देशाच्या गृहमंत्र्यांनी आपल्या कुटुंबासह महाकुंभमेळ्यात स्नान, पूजा केली. ५ फेब्रुवारीला दस्तूरखुद्द देशाचे पंतप्रधान महाकुंभमेळ्याला हजेरी लावणार आहेत, दररोज सुमारे १.५० कोटी भाविक महाकुंभमेळ्यात सहभागी होत आहेत. अनेक सेलिब्रेटी सुद्धा यात मागे राहिलेले नाहीत. मकर संक्रांतीला महाकुंभमेळा सुरू होण्यापूर्वी वर्तमानपत्रांमध्ये टीव्ही, रेडिओवर दररोज जाहिराती येत होत्या. जाहिरातींमध्ये अध्यात्मापासून आयोजनापर्यंत सविस्तर माहिती देऊन, त्याचा लाभ घेण्याचे जाहीर आवाहन ‘राज्य’ करत होते. पूर्वी ‘कुंभ में बिछडे हुए भाई’ या अर्थाने चित्रपटातून किंवा गावातील कुणी शेठजी कुंभमेळ्यात जाऊन आल्याची कोपऱ्यावरील चर्चा वगळता, कुंभमेळा सर्वसामान्यांच्या आयुष्यात डोकावत नव्हता. आज मात्र तो बटबटीतपणे दिसू लागला आहे. हा फरक, त्या जाहिराती आणि मान्यवरांची उपस्थिती नक्कीच विचार करण्यास भाग पाडणारी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा