नरेंद्र मोदी, पंतप्रधान

ख्यातनाम उद्याोगपती, कार्यतत्पर समाजसेवी आणि संवेदनशील प्राणिप्रेमी असलेले रतन टाटा यांचे जाणे समस्त भारतीयांसाठी चटका लावणारे होते. टाटा यांच्या निधनाला आज, ९ नोव्हेंबर रोजी एक महिना पूर्ण होत आहे. त्याचनिमित्ताने टाटा यांच्या कार्यकर्तृत्वाला आणि व्यक्तिमत्त्वाला आदरांजली वाहणारा पंतप्रधानांचा हा विशेष लेख.

Loksatta editorial on Donald Trump unique campaign in us presidential election
अग्रलेख: ‘तो’ आणि ‘त्या’!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
indians want to move abroad indians want opportunity to leave India
भारतीयांना भारत सोडण्याची संधी का हवी असते?
Loksatta editorial Donald Trump victory in the US presidential election
अग्रलेख: अनर्थामागील अर्थ!
loksatta editorial Supreme court verdict on madrasa
अग्रलेख: मदरसे ‘कबूल’
Loksatta editorial about investment decline in Maharashtra
अग्रलेख: महाराष्ट्र मंदावू लागला…
world eyes on donald trump dealing with big tech during his second term of us president
बलाढ्य टेक कंपन्यांसाठी ट्रम्प यांच्या विजयाचा अर्थ काय ?

श्री. रतन टाटाजी आपल्याला सोडून गेले त्याला एक महिना झाला आहे. गजबजलेल्या शहरांपासून ते छोटी शहरे, अगदी गावांपर्यंत, समाजातल्या प्रत्येक क्षेत्रात त्यांची उणीव तीव्रतेने जाणवत आहे. प्रस्थापित उद्याोगपती, होतकरू उद्याोजक आणि मेहनती व्यावसायिक सर्वांनीच त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पर्यावरणाप्रति सजगता आणि परोपकाराला वाहून घेतलेल्या प्रत्येकालाही तितकेच दु:ख झाले. देशाला तर टाटा यांची अनुपस्थिती तीव्रतेने जाणवली, त्याचबरोबर जगालाही ती जाणवली.

युवकांसाठी रतन टाटा प्रेरणास्थान होते. स्वप्ने ही साकारायची असतात, करुणा आणि विनम्रता बाळगत यश साध्य होऊ शकते, याचे स्मरण रतन टाटा करून देतात. भारतीय उद्याोजकतेची सर्वोत्तम परंपरा त्यांनी रुजवली आणि प्रामाणिकपणा, उत्कृष्ट दर्जा आणि सेवा या मूल्यांप्रति ते कायम ठाम राहिले. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने आदर, सचोटी आणि विश्वासार्हता जपत जगभरात नवी शिखरे गाठली. तरीही अतिशय विनम्रतेने आणि दयाळूपणे त्यांनी हे यश स्वीकारले.

हेही वाचा >>>भारतीयांना भारत सोडण्याची संधी का हवी असते?

इतरांची स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी त्यांना पाठबळ देणे, हा टाटा यांच्यातील आणखी एक अनोखा गुण होता. अलीकडच्या वर्षात भारताच्या स्टार्ट अप परिसंस्थेचे मार्गदर्शक म्हणून ते ओळखले जात असत. अनेक आशादायी प्रकल्पांमध्ये त्यांनी गुंतवणूक केली. युवा उद्याोजकांच्या आशा- आकांक्षा त्यांनी जाणल्या आणि भारताच्या भविष्याला आकार देण्याची त्यांची क्षमता ओळखली. अशा युवांना पाठबळ देत धाडस आणि पूर्ण क्षमतेनिशी काम करण्यासाठी अशी स्वप्ने पाहणाऱ्या पिढीला त्यांनी सबल केले. यातून नवोन्मेष आणि उद्याोजकतेची संस्कृती निर्माण होण्यासाठी मोठी मदत झाली आणि याचा सकारात्मक प्रभाव येणाऱ्या अनेक दशकांमध्ये कायम राहील याचा मला विश्वास आहे.

त्यांनी नेहमीच सर्वोत्कृष्टतेचा पुरस्कार केला आणि भारतीय उद्याोगाने जागतिक मापदंड स्थापित करण्याचा आग्रह ठेवला. हा दृष्टिकोन भारताला, जागतिक तोडीची गुणवत्ता बनवण्यासाठी आपल्या भावी उद्याोजकांना प्रेरणा देत राहील याचा मला विश्वास आहे.

बोर्डरूम किंवा सहकाऱ्यांपुरतेच टाटा यांचे थोरत्व मर्यादित नव्हते. सर्व मानवतेप्रति त्यांची परोपकारी दृष्टी होती. प्राण्यांप्रति त्यांचा दयाळूपणा सर्वपरिचित आहे, प्राण्यांच्या कल्याणासाठीच्या प्रत्येक प्रयत्नाला त्यांचे सहकार्य राहिले. एखाद्या व्यवसाय प्रकल्पाप्रमाणेच त्यांच्या जीवनाचा भाग बनलेल्या त्यांच्या श्वानाचे फोटो ते अनेकदा सामायिक करत. एखाद्याचं नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व केवळ त्याच्या कामगिरीनेच नव्हे तर दुर्बलांची काळजी घेण्याच्या क्षमतेने मापले जाते, याचे स्मरण टाटा यांच्या जीवन परिचयातून होते.

