स्वातंत्र्याची पाऊणशे वर्षे उलटून गेल्यानंतरही भटक्या विमुक्त जमातींचे दैन्य संपलेले नाही. समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी त्यांना अजून बराच काळ लागणार आहे. अठरा विशे दारिद्र्याच्या जोडीला रोजगाराच्या अभावाचा, रोजगाराच्या अपुरेपणाचा, व्यसनाधीनतेचा शाप… त्यामुळे दारिद्र्याची भीषणता अधिक भेसूर झाल्याचे दिसते. समाजातील या घटकाच्या उत्थानासाठी सरकारी उपाययोजना पुरेशा नसताना काही सामाजिक संस्था, कार्यकर्ते त्यासाठी धडपड करताना दिसतात. ‘भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान’ त्यापैकीच एक महत्त्वाची संस्था आहे. सध्या ही संस्था ५४ पालांवर शाळा चालवते. त्यांना सढळ आर्थिक मदतीची गरज आहे.

ऑनलाइन देणगीसाठी

खाते क्रमांक- 084100107153

कॉसमॉस बँक, शाखा सोलापूर

आयएफएससी कोड- COSB0000084

धनादेश या नावाने काढा :

भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान

BHATKE V VIMUKT VIKAS PRATISHTHAN

पॅन : AAATB5093J

संस्था ‘८०जी’ अंतर्गत करसवलतपात्र आहे.

वेशीबाहेरील मुलांची शाळा

देशातील प्रमुख प्रगतशील राज्य अशी आपल्या महाराष्ट्राची ओळख… प्रबोधनाची उज्ज्वल परंपरा सांगणारा, विवेकाची कास धरल्याचा अभिमान बाळगणारा हा प्रदेश… तरीही वेशीबाहेरील वस्तीचे दु:ख पूर्णपणे दूर करण्यात यश मिळाले नाही. मात्र, त्या ध्येयाच्या दिशेने अविरत चालणारी पावले आपल्याला दिसतात. वैयक्तिक, भौतिक सुखाचा विचार न करता वंचित समूहाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांचा हरपलेला सन्मान परत मिळवून देण्यासाठी काम करणारे हजारो हात राज्यभर विखुरलेले पाहायला मिळतात. वर्धा जिल्ह्यातील रोठा या गावातील ‘उमेद’ ही संस्थाही त्याच साखळीतील मोलाचा दुवा आहे.

ऑनलाइन देणगीसाठी

खाते क्रमांक- 0191001020545

कॉसमॉस बँक, शाखा पौड रोड

आयएफएससी कोड- COSB0000019

धनादेश या नावाने काढा : उमेद एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट

Umed Education Charitable Trust

पॅन : AAATU7470Q

संस्था ‘८०जी’ अंतर्गत करसवलतपात्र आहे.

तीन शतकांचा दुवा सांधणारी ‘पुणे सार्वजनिक सभा

देशाला स्वतंत्र करण्यासाठी समाजाला संघटित करण्याच्या उद्देशातून एकोणिसाव्या शतकात गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांनी स्थापन केलेली, स्वराज्याचे रूपांतर सुराज्यात करण्यासाठी झटणारी, एकविसाव्या आव्हानांना समर्थपणे तोंड देणारी, तीन शतकांचा दुवा सांधणारी ‘पुणे सार्वजनिक सभा’ ही संस्था नव्या वास्तूसह अनमोल दस्तावेजांचे डिजिटीकरणाच्या माध्यमातून जतन करण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यासाठी आर्थिक साहाय्याची गरज आहे…

ऑनलाइन देणगीसाठी

खाते क्रमांक- 0151001016375

कॉसमॉस बँक, शाखा कसबा पेठ, पुणे

आयएफएससी कोड-COSB0000015

धनादेश या नावाने काढा : पुणे सार्वजनिक सभा

PUNE SARVAJANIK SABHA

पॅन : AAATP5435G

संस्था ‘८०जी’ अंतर्गत करसवलतपात्र आहे.

पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्याचा ‘संकल्प

जैवविविधतेच्या दृष्टीने जागतिक पातळीवर संवेदनशील मानल्या गेलेल्या पश्चिम घाटाचा कोकण हा महत्त्वाचा हिस्सा आहे. बिबटे, अस्वले, रानडुकरे, कोल्हे, तसेच विविध प्रकारच्या पक्षी आणि फुलपाखरांमुळे या प्रदेशाला कमालीची नैसर्गिक विविधता प्राप्त झाली आहे. पण ही नैसर्गिक साधनसंपत्ती नष्ट होण्याचे संकट जगाच्या अन्य भागाप्रमाणे कोकणातही उभे ठाकले आहे. मात्र त्यापुढे हार न मानता रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथील ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’चे कार्यकर्ते गेली सुमारे दोन दशके या क्षेत्रात व विविध आघाड्यांवर झपाटून काम करत आहेत. त्याचा आगामी पिढ्यांना चांगलाच फायदा होणार आहे.

ऑनलाइन देणगीसाठी

खाते क्रमांक-100100102486

कॉसमॉस बँक, शाखा मांटुंगा पूर्व, मुंबई

आयएफएससी कोड- COSB0000100

धनादेश या नावाने काढा : सह्याद्री संकल्प सोसायटी

Sahyadri Sankalp Society

पॅन : ABHTS4798P

संस्था ‘८०जी’ अंतर्गत करसवलतपात्र आहे.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘आधार माणुसकीचा’!

राज्यात, विशेषत: मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या हा न सुटलेला प्रश्न आहे. अशा आणि आर्थिक संकटांमध्ये सापडलेल्या इतर घरांमधील मुलांच्या मदतीसाठी संत गाडगेबाबा स्वयंसेवी संस्थेच्या संतोष पवार यांनी आधार माणुसकीचा हा उपक्रम आखला आहे. त्याच्या माध्यमातून आतापर्यंत किमान साडेसातशे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्यात आली आहे. यापुढेही हे काम सुरू ठेवायचे आहे. विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी राहण्यासाठी जागा असावी यासाठी अंबेजोगाईमध्ये वसतीगृह बांधायचे आहे. त्यासाठी सबळ आर्थिक मदतीची गरज आहे.

ऑनलाइन देणगीसाठी

खाते क्रमांक- 9051001016506

कॉसमॉस बँक, शाखा औरंगाबाद</strong>

आयएफएससी कोड- COSB0000905

धनादेश या नावाने काढा :

संत गाडगेबाबा सेवाभावी संस्था

SANT GADGEBABA SEVABHAVI SANSTHA

पॅन : AAUAS2402D

संस्था ‘८०जी’ अंतर्गत करसवलतपात्र आहे.

हुशार, गरजू विद्यार्थ्यांसाठी विद्यादानाचा निरंतर यज्ञ

उत्तम शिक्षणाने उत्तम समाज घडवता येतो, यावर ठाम विश्वास असणाऱ्या समविचारी मंडळींच्या प्रयत्नांतून ‘विद्यादान सहाय्यक मंडळा’ने गेल्या १६ वर्षांत राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील वंचित आणि दुर्बल घटकांतील गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सर्वांगीण हातभार लावला आहे. अर्थसहाय्यासाठी काटेकोर निवड प्रक्रिया राबवली जाते. त्याबरोबरच विद्यार्थ्यांना व्यापक सामाजिक आणि संस्थात्मक कुटुंबांचा भाग करून घेण्याची कार्यपद्धती आणि त्यातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि व्यक्तिमत्त्व विकास करणारे मूलगामी प्रारूप हे ‘विद्यादान’चे वेगळेपण आहे.

नलाइन देणगीसाठी

खाते क्रमांक- 0400501086161

कॉसमॉस बँक, शाखा ठाणे</strong>

आयएफएससी कोड- COSB0000040

धनादेश या नावाने काढा : विद्यादान सहाय्यक मंडळ, ठाणे

VIDYAADAN SAHAYYAK MANDAL THANE

पॅन : AABTV3881F

संस्था ‘८०जी’ अंतर्गत करसवलतपात्र आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचा, वृद्धांचा निवारा

स्वत:वर आलेल्या संकटाने खचून जायचे की त्यावर मात करत इतरांनाही आधार देण्यासाठी हात पुढे करायचा हे ज्याच्या त्याच्या मनोबलावर ठरते. सोलापूर जिल्ह्यातील अनु मोहिते आणि प्रसाद मोहिते यांऩी दुसरा पर्याय स्वीकारला. त्यातून साकारले आहे मोहोळ तालुक्यातील ‘प्रार्थना फाउंडेशन’चे ‘बालग्राम’. अनु आणि प्रसाद हे दाम्पत्य आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आधार देण्याचा प्रयत्न करत वाटचाल करत आहेत. त्यासाठी समाजाची मदत मिळतच आहे, पण ती पुरेशी नाही. हे सेवाकार्य पुढे सुरू ठेवण्यासाठी या संस्थेला सढळ हाताने मदतीची गरज आहे.

ऑनलाइन देणगीसाठी

खाते क्रमांक- 084100107146

कॉसमॉस बँक, शाखा सोलापूर

आयएफएससी कोड- COSB0000084

धनादेश या नावाने काढा : प्रार्थना फाउंडेशन

Prarthana Foundation

पॅन : AADTP7758D

संस्था ‘८०जी’ अंतर्गत करसवलतपात्र आहे.

वसा साने गुरुजींच्या विचारांच्या प्रसाराचा, राष्ट्र घडविण्याचा

‘श्यामची आई’चे लेखक म्हणून अवघ्या मराठी जगतामध्ये लोकप्रिय असणाऱ्या साने गुरुजींनी अनेक धडपडणारी मुले घडवली, मानवतेचा सर्वत्र प्रसार केला आणि आंतरभारतीच्या माध्यमातून विविध भाषकांना जोडण्याचे प्रयत्न केले. त्यांच्या या कार्याचा वसा घेतलेले कार्यकर्ते आपापल्या परीने त्यांचे काम पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातूनच रायगड जिल्ह्यामधील वडघर येथे ‘साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक’ उभे राहिले असून नवीन पिढी घडवण्याचे काम पोटतिडकीने केले जात आहे. ऑनलाइन देणगीसाठी

खाते क्रमांक- 1020501034089

कॉसमॉस बँक, गोरेगाव पूर्व, मुंबई शाखा

आयएफएससी कोड- COSB0000102

धनादेश या नावाने काढा : साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट

Sane Guruji Rashtriy Smarak Trust

पॅन : AABTS5671C

संस्था ‘८०जी’ अंतर्गत करसवलतपात्र आहे.

विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीसाठी ‘विज्ञान प्रबोधन’

विद्यार्थिदशेत वावरत असताना अनेकांना विज्ञान हा विषय क्लिष्ट वाटतो. तर निरनिराळ्या वैज्ञानिक संकल्पनांबाबत काही विद्यार्थी अनभिज्ञ असतात. तर काही विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाबाबत जिज्ञासा असते, मात्र योग्य मार्गदर्शनाअभावी संबंधित क्षेत्रात वाटचाल करताना आणि विविध प्रकल्पांवर काम करताना अडचणींचा सामना करावा लागतो. या बाबी लक्षात घेऊनच ‘नवनिर्माण विज्ञान प्रबोधन’ संस्था काम करत आहे.

ऑनलाइन देणगीसाठी

खाते क्रमांक

आयएफएससी कोड

हे तपशील लवकरच प्रसिद्ध केले जातील.

धनादेश या नावाने काढा : नवनिर्माण विज्ञान प्रबोधन

Navnirman Vidnyan Prabodhan

पॅन : AACTN0381P

संस्था ‘८०जी’ अंतर्गत करसवलतपात्र आहे.

ग्रंथसंपदेचे राखणदार

उभ्या-आडव्या धाग्यांची वीण घालत वस्त्राला आकार देण्यासाठी राज्यात लौकिक मिळवलेल्या वस्त्रनगरी इचलकरंजीची सांस्कृतिक ओळख म्हणून ‘आपटे वाचन मंदिरा’कडे पाहिले जाते. ग्रंथसंपदेचा शाश्वत ठेवा या ग्रंथालयाने वर्षानुवर्षे सांभाळला. त्याला शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाची तेजस्वी परंपरा आहे. अनेक पिढ्यांना वाचनसमृद्ध करणाऱ्या या ग्रंथालयास नवोपक्रमासाठी भरीव निधीची नितांत गरज भासत आहे.

ऑनलाइन देणगीसाठी

खाते क्रमांक – 114100105524

कॉसमॉस बँक, शाखा इचलकरंजी

आयएफएससी कोड- COSB0000114

धनादेश या नावाने काढा : आपटे वाचन मंदिर

Apte Wachan Mandir

पॅन : AAATA1844N

संस्था ‘८०जी’ अंतर्गत करसवलतपात्र आहे.

अनाथ, मतिमंद आणि वयोवृद्धांसाठी मायेचा आधार

देशभक्ती आणि मातृभक्ती यांचा योग्य मिलाफ झाला की त्याचे कसे अनुकरणीय परिणाम होतात ते निवृत्त सैनिक किसन लोखंडे यांच्या बाबतीत दिसून येते. मूळच्या सातारा जिल्ह्यातील लोखंडे वसईमधील एका गावामध्ये ‘मराठा लाइफ फाउंडेशन’ स्थापन करून अनाथांचा विनामूल्य सांभाळ करत आहेत. त्यामध्ये मनोरुग्ण, मतिमंद, गतिमंद अशा गरजू अनाथांचा समावेश आहे. गेल्या १७ वर्षांपासून सुरू असलेल्या या कामाचा पसारा वाढला आहे. हे काम तसेच जोमाने होत राहावे यासाठी समाजाने सढळ हाताने आर्थिक मदत करण्याची गरज आहे. ऑनलाइन देणगीसाठी

खाते क्रमांक – 116100106019

कॉसमॉस बँक, वसई रोड शाखा

आयएफएससी कोड- COSB0000116

धनादेश या नावाने काढा : मराठा लाइफ फाउंडेशन

MARATHA LIFE FOUNDATION

पॅन : AAFTM4091G

संस्था ‘८०जी’ अंतर्गत करसवलतपात्र आहे.