीने कोरडा भाग.

हेही वाचा… लेख : ‘जीएसटी’चा जाच असा टाळता येईल…

विशेषत्वाने हे गाव पाण्याच्या दृष्टीने अतिशय समृद्ध! १९७६ साली उजनी धरणाच्या कामानिमित्ताने विस्थापित झालेले धरणग्रस्त गाव. त्यामुळे जुने शिंपोरे आणि नवीन शिंपोरे असे साधारणपणे पाच-सातशे उंबऱ्यांचे गाव. सर्वच जाती-धर्म-आणि पंथाचे लोक अतिशय गुण्यागोविंदाने येथे नांदत आहेत. गावाच्या पश्चिमेला लगतच उजनी धरणाचे बॅकवॉटर असल्याने ऐन उन्हाळ्यातही उष्मा जाणवत नव्हता! दाट झाडी आणि लतावेलींमुळे या गावचा परिसर हिरवाईने नटलेला आहे. शाळा तर अतिशय देखणी आणि टुमदार आणि हिरव्या गर्द झाडीत विसावली आहे. इंग्रजाळलेल्या शाळांच्या भाऊगर्दीत या शाळेचे वेगळेपण आणि देखणेपणा मनाला भुरळ पाडत होता. या परिसरातील कोकिळेचे कूजन, चातकाचे आर्जव, इतर पक्षांचा मनोहारी किलबिलाट यांमुळे निवडणुकीच्या कमालीच्या चिंताग्रस्त वातावरणात मनावरचा ताण अगदी हलका होत होता.

मतदान प्रक्रियेत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्वच स्तरातील लोक येत होते. त्यात तरुणांपासून तर अगदी वयोवृद्धही उत्साह ओसंडून सहभागी होत होते. श्रीमंत आणि गरीब लोकंही होते पण त्यांच्यातील दरीचा लवलेशही जाणवत नव्हता!

हेही वाचा…युद्धग्रस्तांबाबतची सहृदयताच जीवावर बेतली, असे का व्हावे?

मतदान केंद्रातील सर्वच सहकारी अतिशय तत्परतेने आणि उत्साहाने आपले काम करत होते. परस्परांच्या सहकार्याने आणि समन्वयाने, समूहभावनेने सर्व काम अतिशय आनंद घेऊन केले. त्याचाच परिपाक म्हणून की काय तब्बल ६८ टक्के मतदान झाले. मतदानाची प्रक्रिया संपल्यावर अगोदरच नियोजनबद्ध पद्धतीने कागदपत्रांची व लिफाफ्यांची क्रमवारी सूची नुसार तयार केली असल्याने तासाभरातच सर्वच तांत्रिक बाबींचीही पूर्तता झाली. तालुक्याच्या ठिकाणी- कर्जत येथे सर्व साहित्य जमा करून मनात गाणे गुणगुणत परतीचा प्रवास धरला.

avi.zarekar@gmail.com

Story img Loader