बहुभाषाकोविद, राजकारणी आणि विद्वान पी.व्ही. नरसिंह राव हे भारतीय राजकारणातील ‘चाणक्य’ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात देशात दूरगामी आर्थिक सुधारणा सुरू झाल्या. १९९१ ते १९९६ या काळात त्यांनी देशाचे पंतप्रधानपद भूषवले. ते देशाचे पहिले दक्षिण भारतीय पंतप्रधान ठरले. पंतप्रधानपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे नेहरू-गांधी कुटुंबीयांव्यतिरिक्त ते पहिले काँग्रेस नेते ठरले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१९९० च्या दशकाच्या प्रारंभी त्यांनी भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढले. पंतप्रधान म्हणून त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात बाबरी मशीद पाडण्यात आली. त्यानंतर हिंदुत्ववादी शक्तींचा उदय झाला. तसेच तसेच नेहरू युगापासून सार्वजनिक क्षेत्रातील समाजवादाच्या दिशेने निघालेला देश नव्या आर्थिक बदलांच्या मार्गावर देश ठामपणे वळला. १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडली गेल्यानंतर त्यांनी आपल्या पांडित्य आणि राजकीय मुत्सद्देगिरीचे प्रदर्शन करून अस्खलित उर्दू भाषेत मुस्लिम धर्मगुरूंची समजूत काढली होती. या घटनेनंतर आठवडाभरातच त्यांनी आपल्या निवासस्थानी आयएएस अधिकाऱ्यांना संबोधित करताना भगवद्गीतेतील श्लोक उद्धृत केले.

हेही वाचा >>>हरित क्रांतीचे जनक एम एस स्वामिनाथन

पी. रंगराव यांचे सुपुत्र असलेल्या नरसिंह राव यांचा जन्म २८ जून १९२१ रोजी तत्कालीन अविभाजित आंध्र प्रदेशातील करीमनगर जिल्ह्यातील वांगारा गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण उस्मानिया, मुंबई आणि नागपूर विद्यापीठात झाले, तेथून त्यांनी बी.एस्सी आणि एलएलबी पदव्या संपादन केल्या. १९३८ मध्ये तत्कालीन निजाम सरकारने ‘वंदे मातरम’वर घातलेलया बंदीविरोधी आंदोलानातून त्यांनी राजकारणात पदार्पण केले.  १९८० च्या दशकात केंद्रात विविध काळात परराष्ट्र, संरक्षण आणि गृह ही महत्त्वाच्या विभागाची मंत्रिपदे त्यांनी भूषवली. राव राजकीय संन्यासाच्या विचारात असतानाच पंतप्रधान झाले. त्यांनी १९९१ च्या निवडणुका लढवल्या नव्हत्या. प्रसिद्धीच्या झोतापासूनही ते दूर होते. नवी दिल्लीत राहणेही त्यांनी कमी केले होते. त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतल्याचे सांगितले जाते. पण २१ मे १९९१ रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर राव हे काँग्रेस अध्यक्षपदाचे सर्वसहमतीचे उमेदवार बनले आणि निवडणुकीनंतर पंतप्रधानपदाचा मान त्यांना मिळाला.

१९९४ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्याशी वॉशिंग्टन येथे झालेल्या शिखर बैठकीनंतर राव यांच्या कार्यकाळात भारत-अमेरिका संबंध वेगाने वृद्धिंगत झाले. परराष्ट्र मंत्री म्हणून आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी क्षेत्रात आपला अनुभव पणाला लावला. जानेवारी १९८० मध्ये नवी दिल्लीत पार पडलेल्या संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संघटनेच्या तिसऱ्या परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. तसेच मार्च १९८० मध्ये न्यूयॉर्क येथे झालेल्या जी-७७ बैठकीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले.

हेही वाचा >>>माणसांत राहूनच ‘कोऽहम’चा शोध घेणारा लेखक… 

नरसिंह राव यांना संगीत, चित्रपट, नाटक आदी विविध क्षेत्रात रुची आणि गती होती. भारतीय तत्त्वज्ञान आणि संस्कृती, काल्पनिक आणि राजकीय लेखन, विविध भाषा शिकणे, तेलगु आणि हिंदी भाषेत कविता करणे आणि एकूणच साहित्याबाबत त्यांना विशेष रुची होती. त्यांनी ‘द इनसाइडर’ हे ७०० पानांचे अर्ध-आत्मचरित्र लिहिले, जे त्यांचे कट्टर-राजकीय प्रतिस्पर्धी पण जवळचे मित्र आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी प्रकाशित केले. हिंदीतील साहित्य रत्न असलेले राव मराठी, स्पॅनिशसह अनेक भाषांमध्ये पारंगत होते. राजीव गांधींपासून प्रेरणा घेऊन राव यांनी तंत्रज्ञान वेगाने आत्मसात केले होते. वयाची साठी ओलांडल्यानंतर ते संगणक पारंगत झाले. ज्या काळात बहुसंख्य राजकीय नेते संगणक साक्षरही नव्हते अशा वेळी ते तासनतास संगणकावर घालवत असत. नवोदय विद्यालय योजनेची कल्पना त्यांनीच दिली होती.  ज्ञानपीठने प्रकाशित केलेल्या विश्वनाथ सत्यनारायण यांच्या प्रसिध्द ‘‘वेयि पडगलु’’ या तेलगू कादंबरीचा ‘‘सहस्त्रफन’’ हा हिंदी अनुवाद तसेच केंद्रीय साहित्य अकादमीने प्रकाशित केलेल्या ‘‘पण लक्षात कोण घेतो’’ या हरि नारायण आपटे यांच्या प्रसिध्द कादंबरीचे ‘‘अबला जीवितम्’’ हा तेलगू अनुवाद त्यांनी समर्थपणे केला. मराठीतील अनेक उत्तम साहित्याचा त्यांनी तेलगू भाषेत तसेच तेलगू साहित्याचा हिंदी भाषेत अनुवाद केला.