ओपन-बुक परीक्षा किंवा पुस्तकासहित परीक्षा घेण्याची घोषणा आधी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) केली आणि पाठोपाठ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानेही (स्टेट बोर्डानेही) इयत्ता नववी ते बारावीसाठी लवकरच पुस्तकासहित परीक्षा योजना राबवणे विचाराधीन असल्याचे म्हटले आहे. पुस्तकासहित परीक्षा घेण्यामुळे मुले पाठ्यपुस्तक वाचतील हा सकारात्मक बदल नक्कीच घडेल पण केवळ वाचन उपयोगाचे नाही तर वाचलेलं जे जे आहे त्याचं आकलन झालं पाहिजे आणि आकलन झालं तरच त्या माहितीचं उपयोजन कुठे करायचं आणि कसं करायचं हे मुलांना समजेल.पुस्तका विरहित परीक्षा मुलांच्या बुद्धिमत्तेपेक्षा पाठांतर, घोकंपट्टी व आठवण्याची क्षमता याचा कस लावणारी होती. अभ्यास न करणाऱ्यांसाठी पण कॉपी करून पास होणाऱ्यांना वरदान होती. आता पुस्तकासहित परीक्षा घेण्याचा प्रायोगिक प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट असतील तर आणि विचारलेल्या प्रश्नांचे आकलन त्यांना झाले तर उत्तर त्यांच्या मनातच असेल. परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना वाचन केल्यानंतर व त्याचे आकलन झाल्यानंतर व उपयोजन करता आल्या नंतरच देता येऊ शकतील. आजच्या विद्यार्थ्यांमध्ये पाठांतर करण्याची क्षमता आहे पण त्याचे आकलन व उपयोजन यामध्ये ते कमी पडतात. परीक्षेत आतापर्यंत विद्यार्थी फक्त प्रश्नांची उत्तरे लिहीत होती, आता त्यांना एखाद्या प्रश्नाचे उपयोजन, विश्लेषण व त्यावर आपलं मत मांडता येणं आवश्यक ठरणार आहे. ज्याप्रमाणे वकिलांचा अभ्यास असेल तर कोणत्या पुस्तकात कोणत्या पानावर कोणतं कलम, कोणता नियम आहे हे त्यांना माहीत असतं, ते संदर्भ घेऊन ते केस लढवतात.

maharashtra govt introduces new guidelines for school picnic
शैक्षणिक सहलींसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून दक्षतेची सूचना
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
education board warning against schools for obstructing students while filling exam application zws
परीक्षा अर्ज भरताना अडवणूक केल्यास शाळांवर कारवाई;  शिक्षण मंडळाचा इशारा
open prison in india
खुले कारागृह म्हणजे काय? त्यात कैदी कसे राहतात आणि काय करतात?
academic degree on experience
विश्लेषण : अनुभवाच्या आधारे पदवी कशी मिळणार?
How will state boards mobile app be useful for students parents and teachers
राज्य मंडळाचे मोबाइल अॅप विद्यार्थी, पालक, शिक्षकांना कसे ठरणार उपयुक्त?
NEET Postgraduate Exam Schedule Announced Wardha news
नीट पदव्युत्तर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; वैद्यक आयोग म्हणतो…
Rare book Exhibition organized by BNHS
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे दुर्मिळ पुस्तकांचे प्रदर्शन

हेही वाचा : लोकसभेत आंबेडकरी चळवळीला प्रतिनिधित्व मिळेल काय?

विद्यार्थी आज किंवा पाठ्यपुस्तकातून व शिक्षकांनी शिकवलेल्या भागावरच अवलंबून असतात असे नाही तर पुस्तकांच्या बाहेर जे जे आहे ते उदा. इंटरनेट विकिपीडिया, प्रसार माध्यमे यातून ते शिकत असतात. प्रत्येक पाठाच्या खाली आता योजना चे प्रश्न असतात पण ते सोडवताना विद्यार्थी किती आकलन उपयोजनाचा उपयोग करतो ते पाहणे महत्त्वाचे आहे. गृहपाठ कॉपी करून किंवा आई-वडिलांनी लेला असेल तर अशा प्रकारची मुले पुस्तके घेऊन सुद्धा उत्तरे शोधू शकणार नाहीत. मूक वाचन प्रकट वाचन बंद झालेल्या मुलांना पुस्तके कशी वाचायची त्यातील अर्थ समजून त्याचा इतर ठिकाणी कसा वापर करायचा या दिशेने यांची आधी तयारी करून घ्यावी लागेल. वाचन आकलन उपयोजन हे एकमेकांशी निगडित असल्यामुळे पुढचे सर्व त्यांना कसे येईल.

आजची मुले पाठ्यपुस्तके फार कमी वाचतात. पुस्तके वाचलेली असतील तर त्याचा संदर्भ कोठे व कसा घ्यायचा हे कळेल, पण जर पुस्तकाला हात सुद्धा न लावणारे जेव्हा परीक्षेला सामोरे जातात, त्यांचं काय होणार? ‘२१ अपेक्षित’ वर अवलंबून असणारे, शिकवणीमधील शिकविलेले पाठांतर करून परीक्षेत उत्तर लिहणारे व चांगले मार्क घेऊन जाणारे व पाठांतर करणारे व संकल्पना न समजणारे पण मेरिटमध्ये येणारे यांचं काय होणार? पुस्तका सहित परीक्षा साठीआमच्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना यासाठी आधी तयार करावं लागेल. काठिण्य पातळीचे प्रश्न तयार करावे लागतील. शिक्षकांना अधिकची प्रश्नपेढी तयार करावी लागेल. मुलांनी नुसतं उत्तर लिहिणं अपेक्षित नाही तर पुस्तकातल्या संदर्भावरून तो कुठे आणि कसा वापरायचा हे त्यांना कळायला हवं.

हेही वाचा : … मग हवी कशाला हो निवडणूक ? 

एका विषयात ३५ मार्क मिळवण्याचे ध्येय असणाऱ्या विद्यार्थ्यांना हे कितपत पेलवेल, अंतर्गत गुणांच्या कुबड्यामुळे विद्यार्थी कसेतरी ३५ मार्क मिळवतात. पासचा टक्के वाढण्यासाठी अंतर्गत गुणांची सोय केली जाते. ढ मुलाला सुद्धा पास करण्यासाठी २० पैकी २० अंतर्गत गुण जर दिले जातात, तिथे तो विद्यार्थी पुस्तक असूनही परीक्षेत काय लिहिणार? घोड्याला पाण्याजवळ नेता येईल पण पाणी पिणे क्रिया घोड्यालाच करावी लागेल.

पुस्तक असूनही विद्यार्थ्यांना प्रश्न व त्याचे उत्तर लिहिता आले नाही तर व निकालाची टक्केवारी घसरली तर त्याला जबाबदार कोण? म्हणून पुस्तकासहित परीक्षेसाठी तयारी झाल्यानंतरच त्याची अंमलबजावणी करणे योग्य ठरेल. मुलांना पुस्तके जवळ करावी लागतील तरच पुस्तकांच्या पलीकडचे जे जे आहे ते त्यांना कळेल. अनेक संकल्पना पुस्तकाच्या बाहेर मुलांना कळतात पण त्यासाठी पुस्तकाचा संदर्भ असेल तर त्या संकल्पना लवकर कळतात म्हणून पुस्तके वाचून त्यातले संदर्भ जीवनात शोधता यायला हवेत. उपयोजन, मनन, चिंतन यापासून आजची पिढी खूप दूर आहे.

बंद पुस्तकी परीक्षांपेक्षा खुल्या पुस्तकांच्या परीक्षा सोप्या नसतात – अनेकदा त्या कठीण असतात. ओपन-बुक परीक्षेसाठी तुम्हाला खरोखर सामग्री समजून घेणे आणि माहिती आणि सामग्री लक्षात ठेवण्याऐवजी विश्लेषण करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. याचा अर्थ तुम्हाला निश्चितपणे अभ्यास करणे आणि संघटित होणे आवश्यक आहे कारण तुम्ही फक्त माहिती लक्षात ठेवू शकणार नाही! तुम्ही गोष्टी शोधण्यात किंवा प्रथमच साहित्य पाहण्यात परीक्षेचा मौल्यवान वेळ वाया घालवू इच्छित नाही. तुम्हाला वापरण्याची परवानगी असलेल्या सामग्रीसह तुम्हाला व्यवस्थित करणे आवश्यक आहे. ‘ओपन-बुक’ म्हणजे वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये वेगवेगळ्या गोष्टी, आणि तुम्ही काय आहात हे तुम्हाला माहीत आहे. तुम्हाला सर्वसाधारणपणे परीक्षेचे स्वरूप आणि लॉजिस्टिक्सदेखील समजून घेणे आवश्यक आहे. परीक्षा बहुविध निवड, समस्या सोडवणे किंवा निबंध आधारित आहे का हे जाणून घेणे आवश्यक आहे. परीक्षा पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल हे देखील माहित असणे आवश्यक आहे. प्रत्येक प्रशिक्षक आणि परीक्षा भिन्न असतात, म्हणून अभ्यासक्रम तपासा. तुम्हाला काही अस्पष्ट वाटत असेल, तर ती गोष्ट स्पष्ट करणे ही तुमची जबाबदारी आहे. लक्षात ठेवा, खुल्या पुस्तकाचा अर्थ असा नाही की तुम्हाला तयारी करण्याची किंवा अभ्यास करण्याची गरज नाही! तुमची ओपन बुक परीक्षा वेळेवर असेल तर हे आणखी महत्वाचे आहे. ओपन-बुक परीक्षांसाठी तुम्हाला ‘उच्च पातळीची विचारसरणी’ वापरण्याची आवश्यकता असल्यामुळे, तुम्हाला फक्त तथ्ये किंवा आठवणीबद्दल विचारले जाणार नाही. त्याऐवजी तुम्हाला माहितीची तुलना, विश्लेषण, मूल्यमापन किंवा संश्लेषण करण्यास सांगितले जाईल. तुमचे ज्ञान दाखवण्याचे हे मार्ग अधिक आव्हानात्मक आहेत आणि त्यासाठी आवश्यक आहे की तुम्हाला सामग्री सखोलपणे माहित असणे आणि कनेक्शन पाहण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. तुमच्या संदर्भ सामग्रीचा विचार केला जातो तेव्हा ‘खूप जास्त’ अशी एक गोष्ट आहे – तुमच्याकडे जितके जास्त आहे, तितकेच तुम्हाला हवे असलेले शोधण्यासाठी अधिक शोधणे आवश्यक आहे. तुमच्याकडे उपलब्ध आहे त्यामध्ये निवडक व्हा आणि तुम्ही जे काही वापरायचे किंवा संदर्भ साहित्य म्हणून आणायचे ठरवले ते व्यवस्थित केले पाहिजे.

हेही वाचा : गावाची काळजी आहे, पण ग्रामदान माहीत नाही?

तुमच्या नोट्स व्यवस्थित करा. भरपूर आणि बऱ्याच नोट्स तुम्हाला अधिक तयार होण्यास मदत करू शकतात, तरीही ते पाहणे अधिक असू शकते. मुख्य थीम आणि विषय ओळखा, महत्वाची माहिती सारांशित करा, विषयानुसार नोट्स व्यवस्थित करा, विषय कसे जोडले आहेत ते ओळखा इ. तुमची सामग्री तयार करा – मुख्य विषयांचे निर्देशांक तयार करा आणि त्या प्रत्येकावर तुम्हाला अधिक माहिती कुठे मिळेल ते ओळखा, महत्त्वाची पृष्ठे/चॅप्टर बुकमार्क करा, महत्त्वाच्या माहितीची यादी तयार करा (सूत्र, व्याख्या इ.), इ. परीक्षेदरम्यान, तुमचा वेळ प्रभावीपणे व्यवस्थापित करा.

आजच्या पिढीने वाचायला हवं. ‘वाचाल तर वाचाल’ हे माहीत असूनही विद्यार्थी जर वाचणारच नसतील, पाठ्यपुस्तके व अवांतर वाचन करणारच नसतील तर पुस्तके असून सुद्धा त्यांना परीक्षेतील प्रश्नांची उत्तरे लिहिणे अवघड जाणार आहे. त्यासाठी पुस्तक वाचायलाच हवं. यानिमित्ताने एक होईल पुस्तके वाचण्याची सवय लागेल. स्पर्धा परीक्षा पास करणारे पुस्तक फाटेपर्यंत त्याच मनन, चिंतन करतात, तेव्हा कुठे त्यांना यश मिळतं. कोणती माहिती कुठे कशी लिहायची हे त्यांना अवगत होतं. खूप वाचल्यानंतर ते कुठे व कसं वापरायचं हे कळेल पण वाचलंच नाही तर कसं कळेल.

हेही वाचा : तैवानशी वाढत्या जवळिकीने भारताला काय मिळेल?

आधी चाचणी परीक्षेत व प्रायोगिक तत्त्वावरच याचा अवलंब करून काय परिणाम येतात हे पाहायला हवं. मुलांना वाचून यायला सांगितल्यानंतर अचानक उपयोजनाचे प्रश्न त्यांना दिल्यानंतर ते कशाप्रकारे पुस्तकाचा उपयोग करून उत्तर देतात हे पाहायला हवं. त्याचा सराव व्हायला हवा तरच हा प्रयोग यशस्वी होईल. पेपर फुटून प्रश्नपत्रिका बाहेर गेल्यानंतर ती उत्तरं काॅपी करून,पुस्तकात लपवून लिहिली तर त्याला प्रतिबंध कसा करणार? आधी पाया पक्का करावा लागेल, नाही तर इमारत कोसळणारच. पुस्तकांच्या असण्याने ज्ञानाच्या कक्षा रूंदावणारच आहेत. मुले विचार करायला शिकतील. विचाराने प्रश्नांची उकल करणे विद्यार्थी शिकतील. हाच शिक्षण प्रक्रियेतील अमुलाग्र बदल असेल. आजही सामान्य विद्यार्थ्यांना समोर ठेवूनच प्रश्नपत्रिका काढले जाते. कारण निकाल कमी लागणे कोणालाच परवडणार नाही. कोचिंगचे पॅटर्न बदलावे लागतील, गाईडमधील आशय बदलावा लागेल. शिक्षकांना प्रशिक्षित करावं लागेल. हे सर्व होणार असेल तरच नवीन मूल्यं व मापन रूजणार आहे.

anilkulkarni666@gmail.com

Story img Loader