डॉ. राजेंद्र डोळके
अर्ध्या मानवजातीला मानवांचेच गुलाम करणारा ‘मनुस्मृती’ हा एका दृष्टीने भांडवलशाहीचे समर्थन करणारा प्राचीन ग्रंथ आहे. तो जाळून टाकला पाहिजे असे महात्मा फुले यांनी म्हटले होते. २५ डिसेंबर १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले यांची इच्छा पूर्ण केली. त्यानंतरही मनुस्मृतीदहनाचे प्रकार अधूनमधून घडत राहिले.

श्रुती (म्हणजे वेदग्रंथ), स्मृती, पुराणे वगैरेंना हिंदू हे आपले धर्मग्रंथ मानतात. यातील वेदग्रंथांचा काळ हा साधारणत: पाच हजार वर्षांपूर्वीचा तर स्मृतिग्रंथांचा काळ हा दोन-सव्वादोन हजार वर्षांपूर्वीचा समजला जातो. स्मृतिग्रंथ अनेक आहेत. पण या सर्वात ‘मनुस्मृती’ अत्यंत महत्त्वाची, श्रेष्ठ आणि पवित्र मानली जात असे. मनूचा निर्देश करताना अनेक ग्रंथकारांनी त्याला भगवान, प्रभू इत्यादी ईश्वरतुल्य विशेषणे लावली आहेत.

uma badve s swalekhan App
‘स्वलेखन’ ॲपद्वारे दृष्टीहिनांना डिजिटल युगाचे दार खुले करणाऱ्या उमा बडवे
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Babasaheb Ambedkar, Shyam Manav,
आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक पुत्र आणि ते…
Jagan Mohan reddy
Tirupati Laddu Row : “…तर दूरगामी परिणाम होतील”, लाडूप्रकरणावरून जगनमोहन रेड्डींनी पंतप्रधानांना पत्र लिहित व्यक्त केली भीती
loksatta chaturang Happiness Thomas Hobbes philosophy advertisers
जिंकावे नि जगावे : आनंदाचे डोही
gibbon monkey dance marathi news
विश्लेषण: गिबन माकड जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी चक्क नृत्य करते? काय सांगते नवे संशोधन?
Sarsangchalak Dr Mohan Bhagwat presented his views on Hinduism
‘हे खा’, ‘ते खा’ सांगणे म्हणजे धर्म नव्हे, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे मत
How to look at Manusmriti and the Caste System
Manusmriti and the Caste System मनुस्मृती आणि जातिव्यवस्थेकडे कसे पाहावे? देवदत्त पट्टनायक यांच्यासह भारतीय संस्कृती आणि कलेचा घेतलेला आढावा!

मनुस्मृतीचा अभ्यास आणि त्याचे विश्लेषण करणे हा खरे तर एक जन्मभराचा उद्याोग होऊ शकतो. एका लेखात त्यावर प्रकाश टाकणे शक्य नसले तरी तसेच करणे भाग आहे. हे विवेचन करताना माझ्यासमोर मनुस्मृतीच्या भाषांतरित आवृत्तीत फार महत्त्वाची असलेली मुकुंद गणेश मिरजकर यांनी भाषांतरित केलेली आणि चित्रशाळा प्रेस, पुणे यांनी इ.स. १९२७ साली प्रसिद्ध केलेली अत्यंत दुर्मीळ आणि जीर्ण प्रत आहे. त्या ग्रंथाचे १२ अध्याय असून श्लोकसंख्या आहे २६६२.

हेही वाचा >>>‘संपूर्ण क्रांती’ची ५० वर्षे

मनुस्मृतीत विषमतेचे समर्थन केले आहे, हे तर सर्वप्रसिद्धच आहे. पण ही विषमता कोणत्या थराची आहे, हे पाहिले की मन अचंबित होऊन जाते. ब्राह्मणांचे जन्मजात श्रेष्ठत्व वर्णन करताना तो म्हणतो-

ब्राह्मणो जायमानोही पृथिव्यामधिजायते

ईश्वर: सर्वभूतानां धर्मकोशस्य गुप्तये (१/९९)

ब्राह्मण हा जगामध्ये उपजतच सर्वांपेक्षा श्रेष्ठपणा पावतो. सर्व प्राण्यांच्या व धर्माच्या रक्षणाकरिता तो प्रभूच समजला जातो. दहा वर्षे वयाचा ब्राह्मण व शंभर वर्षे वयाचा क्षत्रिय असला तरी ब्राह्मण हा पित्याप्रमाणे व क्षत्रिय पुत्राप्रमाणे समजावा (२/१३५). चराचर वस्तूंमध्ये प्राणी श्रेष्ठ, त्यातही थोडा विचार करणारी पशूंची जाती, यामध्येही बुद्धीचा उपयोग करणारी मानव जाती व मानवजातीमध्येही ब्राह्मण जाती ही सर्वश्रेष्ठ समजली जाते (१/९६). धर्मशास्त्राचा अधिकार ब्राह्मणांच्याशिवाय इतर कुणालाही नाही (१/१०३). ब्राह्मण कुलीन असतो (१/१००). ब्राह्मण हा स्वार्थत्यागी व निर्वाहापुरतेच अन्नाछादन घेतो. ब्राह्मणांच्या कृपेमुळेच इतर वर्ण जगले आहेत असे समजावे (१/१०१). ब्राह्मणाला भूमी, सोने, रुपे, घर, वस्त्र, अश्व, बैल, गाई, वाहन, शय्या इत्यादी दान करावे. राजाने जो नवा प्रदेश जिंकला त्या प्रदेशातील भूमी व द्रव्य ब्राह्मणाला दान देऊन तृप्त करावे. राजाने धनधान्य देऊन ब्राह्मणास संतुष्ट करावे (७/८२). जेव्हा तुम्ही इतर जातीच्या व्यक्तीस दान करता तेव्हा दानाचे फळ दानाइतके असते. पण केवळ नामधारी ब्राह्मणास जरी दान दिले तरी दानाचे फळ दानाच्या दुप्पट मिळते (७/८५). राज्याचे मंत्री ब्राह्मणच असावेत (७/५८). राज्यावर कितीही दुर्धर संकट आले तरी राजाने ब्राह्मणांवर कर लादू नये (७/१३३).

याप्रमाणे मनुस्मृतीतील हे सारे विवेचन हे ब्राह्मणांच्या अधिकारांचे आणि सोयीचे आहे. यापेक्षाही जास्त मती गुंग होते, ती भिन्न वर्णपरत्वे दिल्या जाणाऱ्या भिन्न दंड आणि शिक्षा पाहून!

मनुस्मृतीतील आठवा अध्याय हा सर्वात मोठा म्हणजे ४२० श्लोकांचा असून हा गुन्हे व शिक्षा यांना वाहिला आहे. यातील भिन्न वर्णपरत्वे भिन्न शिक्षा पाहा-

क्षत्रियाने ब्राह्मणाला चोर म्हटल्यास त्याला शंभर पण (दंड), वैश्याला दीडशे पण (दंड)आणि शूद्राला ताडन करावे (८/२६७). शूद्राने ब्राह्मणादी उच्च वर्णास अश्लील शब्दाने दुखवल्यास त्याचा जिव्हाच्छेद करावा (८/२७०). ‘‘निक्षेप्योऽयोमय: शङ् कुर्ज्वलभास्ये दशांगुल’’ म्हणजे शूद्राने ब्राह्मणाला जातीवरून शिव्या दिल्यास त्याच्या तोंडात तापवून लाल केलेला दहा बोटे लांबीचा खिळा घालावा (८/२७१). ‘‘तप्तमासेचयेत्तैलं वक्त्रस्े श्रोत्रे च पार्थिव:’’ (८/२७२). म्हणजे शूद्र उन्मत्तपणाने शिवीगाळ करून ब्राह्मणाला धर्मोपदेश करू लागल्यास राजाने त्याच्या तोंडात व कानात तापलेले तेल ओतावे. वैश्य व शूद्र यांचे भांडण झाल्यास वैश्याला प्रथम साहस व शूद्राला मध्यम साहस दंड करावा (८/२७७). शूद्राने ज्या अवयवाने वरिष्ठ जातीस ताडन केले ते अवयव छाटून टाकावे (८/२७९). ब्राह्मणादिकांवर हात किंवा काठी उगारल्यास हात कलम करावा (८/२८०). २८१, २८२, २८३ या श्लोकांत सांगितलेल्या शिक्षा इतक्या भयानक. अमानुष आणि निर्घृण आहेत की, त्या येथे उद्धृत कराव्याशा वाटत नाही.

हेही वाचा >>>नवे सरकार, नव्याने अपेक्षा!

मनू स्त्रियांनाही शूद्रतुल्य लेखतो आणि त्यांची अवमानित जीवनप्रणाली सांगतो. पाचव्या व नवव्या अध्यायांत याबद्दलचे विवेचन आले आहे. पती शीलरहित, गुणरहित व स्वेच्छाचारी असला तरी पत्नीने देवाप्रमाणे त्याची नेहमी शुश्रूषा करावी (५/१५४). पती वारला असता स्त्रीने स्वत:ला कृश करावे व परपुरुषाचे नावही उच्चारू नये (५/१५७). स्त्रियांनी घरातील कोणतेही कार्य स्वतंत्रपणे करू नये (५/१४७). लहानपणी वडिलांच्या, तरुणपणी पतीच्या आणि पती मृत झाल्यास मुलांच्या संमतीने वागावे. एकंदरीत स्त्रीने स्वतंत्रता स्वीकारू नये (५/१४८). स्त्रीने पतीनिधनानंतर ब्रह्मचारी असावे, परपुरुषाची इच्छा करू नये (५/१५८). मात्र पुरुष गृहस्थाश्रम पुढे चालिवण्याकरिता पुन्हा लग्न करू शकतो (५/१६८). स्त्रिया या असत्याप्रमाणे अशुभ असतात (९/१८). चंचल स्वभावाच्या आणि चटकन व्यभिचारी होणाऱ्या असतात (९/१५). निद्रा, आळशीपणा, अलंकारत्रियता, काम, क्रोध, वक्रता, द्रोह आणि दुराचार हे गुण मनूने निर्माणकालीच स्त्रियांना दिले आहेत (९/१७). या सर्व उदाहरणांवरून मनूचा स्त्रीविषयक दृष्टिकोन लक्षात येतो.

मनुस्मृतीतील ही उदाहरणे पाहिली की त्याने अर्ध्या मानवजातीला मानवांचेच गुलाम केले आहे असे लक्षात येते. अशाप्रकारची मानवांना पशुतुल्य वागणूक देणारे ग्रंथ म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या समतेच्या पुरस्कर्त्यांना सहन होणे शक्यच नव्हते. म्हणून म. फुले यांनी हा ग्रंथ जाळून टाकला पाहिजे असे म्हटले. आपल्या काव्यरचनेत ते म्हणतात, ‘‘बंधु आर्य राया दयावान व्हावा। जाळून टाकावा। मनुग्रंथ’’ (म. फुले समग्र वाङ्मय, संपा. कीर, मालशे, पृ ४६५). फुले यांची इच्छा पुढे डॉ. आंबेडकरांनी पूर्ण केली. त्यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी कुलाबा जिल्ह्यातील महाड या गावी रात्री ९ वा. मनुस्मृतीचे विधिपूर्वक दहन केले. पुढेही मनुस्मृती दहनाचे प्रकार अधूनमधून घडत राहिले. ‘मनुस्मृती का जाळली’ याबाबत त्यांनी आपली भूमिका दि. ३ फेब्रुवारी १९२८ च्या ‘बहिष्कृत भारता’त स्पष्ट केली आहे. ते लिहितात, ‘आम्ही जे मनुस्मृतीचे वाचन केले आहे त्यावरून आमची खात्री झाली आहे की, त्या ग्रंथात शूद्र जातीची निंदा करणारी, त्यांचा उपमर्द करणारी, कुटाळ उत्पत्तीचा कलंक त्यांच्या माथी मारणारी व त्यांच्याविषयी समाजात अनादर वाढवणारी वचने ओतप्रोत भरलेली आहेत. त्यात धर्माची धारणा नसून धर्माची विटंबना आहे. आणि समतेचा मागमूस नसून, असमतेची मात्र धुळवड घातली आहे. स्वयंनिर्णयाचे तत्त्व प्रस्थापित करावयास निघालेल्या सुधारणावाद्यांस असला ग्रंथ कधीच मान्य होणे शक्य नाही व तो अस्पृश्य वर्गासही मान्य नाही. एवढेच दर्शविण्याकरिता महाड येथे त्याची होळी करण्यात आली.’’

मनुस्मृतीचे सखोल चिंतन केल्यानंतर एक विचार मनात येतो की या ग्रंथाचा मार्क्सवादी दृष्टिकोनातून अभ्यास होणे आवश्यक आहे. धर्म, भांडवलदार, उत्पादनाची साधने, शोषित वर्ग वगैरेंचा अभ्यास मार्क्सवादात असतो. मनुस्मृतीत उच्चवर्णीयांची आणि सत्ताधाऱ्यांची आर्थिक स्थिती कशी संपन्न आणि सुरक्षित राहील यावरच प्रामुख्याने भर दिला आहे. एका दृष्टीने भांडवलशाहीचे समर्थन करणारा हा एक महत्त्वाचा प्राचीन ग्रंथ आहे. येथे शोषित वर्ग हा उच्चवर्णीय आणि सत्ताधाऱ्यांचा संपूर्णपणे अंकित आहे आणि हे सर्व धर्माच्या आड सुरू आहे. म्हणजे अशाप्रकारची समाजव्यवस्था असणे हेच समाजहितकारक म्हणजे धर्म्य आहे, असे यात सूचित केले आहे. भांडवलशाहीचे तात्त्विक विवेचन एकोणिसाव्या शतकात मार्क्सने केले आहे, असे समजण्याचे कारण नाही. आम्ही भारतीयांनीच कित्येक वर्षे अगोदर हा अभ्यास करून ठेवला आहे.

आज थेट अशीच स्थिती भारतात निर्माण झाली आहे, किंवा करण्यात आली आहे. एकीकडे देशातील बहुतांश संपत्तीचा भाग हा मूठभर भांडवलदारांच्या हातात एकवटला जात आहे, तर दुसरीकडे देशातील ८० कोटी जनतेला जगण्याकरिता मोफत रेशन दिले जात आहे. म्हणजे देशातील भांडवलदार किंवा अतिश्रीमंत वर्ग यांच्यात प्रचंड दरी निर्माण होत आहे. ज्यावेळी या देशातील गरिबांचा मोफत धान्य देण्याचा टेकू काढला जाईल, त्यावेळी ही दरी किती भयानक आणि अक्राळविक्राळ स्वरूप धारण करेल तसेच शोषित वर्गाची स्थिती किती दयनीय आणि लाचार होऊन जाईल याची कल्पनाही करवत नाही. साहजिकच मनुस्मृतीचे पुनरुज्जीवन करण्यामागे सामाजिक विषमतेचे समर्थन आणि मूठभर भांडवलदारांच्या हाती आर्थिक सत्तेचे एकीकरण, हे उद्देश आहेत हे लोकांनी ओळखायला हवे.

बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळल्यानंतर त्यांना ‘असले जुने बाड जाळण्यात काय अर्थ आहे?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बाबासाहेब म्हणाले, ‘‘मनुस्मृती हे एक जुने बाड आहे असे आमच्या मित्राप्रमाणे आम्हासही म्हणता आले असते तर आम्हास मोठाच आनंद झाला असता. परंतु दुर्दैवाने आम्हास तसे म्हणता येत नाही. मनुस्मृती ही जुनी जंत्री नसून चाली वहिवाटीत आहे. स्पृश्य लोक अजूनही मनुस्मृतीचे नियम पाळत आहेत.’’ (ब.भा. ३/२/१९२८). प्रा. नरहर कुरुंदकर यांनी आपल्या ‘मनुस्मृती : काही विचार’ या पुस्तकात मनुस्मृती दहनाला समर्थनीय ठरवले आहे (पृ. ९२). एवढेच नव्हे ‘तर ते दहन अपरिहार्य आणि आवश्यकही आहे’ असेही ते म्हणतात (पृ. १६०).

डॉ. आंबेडकर आणि प्रा. कुरुंदकर यांचे विचार योग्य नाहीत असे कोण म्हणेल?

rajendradolke@gmail.com