द्रौपदी मुर्मू – राष्ट्रपती

भगवान बिरसा मुंडा अवघ्या २५ वर्षांच्या आयुष्यात वसाहतवाद्यांकडून होणाऱ्या शोषणाविरोधातील जनतेच्या लढ्याचे नायक ठरले. आदिवासींची सांस्कृतिक ओळख प्रस्थापित करण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. आज ते केवळ आदिवासी समाजातीलच नव्हे, तर देशातील प्रत्येक भागातील, प्रत्येक वर्गातील तरुणांसाठी प्रेरणेचा स्रोत आहेत…

Gujarat gold chain snatchers thieves active in vasai
गुजरातमधील सोनसाखळी चोर वसईत सक्रीय, गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Cyber ​​thieves rob senior citizen who advertised for remarriage Pune news
Pune Cyber Crime: पुनर्विवाहासाठी जाहिरात देणाऱ्या ज्येष्ठाला सायबर चोरट्यांचा गंडा
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
Santosh Deshmukh Murder Case
“…म्हणून माझ्यावर ही वेळ आली का?” मयत सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा टाहो; पत्नी म्हणाली, “ते १५ वर्षांपासून..”
Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
Chennamaneni Ramesh BRS MLA
Chennamaneni Ramesh: भारतीय नागरिकत्व रद्द झालेले देशातील पहिले आमदार; कोण आहेत चेन्नमनेनी रमेश?
What Nitesh Rane Said?
Ladki Bahin Yojana : “दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिम कुटुंबांना लाडकी बहीण योजनेतून वगळा”, आमदार नितेश राणेंची मागणी

आपल्या मातृभूमीत इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर अशा काही वीरपुत्र आणि वीरकन्यांचा जन्म झाला ज्यांनी निखळ प्रतिभेच्या जोरावर ‘भारत’ या तत्त्वाला अभिव्यक्ती मिळवून दिली. त्यापैकी काही जण सप्तर्षी समूहातील ताऱ्यांसारखे आपल्याला सदैव मार्गदर्शन करत आले आहेत. भगवान बिरसा मुंडा यांनी या नक्षत्रातील सर्वांत तेजस्वी ताऱ्याप्रमाणे राष्ट्राच्या प्रगतीचा मार्ग प्रकाशमान केला आहे. आधुनिक भारताच्या इतिहासातील या लक्षणीय व्यक्तिमत्त्वाच्या दीडशेव्या जयंती वर्षाला प्रारंभ होत आहे. त्यानिमित्त मी बिरसा मुंडा यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करते.

मी आणि माझी मित्रमंडळी लहानपणापासूनच भगवान बिरसा मुंडा यांच्या दंतकथा ऐकत आलो. त्या ऐकताना आमच्या संपन्न वारशाचा आम्हाला अभिमान वाटत असे. बिरसा मुंडा यांना अवघे २५ वर्षांचे आयुष्य लाभले, मात्र एवढ्या अल्पावधीतही सध्याच्या झारखंडमधील उलिहातू गावात जन्मलेला हा मुलगा वसाहतवाद्यांकडून होणाऱ्या शोषणाविरोधातील जनतेच्या लढ्याचा नायक ठरला. ब्रिटिश अधिकारी आणि स्थानिक जमीनदार आदिवासी समुदायांचे शोषण करत होते, त्यांच्या जमिनी बळकावत होते आणि त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करत होते, तेव्हा बिरसा मुंडा यांनी या सामाजिक आणि आर्थिक अन्यायाविरोधात उठाव केला. लोकांना त्यांच्या हक्कांसाठी लढण्यास उद्याुक्त केले. ते ‘धरती आबा’ म्हणजेच पृथ्वीचे पिता म्हणून ओळखले जात. १८९०च्या अखेरीस त्यांनी ब्रिटिशांच्या जुलुमांविरोधात ‘उलगुलान’ म्हणजेच मुंडा उठाव केला.

हेही वाचा >>> संविधानभान : अभिजात भाषा म्हणजे काय?

अर्थात उलगुलानची व्याप्ती बंड किंवा उठावापेक्षा बरीच मोठी होती. तो जसा न्यायासाठीचा लढा होता, तसाच सांस्कृतिक ओळख प्रस्थापित करण्यासाठीचा संघर्षही होता. भगवान बिरसा मुंडा यांनी अतिशय चतुरपणे एकीकडे आदिवासींचा जमिनीवर असलेला हक्क आणि कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय जमीन कसण्याचा हक्क यावर भर दिला. त्याच वेळी दुसरीकडे आदिवासींच्या प्रथा आणि सामाजिक मूल्यांचे महत्त्वही अधोरेखित केले. महात्मा गांधींप्रमाणेच त्यांचा संघर्षही न्यायासाठी आणि सत्याच्या शोधासाठी होता.

त्यांना रुग्णसेवेचा ध्यास लागला होता, शुश्रूषेचे प्रशिक्षण घेतले होते आणि अशा काही घटना घडत गेल्या की त्यांच्या स्पर्शानेही वेदना दूर होऊ शकतात, असा विश्वास लोकांना वाटू लागला. ‘कोणीही आजारी असेल त्यांना माझ्याकडे घेऊन या,’ असा त्यांचा आग्रह असे. ‘ते शक्य नसेल, तर मी स्वत:च तिथे येऊन रुग्णाची शुश्रूषा करेन,’ असेही ते म्हणत. त्यांनी गावोगावी फिरून रुग्ण शोधून काढले आणि असंख्य लोकांना आपल्या कौशल्याने बरे केले.

त्यांच्या बलिदानाची गाथा भारतातील आदिवासी समाजातील महान क्रांतिकारकांच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दुवा आहे. त्यांचा संघर्ष या मातीतील एक अनोखी परंपरा अधोरेखित करतो, जिथे कोणताही समाज कधीही मुख्य प्रवाहापासून दूर नाही. आज अनुसूचित जमाती या वर्गात समाविष्ट असलेले आदिवासी हे नेहमीच राष्ट्रीय समूहाचा भाग होते आणि आहेत.

एक काळ होता तेव्हा भगवान बिरसा मुंडा आणि त्यांच्यासारख्या इतरांचा समावेश भारतीय इतिहासातील अनाम नायकांत केला जात असे. अलीकडच्या काळात मात्र त्यांच्या शौर्य आणि त्यागावर खऱ्या अर्थाने प्रकाशझोत टाकला गेला. ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करताना भारतीय संस्कृतीच्या वैभवशाली इतिहासाचा आणि देशाने केलेल्या प्रगतीचा गौरव करण्यात आला. त्यानिमित्ताने जनतेला आणि विशेषत: तरुण पिढीला आजवर फारशा ज्ञात नसलेल्या अनेक झुंजार वीरांच्या योगदानाविषयी अधिक जाणून घेण्याची संधी मिळाली.

आदिवासी समुदायातील स्वातंत्र्यवीरांच्या योगदानाला अभिवादन करण्यासाठी भगवान बिरसा मुंडा यांची जयंती- १५ नोव्हेंबर- जनजातीय गौरव दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय २०२१मध्ये सरकारने घेतला. त्यातून इतिहासावर पुन्हा दृष्टिक्षेप टाकण्याच्या प्रयत्नांना अधिक प्रोत्साहन मिळाले. भगवान बिरसा मुंडा यांच्या वारशाचे स्मरण करण्यास सुरुवात झाल्यामुळे प्रदीर्घ काळ उपेक्षित राहिलेला आदिवासींचा इतिहास भारतीय इतिहासाच्या केंद्रस्थानी आला.

