सागर शिंदे

दर्शन सोळंकीसारख्या, सामान्य कुटुंबातून आलेल्या विद्यार्थ्यांचा जीव जातो ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. परंतु या घटनेचा तपास होईपर्यंत न थांबता काही संघटनांनी आपापला राजकीय अजेंडा रेटण्याची आणि व्यवस्था कशी दलितविरोधी आहे हे सिद्ध करण्याची घाई केली ते आता गप्प बसले आहेत, असा दावा करणारे टिपण..

issue of house of police and service colonies is stalled
व्यथा पोलिसांच्या : घर व सेवा वसाहतींचा प्रश्न रखडलेला
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Locals rage against minority students from Kerala in Trimbak
त्रिंबकमध्ये केरळच्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांविरुद्ध स्थानिकांचा रोष
chembur chawle fire
चेंबूरच्या आगीत माणुसकीही झाली खाक, चोरट्यांनी उद्ध्वस्त घरात डल्ला मारत १२ लाखांचा ऐवज चोरला
tanishk vice president arun narayan
‘नैसर्गिकच्या तुलनेत कृत्रिम हिऱ्यांना अनेकांगी मर्यादा’; तनिष्कचे उपाध्यक्ष अरुण नारायण यांचे प्रतिपादन
Sanjuba Secondary School
वाहनकोंडीमुळे ‘ संजुबा’च्या विद्यार्थ्यांना अपघाताचा धोका
womens drum, womens in drum corps,
ढोलपथकातल्या ‘तिची’ दुखरी बाजू…
Commercial Pilot License Holder ppl Cpl airplan career news
चौकट मोडताना: अनुभवानंतरचे शहाणपण

दर्शन सोळंकी मृत्यू प्रकरणात अरमान इकबाल खत्री या मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांला मुंबई पोलिसांनी अटक केल्याने या प्रकरणी हेतुपूर्वक दिशाभूल करणाऱ्या कम्युनिस्ट व अन्य संघटना व नेते तोंडावर आपटले आहेत आणि सध्या त्यांच्या गोटात शांतता पसरली आहे. 

‘आयआयटी मुंबई’त शिक्षण घेणारा हुशार असा १९ वर्षीय दलित विद्यार्थी दर्शन सोळंकी. ‘बी.टेक.’च्या प्रथम वर्षांला असणाऱ्या या युवकाने आत्महत्या करण्याची दुर्दैवी घटना १२ फेब्रुवारी रोजी घडली होती. या प्रकरणात राज्य सरकारने २८ फेब्रुवारी रोजीच राज्य पोलिसांच्या विशेष तपास पथकाची (‘एसआयटी’) नियुक्ती केलेली आहे, पोलीस तपासात वसतिगृहातील दर्शन सोळंकीच्या खोलीत एक चिठ्ठी (सुसाइड नोट) पोलिसांना सापडली. या चिठ्ठीमध्ये अरमान इकबाल खत्री याचा उल्लेख आहे. ‘‘अरमान हॅज किल्ड मी’’ (अरमानने मला मारले) असे दर्शनने लिहले होते. ते हस्ताक्षर दर्शन सोळंकीचेच असल्याचा निर्वाळा हस्ताक्षरतज्ज्ञांनी ७ एप्रिल रोजी दिलेला आहे. ‘अरमान व दर्शनचा वाद झाला होता, दर्शनने अरमानसंदर्भात धार्मिक टिप्पणी केली होती व अरमान इक्बाल खत्री या विद्यार्थ्यांने दर्शनला चाकूचा धाक दाखवत खुनाची धमकी दिली होती,’ असेही पोलीस तपासात समोर आल्याची माहिती प्रस्तुत लेखकाला मिळाली आहे.

हा नेमका वाद काय होता याचा सखोल तपास व्हायला पाहिजे व पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. या प्रकरणात ही नवीन माहिती समोर आल्याने या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे.

दर्शनच्या आत्महत्येनंतर आयआयटी मुंबईमधील ‘आंबेडकर फुले पेरियार स्टडी सर्कल (एपीपीएससी)’ तसेच स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) सारख्या कम्युनिस्ट संघटनांनी घटनेच्या पहिल्या दिवसापासून आरोप व प्रचार केला की, ही आत्महत्या नसून ‘संस्थात्मक खून’ आहे व ‘जातीय भेदभावामुळे’ ही घटना घडली आहे. याविषयी या संघटनांनी अनेक विद्यापीठांमध्ये आंदोलनेसुद्धा केली. या संघटनांनी आयोजित केलेल्या, ‘आयआयटी मुंबई’मध्ये झालेल्या सभेत एका युवकाने त्याच्या भाषणात अतिशय द्वेषपूर्ण, तेढ निर्माण करणारे पुढीलप्रमाणे विधान केले होते. ‘‘जब तक आप घर जाकर जय सियाराम बोलेंगे आपकी मानसिकता मे पूरी तरह से ब्राह्मण बँधा है, आप उसके चंगुल मे बँधे रहेंगे। आपको मानना पडेगा कि जब तक आप जय श्रीराम बोलेंगे, आपको जय क्षत्रिय जय ब्राह्मण जय वैश्य बोलना पडम्ेगा और थू शुद्र कहना पडम्ेगा, दलितवर्ग को नीचा दिखाना पडेगा।’’  या विधानाच्या विरोधात आयआयटीमधील एका संशोधक विद्यार्थ्यांने पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याची माहिती प्रस्तुत लेखकाकडे आहे.

कुटुंबाचीही दिशाभूल

एखाद्या दुर्दैवी घटनेचा कोणताही तपास न करता पहिल्या दिवसापासून त्याला जातीय रंग देणे किती योग्य आहे? दर्शन सोळंकीसोबत आत्महत्या करण्यापर्यंत जातीय भेदभाव झाला असेल तर त्याने आयआयटी प्रशासनाकडे त्या संदर्भात तक्रार का नाही केली? किंवा आयआयटीमध्ये कार्यान्वित असलेल्या अनुसूचित जाती, जमाती विभागाकडे (‘एससी/ एसटी सेल’कडे) तक्रार का नाही केली? किंवा कोणत्याही विद्यार्थी संघटनांकडेसुद्धा तक्रार केली नाही. हे साधे प्रश्न या संघटनांना का पडले नसतील? माजी राज्यसभा खासदार व मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर यांनी या प्रकरणी वृत्तपत्रात लेख लिहिला, पत्रकार परिषद घेतली व काही मागण्या केल्या होत्या. मुणगेकरांना या घटनेविषयी खोटी माहिती कोणी पुरवली? की त्यांनीच काही हेतूने तथ्यहीन विधाने केली? याचा जाब समाजाने विचारायला हवा.

या प्रकरणात ज्या संघटनांनी खोटी माहिती पसरवून समाजात जातीय तेढ व अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याचीसुद्धा चौकशी पोलिसांनी करायाला हवी. कोणतेही पुरावे हाती नसताना स्वत:चा अजेंडा रेटण्याचा यांचा प्रयत्न होता. या लोकांनी दर्शनच्या कुटुंबीयांचीसुद्धा दिशाभूल केली, असे प्रस्तुत लेखकाचे मत आहे. तथ्य बाहेर आल्यानंतर मात्र हे लोक गप्प आहेत.

एका विशिष्ट चष्म्यातून घटनांकडे पाहणे व घटनांना जातीय रंग देणे यात कम्युनिस्ट संघटना आघाडीवर राहिलेल्या आहेत. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या विद्यार्थ्यांचा जीव जातो ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. किती कष्ट करून हा मुलगा आयआयटीपर्यंत आला असेल, त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची खरी कारणे शोधण्याची थोडीसुद्धा तसदी हे लोक का घेत नाहीत? घटनेच्या पहिल्या दिवशीच हेतुपूर्वक आरोप कोणत्या तथ्यांच्या आधारे करतात? किमान तपास होण्यापर्यंतसुद्धा संयम हे लोक बाळगू शकत नाहीत का?

‘आयआयटी मुंबई’ने या प्रकरणात अंतर्गत सत्यशोधन समिती नियुक्त केली होती. या समितीने ७९ व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या व अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालामध्ये त्यांनी काही निष्कर्ष मांडले. त्यात प्रामुख्याने त्यांनी म्हटले की, जातीय भेदभाव झाल्याच्या आरोपांत कोणतेही तथ्य आढळले नाही. तसेच दर्शनची शैक्षणिक प्रगती खालावली होती आणि त्यामुळे त्याने आत्महत्या केली असण्याची शक्यता आहे.

परंतु या समितीला सुसाइड नोट सापडली नव्हती. पोलिसांच्या विशेष तपास पथकाला तपासात दर्शनच्या खोलीमध्ये सुसाइड नोट सापडल्यामुळे या प्रकरणातील चित्र स्पष्ट झाले. आणि त्यामुळे आयआयटी मुंबईची सत्यशोधन समिती तथ्यापर्यंत पोहोचू शकली नाही आणि त्याचा अहवाल अर्धवट झाला असे म्हणता येईल.

दोष आहेत, पण संघटना उघडय़ा पडल्या!

या प्रकरणानंतर उच्च शिक्षण संस्थांमध्ये जातीय भेदभाव कसा चालतो, या संस्थांमध्ये ग्रामीण भागातून व वंचित घटकांमधून आलेल्या विद्यार्थ्यांना पुरेशा सोयीसुविधा कशा दिल्या जात नाहीत, विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य सुदृढ राहावे यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या जाव्यात, रॅगिंगविरोधात यंत्रणा हवी, अशा विषयांची चर्चा झाली. ‘आयआयटी मुंबई’मध्ये अनुसूचित जाती- जमाती सेल संस्थेने निर्माण केलेला आहे व त्याद्वारे विद्यार्थ्यांसाठी बरेच काम चालते असे समजले.

 तरीही व्यवस्थेमध्ये दोष नक्की आहेत त्यावर बोललेच पाहिजे, दोष दूर करण्यासाठी पर्याय सुचवला पाहिजे, समस्येवर काम केले पाहिजे. पण काही संघटना वा लोकांना फक्त आरोप करणे व व्यवस्था कशी दलितविरोधी आहे हे सिद्ध करण्याची घाई असते. रोहित वेमुला याच्या आत्महत्येची घटनासुद्धा यांनी अशीच मोठी करून वैचारिक अजेंडा राबवला. आता दर्शन सोळंकी घटनेमध्येसुद्धा त्यांचा असाच प्रयत्न होता पण योग्य पोलीस तपासामुळे या कम्युनिस्ट, विद्रोही संघटना उघडय़ा पडल्या आहेत.

दर्शन सोळंकीला न्याय मिळालाच पाहिजे. उच्च शिक्षण संस्थांमध्ये अनेक कारणांनी विद्यार्थी आत्महत्या करतात. या सर्व कारणांचा शोध घेऊन या संस्थांच्या मध्ये  कोणत्याही कारणांनी अशा दुर्दैवी घटना घडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत.

लेखक ‘विवेक विचार मंच, महाराष्ट्र’ या संघटनेचे राज्य संयोजक आहेत.

srshinde1@gmail.com