देशावर आलेल्या संकटांच्या काळात रतन टाटा यांची देशभक्ती अधिक प्रखर आणि तेजस्वी ठरली होती. २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईतील प्रतिष्ठित ताज हॉटेल झपाट्याने उघडण्याची त्यांची कृती म्हणजे भारत दहशतवादापुढे न झुकता एकजुटीने उभा आहे, हा संदेश संपूर्ण राष्ट्राला देऊन गेली.

हेही वाचा >>>महाशक्तीचं स्वप्न पाहणाऱ्या देशात एवढी ‘पडझड’ का होतेय?

व्यक्तिगतरीत्या मला अनेक वर्षांपासून त्यांना जवळून जाणून घेण्याचा विशेषाधिकार मिळाला. आम्ही गुजरातमध्ये जवळून काम केले, जिथे त्यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली, यातील अनेक प्रकल्पांवर त्यांचा खूप जीव होता. काही आठवड्यांपूर्वी, मी स्पेन सरकारचे अध्यक्ष श्री. पेड्रो सांचेझ यांच्यासमवेत वडोदरा येथे होतो आणि आम्ही संयुक्तपणे एका विमान संकुलाचे उद्घाटन केले जेथे सी-295 विमाने भारतात बनवली जातील. रतन टाटा यांनीच यावर काम सुरू केले होते. त्यावेळी रतन टाटा यांची अनुपस्थिती आम्हाला फारच जाणवली हे वेगळे सांगायला नको.

मला रतन टाटाजी हे पत्रलेखक म्हणूनही स्मरणात आहेत – ते वारंवार मला निरनिराळ्या मुद्द्यांवर पत्र लिहित असत, मग ते प्रशासनाचे विषय असोत, सरकारच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे असो किंवा निवडणूक विजयानंतर अभिनंदनाच्या शुभेच्छा असोत.

जेव्हा मी केंद्र सरकारमध्ये गेलो तेव्हाही आमचा निकटचा संवाद कायम राहिला आणि ते आमच्या राष्ट्र उभारणीच्या प्रयत्नांमधील एक वचनबद्ध भागीदार राहिले. रतन टाटा यांनी स्वच्छ भारत मिशनला दिलेला पाठिंबा विशेषत्वाने माझ्या हृदयाच्या जवळ होता. भारताच्या प्रगतीसाठी स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता आणि साफसफाई अत्यावश्यक आहे हे समजून ते या लोकचळवळीचे मौखिक पुरस्कर्ते बनले. ऑक्टोबरच्या सुरुवातीला स्वच्छ भारत मिशनच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त त्यांनी दिलेला मनस्वी व्हिडीओ संदेश मला अजूनही आठवतो. हे त्यांच्या काही शेवटच्या सार्वजनिक दर्शनांपैकी एक होते.

त्यांच्या हृदयाच्या जवळची आणखी एक बाब म्हणजे आरोग्यसेवा आणि विशेषत: कर्करोगाविरुद्धची लढाई. मला दोन वर्षांपूर्वीचा आसाममधील कार्यक्रम आठवतो, जिथे आम्ही राज्यातील विविध कर्करोग रुग्णालयांचे संयुक्तपणे उद्घाटन केले होते. त्यावेळच्या त्यांच्या टिप्पण्यांमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, त्यांना त्यांची शेवटची वर्षे आरोग्यसेवेसाठी समर्पित करायची आहेत. आरोग्य आणि कर्करोग सेवा सुलभ आणि परवडण्याजोगी बनवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे मूळ हे त्या रोगांशी लढा देत असलेल्या रुग्णांबद्दलच्या खोल सहानुभूतीमध्ये होते, समाजातील सर्वात दुर्बळांच्या/असुरक्षितांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हेच न्याय्य असल्याचा त्यांना विश्वास होता.

आज जेव्हा आपण त्यांची आठवण काढतो, तेव्हा आपल्याला त्यांनी कल्पिलेल्या समाजाची आठवण होते- जिथे व्यवसाय हा भल्यासाठी असणारी एक शक्ती म्हणून काम करू शकतो, जिथे प्रत्येक व्यक्तीच्या क्षमतेचे मूल्य असते आणि जिथे प्रगती ही सर्वांच्या कल्याण आणि आनंदात मोजली जाते. त्यांनी स्पर्श केलेल्या जीवनात आणि त्यांनी जोपासलेल्या स्वप्नांमध्ये ते चिरायू आहेत. भारताला एक चांगले, दयाळू आणि अधिक आशादायी ठिकाण बनवल्याबद्दल पुढच्या पिढ्या त्यांच्या कृतज्ञ असतील.

Story img Loader