दयानंद लिपारे

भरड धान्याचे चित्र आता कात टाकत आहे. कालानुरूप नवे रंग, रूप, गंध, चव घेऊन ते ग्राहकांसमोर येत आहे. भारत या भरड धान्यातील (श्री अन्न) सर्वात मोठा उत्पादक देश ठरला आहे. भारतातील कमी पावसाच्या, दुष्काळसदृश भागात भरडधान्याचे पीक घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाचा भाग म्हणून उत्तेजन दिले जाणाऱ्या या भरड धान्याची ही नवी वाटचाल..

Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Manghar Transformation into India First Honey Village in crisis
महाबळेश्वरमधील ‘मांघर’च्या मधमाश्यांवर संकट
Nano Fertilisers loksatta marathi news
लोकशिवार : नॅनो खते; पिकांच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनातील आविष्कार
minister nitesh rane put on onion garland by the farmer
नाशिक : नितेश राणे यांच्या गळ्यात कांद्याची माळ; शेतकरी ताब्यात
Onion auction in Solapur stalled for four days due to Mathadi protest
माथाडींच्या आंदोलनामुळे सोलापुरात चार दिवस कांदा लिलाव ठप्प
Roasted chana with kishmish benefits
उपाशीपोटी हरभरा आणि मनुक्यांचे सेवन केल्याने होतात अनेक फायदे
eating in a bowl is a good practice Or Not
Malaika Arora: मलायका अरोराने सांगितल्याप्रमाणे बाऊलमध्ये खाणे ‘हा’ एक चांगला पर्याय असू शकतो का? तज्ज्ञ म्हणतात की…

ज्वारी, बाजरी या भरड धान्याचा प्रामुख्याने भाकरी या अन्न स्वरूपात खाण्याची पद्धत प्रचलित आहे. पारंपरिक खाद्य अशा श्री अन्न (भरड धान्य/ मिलेट्स) मधून बनवले जाते. यामध्ये बदल घडवला आहे तो हैदराबादच्या भारतीय भरड धान्य संशोधन संस्थेच्या (इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मिलिट्स रीसर्च, आयआयएमआर ) राष्ट्रीय पातळीवरील संशोधन करणाऱ्या संस्थेने. त्यासाठी संस्थेने तांत्रिक सुविधा देऊ केल्या आहेत. मातेने बोट धरून बालकाला चालायला शिकवावे इतक्या सहज सोप्या पद्धतीने हे तंत्रज्ञान अवगत केले जाते. यातून इडली, रवा, पोहे, लाह्या, बिस्किटे, पास्ता, उपमा लाडू असे जवळपास ३३ प्रकारचे खाद्यपदार्थ कसे बनवता येईल याचे तंत्रज्ञान शोधून काढले आहे. इतकेच नव्हे तर आजचा मूल्यवर्धिततेचा जमाना. त्यामुळे भरडधान्यही मूल्यवर्धित स्वरूपात कसे बाजारात आणता येईल याचेही प्रयत्न झाले. त्यातून जव्हार लस्सी, रागी केक, रागी पिझ्झा, रागी ब्रेड, जीरायुक्त बिस्कीट, जव्हार खाकरा, जव्हार इन्स्टंट खिचडी, मिक्स एनर्जी बार अशा सुमारे ३० हून अधिक मूल्यवर्धित आणि मुख्य म्हणजे आजच्या पिढीलाही आवडेल, आकर्षित करणारे अन्न पदार्थ बनवले गेले आहेत.

त्यासाठी विशेष स्वरूपाच्या प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध केलेली आहे. एका वस्तूच्या प्रशिक्षणासाठी ५० हजार रुपये शुल्क आकारले जाते. पण आणखी काही पदार्थाचे प्रशिक्षण घ्यायचे असेल तर पुढच्या पदार्थासाठी पहिल्या पेक्षा खर्च कमी येतो. म्हणजे  दोन किंवा तीन पदार्थ पदार्थाचे प्रशिक्षण घ्यायचे असेल तर हे शुल्क ३३ हजारवर येते. चार किंवा पाच पदार्थ शिकायचे असतील तर शुल्क ३० हजार होते. आणि पाचहून अधिक पदार्थ शिकायचे असेल तर २५ हजार रुपयांमध्ये हे तंत्रज्ञान तुम्हाला शिकता येते. दोन दिवसांच्या या प्रशिक्षण शिबिरामध्ये एक किंवा दोघांना प्रवेश घेता येतो. यामध्ये तंत्रज्ञानाची कागदपत्रे पुरवली जातात. मशिनरीचा तपशील, त्याचे सविस्तर वर्णन, पुरवठादारांची यादी असे सर्व काही तपशील येथे पुरवला जातो. तुमच्या सर्व शंका निरसन होतील असेच नियोजन केले आहे, असे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. बी. दयाकर राव यांनी सांगितले.

हेही वाचा >>>शाळूची पेरणी

भरड धान्याचे चित्र आता कात टाकत आहे. कालानुरूप नवे रंग, रूप, गंध, चव घेऊन ते ग्राहकांसमोर येत आहे. भारत या भरड धान्यातील (श्री अन्न) सर्वात मोठा उत्पादक देश. भारतातील कमी पावसाच्या, दुष्काळ सदृश्य भागात भरडधान्याचे पीक घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाचा भाग म्हणून भरड धान्याला उत्तेजन दिले जात आहे. भरडधान्य हे केवळ पारंपरिक आहाराचा भाग न राहता त्याचे मूल्यवर्धित स्वरूप कसे निर्माण होईल यासाठी हैदराबादच्या या भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अंतर्गत चालणाऱ्या या संस्थेने विशेष लक्ष पुरवले आहे.

भारतीय भरड धान्य संशोधन  संस्थेत पाय टाकताक्षणीच त्याचा पहिला भव्यतम अंदाज येतो. येथील टोलेजंग इमारती, संशोधनाची शिस्तबद्ध पद्धत, अत्यावश्यक यंत्रसामग्री, शास्त्रज्ञांचे प्रयत्न, प्रयोगशील वातावरण, भरडधान्यांनी फुललेली शेती, अल्पशिक्षित शेतकऱ्यांना समजेल- उमजेल अशा साध्या  सोप्या पद्धतीने शिकवणे हे सारे काही पाहून थक्क व्हायला होते.  केवळ तांत्रिक स्वरूपाचे  काम न ठेवता यापासून भरड धान्य उत्पादक शेतकऱ्यांनी काहीतरी शिकावे, त्याचा अधिकच्या अर्थार्जनासाठी वापर केला जावा हा त्यांचा मुख्य हेतू आहे. केवळ शिकावे असे नाही तर शेतकऱ्यांनी त्यांच्या उत्पादित भरड धान्यापासून चार पैसे अधिक कसे कमवावेत यासाठी मूल्यवर्धित उत्पादने कशी घ्यावीत यासाठी या संस्थेने केलेले प्रयत्न खचितच स्पृहणीय आहेत. आता त्याला पंत्रप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनीही बळ पुरवले आहे.

हेही वाचा >>>भारतातले बेकायदा बांगलादेशी आणि अमेरिकेतले बेकायदा भारतीय

 जगभरात भरड धान्याचे उत्पादन गेल्या काही वर्षांत तुलनेने स्थिर आहे. भारत हा सर्वात मोठा उत्पादक देश. पाठोपाठ नायजेरिया आणि चीनचा क्रमांक. खेरीज बुर्किना फासो, माली आणि सेनेगल आदी देशांतही याचे चांगले उत्पादन होते. प्रगत देशांमध्ये हे प्रमुख अन्न पीक नसले तरी विकसनशील देशांतील अनेक लोकांच्या आहारात ती महत्त्वाची भूमिका बजावते. पौष्टिक धान्य असलेले भरड धान्य कमी पाण्यात पिकात असल्याने ते पुढील काही वर्षांत महत्त्वाचे अन्न पीक राहील असा अंदाज आहे. आपल्याकडील मोती बाजरी आणि ज्वारी या दोन प्रकारच्या ज्वारीचा २०२० मध्ये जागतिक उत्पादनात सुमारे २० टक्के वाटा आहे. भारतातील मोती बाजरी उत्पादनाचा वाटा ४१ टक्के आहे. त्यानंतर ज्वारीचा जागतिक उत्पादनात ९ टक्के वाटा आहे. भारतातील राजस्थान, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा, गुजरात, मध्य प्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि उत्तराखंड ही प्रमुख भरड धान्य उत्पादक राज्ये आहेत. या दहा राज्यांचा वाटा ५ टक्क्याहून अधिक आहे. मोती बाजरी, ज्वारी आणि नाचणी यांचा वाटा सर्वाधिक आहे. जागतिक अन्न कार्यक्रमानुसार, अंदाजे सव्वा अब्ज लोक आहाराचा भाग म्हणून भरड धान्याचे सेवन करतात. भारतात, अलीकडच्या काळात त्याचे उत्पादन वाढत असल्याने ते जगभर पोहोचावे आणि ते पोहोचताना त्याला मूल्यवर्धिततेची जोड मिळावी असा केंद्र सरकारचा प्रयत्न. हेच काम पुढे प्रभावीपणे नेण्याचे काम हैद्राबादच्या या संस्थेत अव्याहतपणे होत आले आहे.

नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या वतीने या ज्वार संशोधन केंद्रावरील प्रक्षेत्रास व प्रदर्शनास भेट देऊन रब्बी ज्वारीच्या विविध संशोधनात्मक प्रयोग व नवीन संशोधित वाणांची पाहणी केली जाते. महाराष्ट्रात महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत (स्मार्ट ) प्रकल्प अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील भरड धान्य उत्पादक शेतकरी हैद्राबाद मध्ये जाऊन याचे शिक्षण घेऊन आले आहेत. खरीप व रब्बी ज्वारी हे बदलत्या वातावरणामध्येही तग धरणारे पीक असून यापासून मनुष्यासाठी पोषक अन्न तर जनावरासाठी चांगल्या प्रतिचा कडबा मिळतो. ज्वारीपासून मूल्यवर्धित पदार्थ जसे रवा, शेवया, पोहे, बिस्कीट, लाह्या आदींना मागणी वाढत आहे, त्यामुळे पुन्हा ज्वारीस आर्थिक महत्त्व प्राप्त होईल, असे मत या प्रशिणार्थिनी व्यक्त केले आहे. कमी पाण्यात लवकर येणारा व प्रथिनांचे प्रमाण जास्त असणारा वाण विकसित करण्याची गरज असल्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. विविध वाणांच्या प्रात्यक्षिकांचा शेतकऱ्यांना लाभ झाल्याचे सांगितले.

कृषी विभागाच्या आत्मा अंतर्गत आयआयएमआर व राष्ट्रीय भरडधान्य संशोधन केंद्राच्या वतीने हे दोन दिवसीय प्रशिक्षण हैद्राबादला झाले असता कोल्हापुरातील शेतकरी, महिला चांगल्याच रमल्या.  बाजरी, नाचणी, ज्वारी लागवड करताना व नंतर त्याचे पीक व्यवस्थापन करताना आधुनिक तंत्रज्ञान अवलंबण्याची गरज असते. हे तंत्रज्ञान शिकण्यासाठी व भरड धान्याचे उपपदार्थ कोणते – कोणते होतात, कोणती व कशी प्रक्रिया करतात हे प्रशिक्षण या महिलांना हैद्राबादच्या अभ्यास सहलीतून झाले आहे. दोन दिवसांच्या प्रशिक्षणात भरड धान्य लागवडीचे तंत्र, पीक व्यवस्थापन, पीक काढणी, मळणी याच्यापासून ते ज्वारीपासून विविध खाद्य पदार्थ, पोहे, रवा, लाह्या, बिस्किटे, पापड, कुरडई आदी बनविण्याविषयी या महिलांनी प्रशिक्षण घेतले. तेथील तज्ज्ञांनी या महिलांना भरड धान्याच्या बाजारमूल्य वाढीसाठी त्यावरील प्रक्रिया उद्योगाची उभारणी करण्याचा सल्ला दिला. घरगुती पध्दतीने व्यवसाय केले तरी स्वयंरोजगारही तालुक्यातील गावोगावी उपलब्ध होईल, असा मोलाचा सल्ला दिला. प्रशांत कांबळे, अर्थशास्त्रज्ञ तथा वित्तीय सल्लागार आणि अक्षय पोवार, अर्थशास्त्रज्ञ तथा वित्त प्रवेश सल्लागार, निधी अंमलबजावणी कक्ष, स्मार्ट,कोल्हापूर या प्रशिक्षणास उपस्थित होते.

भरड धान्य मूल्यवर्धिततेच्या अनेक यशकथा पाहायला मिळतात. नाशिक येथील भगर मिल उद्योजक आणि सोनपरी या प्रख्यात ब्रँडचे निर्माते महेंद्र छोरीया यांना हायटेक्स इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर हैदराबाद येथे न्युट्रिहब, आयआयएमआर यांच्यातर्फे ‘‘न्यूट्री-सेरियल्स मल्टी-स्टेकहोल्डर्स मेगा कन्व्हेन्शन’’ समारंभात सलग दुसऱ्यांदा ‘पोषक अनाज या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भगर उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये अत्याधुनीकरण करणे, शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगली संधी निर्माण करणे, राष्ट्रीय पातळीवर ब्रँड नावारुपाला आणला आहे. या पुरस्काराने गौरविण्यात आलेले छोरीया हे महाराष्ट्रातील एकमेव उद्योजक आहेत. २०२३ हे वर्ष तृणधान्य वर्ष (आंतरराष्ट्रीय  मिलेट्स वर्ष) म्हणून घोषित करण्यात आले आहे. भगर हे सुद्धा तृणधान्य आहे. तृणधान्याच्या इको-सिस्टीममध्ये काम करणाऱ्या भागधारकांना व्यासपीठावर एकत्र आणणे, तसेच उत्पादक आणि ग्राहकांमध्ये तृण धान्याबद्दल जागरूकता निर्माण करणे, या हेतूने या क्षेत्रात नावीन्यपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना हैदराबाद येथे सन्मानित करण्यात आले. राज्याच्या आदिवासी आणि दुर्गम भागात भगरीचे उत्पादन घेणारे शेतकरी, त्यावर प्रक्रिया करणारे उद्योजक, तृणधान्य विक्री करणारे व्यावसायिक आणि आरोग्य जपण्यासाठी तृणधान्याचा आहारात समावेश करणाऱ्या ग्राहकाचा हा सन्मान आहे. आणखी दर्जेदार आणि ग्राहक केंद्रित व्यवसाय करू, या महेंद्र छोरिया यांच्या भावना महत्त्वाच्या आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भरड धान्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.  यापैकी तीन एफपीओ – शेतकरी उत्पादक कंपन्यांना हैदराबाद येथील आयआयएमआर संस्थेमध्ये प्रशिक्षण अभ्यास सहल दौरा आयोजित केला होता. या शेतकरी कंपन्यांचे २५० ते एक हजार इतके सभासद आहेत. त्यापैकी निवडक सभासदांना हैदराबाद येथील संस्थेमध्ये प्रशिक्षण, अभ्यास दौरा आयोजित केला होता. शेतकऱ्यांनी धान्य थेट विकण्याऐवजी किमान ते स्वच्छ केले, त्याचे वर्गीकरण केले (क्लिनिंग, ग्रेडिंग) तरी त्यांना अधिक रक्कम मिळू शकते. त्यांनी मूल्यवर्धित असे काही उत्पादन केले तर त्याहून अधिक उत्पन्न मिळू शकते. या हेतूनेच आमच्या स्मार्ट उपक्रमांतर्गत यापूर्वी नाशिक, बारामती, औरंगाबाद येथे अभ्यास, सहल दौरे झाले होते.  हैदराबाद येथील  दौऱ्यात या शेतकरी कंपन्यांच्या सभासदांची दृष्टी अधिक विशाल झाली. त्यांचाही अशा प्रकारचे काही उत्पादने घेण्याकरितां कल होत चालला आहे ही खूपच महत्त्वाची बाब आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रोत्साहनपर अनुदानही दिले जाणार आहे. पण याच वेळी त्यांचे हे उत्पादन, भरड धान्यावर आधारित शेतकरी उत्पादक कंपनी कायमस्वरूपी चालाव्यात याकडेही लक्ष पुरवले जात आहे. –  अक्षय पोवार, अर्थशास्त्रज्ञ तथा वित्त प्रवेश सल्लागार,  निधी अंमलबजावणी कक्ष, स्मार्ट,कोल्हापूर

आंतरराष्ट्रीय भरडधान्य श्री अन्न वर्षांनिमित्त आयआयएमआर, हैद्राबादमध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रम, संशोधनावर भर देण्यात आला आहे. देशात तांदूळ, गहू या धान्याचे प्रमाण वाढले असले तरी त्याच्या काही मर्यादा, परिणाम जाणवतात. म्हणून आता केंद्र शासनाच्या वतीने आरोग्यदायी अशा श्री अन्नाकडे अधिक लक्ष पुरवले आहे. कमी पावसाच्या भागात कमी काळात चांगले पीक येत असल्याने भरडधान्य शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टय़ाही परवडणारे आहे. ते अधिक कसे परवडेल यासाठी संशोधन केले जात आहे. शेतकऱ्यांनी भरड धान्यामध्ये मूल्यवर्धिततेकडे लक्ष पुरवले तर त्यांना अधिक लाभ होऊ शकतो. यासाठी येथे विविध प्रकारचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. श्री अन्नापासून बिस्किट, पास्ता, नूडल्स अशा विविध प्रकारचे अगणित पदार्थ कसे बनवावेत याचे प्रशिक्षण दिले जाते. त्याचा फायदा घेऊन अनेक ग्रामीण भागातील शेतकरी, ग्रामीण भागातील कंपन्या यांनी श्री अन्न क्षेत्रात चांगले स्थान मिळवले आहे. त्यांना चांगला आर्थिक लाभही होत चालला आहे. देशभरात स्त्रियांचा यामध्ये सहभाग वाढावा यासाठी जागृती निर्माण करण्याचे काम गतीने जोमाने सुरू आहे. – आदित्य साठे, प्रकल्प व्यवस्थापक, न्यूट्री हब, आयआयएमआर, हैदराबाद

Story img Loader