जतिन देसाई

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाकिस्तानात अल्पसंख्याकांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीबद्दल संयुक्त राष्ट्रांत (यूएन) आणि आंतरराष्ट्रीय समुदायात नेहमी चर्चा होत असते. पाकिस्तानात देखील उदारमतवादी, धार्मिक स्वातंत्र्यावर विश्वास ठेवणारे लोक अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अन्याय, अत्याचारांबद्दल चिंता व्यक्त करत असतात. एखाद्या देशात अल्पसंख्याकांना कशी वागणूक दिली जाते, यावरून त्या देशातील नागरिकांची मानसिकता स्पष्ट होते. २८ मार्च, ३० मार्च, १ एप्रिल आणि २ एप्रिलला पाकिस्तानात अल्पसंख्याक समाजातील चौघांची हत्या करण्यात आली.

३० मार्चला कराची शहरात डॉ. बिरबल गेनानी यांची हत्या करण्यात आली. ३१ मार्चला अशांत पेशावरमध्ये दयाल सिंग नावाच्या शीख दुकानदाराची हत्या झाली. १ एप्रिलला पेशावरमध्येच कासिफ मसीह नावाचा ख्रिस्ती कामगार घरी जात असताना त्याची हत्या करण्यात आली. २८ मार्चला सिंध प्रांतातील हैदराबादमध्ये डॉ. धर्म देव राठी यांची त्यांच्या वाहनचालकाने हत्या केली. चारही घटना सिंध आणि खैबर-पख्तुनख्वा प्रांतात घडल्या.

हेही वाचा >>>नीट पाहा… वाढत्या इंधनदरांची चिंता कोणाला?

पाकिस्तानात हिंदू समाज सुमारे २.१५ टक्के एवढा आहे आणि त्यातील बहुतेकजण सिंध प्रांतातील कराची, हैदराबाद, उमरकोट, थरपारकर, घोटकी येथे राहतात. एकेकाळी सिंधमध्ये सूफींचा प्रभाव होता. स्वतंत्र सिंधसाठी देखील जी. एम. सईद यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने झाली होती. अजूनही उमरकोट आणि थरपारकर जिल्ह्यांत हिंदू बहुसंख्याक आहेत. मात्र ते आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहेत. ते शेतमजुरी, सफाई किंवा तत्सम कामे करतात. अन्याय, अत्याचारांचा सर्वांत जास्त त्रास या प्रांतातील हिंदू महिलांना होतो. हिंदू मुलींचे धर्मांतर करून त्यांचा निकाह लावला जातो. २ एप्रिलला थर येथे निर्भव मेघवार नावाच्या हिंदू मुलीचे बळजबरीने धर्मांतर करून तिचा अल्ला दिनो नावाच्या व्यक्तीशी निकाह लावण्यात आला. धर्मांतर आणि निकाहच्या विरोधात हिंदू समाज आता आक्रमक झाला आहे. सिंध प्रांतात पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीचा (पीपीपी) प्रभाव असून तिथे याच पक्षाचे सरकार आहे.

सीमावर्ती प्रांतात दहशतीचा इतिहास

खैबर-पख्तुनख्वा प्रांतात तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) नावाच्या अतिरेकी संघटनेची दहशत आहे. तालिबानने काबूलवर कब्जा केल्यापासून खैबर-पख्तुनख्वा आणि बलुचिस्तान प्रांतात टीटीपीचे हल्ले वाढले आहेत. दररोज दोन-तीन ठिकाणी आत्मघाती हल्ले किंवा बॉम्बस्फोट होतात. सुरुवातीला तालिबानच्या मदतीने पाकिस्तानने टीटीपीशी शस्त्रविरामचा करार केला होता, पण काही महिन्यांतच टीटीपीने तो करार फेटाळून लावला. खैबर-पख्तुनख्वामध्ये पूर्वीपासूनच धर्माचा प्रभाव होता. अफगाणिस्तानात तालिबानने १९९६ मध्ये प्रथमच सत्ता काबीज केली आणि तेव्हापासून तेथे धर्मांधता सतत वाढत राहिली आहे. त्याची सुरुवात तालिबान १.० येण्यापूर्वीपासून झाली होती. डाव्या विचारांचे नजीबुल्ला तेव्हा अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष होते. सोव्हिएत रशियाकडून त्यांना लष्करीमदतीसह सर्व प्रकारची मदत मिळत होती.

हेही वाचा >>>शिक्षणाच्या मापात पाप?

तो शीतयुद्धाचा काळ होता. अमेरिकेच्या मदतीने पाकिस्तान तेव्हा नजीबुल्लांच्या विरोधातील मुजाहिदीनांना मदत करत असे. लाखो अफगाण नागरिकांनी खैबर-पख्तुनख्वा आणि बलुचिस्तानात आश्रय घेतला होता. नास्तिक नजीबुल्ला आणि सोव्हिएत लष्कराच्या विरोधात धर्माचा उपयोग करून मुजिहिदीनांना अफगाणिस्तानात ‘इस्लामच्या रक्षणासाठी’ पाठवले जात असे. मुजाहिदीनांनी १९९२ मध्ये काबूलवर विजय मिळवला होता. पेशावर एके काळी पुरोगामी विचारांचे शहर होते, मात्र पुढे त्याचे परिवर्तन कर्मठ आणि अशांत शहरात झाले. टीटीपी आणि इतर अतिरेकी संघटनांची या परिसरात दहशत आहे. अन्य धार्मिक संघटनांची त्यांना मदत होत असे. धर्मांधता वाढते तेव्हा सर्वाधिक नुकसान अल्पसंख्याक आणि महिलांचे होते, असा इतिहास आहे.

पेशावर शहरात आजही जवळपास १५ हजार शीख राहतात. खैबर-पख्तुनख्वा प्रांतात एकूण ३० हजार शिखांची वस्ती आहे. या भागातील शीख हे पश्तून शीख आहेत. त्यांची भाषा पश्तू आहे. बरेच जण दरी भाषेत देखील बोलतात. उर्दू ही राष्ट्रभाषा

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minorities were killed in pakistan questions raised about human rights in pakistan amy