– डॉ. व्यंकटराव घोरपडे
राज्य सरकारने १७ मे २०२३ रोजीपासून पुन्हा एकदा ‘गोवर्धन गोवंश सेवा केंद्र’ योजनेत बदल करून नवीन योजना कार्यान्वित केली आहे. या निर्णयाला आज महिना पूर्ण होतो आहे. खरे तर राज्यात ४ मार्च २०१५ पासून संपूर्ण गोवंश कत्तलीवर बंदी घालण्यात आली. तेव्हापासून या विषयावर नेमकी उपाययोजना शोधण्याबाबत खूपच गोंधळ दिसून येतो. या विषयावर संबंधित एक तर मार्गदर्शन करताना दिसत नाहीत किंवा सदर विषय एका वेगळ्या दृष्टिकोनातून हाताळायचा असल्यामुळे शासकीय स्तरावर कुठल्याही तांत्रिक मार्गदर्शनाची गरज भासत नसावी. गोरक्षण आणि गोसेवा या विषयांचा आज अखेरचा प्रवास पाहिला तर ही बाब प्राकर्षाने लक्षात येते. राज्य सरकारने २६ एप्रिल २०१७ मध्ये राज्यस्तरीय योजनेअंतर्गत ‘गोवर्धन गोवंश सेवा केंद्र’ ही योजना सुरू केली. मुंबई व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता ३४ ग्रामीण जिल्ह्यांत ही योजना राबविण्यासाठी मंजुरी दिली. त्यानंतर पुन्हा सदर योजना रद्द करण्यात आली. नवीन सुधारित योजना तयार करून ती राबवण्यासाठी ८ मार्च २०१९ रोजी मान्यता देऊन सुधारित आदेश निर्गमित करण्यात आले. त्यानुसार सन २०१९-२० या आर्थिक वर्षात ३४ जिल्ह्यांतील १३९ महसुली उपविभागात राबविण्याबाबत सूचित केले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा