मुकेश चंद्राकर हा तरुण पत्रकार १ जानेवारी २०२५ रोजी घरी परतला नाही. त्याच्या भावाने तो बेपत्ता झाल्याची पोलीस तक्रार २ तारखेला नोंदवली. मुकेश हा यूट्यूबच्या साह्याने पत्रकारिता करणारा. बस्तर परिसरातील प्रशासनाबद्दलच्या बातम्या देणारा. स्थानिक कंत्राटदार सुरेश चंद्राकर आणि त्यांच्या चुलत भावांकडून मुकेशच्या जिवाला धोका असल्याचे या तक्रारीत म्हटले होते. त्यानंतर दोन दिवसांनी, मुकेशचा मृतदेह सुरेश चंद्राकर यांच्या आवारातील सेप्टिक टँकमध्ये (मैला-टाकीत) सापडला. निर्घृण वार करून नंतर तो फेकला गेल्याचे प्राथमिक तपासात आढळल्याची बातमी जगभरच्या प्रसारमाध्यमांनी दिल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले. अखेर या गुन्ह्यातील प्रमुख संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे; पण मुद्दा सर्वच पत्रकारांच्या सुरक्षेचा आहे.
ग्रामीण भागात पत्रकारिता करणाऱ्यांसाठी राजकीय नेत्यांच्या विरोधात बातम्या देणे सोपे नसते. वस्तुनिष्ठ बातम्या देणारे पत्रकार अनेकांसाठी अडचणीचे असतात. हा काळ माहितीचा असल्यामुळे युद्धाची किंवा इतर महत्त्वाची बातमी लवकर वाचक, प्रेक्षकांकडे पोहोचविण्याचीही स्पर्धा असते. काही वेळा युद्धाचे वृत्तांकन करताना पत्रकार मारले जातात. लष्करशाही किंवा हुकूमशाही असलेल्या देशांत किंवा धर्म-आधारित राज्यव्यवस्था असलेल्या देशांत वस्तुनिष्ठ पत्रकारिता जवळपास नसते. अशा देशांत वस्तुनिष्ठ पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सर्रास तुरुंगांत डांबले जाते, हत्याही होतात. गेल्या वर्षी जगात १४ महिलांसह किमान १२२ पत्रकारांची हत्या करण्यात आली किंवा ते मारले गेले. इस्रायल-पॅलेस्टाइन, रशिया-युक्रेनमध्येही युद्ध सुरू आहे. त्या बातम्या देतानाही काही पत्रकार मारले गेले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा