डॉ. सुनिल धापटे

आपल्याकडे गेली ३३ वर्षे दरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. यंदाही ११ ते १७ जानेवारी २०२३ या कालावधीमध्ये तो पाळला जात आहे. या कालावधीत समग्र भावनेने रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करणे आणि संबंधितांमध्ये सुरक्षित रस्त्यांच्या कारणांचा प्रचार आणि प्रसार करणे अपेक्षित आहे.

two wheeler accident
पुणे: फटाक्यांच्या धूरामुळे गंभीर अपघात, दोन दुचाकींची समोरासमोर धडक; अपघातात चौघे जण जखमी
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Top 10 worst cities in Asia for traffic
पुणेकरांचा ट्रॅफिकमुळे ‘एवढा’ वेळ जातो वाया! वाहतूक कोंडीत आशियातील टॉप १० शहरात पुण्याचा समावेश
Uttarakhand Bus Accident News
Uttarakhand Bus Accident : उत्तराखंडच्या अल्मोडा दरीत बस कोसळून २३ प्रवाशांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
traffic jam on pune Bengaluru highway
पुणे – बंगळुरू महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; वाहनांच्या रांगाच रांगा
Loksatta anvyarth Ten elephants died in the Bandhavgarh tiger project in Madhya Pradesh
अन्वयार्थ: हत्तीएवढ्या दुर्लक्षाचे बळी
Pune hit and run case
पुण्यात पुन्हा हिट अँड रन! रस्त्यावर फटाके फोडणाऱ्याला भरधाव कारने दिली धडक; ३५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू
Boy dies after falling into water tank in park navi Mumbai
नवी मुंबई: आठ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू; उद्यानातील पाण्याच्या टाकीत पडला

जागतिक रस्ता सुरक्षा परिस्थिती लक्षात घेता संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने २०१० मध्ये रस्ता सुरक्षिततेसाठी कृती दशकाची आखणी केली व त्यासाठी २०११ ते २०२० असे कृती दशक निश्चित करण्यात आले. परंतु या काळामध्ये जगामध्ये अनेक ठिकाणी त्याची नीट अंमलबजावणी न झाल्यामुळे रस्त्यांवरील अपघातांमध्ये घट होऊ शकली नाही. आणि म्हणूनच २०२१ ते २०३० हे रस्ता सुरक्षेसाठी दशक म्हणून पुन्हा निश्चित करण्यात आले. प्रत्येक देशाने २०३० पर्यंत रस्त्यावरील मृत्यू आणि जखमींचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवावे आणि त्यासाठी कृती आराखडा तयार करावा असे अनिवार्य केले गेले. यातूनच सेफ सिस्टीम अॅप्रोच ही संकल्पना पुढे आली. या सुरक्षित प्रणाली दृष्टिकोनाची तीन प्रमुख तत्वे आहेत. एक, मानवी दुर्बलता मान्य करणे. दोन, मानवी चुका स्वीकारणे आणि तीन, क्षमाशील वातावरण आणि दुर्घटनेचे सुयोग्य व्यवस्थापन करणे. या तत्त्वांवर आधारित या प्रणालीचे पाच मुख्य स्तंभ आहेत. यात रस्ता सुरक्षा व्यवस्थापन, सुरक्षित रस्ता बांधणी, सुरक्षित वाहन निर्मिती, रस्ता वापरणाऱ्यांचे सुरक्षित वर्तन आणि अपघातानंतर उत्तम काळजी करणारी यंत्रणा यांचा अंतर्भाव होतो. रस्ता सुरक्षेसाठी जागतिक पातळीवर आणि त्या अनुषंगाने भारतातही मोठ्या प्रमाणात विज्ञान व तंत्रज्ञानाचा आधार घेऊन सुधारणा केल्या जात आहेत. परंतु या सुधारणांचा पाया आहे मोठ्या संख्येने असलेले सुजाण, विचारी आणि जागृत रस्त्याचा वापर करणारे नागरिक आणि प्रामाणिक व प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा यावरच खरे तर रस्ता सुरक्षेचे यश अवलंबून आहे.

रस्ता सुरक्षा ही एक जागतिक समस्या असून जगभरातील मृत्यू आणि दुखापतीचे ते एक प्रमुख कारण आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार जगभरातील रस्त्यावर जीव गमावणाऱ्या प्रत्येक दहा लोकांपैकी किमान एक भारतीय नागरिक असतो. २०२१ या वर्षात देशात एकूण ४,१२,४३२ रस्ते अपघातांची नोंद झाली आहे. ज्यामध्ये १,५३,९७२ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि ३,८४,४४८ लोक जखमी झाले आहेत. दुर्दैवाने या अपघातांमध्ये १८ ते ४५ वर्ष वयोगटातील व्यक्तींचा सर्वाधिक बळी गेला आहे. एकूण अपघातामध्ये या मृत्यूचे प्रमाण ६७% आहे.

अपघात किंवा दुर्घटना ही एक दुर्मिळ आणि अनेक घटकांमुळे घडणारी घटना आहे. ज्यामध्ये एक किंवा अधिक रस्ता वापरणारे रस्त्याच्या परिस्थितीचा सामना न करू शकल्यामुळे वाहनांची धडक होते. यातील बहुतांश अपघात विविध प्रकारच्या काही मूलभूत सुरक्षा उपायांचा अवलंब करून टाळता येण्यासारखे आणि टाळता येण्याजोगे आहेत असे संशोधनातून सिद्ध झाले आहे.

रस्त्यावरील अपघातांमुळे दरवर्षी जगभर अंदाजे १.३ दशलक्ष लोकांचे जीवन नष्ट होते. दुर्दैवाने ९०% हून अधिक मृत्यू हे अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होतात अगदी उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये अल्प सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी असलेले लोक अपघातांमध्ये बाधित होण्याची शक्यता अधिक असते. जगात सर्वाधिक ११ टक्के मृत्यूसह भारताचा पहिला क्रमांक लागतो. दरवर्षी भारतातील रस्त्यावर अंदाजे १.५ लाख लोकांचा मृत्यू होतो. म्हणजेच दिवसाला सरासरी ११३० अपघात आणि ४२२ मृत्यू, तर दर तासाला ४७ अपघात आणि १८ मृत्यू असे प्रमाण येते.

केंद्र शासन फोर इ, म्हणजे एज्युकेशन अर्थात शिक्षण, इंजिनियरिंग अर्थात अभियांत्रिकी (रस्ते आणि वाहने दोन्ही), एनफोर्समेंट अर्थात अंमलबजावणी आणि इमर्जन्सी केअर अर्थात आपत्कालीन काळजी यांवर आधारित बहु-आयामी रस्ता सुरक्षा धोरण राबवत आहे. सर्व बाजूंनी प्रयत्न सुरू आहेत, परंतु यश मात्र अत्यंत अल्प प्रमाणात दिसते आहे.

२०२१ मध्ये देशात एकूण चार लाख १२ हजार ४३२ अपघातांची नोंद झाली. त्यापैकी एक लाख २८ हजार ८२५ म्हणजेच ३१.२% अपघात दृतगती मार्गासह राष्ट्रीय महामार्गावर, ९६ हजार ३८२ म्हणजेच २३.४% अपघात राज्य महामार्गावर आणि उर्वरित एक लाख ८७ हजार २२५ म्हणजेच ४५.४% अपघात इतर रस्त्यांवर झाले होते.

२०२१ मध्ये नोंदवलेल्या एकूण एक लाख ४२ हजार १६३ प्राणघातक अपघातांपैकी ५० हजार ९५३ म्हणजेच ३५.८% अपघात राष्ट्रीय महामार्गावर ३४ हजार ९४६ म्हणजेच २४.६% अपघात राज्य महामार्गावर आणि ५६ हजार २६४ म्हणजेच ३६.६% अपघात इतर रस्त्यांवर झाले होते. रस्ते अपघात हे विविध कारणांमुळे घडतात आणि ते अनेकदा मानवी चुका, रस्त्याची परिस्थिती आणि वाहनाची स्थिती यासारख्या विविध घटकांच्या परस्पर कृतींचा परिणाम स्वरूप असतात.

२०२१ मध्ये वाहतूक नियमांच्या उल्लंघनाच्या प्रकारा अंतर्गत अतिवेग हा अपघाताचा एक प्रमुख घटक आहे. ज्यात ६९.५% लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर चुकीच्या बाजूने वाहन चालवल्याने ५.२ टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. ४६.९% अपघात, ५४.२% मृत्यू आणि ४६.९% दुखापती मोकळ्या रस्त्यांवर घडलेल्या अपघातांमुळे झाल्या आहेत. म्हणजेच साधारणपणे ज्या ठिकाणी मानवी हालचाली कमी असतात, अशा ठिकाणी, सरळ रस्त्यांवर हे अपघात झाले आहेत. तर वळणावर, खड्डे असलेल्या ठिकाणी मिळून केवळ १३.९% अपघात झाले आहेत. जीवघेण्या अपघातात बळी पडणाऱ्यांमध्ये उत्पादक वयोगटातील तरुणांचा मोठ्या प्रमाणात समावेश होतो. २०२१ मध्ये १८ ते ४५ वर्षे वयोगटातील तरुणांचे बळी ६७.६% होते तर १८ ते ६० वर्षे वयोगटातील कार्यरत लोकांचा वाटा एकूण अपघातातील मृत्यूंपैकी ८४.५% आहे.

२०२१ मध्ये एकूण अपघात आणि मृत्यूंमध्ये दुचाकीचा वाटा सर्वाधिक आहे कार जीप आणि टॅक्सी यांचा समावेश असलेली हलकी वाहने दुसऱ्या क्रमांकावर आहेत रस्ते वापरकर्त्यांच्या वर्गवारी बाबत २०२१ मध्ये एकूण मृत्यूमध्ये दुचाकी स्वरांचा वाटा सर्वाधिक ४५.१% होता त्यानंतर मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पादचारी यांचा वाटात १८.९% होता.

धडक कशा प्रकारची होती या दृष्टीने विचार केल्यास ‘हिट फ्रॉम बँक’ पाठीमागून धडक देणे (२१.२%) या प्रकाराचा एकूण अपघातांमध्ये सर्वात मोठा वाटा आहे आणि यामध्ये एकूण मृत व्यक्तींची संख्या (१८.६%) आहे. त्यानंतर अनुक्रमे “हेड ऑन कोलिजन” समोरासमोर धडक (१८.५%) आणि बाजूने धडक देणे (१७.७%) या प्रकाराचा वाटा आहे. अरुंद लेन, तीक्ष्ण वळण, दुतर्फा रहदारीसाठी विभक्त न केलेल्या लेन आणि व्यस्त पट्ट्यांसह रस्त्यांवर समोरासमोर धडक होत असल्याचे दिसून येते. सामान्यतः, समोरासमोर धडक होण्याचा सर्वात मोठा धोका असलेले रस्ते शहरी भागाबाहेरील व्यस्त, सिंगल कॅरेजवे रस्ते असतात. जेथे वेग सर्वाधिक असतो.

अपघातांचे इतर प्रमुख प्रकार ज्यांच्यामुळे मृत्यू होतो ते म्हणजे ‘हिट अँड रन’ धडक देऊन पलायन (१६.८%), आणि “रन ऑफ द रोड” रस्त्यापासून भरकटणे सारख्या इतर प्रकारांमध्ये जास्त किंवा अयोग्य वेग, लक्ष विचलित होणे, चुकीचा / अंदाज न आल्याने ड्रायव्हरचे नियंत्रण गमावल्यामुळे त्याचे परिणाम अपघातामध्ये होऊ शकते.

२०२१ मध्ये हिट अँड रन अपघात ५७,४१५ – १३.९ % होते आणि यामध्ये मृत्यू २५,९३८ – १६.८ % व जखमी ४५,३५५ – ११.८% होते; उभ्या वाहनाला धडक अपघात ११,६११ – २.८%, होते आणि यामध्ये मृत्यू ४,९२५ – ३.२%, व जखमी १०,३०२ – २.७% होते; मागील बाजूने धडक अपघात ८७,३६८ – २१.२% होते आणि यामध्ये मृत्यू २८,७१२ – १८.६%, व जखमी ८१, ८००- २१.३% होते; बाजूने धडक अपघात ६०,२२१ – १४.६%, होते आणि यामध्ये मृत्यू १८,२९९ – ११.९%, व जखमी ५९,३९६ – १५.४% होते; वाहनाने रस्ता सोडणे अपघात १९,४७८ – ४.७ % होते आणि यामध्ये मृत्यू ९,१५० – ५.९ % व जखमी १९,०७७ – ५.०% होते; अडथळ्याला धडक अपघात १४,४३६ – ३.५%, होते आणि यामध्ये मृत्यू ६,६००-४.३%, व जखमी १२,६६५ – ३.३% होते; वाहन उलटणे अपघात १९,३०३ – ४.७% होते आणि यामध्ये मृत्यू ९,१२२ – ५.९% व जखमी १९,३३६ – ५.०% होते; आणि इतर अपघात ६६,२९६ – १६.१%, होते आणि यामध्ये मृत्यू २३,९७८ – १५.६%, व जखमी ५८,०१५ – १५.१% होते, म्हणजेच एकूण अपघात ४,१२,४३२ होते आणि यामध्ये मृत्यू १,५३,९७२ व जखमी ३,८४,४४८ होते अशी परिस्थिती दिसते.

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात आणि अपघाती मृत्यू झाले आहेत २०२१ मध्ये सुमारे ७४.४ टक्के अपघात आणि ७२.२% मृत्यू अति वेगाने वाहन चालविल्यामुळे झाल्याची नोंद आहे. नशेत वाहन चालवणे, दारू आणि ड्रगचे सेवन, लाल दिवा मोडणे, चुकीच्या बाजूने वाहन चालवणे, मोबाईल फोनचा वापर इत्यादी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अपघात आणि मृत्यूची संख्या १,२८,८२५ आणि ५६,००७ इतकी लक्षणीय वाढ दर्शवते.

रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या काळात पुढील बाबींचा प्राधान्याने विचार करणे आणि तसे उपक्रम आयोजित करणे अपेक्षित आहे.

० ट्रक ड्रायव्हरचा थकवा तपासणी आणि त्यांना रस्त्याच्या सुरक्षेबद्दल शिक्षित करणे.

० वाहनाच्या मागील बाजूने होणारी धडक टाळण्यासाठी ट्रक, ट्रॅक्टर आणि ट्रॉलीच्या मागील बाजूस लाल दिवे किंवा रेट्रो रिफ्लेक्टिव्ह टेप चिटकवणे.

० टोल प्लाझावर रात्री वाहनांना लाल रिफ्लेक्टिव्ह टेप चिटकवणे.

० चुकीच्या बाजूने वाहन चालवणे थांबविण्यासाठी विशेष मोहीम घेणे.

० ओव्हर लोडिंग थांबवण्यासाठी विशेष मोहीम घेणे.

० पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने पादचाऱ्यांनी फूट ओव्हर ब्रिज किंवा पेडेस्ट्रिन अंडरपास यांचा वापर करून याव्यतिरिक्त इतर ठिकाणावरून रस्ता ओलांडू नये यासाठी प्रयत्न करणे.

० डोंगराळ भागात क्रॅश बेरियर्स, रस्ता सुरक्षा फर्निचर इत्यादी बसवणे.

० चालकांसाठी नेत्र तपासणी शिबिर घेणे.

लेखक माजी परिवहन अधिकारी, रोड सेफ्टी ऑडिटर तसेच ‘यशदा’चे माजी संचालक आहेत

drdhaptesunil@gmail.com