संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगविख्यात तत्वज्ञ आणि भारतीय संविधानाला सामाजिक न्यायाची दिशा देणारे राष्ट्रपुरुष होते, त्यामुळे भारतातील प्रत्येक नागरिकाला, शासनव्यवस्थेला व सरकारला त्यांच्याविषयी किती आदर असेल याची कल्पना जगातील इतर देशांना येणे कठीणच. डॉ. आंबेडकरांचा जन्म भारतात झाला असला आणि त्यांनी भारताच्या सामाजिक, आर्थिक जडणघडणीत मोलाचे योगदान दिले असेल, तरीही त्यांचे कार्यक्षेत्र केवळ भारतापुरते कधीच मर्यादित राहिले नाही. त्यांच्या हयातीतही जगभर त्यांचा आदर केला जात होता आणि आजही देशविदेशांत त्यांना आदर्श मानले जाते. त्यांच्या विचारांचा, लेखनाचा अभ्यास केला जातो. 

जगात सर्वात जास्त पुतळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत. त्यांचा आदर्श येणाऱ्या पिढ्यांनी घ्यावा, त्यांच्या विचारांतून प्रेरणा घ्यावी, हा त्यामागचा उद्देश आहे. मात्र, काही अवाचारी व्यक्ती या पुतळ्याची तोडफोड करतात. ते माथेफिरू कोणाच्या सांगण्यावरून हे कृत्य करीत असतील? हा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे नुकतीच परभणी जिल्ह्यात घडलेली घटना. एका माथेफिरूने शहरातील रेल्वे स्थानकासमोरील चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची विटंबना याआधीही भारतातील विविध राज्यांत होत आली आहे. देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे प्रचंड संख्येने उभारलेले आहेत. आंबेडकर- विरोधक त्यांच्या काही पुतळ्यांना लक्ष्य करताना दिसतात. आंबेडकरी विचारांना विरोध करायचा तो पुतळ्याच्या आडून अशी धारणा अशा व्यक्तींच्या मनात असते. वैचारिक विरोध करणे शक्य नसल्याने अशी कृत्ये केली जातात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जगातील पहिला पुतळा त्यांच्या हयातीतच उभारण्यात आला. हा ऐतिहासिक अर्धाकृती पुतळा कोल्हापुरातील बिंदू चौकात उभारण्यात आला होता. जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे १९५० मध्ये बिंंदू चौकात स्थापन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते भाई माधवराव बागल हे या पुतळा समितीचे अध्यक्ष होते. शिल्पकार बाळ चव्हाण यांनी हा पुतळा साकारला होता. तत्कालीन नगराध्यक्ष द. मा. साळोखे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रतिमा समितीकडून तो नगरपालिकेस करवीर नगरीतील जनतेच्या वतीने प्रदान करण्यात आला. 

BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
committee has been formed under chairmanship of sub-divisional officer of Daryapur to investigate after Kirit Somaiyas allegations
किरिट सोमय्यांच्‍या आरोपानंतर खळबळ… अमरावतीत आता बांगलादेशींच्या…
Central Election Commissioner refutes opposition allegations no discrepancy in counting of ballot papers
मतपावत्यांच्या मोजणीत विसंगती नाही! विरोधकांच्या आरोपांचे केंद्रीय निवडणूक आयुक्तांकडून खंडन
Citizen Centered Leave Protection Digital Personal Leave Protection Right to Privacy
‘विदा संरक्षण’ नवउद्यामींना मारक!
loksatta readers feedback
लोकमानस: साम्राज्य उभे करण्यासाठी निधीचा वापर
Court orders on state government officials regarding land compensation
‘भरपाई टाळण्यासाठी कायद्याचे बेधडक उल्लंघन’; राज्य सरकारी अधिकाऱ्यांवर न्यायालयाचे ताशेरे
loksatta readers response
लोकमानस : ही नेहरूंचे धोरण पुढे नेण्याची वेळ

हेही वाचा – आताच्या पंतप्रधानांना पहिल्या पंतप्रधानांबद्दल पुरेशी माहिती नाही काय?

महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा बागल यांच्यावर प्रभाव होता. त्यांच्या कार्यातून शाहूनगरीतील तरुणांना सतत स्फूर्ती मिळाली पाहिजे, हा त्यांचा उद्देश होता. यासाठी हे ब्राँझचे पुतळे घडवून घेण्यात आले. ९ डिसेंबर १९५० रोजी शेकडोंच्या उपस्थितीत या पुतळ्यांचे अनावरण केले गेले. बिंदू चौकाच्या डाव्या-उजव्या बाजूच्या गर्दीतून भाई बागल यांनी दोन सामान्य माणसांना हाताला धरून नेले आणि त्यांच्या हस्ते या पुतळ्यांचे अनावरण झाले. आज डॉ. आंबेडकरांचे पुतळे जगभर असले, तरीही या पुतळ्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे. आंबेडकरवाद्यांसाठी बिंदू चौक हे आदराचे आणि महत्त्वाचे ठिकाण आहे. २०२२ मध्ये अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात असलेल्या रिद्धपूर गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केली गेली होती. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी घटनेचा निषेध केला. त्यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी जाळपोळ आणि तोडफोडही केली होती. 

परभणीतील घटनेनंतरही आंबेडकरांचे अनुयायी रस्त्यावर उतरले आणि निषेध करू लागले. मात्र, पोलीस प्रशासनाने निषेध करणाऱ्यांना धमकावले असल्याने, जमाव संतप्त झाला. हे माथेफिरू वारंवार डॉ. आंबेडकरांच्याच पुतळ्याची विटंबना का करत असावेत? यामागे काही सुप्त शक्ती उभी आहे का? भीमा कोरेगाव दंगल घडवून आणली गेली. आंबेडकरी अनुयायांवर दगडफेक केली गेली. हा मुद्दाम आंबेडकरी विचारांना डिवचण्याचा प्रयत्न तर नव्हे? गावागावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवावर दगडफेक केली जाते. सोनपेठ तालुक्यातील एका गावात अशाच प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवादरम्यान अडवणूक करण्याचा प्रयत्न झाला. अशा कितीतरी घटना सांगता येतील. हा प्रकार राज्यात पोलीस प्रशासन असताना घडतोच कसा, असा प्रश्न पडणे साहजिकच आहे.

हेही वाचा – ‘लाडक्या बहिणी’ एकगठ्ठा मते देतात?

गावागावांत, शहराशहरांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची भीती का? आधुनिक भारताचे शिल्प उभे राहण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार का नको आहेत? पुन्हा मनुव्यवस्था लावण्यासाठी का? परभणीत भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड केली गेली, तर केवळ आंबेडकरी अनुयायांनी रस्त्यावर का उतरावे? इतरांना संविधान हक्क अधिकार देत नाही? केवळ घरात बसून समाज माध्यमांतून बोट फिरवून चार ओळी निषेधाच्या लिहिल्या म्हणजे झाले? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मी प्रथम भारतीय आणि अंतिमतःही भारतीयच. तर आम्ही भारताचे लोक आहोत हे विसरलोय का? काल, आज आणि उद्याही संविधान रक्षणासाठी आंबेडकरी विचारांच्या व्यक्ती आणि अनुयायी पुढे येतील. ही परिस्थिती बदलणे आवश्यक आहे. या अविचारी घटनेचा निषेध ‘आम्ही भारताचे लोक’ म्हणून केला पाहिजे. देशभरात कुठेही अशा अनुचित घटना घडल्या की केवळ आंबेडकरांचे अनुयायी रस्त्यावर उतरतात. ही वस्तुस्थिती आहे. मनुव्यवस्था लादण्याचा प्रयत्न कितीही झाला तरी आंबेडकर अनुयायी आणि संविधान प्रेमी रस्त्यावर येऊन निषेध करतील, हीच काय ती अपेक्षा. 

padmakarmujmulefoundation@gmail.com

Story img Loader