हुमायून मुरसल

स्त्रिया सांस्कृतिक, धार्मिक, नैतिक अशा सर्व जबाबदाऱ्या सांभाळतात. पुरुषांना त्याचे सर्व फायदे मिळतात. पण स्त्रियांच्या या कार्याचे सतत अवमूल्यन होते.

society and housing society
‘हाउसिंग सोसायटी’पासून समाजापर्यंत… स्वातंत्र्य हवं, जबाबदारी नको?
ancient Indian mathematician Bhaskaracharya
भारतीय अर्वाचीन गणिती: भास्कराचार्य
Manohar Sapre from Chandrapur Marathi cartoonist
चंद्रपूरचे मनोहर सप्रे
Air quality index in Delhi area
शिक्षा, काळ्या हवेची!
Indian culture from the perspective of Sane Guruji
साने गुरुजींच्या दृष्टिकोनातून भारतीय संस्कृति
dr Babasaheb Ambedkar amit shah
अमित शहांना आंबेडकर ‘फॅशन’च वाटणार!
A story of corruption in the name of religion
धर्माच्या नावे भ्रष्टाचाराची कहाणी
The profile of the city Book American journalism New journalism
शहराची सखोल दखल
One Nation One Election , Constitution , Federalism,
संविधान पायदळी तुडवून निवडणुकीचा खर्च आणि वेळ वाचवायचा आहे?

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा दिवस जवळ आला आहे. आपल्याकडे लोकशाही प्रगल्भ झाली आहे, अशी चर्चा सतत होत असते. या निवडणुकीनंतरही ती होईल. दर पाच वर्षांनी घराणेशाही किंवा खास हुकूमशाही निवडण्यातली जनतेची प्रगल्भता आपण पुन्हा पाहूयातच. भांडवलशाहीने ‘सर्व’ मानवी संबंधांचे ‘धंद्या’त रूपांतर केले आहे. दोन टक्के अतिविद्वान तंत्रज्ञ आणि बड्या भांडवलदारांनी मानवी आयुष्याला ‘पैसा कमव आणि पैसा खर्च कर’ एवढ्या संकुचित चाकोरीत बसविले आहे. आता सर्व व्यवहार पैशांसाठी आणि पैशांनी होतात. प्रेमाचे, सहकार्याचे आणि सहजीवनाचे नातेसंबंध पद्धतशीरपणे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. मानवी नात्यांऐवजी बाजारपेठेमधील उपलब्ध सेवांवर विश्वास दृढ करण्यात आला आहे. अशा वेळी सरकारने चार पैसे सरळ खात्यात टाकले तर मतदारांना पुरेसे वाटते. राजकारण धंदा आहे, हे आता सर्वमान्य आहे. मानवी नात्यांचा, स्वातंत्र्याचा विचार करायला लोकांना वेळ आहे कुठे ?

तरीही चिवट मानवी नात्यांचा अडसर निर्माण होतोच. तो अडसर दूर करण्यासाठी नव राष्ट्रवादाने माणसाला भ्रमित केले आहे. भारतात या राष्ट्रवादाने जाती आणि धार्मिक विद्वेषाची आणि शत्रुत्वाची झिंग आणली. हिंसेचे गलिच्छ राजकारण स्वाभिमान जागवणारी, अभिमानाची गोष्ट बनली आहे. जेथे नातेसंबंध संपतात तेथे भीती निर्माण होणे स्वाभविक आहे. आता राजकारणात याच भ्रामक भीतीचा वापर सुरू आहे.

हेही वाचा >>> ‘लाडक्या बहिणींनो’ कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!

जनता एकजिनसी नाही. जनतेत भावुकता, मानसिक बंदिस्तता आणि प्रतिगामी विचारांचा प्रभाव मोठा आहे. माणसांच्या एकंदर विचारांच्या केंद्रस्थानी मिथके आणि श्रद्धा आहेत. जगण्यातील बाह्य आणि आंतरिक तणावाने माणूस अस्थिर, अस्वस्थ आणि अशांत आहे. चौकटीतून बाहेर येऊन विचार करण्याइतपत मुक्त नाहीत. अशा कुंठीत मानसिक अवस्थेत मी ‘लाडक्या बहिणी’ची गोष्ट सांगू कशी? कोणाला ?

स्त्रियांच्या मुक्तीचा, स्वातंत्र्याचा, विकासाचा वेगळा विचार होणे आवश्यक आहे. कारण आजही अशिक्षित असणाऱ्या, शेतात आणि असंघटित क्षेत्रात राबणाऱ्या, झोपडपट्टीत जगणाऱ्या, घरकामात आयुष्य कंठणाऱ्या स्त्रियांची संख्या प्रचंड आहे. कुटुंबाचे पालनपोषण, संगोपन, शुश्रूषा, संर्वधन त्याच करतात. दारिद्र्याचा चटका नेहमी स्त्रियाच सहन करतात. त्यांचे ‘वेळेचे दारिद्र्य’ सर्वात तीव्र आहे. स्वत:चा विचार करण्यासाठी त्यांना उसंत नसते. स्वविकासाला संधी मिळत नाही.

खरे तर, समाजाची एकंदर धारणाच त्यांच्या सेवाकार्यामुळे टिकून आहे. मानवजातीचे आणि निसर्गाचे पुनरुत्पादन स्त्रियांमुळे होते. त्या कुटुंब सांभाळून भावी आणि चालू दोन्ही कामगार, तंत्रज्ञ थोडक्यात समाजाच्या संपूर्ण वर्कफोर्सचे निर्माण आणि पुनर्निर्माण करतात. त्या वर्कफोर्स असून वर्कफोर्सच्या निर्मात्याही आहेत. अर्थव्यवस्थेचा संपूर्ण गाडा त्यांच्या घरकामातील सहभागावर अवलंबून आहे. शाळा, रुग्णालये, कारखाने, शेती, उद्योग केवळ त्यांच्या श्रमावर अवलंबून आहेत.

८० टक्क्यांहून अधिक स्त्रिया घरकाम करतात. त्यात दररोज त्यांचा किमान सात ते आठ तासांचा वेळ जातो. त्यातील त्यांची गुंतवणूक केवळ शारीरिक नसते. ती भावनिक आणि मानसिकही असते. त्या सांस्कृतिक, धार्मिक, नैतिक सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या सांभाळतात. पुरुषांना याचे सर्व फायदे मिळतात. पण स्त्रियांच्या या कार्याचे सतत अवमूल्यन होते. स्त्री-पुरुष दोघेही अर्थाजन करतात, तेव्हा सर्व बोजा स्त्रीवर ढकलला जातो. घरकामाला कधी सुट्टी नसते. सणासुदीला कामाचा बोजा वाढतो. आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होतो. पुन्हा आजारपणात ताण त्यांच्यावर असतो. पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या त्या शोषिता आणि गुलाम आहेत.

घरकाम ही स्त्रियांची जबाबदारी मानली जाते. त्याच्या मोबदल्याचा विचारच केला जात नाही. पण याच कामाला बाजारमूल्य मिळते, तेव्हा ते पुरुषाचे होते. अर्थव्यवस्थेत स्त्रियांच्या घरकामाचा वाटा वार्षिक १०.८ ट्रिलियन डॉलर्स इतका आहे, हे किती स्त्रियांना माहीत आहे? जागतिक पातळीवर ही रक्कम जीडीपीच्या १३ टक्के तर भारतातील जीडीपीमध्ये त्यांचा वाटा ३६ टक्के आहे !

सध्या तरी, संगोपन आणि शुश्रूषेच्या कौटुंबिक कार्यात स्त्रियाच केंद्रस्थानी राहणार आहेत. स्त्रियांनी मानवी नातेसंबंध टिकवून समाजाला एकत्र बांधून ठेवले आहे. पण स्त्रियांचा आदर केवळ शाब्दिक आहे. स्त्रीला देवी, माता म्हणून तिचा आदर करण्यापेक्षा बरोबरीचा माणूस म्हणून तिला सन्मान मिळायला हवा. संगोपन आणि संर्वधनाची जबाबदारी केवळ स्त्रियांवर न ढकलता हे कार्य सामूहिक आणि सामाजिक जबाबदारीचे मानले गेले पाहिजे.

स्त्रियांना वेळेचे स्वातंत्र्य हवे. कारण, १६६७ ते २०१२ या कालावधील ७२ देशांमध्ये स्त्रिया आणि पुरुष यांच्यामध्ये घरकामात व्यतीत होणाऱ्या वेळेत सात मिनिटांचा फरक पडला. या दराने स्त्री-पुरुषांतील ही तफावत संपण्यासाठी आणखी २१० वर्षे वाट पहावी लागेल. त्यामुळे स्त्रियांच्या शैक्षणिक, आर्थिक आणि मानसिक विकासाला आणि मनोरंजनाला मोकळा हक्काचा वेळ मिळाला पाहिजे!

१५ वर्षांहून अधिक वयाच्या स्त्रियांचा २०१८ मध्ये नोकरीतील सहभाग केवळ २४.५ टक्के होता. तर पुरुषाच्या सहभागाचे प्रमाण ७५.५ टक्के होते. स्त्रियांचा शिक्षणातील सहभाग वाढत असताना नोकरीतील त्यांचे प्रमाण घटत आहे. २००४ मध्ये ते ३१ टक्के होते. २०११ मध्ये ते २४ टक्के झाले. खासकरून २५ ते ३४ वयोगटात ही घट जास्त आहे. एकाच प्रकारचे काम करणाऱ्यांची तुलना केल्यास पुरुषाच्या तुलनेत स्त्रियांची कमाई २५ टक्क्यांनी कमी आहे.

स्त्री-पुरुषांचे नातेसंबंध समान पातळीवर आणण्यासाठी, घरकामासंदर्भात सरकारने आवश्यक कायदेशीर, आर्थिक उपाययोजना आणि यंत्रणेची उभारणी केली पाहिजे. जगभरात याविषयी गांभीर्याने विचार केला जात आहे. घरकामाच्या माध्यमातून स्त्रिया अर्थव्यवस्थेत ४० टक्के योगदान देतात हे लक्षात घेऊन भरपाई म्हणून त्यांना ‘मासिक मानधन’ देण्याचा विचार जगात पुढे आला. इतर भांडवली गरजेची चर्चा तूर्तास नको… पण लाडकी बहीण म्हणून १५०० रु. देणारे सरकार स्त्रियांवर उपकार करत नाही. उलट ही त्यांच्या लुटीची, हक्काची तटपुंजी रक्क्म परत करत आहे. त्यासाठी लाचार होण्याची किंवा उपकार मानण्याची गरज नाही. हे भोळ्या स्त्रियांना कोण सांगणार ?

युरोप, लॅटिन अमेरिका इ. ठिकाणी स्त्रियांना मुक्त वेळ आणि विकासाला संधी देण्यासाठी विविध ‘केअर अॅक्ट’ करण्यात आले आहेत. त्याअंतर्गत मोफत आरोग्य विमा, बाल संगोपन, मतिमंद आणि वृद्ध शुश्रूषा सेवा देण्यासाठी खास ‘संगोपन केंद्रे’ सुरू करण्यात आली आहेत. प्रत्येक मोहल्ला आणि खेड्यात अशा केंद्रात आहारतज्ज्ञ, डॉक्टर, नर्स, शिक्षक, मानसोपचारतज्ज्ञ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण, नोकरी यासाठी जाणाऱ्या किंवा घरकाम करणाऱ्या स्त्रिया लहान मुलांना, वृद्ध किंवा आजारी माणसांना येथे सोपवून चिंतेविना जाऊ किंवा जगू शकतात. जगात सुरू असलेल्या या गोष्टीचा आपल्या राजकारण्यांना अजून पत्ता नाही. हिंदू-मुसलमान गाय, गोबर, मंगळसूत्र यावर भाषणे देऊन वेळ मिळाला तरी ते यावर विचार करणार नाहीत. स्त्रिया स्वत:च शहाण्या होऊन आपल्या हक्कांबद्दल, विकासाबद्दल बोलायला लागतील, तोच लोकशाही सुरू होण्याचा दिवस असेल. humayunmursal@gmail.com

Story img Loader