हा इतिहास आज अधिक समर्पक ठरतो, कारण तो आधुनिक जगाला निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याचे आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे महत्त्वपूर्ण धडे देतो. मला चांगले आठवते की, मी लहानपणी माझ्या वडिलांना वाळलेली लाकडे सरपणासाठी तोडल्याबद्दल क्षमा मागताना पाहिले आहे. सामान्यत: आदिवासी समाज समाधानी असतो कारण तो वैयक्तिक महत्त्वाकांक्षांपेक्षा समूहाच्या कल्याणाला अधिक महत्त्व देतो.

मानवजातीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आदिवासी समाजाचे हे वेगळेपण जपले पाहिजे. भारताच्या सामाजिक-सांस्कृतिक जडणघडणीत आदिवासी समुदायांना योग्य महत्त्व देण्यासाठी सरकारने गेल्या दशकात सुरू केलेल्या व्यापक प्रयत्नांमागे नेमके हेच कारण आहे. घोषणांच्या पलीकडे जाऊन आणि वास्तवात लोककल्याण साधण्याच्या उद्देशाने अनेक कार्यक्रम आणि योजनांची घोषणा करण्यात आली आहे. आदिवासी विकास आणि कल्याणासाठी अधिक समग्र दृष्टिकोन राखून सुमारे ६३ हजार आदिवासी गावांमधील सामाजिक पायाभूत सुविधांमधील त्रुटी दूर करण्यासाठी गेल्या महिन्यात ‘धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान’ सुरू करण्यात आले. याव्यतिरिक्त, ‘प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान’ कल्याणकारी उपक्रम अधिक प्रभावी करण्यासाठी ११ महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करते.

अनुसूचित जमातींच्या सर्वांगीण विकासासाठी अविरतपणे काम करणे हीच भगवान बिरसा मुंडा आणि आदिवासी भागातील इतर स्वातंत्र्यसैनिकांना खरी आदरांजली ठरेल, असा विश्वास मला वाटतो. राष्ट्रपती भवनानेही अनुसूचित जमातींपर्यंत पोहोचण्यासाठी नवीन उपक्रम हाती घेतले आहेत, ही माझ्यासाठी अत्यंत समाधानकारक बाब आहे. समृद्ध कला, संस्कृती आणि देश घडविण्यात आदिवासी समुदायाने दिलेल्या योगदानाची झलक दाखविणाऱ्या ‘जनजातीय दर्पण’ या राष्ट्रपती भवनाच्या वस्तुसंग्रहालयातील दालनाचे उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्य समजते. ऑगस्टमध्ये झालेल्या राज्यपालांच्या परिषदेदरम्यान, मला उपलब्ध संसाधनांचा आदिवासींच्या कल्याणासाठी अधिक चांगल्या प्रकारे वापर करण्यावर भर देण्याचे महत्त्व अधोरेखित करण्याची संधीदेखील मिळाली.

राष्ट्रपती भवनाला भेट देण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या ७५ असुरक्षित आदिवासी गटांच्या प्रतिनिधींशी मला सविस्तर संवाद साधता आला. माझ्यासाठी हा विनम्र करणारा अनुभव होता. त्यांची सुख-दु:खे त्यांनी मला सांगितली. माझ्या आदिवासी बंधु-भगिनींना आपल्यापैकीच एक व्यक्ती देशातील सर्वोच्च घटनात्मक पदावर विराजमान होताना पाहता आले, हा माझ्यासाठी सर्वाधिक अभिमानास्पद प्रसंग होता. आमच्या अस्तित्वाला मान्यता देणारा तो अभूतपूर्व क्षण होता. भगवान बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती साजरी करताना, आपणा सर्वांच्या मनात हीच भावना आहे, याची मला खात्री वाटते. त्यांचा आदर्श हे केवळ आदिवासी समाजातीलच नव्हे तर देशातील प्रत्येक भागातील, प्रत्येक वर्गातील तरुणांसाठी अभिमानाचे स्थान आणि प्रेरणेचा स्रोत आहे. स्वातंत्र्य, न्याय, ओळख आणि प्रतिष्ठा या त्यांच्या आकांक्षा देशातील प्रत्येक तरुणाच्या आकांक्षा आहेत.

Story img Loader