मुकुंद टाकसाळे

गेली काही वर्ष महाराष्ट्राचं राजकारण अक्षरशः रसातळाला गेलेलं आहे. इडी, सीबीआय, निवडणूक आयोग या सरकारी स्वायत्त संस्थांचाही यात मोलाचा वाटा आहे. इडीचा धाकधपट‘शहा’ दाखवून घाऊक प्रमाणात पक्षांतरं घडवून आणणं, विरोधी पक्ष नामशेष करणं, काल ज्याला भ्रष्टाचारी म्हणाले, त्याला आज मंत्रीपद देणं, हे नरेंद्र-देवेंद्र कंपनीचं बॅण्डेड वॉशिंग मशीन महाराष्ट्रात नुसतं गरगर फिरत होतं, आजही फिरतं आहे. या धांदलीत महाराष्ट्राची वाट लागली, इथले उद्योगधंदे मोदी-शहांनी मुख्यमंत्री एकनाथ आणि उपमुख्यमंत्री दोन नाथ यांच्या नाकाखालून गुजरातमध्ये पळवले. एका अर्थानं संयुक्त महाराष्ट्र चळवळीची मोदी शहांनी इथल्याच राजकारण्यांना हाताशी धरून केलेली ही परतफेड मानता येईल.

हे सारं डोळ्यांसमोर दिसत असताना भाजपचा इलेक्ट्रॉल बॉण्डचा भ्रष्टाचार उघडकीस आला. तो अचाटच होता. तशात तरुणांना रोजगार नाही. आणि वक्ता म्हणून मोदींनी तोंड उघडलं रे उघडलं की हिंदू मुस्लीम, शहजादे, पाकिस्तान, काँग्रेसच्या काळात… याखेरीज दुसरी बात नाही. लोकांना कंटाळा येईपर्यंत तीच ती रेकॉर्ड ऐकवत राहायचं. यात आपण पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवतो याचंही त्यांना भान नाही. या साऱ्या गोष्टी सुशिक्षित नागरिकांच्या मनात खदखदत असताना बोलायला व्यासपीठ हवं होतं. पण बोलणार कुठं? ना ‘गोदी मिडिया’त, ना वर्तमानपत्रांत. आख्ख्या रेल्वेगाड्या मोदींच्या चेहऱ्याने जाहिरातलेल्या आणि विरोधी पक्षांचे नेते इडीच्या मदतीने तुरुंगात टाकलेले… हे सारं सुजाण नागरिकांना समजत नव्हतं, असं थोडंच आहे? पण बोलायचं कुठं?

Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
controversial statements by bjp union minister
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानांमुळे वाद; विरोधकांच्या टीकेनंतर सुरेश गोपी यांची सारवासारव
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Former MP Vinayak Raut criticizes Industries Minister Uday Samant in ratnagiri
“भाजप नेत्यांची गद्दारांना जागा दाखवायला सुरवात”, उद्योगमंत्री उदय सामंतांवर माजी खासदार विनायक राऊत यांची सडकून टीका

हेही वाचा…मतदान केंद्राध्यक्ष म्हणून काम करताना…

या अघोषित आणीबाणीच्या काळात पुण्यात साधारणतः चार महिन्यांपूर्वी काही सुजाण नागरिक एकत्र आले. भीतीच्या या वातावरणात आवाज उठवायला हवा, हे साऱ्यांच्याच मनात होतं. पण मार्ग सापडत नव्हता. लोकांना वस्तुस्थितीची नीट जाणीव करून द्यायची तर महाराष्ट्रातल्या गावागावात हिंडलं पाहिजे. त्यांच्यासमोर विचार मांडले पाहिजेत. काही जण म्हणत होते की हिंडण्यापेक्षा पुण्या- मुंबईतच व्हिडिओ करू. पण त्यातल्या दोघांना असं वाटत होतं की आपण स्वतः लोकांकडे जाऊन त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. विश्वंभर चौधरी आणि ॲडव्होकेट असीम सरोदे या दोघांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आख्ख्या महाराष्ट्रात हिंडून तब्बल (हा लेख लिहीत असताना) ६८ सभा घेतल्या. (त्या किती प्रभावी झाल्या हे आपल्याला यूट्युबवरील व्हिडीओ पाहताना लक्षात येतं.) सुरुवातीला ते पदरमोड करून एखाद्या गावी जायचे. पहिली सभा नगरला झाली तेव्हा समोर फक्त ५० माणसं होती. सुरुवातीच्या सभेला असा कोमट प्रतिसाद मिळाला होता. पण नंतर मात्र त्यांच्या ‘निर्भय बनो’ला हजारोंच्या संख्येने प्रतिसाद मिळू लागला. त्यांनी व्हॉटस्ऍप ग्रुप स्थापन केला. त्यावर गावोगावच्या नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. या दोघांना ते नागरिक आपापल्या गावी सभा घेण्यासाठी आमंत्रणं देऊ लागले. एक हजार रुपयाच्यावर कुणाकडूनही देणगी स्वीकारायची नाही, असा त्यांचा नियम आहे.

ॲड. असीम सरोदे यासंदर्भात बोलताना म्हणाले, ‘निर्भय बनो’ ही कल्पना गांधीजींची, हे शब्दही गांधीजींचे. बिहारमध्ये निळीचा सत्त्याग्रह झाला तेव्हा तिथं गांधीजी गेले होते. त्यांनी शेतकऱ्यांना ब्रिटिशांशी धीटपणे कसं लढायचं ते शिकवलं. त्या सत्याग्रहानंतर ते शेतकरी गांधीजींना म्हणाले, ‘आमचे अजूनही प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी तुम्ही इथंच आमच्याबरोबर राहा.’ त्यावर गांधीजींनी त्यांना म्हणाले, ‘तुमचे प्रश्न तुम्हीच सोडवायचे आहेत.’ गांधीजींनी अहिंसेची लढाई करून कसा विजय मिळवता येतो, हे त्यांना समजावून सांगितले.

असीम सरोदे पुढे म्हणाले, “इंदिरा गांधींनी जेव्हा आणीबाणी आणली तेव्हा जयप्रकाश नारायण यांनी हाच मंत्र दिला ‘निर्भय बनो.’ माझे वडील त्यावेळी आणीबाणीविरुद्धच्या लढ्यात सहभागी होऊन १४ महिने तिहारच्या तुरुंगात गेले होते. आजही देशावर, लोकशाहीवर, डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या ‘घटने’वर म्हणजे संविधानावर संकट येते आहे, असे दिसल्यानंतर मला प्रथम हाच मंत्र मनात आला ‘निर्भय बनो.’ गांधीजींनी भारतातल्या सर्वसामान्य माणसाला प्रचंड ताकदीच्या इंग्रज सरकारविरुद्ध लढण्याचा हाच मंत्र दिला ‘निर्भय बनो.’ आज भारताला – हुकुमशाहीचा धोका असताना आपल्याला ‘निर्भय बनो’ हीच चळवळ पुन्हा हाती घ्यावी लागणार, असं आम्हाला वाटलं आणि आम्ही आमच्या या छोट्या चळवळीला ‘निर्भय बनो’ हे नाव देऊन आमचं नातं गांधीजी, बाबासाहेब आंबेडकर, गाडगेबाबा यांच्याशी सांगितलं.’

हेही वाचा…महिला मतदार ‘संविधानाची देणगी’ राखणार का?

खरं तर एकेकाळी राजकीय, सामाजिक चळवळींचं नेतृत्व करणारा मध्यमवर्ग आता एकूण चळवळींपासूनच खूप दूर गेला आहे. बसल्या जागेवरून व्हॉटस्ऍपवर किंवा फेसबुकवर ‘सारे राजकारणी चोर आहेत,’, ‘सारे एकाच माळेचे मणी’ असली ढोबळ सिनिक मतं मांडून स्वस्थ बसून राहणाऱ्या, सतत नकारात्मक भूमिका घेणाऱ्या मध्यमवर्गाला त्याच सोशल मिडियाचा योग्य तो वापर करून भूमिका घ्यायला भाग पाडण्यात ही चळवळ यशस्वी ठरू पाहते आहे.

अर्थात भाजपला या सभांचीसुध्दा भीती वाटू लागली आहे. पुणे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पुण्यात ‘या चार टाळक्यांची सभा आम्ही होऊ देणार नाही’, असं अगोदरच जाहीर केलं होतं. विश्वंभर चौधरी, असीम सरोदे, निखिल वागळे यांना सभास्थानी घेऊन येणाऱ्या गाडीवर त्यांनी हिंसक हल्ला केला. गाडीची मोडतोड केली, काचा फोडल्या. पोलिसांनी या प्रसंगी बघ्याची भूमिका घेतली. पण या हल्ल्याला धैर्याने तोंड देऊन हे तिघेही वक्ते उशिरा का होईना सभास्थानी आले आणि त्यांनी निर्भयपणे हुकुमशाहीला विरोध करणारी भाषणं दिली. उशीर झाला तरी लोक हजारोंच्या संख्येने सभास्थानी बसून होते आणि त्यांची भाषणं ऐकायला उत्सुक होते. त्यांचा या तिघांनाही मनापासून पाठिंबा होता. सिन्नरला विश्वंभर चौधरी एका व्याख्यानमालेत बोलत होते. त्यांची सभा तिथल्या भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मध्येच येऊन बंद पाडली. ही सभा या प्रकारे बंद पडायला नको होती, असं वाटणारा मोठा वर्ग सिन्नरमध्ये होता. सिन्नरच्या या विचारी नागरिकांनी विश्वंभर चौधरी यांना काही दिवसांनी पुन्हा भाषणासाठी बोलावलं आणि लोकांच्या प्रचंड उपस्थितीत दुसरी सभा यशस्वी करवून दाखवली. अशा रितीनं आता लोकांनीच ‘निर्भय बनो’ ही चळवळ आपल्या हाती घेतलेली आहे आणि ती ती पुढं नेत आहेत. हे फक्त महाराष्ट्रात घडतं आहे, असं नाही. कर्नाटकात तर सर्व नागरी समाज संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी कर्नाटकातील राजकीय आणि सामाजिक चित्र पूर्णपणे बदलून टाकलं. महाराष्ट्रातही ‘निर्भय बनो’ आता तोच कित्ता गिरवू पाहत आहे.

मतदारांच्या विवेकशक्तीला व विचारशक्तीला आवाहन करण्यासाठी आणि त्यांना संविधानिक सत्य समजून देण्यासाठी या सभा आहेत. चौधरी-सरोदे हे विनोबांना मानत असले तरी सर्वोदयाच्या विचारधारेत अभिप्रेत असणारी तटस्थतेची भूमिका घेणे आज तरी लोकशाहीसाठी परवडणारे नाही, याची त्यांना जाणीव आहे. तशी राजकारण-विन्मुख भूमिका घेण्याचा हा काळ नाही याची ‘निर्भय बनो’च्या या शिलेदारांना जाणीव असल्याने ते थेट भूमिका घेऊन ‘सत्तांतर करावे’ असे आवाहन नागरिकांना करत आहेत.

हेही वाचा……आणि ‘आपल्या’च देशांत अहमदिया ठरले गैरमुस्लीम

ॲड. असीम सरोदे म्हणतात, “जगातील सर्वात श्रीमंत पक्ष असलेल्या भाजप विरोधात लोकलढा उभा करणे, हे आम्हाला सध्यस्थितीत अत्यंत महत्त्वाचे वाटते. भाजपने या प्रचंड पैशाच्या जोरावर राजकीय पक्ष म्हणून स्वतःला जनतेवर लादणे आम्हाला अमान्य आहे. हिंदू मुस्लीम वाद निर्माण करून जनतेते फूट पाडणं आम्हाला अमान्य आहे. असल्या वादात सर्वसामान्य जनतेला मुळीच रस नाही. त्यांचा प्रश्न रोजी रोटीचा आहे, रोजगाराचा आहे, शिक्षणाचा आहे. महाराष्ट्रभर फिरल्यानंतर हेच सर्वत्र आढळून येते. कमीकमी शासन व लोकसहभागी व्यवस्था या संकल्पना अस्तित्वात आणल्या पाहिजेत यासाठी नागरिकांना तयार करण्याची ‘निर्भय बनो’ ही मोहीम आता लोकांनी आपली मानली आहे. दमनकारी व हिंसक स्वरूपात कार्यरत मोदी-शाह या प्रवृतींना आमचा प्रामाणिक व स्पष्ट विरोध आहे. ‘निर्भय बनो’ आंदोलन कोणत्याही एका पक्षाशी बांधील नाही. आज मोदी आणि शहा या प्रवृत्तींविरुध्द आमची लढाई आहे. उद्या त्यांच्या जागी येणारे राज्यकर्ते त्यांच्यासारखेच उन्मत्त झाले, तर आम्ही त्यांच्याविरुध्द ‘निर्भय बनो’ची मोर्चेबांधणी करू.”

mukund.taksale@gmail.com

Story img Loader