ओपन-बुक परीक्षा किंवा पुस्तकासहित परीक्षा घेण्याची घोषणा आधी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) केली आणि पाठोपाठ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानेही (स्टेट बोर्डानेही) इयत्ता नववी ते बारावीसाठी लवकरच पुस्तकासहित परीक्षा योजना राबवणे विचाराधीन असल्याचे म्हटले आहे. पुस्तकासहित परीक्षा घेण्यामुळे मुले पाठ्यपुस्तक वाचतील हा सकारात्मक बदल नक्कीच घडेल पण केवळ वाचन उपयोगाचे नाही तर वाचलेलं जे जे आहे त्याचं आकलन झालं पाहिजे आणि आकलन झालं तरच त्या माहितीचं उपयोजन कुठे करायचं आणि कसं करायचं हे मुलांना समजेल.पुस्तका विरहित परीक्षा मुलांच्या बुद्धिमत्तेपेक्षा पाठांतर, घोकंपट्टी व आठवण्याची क्षमता याचा कस लावणारी होती. अभ्यास न करणाऱ्यांसाठी पण कॉपी करून पास होणाऱ्यांना वरदान होती. आता पुस्तकासहित परीक्षा घेण्याचा प्रायोगिक प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा