डॉ. जगन्नाथ दीक्षित

१४ नोव्हेंबर या जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने..

chemical manufacturing industries in india stock market share prices
क्षेत्र अभ्यास अजब रसायन बाजार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
kama Hospital study shows increased diabetes prevalence in pregnant women due to changing lifestyles
गर्भधारणेच्या वेळी महिलांना मधुमेहाचा धोका
Sonali Bendre was body shamed due to her long neck, people called her giraffe
“मला जिराफ म्हटलं जायचं”, सोनाली बेंद्रेवर एकेकाळी व्हायची टीका, बॉडिशेमिंगचा आरोग्यावर कसा होतो परिणाम, तज्ज्ञांनी केला खुलासा
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
pune Arogya sena
औषधांच्या किमती नियंत्रणात आणा, आरोग्य व्यवस्था सक्षम करा! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेनेकडून खुला जाहीरनामा
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…

मधुमेह कधीच बरा होऊ शकत नाही, असे सांगत रुग्णांवर औषधांचा मारा केला जातो. पण मधुमेहाच्या औषधोपचारांइतकेच महत्त्वाचे आहेत ते जीवनशैलीमधले बदल. ते सहजसोपे आणि हमखास परिणाम घडवणारे असतील तर करून बघायला काय हरकत आहे?

गेल्या दहा वर्षांपासून मी जीवनशैलीच्या माध्यमातून वजन कमी करणे आणि मधुमेह प्रतिबंध/मुक्ती यासाठी काम करत आहे. ‘स्थूलत्व आणि मधुमेह- मुक्त विश्व’ या मोहिमेद्वारे मी आणि माझे सहकारी लोकांचे प्रबोधन करत आहोत. ही मोहीम ४१ देशांत पोहोचली आहे. वजन कमी होण्याच्या, मधुमेहपूर्व अवस्थेतून मधुमेहमुक्त होण्याच्या आणि मधुमेही रुग्णांच्या औषधांवाचून मधुमेह नियंत्रणात आल्याच्या शेकडो यशोगाथा आम्ही आमच्या वेबसाइटवर, फेस बुक पेज/ग्रुप आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर प्रसिद्ध केल्या आहेत. ‘वन्स देअर वॉज डायबेटिस’ या मराठी, इंग्रजी, हिंदीत प्रकाशित झालेल्या पुस्तकात औषधे न घेता मधुमेह नियंत्रणात आणणाऱ्या २५ सदस्यांच्या यशोगाथा आहेत. असेच १०० यशोगाथांचे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक- गुजरात – गोवा या तीन राज्यांमध्ये आम्ही १४ मधुमेहमुक्ती समुपदेशन केंद्रे चालवतो ज्यात २५ एम. डी. (मेडिसिन) किंवा मधुमेहतज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करतात. याचा फायदा आजवर अकरा हजारांहून जास्त रुग्णांनी घेतला आहे. इन्फोसिस फाऊंडेशनने आणि सीटीआर कंपनीने आर्थिक साह्य केल्याने पुणे, नागपूर आणि नाशिक या तीन शहरांमध्ये मधुमेहमुक्ती समुपदेशन केंद्रे दररोज कार्यरत आहेत. या प्रत्येक केंद्रात २०२५ च्या ऑगस्टपर्यंत किमान एक हजार मधुमेही रुग्णांना डायबेटिस रेमिशन अवस्थेत न्यायचे आमचे ध्येय आहे. डायबेटिस रेमिशन म्हणजे मधुमेहाची कोणतीही औषधे न घेता एचबीएवनसी (तीन महिन्यांची सरासरी रक्त शर्करा) किमान तीन महिने साडेसहा ग्रॅमपेक्षा कमी राहायला हवे. ही मोहीम पूर्णपणे मोफत आहे. या लेखात गेल्या दहा वर्षांच्या अनुभवातून आम्हाला मधुमेहाबाबत काय नवीन शिकायला मिळाले आणि त्याचा मधुमेहावर उपचार करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांना कसा उपयोग होईल याविषयी ऊहापोह केला आहे. 

हेही वाचा >>>निवडणुकीला पैसा लागतोच, पण तो कुठून येतो, कशावर खर्च होतो, हेही महत्त्वाचे! 

दीक्षित जीवनशैलीतील महत्त्वाचे सल्ले:

’कडक भूक लागते त्या दोन वेळा ओळखून त्यावेळी जेवा.

’प्रत्येक जेवण जास्तीत जास्त ५५ मिनिटांत संपवा.

’दोन जेवणांच्या दरम्यान इन्सुलिन निर्माण होईल असा कोणताही पदार्थ खाऊ/पिऊ नका.

’जेवणातील कबरेदके कमी करून प्रथिने वाढवा.

’मधुमेह नसला तरी जेवणातील गूळ/साखर/मध आदी गोड पदार्थाचे प्रमाण कमी करा.

’मधुमेह पूर्व अवस्थेत असाल किंवा मधुमेही असाल तर गोड पूर्ण बंद करा.

’दिवसात किमान ४५ मिनिटे सलग हृदय गती वाढवणारा चालणे, सायकल चालवणे, पोहणे असा कोणताही व्यायाम करा. ४५ सूर्यनमस्कार घातले तरी चालेल.

’दीक्षित जीवनशैली १८ वर्षांपेक्षा कमी वयाची मुले, गरोदर आणि स्तनदा माता तसेच टाइप १ मधुमेहाचे रुग्ण यांच्यासाठी नाही. टाइप २ मधुमेहाच्या रुग्णांनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच तिचा अंगीकार करावा.

आम्ही काय शिकलो?

मधुमेहाचे निदान लवकर होत नाही

गेल्या काही वर्षांत आम्ही विविध आस्थापनांसाठी मधुमेहमुक्ती कार्यक्रम राबवले आहेत. भिलवडीच्या डेअरीतील कर्मचारी, हुपरीच्या एका चांदी उद्योगातील कर्मचारी आणि गुजरात राज्याच्या सोमनाथ गिर जिल्ह्यातील कर्मचारी यांच्या अभ्यासातून आमच्या लक्षात आले की एचबीएवनसी तपासणी केल्याने मधुमेह असल्याचे माहीत असलेले लोक सोडून किमान ३० टक्के इतर व्यक्तींना त्या मधुमेहपूर्व अवस्थेत आहेत किंवा मधुमेही आहेत हे समजले! मधुमेहाचे निदान लवकर न होण्याचे मुख्य कारण म्हणजे ५० टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. दुसरे कारण म्हणजे मधुमेहाच्या निदानासाठी फक्त रक्त शर्करा या तपासणीचा वापर करणे. भारतीय मनोवृत्ती ही निदानाला घाबरण्याची आहे. त्यामुळे ज्याला रक्तशर्करा तपासायला सांगितले जाते तो आदल्या दिवशी कमीच खातो, गोड खात नाही आणि कधी कधी तर चार-पाच किलोमीटर चालूनसुद्धा येतो! साहजिकच तपासणी नकारार्थी येते आणि मधुमेह असला तरी त्याचे निदान होत नाही. एचबीएवनसी तपासणीचा वापर केल्यास असे अनेक लोक मधुमेही असल्याचे किंवा मधुमेहपूर्व अवस्थेत असल्याचे निदान होऊ शकते.

जास्तीचे अनावश्यक औषधोपचार 

मधुमेह उपचारांच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांमध्ये मधुमेहाच्या रुग्णांना औषधे देण्यापूर्वी जीवनशैली बदलाचा सल्ला द्यावा असे सांगितले आहे. आम्ही केलेल्या एका अभ्यासात असे लक्षात आले की ५० टक्के रुग्णांना ज्या दिवशी मधुमेहाचे निदान झाले त्याच दिवशी औषधे सुरू करण्यात आली! हा अभ्यास आम्ही आमच्या अभियानातील जीवनशैलीबाबत जागरूक असणाऱ्या रुग्णांचा केला होता त्यामुळे प्रत्यक्षात हे प्रमाण यापेक्षा नक्कीच जास्त असेल. असे का घडते याचे उत्तर सध्या सुचवल्या जाणाऱ्या जीवनशैलीवर, ती सुचवणारे डॉक्टर आणि ज्यांनी ती अंगीकारायला हवी ते रुग्ण या दोहोंचाही विश्वास नाही हे आहे! सध्या सांगितली जाणारी जीवनशैली म्हणजे व्यायाम करा आणि दर तीन-चार तासाला खा. त्यातून कोणत्या मधुमेही रुग्णाचे औषध कमी झाले का किंवा बंद झाले का याचा शोध वाचकांनी जरूर घ्यावा. कारण घराघरांत मधुमेहाचे रुग्ण आहेत. तुमच्या लक्षात येईल की अशी जीवनशैली अंगीकारणाऱ्या रुग्णांची औषधे दिवसेंदिवस वाढतच जातात. ही जीवनशैली मधुमेहाच्या नियंत्रणासाठी अपयशी ठरली आहे हे सांगण्यासाठी खरे तर कोणत्याही संशोधनाची आवश्यकता नाही. औषधोपचार घेणारा मधुमेहाचा प्रत्येक रुग्ण आणि अनेक मधुमेहतज्ज्ञांच्या मधुमेह रुग्णांच्या नोंदी हेच त्याचे मोठे पुरावे आहेत!

हेही वाचा >>>प्रदूषण असले तरी, आम्ही फटाके वाजवण्यासाठी सज्ज आहोत ! 

जीवनशैली बदलाचा सल्ला देण्यासाठी केवळ रक्त शर्करा किंवा एचबीएवनसी यापेक्षा वाढलेल्या रक्त शर्करेमुळे विविध इंद्रियांमध्ये निर्माण होणाऱ्या गुंतागुंतींना महत्त्व द्यायला हवे.

मधुमेहामध्ये रक्तशर्करा किंवा एचबीएवनसी किती आहे यापेक्षा वाढलेल्या रक्तशर्करेमुळे मूत्रिपड, दृष्टिपटल, हृदय, यकृत किंवा मज्जातंतू या इंद्रियांवर त्याचे काही दुष्परिणाम झाले आहेत का याला जास्त महत्त्व असते. एखाद्याचे एचबीएवनसी आज १० आहे याचा अर्थ किमान मागचे तीन महिने ते वाढलेले होते. कदाचित ६ ते १२ महिने ते वाढलेलेच होते. त्यामुळे अशा व्यक्तींमध्ये जीवनशैलीचा सल्ला देण्यापूर्वी उपरोक्त इंद्रियांवर काही दुष्परिणाम झाला आहे की नाही हे पाहणे जास्त महत्त्वाचे ठरते. रक्तशर्करा अमुक एका पातळीवर इतके दिवस असेल तर त्याचा किती दिवसात कोणत्या इंद्रियावर काय दुष्परिणाम होतो याविषयी खात्रीशीर पुरावा नाही!

हायपोग्लायसेमिया (अर्थात रक्तातील शर्करा कमी होणे) ही मधुमेहाची औषधे कमी करण्याची संधी आहे. अनेकदा दीक्षित जीवनशैली मधुमेही रुग्णांनी का अंगीकारू नये यासाठी ‘त्यामुळे हायपोग्लायसेमिया होईल’ असे कारण पुढे केले जाते. वस्तुस्थिती अशी आहे की मधुमेहासाठी औषधे घेणाऱ्या प्रत्येक मधुमेह्याला हायपोग्लायसेमिया होण्याची शक्यता असतेच! कारण औषधे दिल्याने रक्तातील साखर कमी केली जाते. म्हणून मधुमेहाच्या प्रत्येक रुग्णाने हायपोग्लायसेमियाची काळजी न करता त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी रुग्णाच्या घरी ग्लुकोमीटर असायलाच हवे. आम्ही अभियानात सांगतो की हातपाय थरथरणे, अचानक घाम येणे, छातीत धडधडणे, डोळय़ापुढे अंधारी येणे असा त्रास झाला तर रक्तातील साखर मोजा आणि ती ८० पेक्षा कमी असेल तर गोड खा. सध्या काय घडते ते बघू. रुग्ण दुपारी बारा वाजता ग्लीमिप्राइड १ मिलिग्राम घेत असेल आणि त्याला चार वाजता हायपोग्लायसेमिया झाला तर तो घाबरून डॉक्टरांना फोन करतो. डॉक्टर त्याला गोड खायला सांगतात. ते योग्यच आहे कारण हायपोग्लायसेमिया ही गंभीर गोष्ट असू शकते. आता रुग्णाची मानसिकता समजावून घेऊ. दुसऱ्या दिवशी दुपारी साडेतीनपासूनच रुग्ण हायपोग्लायसेमियाची वाट पाहत असतो! काही मिनिटे त्याचा संयम टिकतो आणि मग हायपोग्ल्यायसेमिया होण्याच्या आधीच तो गोड खातो. असेच रोज करतो. मग डॉक्टरकडे गेल्यावर साखर आणि एचबीएवनसी वाढलेले असतात. मग आणखी औषधे दिली जातात. त्याची परिणती आणखी हायपोग्लायसेमिया आणि आणखी गोड खाणे आणि आणखी औषधे अशा दुष्टचक्रात होते. आमच्या केंद्रामध्ये अशा वेळी डॉक्टर रुग्णांचा ग्लीमीप्राइड औषधाचा डोस ०.५ मिलीग्राम असा कमी करतात. परत हायपो व्हायला लागला तर ते औषध बंद करतात. अशाच पद्धतीने रुग्णांची औषधे कमी होतात किंवा बंद होतात.

 वजन कमी करणे अनिवार्य नाही

वजन १० टक्के कमी करा म्हणजे एचबीएवनसी कमी होईल किंवा मधुमेह नियंत्रणात येईल असे सामान्यपणे सांगितले जाते. आमच्या असे लक्षात आले की काही मधुमेही लठ्ठ नाहीतच. काही मधुमेह्यांचे वजन अनियंत्रित मधुमेहामुळे किंवा औषधांच्या परिणामामुळे कमी झालेले असते. दीक्षित जीवनशैलीचा अंगीकार करून मधुमेह नियंत्रणात आला तर त्यांचे वजन वाढते! अर्थात ज्यांचे वजन जास्त आहे त्यांचे कमी होईलच.

सध्या जगात सर्वत्र मधुमेह मुक्ती/ रेमिशन हा विषय खूप चर्चेत आहे. मधुमेह बरा होत नाही, असे सध्या तरी म्हणावे लागेल. कमी कबरेदके आणि जास्त चरबी असलेला आहार, इंटरमिटेंट फािस्टग, मिलेट खाणे असे अनेक उपाय सध्या मधुमेह रेमिशनसाठी सुचवले जात आहेत. त्याविषयीचे शोधनिबंधही प्रकाशित होत आहेत. दीक्षित जीवनशैलीचा अंगीकार करून मधुमेह रेमिशन प्राप्त केल्याचे रुग्ण अहवाल, याबाबत तटस्थ संशोधकांनी केलेल्या संशोधनांवर आधारित शोधनिबंध हेही उपलब्ध आहेत. नुकत्याच झालेल्या एका पाहणीत भारतातील २६० पैकी ७१ टक्के मधुमेह तज्ज्ञांनी मधुमेह पूर्ण जाऊ शकतो होऊ शकतो, त्यांच्या रुग्णांपैकी ४० टक्के रुग्ण ते ध्येय प्राप्त करू शकतात असे म्हटले आहे. असा सल्ला ते त्यांच्या रुग्णांना का देत नाही असे विचारल्यावर ‘८६ टक्के रुग्ण शिस्तशीर जीवनशैलीचा अंगीकार करू शकत नाहीत’ किंवा ‘४३ टक्के रुग्णांना कुटुंबाची मदत मिळत नाही’ ही कारणे दिली आहेत. २९ टक्के तज्ज्ञांनी त्यांच्याकडे प्रशिक्षित आहारतज्ज्ञ किंवा व्यायाम शिकवणारा तज्ज्ञ उपलब्ध नसल्याने त्यांना सुनियोजित मधुमेह रेमिशन कार्यक्रम राबवता येत नाही असे म्हटले आहे. कळीचा मुद्दा हा आहे की वर सांगितलेल्या सर्व अडचणींवर मात केली तरी रुग्णांना वारंवार खाण्याचाच सल्ला दिला तर बदल घडेल?

विज्ञान म्हणजे डोळे, कान उघडे ठेवून जगात घडणाऱ्या गोष्टींचा साधकबाधक विचार करणे. एखादी गोष्ट आपल्याला माहीत आहे त्यापेक्षा वेगळी आहे असे दिसले तर त्याची शहानिशा करणे आणि व्यापक समाजहिताच्या दृष्टिकोनातून ती चूक असल्यास चूक आणि बरोबर असल्यास बरोबर म्हणणे! मधुमेहावर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टरांना माझे आवाहन आहे की तुमच्याकडे येणाऱ्या, मधुमेहाचे नव्याने निदान झालेल्या आणि एचबीएवनसी ७ पेक्षा कमी असणाऱ्या, फक्त पाच रुग्णांना दीक्षित जीवनशैली अंगीकारण्याचा सल्ला द्या. तीन महिन्यांनी त्यांचे एचबीएवनसी रिपोर्ट पाहा. या जीवनशैलीमुळे वजन कमी होणे, पोट कमी होणे, एचबीएवनसी कमी होणे हे परिणाम दिसून येतात. असे खरोखर झाले तर आणि तरच तुमच्या इतर मधुमेही रुग्णांसाठी ही जीवनशैली सुचवायला सुरुवात करा. बिघडलेल्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या रोगासाठी जीवनशैली सुधार हाच उपाय असू शकतो, औषधे गोळय़ा नाही यावर माझा ठाम विश्वास आहे.

मधुमेही रुग्णांच्या गुंतागुंतीवर उपचार करणे एव्हढे खर्चीक आहे की ते विकसित देशांनाही अवघड आहे. भारतातील १२ कोटी मधुमेहींवर उपचार करणे हेसुद्धा आपल्यासाठी अत्यंत कठीण आहे. मला असे वाटते की या सर्व दारुण परिस्थितीमध्ये कोणी आपल्याला मोफत असलेली, ज्यासाठी कोणतेही उपकरण किंवा पोषक आहार विकत घेण्याची गरज नाही, व्यक्ती आनंदाने आयुष्यभर तिचा अंगीकार करू शकते आणि त्यामुळे फक्त वजनच कमी होईल असे नाही तर मधुमेह प्रतिबंध/रेमिशन होईल अशी जीवनशैली सुचवत असेल तर या देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे की आपण या जीवनशैलीचा प्रयोग तीन महिने करून पाहायला हवा. मी विश्वास ठेवायला हवा असे म्हणणार नाही! प्रयोग केल्यानंतर त्याचा फायदा झाला तर मात्र आयुष्यभरासाठी त्या जीवनशैलीचा अंगीकार करावा आणि इतरांनाही ती सांगावी हीच अपेक्षा आहे. कारण माझ्या मते जगात आलेल्या लठ्ठपणा आणि मधुमेहाच्या महासाथीला आटोक्यात आणण्यासाठी यापेक्षा व्यवहार्य आणि शाश्वत असा दुसरा कोणताही उपाय नाही!

एका शायरने जे लिहिले आहे ते मधुमेहाच्या बाबतीत अगदी खरे आहे.

‘‘नजरिया बदलो नजारे बदलेंगे..

कश्तिका रुख बदलो किनारे बदलेंगे!’’

 लेखक ‘असोसिएशन फॉर डायबेटीस

अ‍ॅण्ड ओबेसिटी रिव्हर्सल (अडोर), पुणे’चे अध्यक्ष आहेत.