हल्लीच्या प्रेमकथांना हीदेखील अपवाद नाही आणि ती धो-धो खपते आहेच, पण इथं नायिका आणि नायक पुस्तकधंद्यातले आहेत..

पंकज भोसले

History , Art , Contemporary Visual Art , Feminist ,
दर्शिका : ‘अनंतकाळच्या माते’ची अनंतकाळची लढाई…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
ulta chashma
उलटा चष्मा: असला भुसभुशीतपणा नको!
ananya pandey marriage plans
अनन्या पांडे ‘या’ व्यक्तीला करतेय डेट? अभिनेत्री लग्नाचे प्लॅन्स शेअर करत म्हणाली, “पुढील पाच वर्षांत…”
Threat to bar owner Chikhli , Chikhli bar Loot ,
बुलढाणा : रात्रीची वेळ; बार मालकाच्या गळ्याला चाकू लावला अन…
sachin pilgaonkar presents this international marathi film
“अमेरिकेतील मराठी लोकांनी…”, आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या ‘या’ मराठी चित्रपटाची प्रस्तुती करणार सचिन पिळगांवकर; म्हणाले…
Loksatta lokrang Love Pictures Poet Relationship PWD Engineer
अन्यथा.. स्नेहचित्रे : अजंठ्याची पुसट रेषा…
Loksatta lokrang Publisher obsessed with words
शब्द-सुरांत रमलेला प्रकाशक

एमिली हेन्री ही ‘चिक-लिट’ किंवा ‘यंग-अ‍ॅडल्ट’ या कुमारोत्तर गटासाठी लिहिल्या जाणाऱ्या कादंबऱ्यांच्या जगातून अचानक उगवलेली लेखिका. पण तिने तयार केलेल्या नव्या रोमान्सिक फॉर्म्युल्याची तुलना केवळ नोरा एफ्रॉन या पटकथा लेखिकेने हॉलीवूड सिनेमांच्या बदललेल्या रोमॅण्टिक सिनेमांशी करता येईल. आता हा रोमॅण्टिक फॉर्म्युला कोणता, तर ज्यावर आपल्या हिंदी चित्रसृष्टीत नव्वदोत्तरीतील गुलुगुलु प्रेमपटांनी कोटय़वधींची कमाई केली, तोच. दोन परस्परविरोधी विचारांच्या – आचारांच्या व्यक्ती एकमेकांशी आधी संघर्ष करतात आणि मग ते ‘लढत-राऊत’ एकमेकांच्या प्रेमात वगैरे पडून आश्चर्याचा धक्का वगैरे देतात. भोळी-हळवी-भित्री नायिका बंडखोरीचा कडेलोट करून मेंडोलिनच्या तारांशी सूरसंलग्न धावत एका धावत्या रेल्वेगाडीतून आलेल्या हाताला बिनाअपघाती पकडण्याचा ‘मौतका कुवाँ’सदृश खेळ करते. वर शतमूर्ख बनलेल्या प्रेक्षकांच्या टाळय़ा घेते. विमानभय असलेली नायिका आपल्या अंगातील सर्व भीतीभुतांना उतरवत ‘प्रेम तर होणारच’छाप खेकसत गाणी म्हणण्याचा प्रकार करते. प्रेम हे बाष्कळ-बेकार असल्याचे गुणगुणणारा तत्त्वज्ञान-परफेक्टी नरपुंगव प्रीतीसुंदरतेचे गोडवे गाताना दिसतो. एकुणातच तिकीटबारी गाजवणाऱ्या भारतातील रोमॅण्टिक सिनेमांचा वकूब हा अमेरिकी रोमाण्टिका किंवा चिक-लिट कादंबऱ्याइतक्या उंचीचा आहे.

ती नोरा एफ्रॉन लेखिका-नाटककार आणि पत्रकारदेखील होती. सरधोपटतेचा तिटकारा करून, ‘तुमचे लेखनच तुमचे व्यक्तिमत्त्व’ असल्याचे प्रत्येक मजकुरातून बिंबवत होती. ‘व्हेन हॅरी मेट सॅली’ (१९८९) या चित्रपटानंतर हॉलीवूडच्या रोमॅण्टिक सिनेमांचा बदललेला प्रवाह पुढल्या दशकातील अमेरिकी लोकप्रिय रोमान्सिक कादंबऱ्यांमध्येही उतरला. दोन हजारोत्तर काळात वास्तववादी रोमान्स बुक्सना आलेली उकळी कुठपर्यंत जावी? तर शाळा-महाविद्यालयीन मुलांचे राजकारण, शहरातून गावात आलेल्या तरुणी किंवा तरुणाची अ-वेगवान आयुष्याशी झालेली ओळख. त्यानंतर गावातल्या ‘गोरा’ किंवा ‘गोरी’चे शहरातल्या ‘छोरा’ किंवा ‘छोरी’शी प्रेमरूपांतर. दोन मृत्यूसमीप आलेल्या तरुण-तरुणींची भावुकबहू रड(वणारी) कथा असा धोपटकथा फॉर्म्युला या बेस्टसेलर कादंबऱ्यांनी केला आणि त्यांच्यावर आलेल्या सिनेमा-मालिकांनी लेखकांना धनसमृद्ध केले. जे. अशर यांची ‘थर्टीन रीझन्स व्हाय’, जॉन ग्रीन यांची ‘द फॉल्ट इन अवर स्टार्स’, जेसी अ‍ॅण्डर्य़ूज याची ‘मी, अर्ल अ‍ॅण्ड डाईंग गर्ल’ ही काही ठळक उदाहरणे; पण बेकी अल्बर्टाली, अ‍ॅडम सिल्व्हरा आणि रेन्बो रोवेल या दशलक्ष आकडय़ांच्या प्रतींनी प्रत्येक कादंबरीचा खप असणाऱ्या लेखक-लेखिकांचे विश्व आपल्याकडे असा तरुण-तुर्की लेखनाचा सवतासुभा नसलेल्या जगासाठी अद्भुत आहे.

सिनसिनाटीची सनसनाटी..

या रोमान्सिक पुस्तकांच्या जगात सिनसिनाटी या अमेरिकेतील प्रांतात राहणाऱ्या एका लेखिकेने तीन वर्षांपूर्वी सनसनाटी निर्माण केली. खासगी कंपनीच्या टेलिफोन आणि त्यांच्या जोडणीसंबंधीच्या तांत्रिक बाबींची पुस्तके लिहिणाऱ्या या लेखिकेची आधीची चार पुस्तके येऊन बेदखल झाली होती; पण ऐन करोनाच्या काळात म्हणजे २०२०च्या मे महिन्यात दाखल झालेल्या तिच्या ‘बिच रिड’ या पुस्तकाने अचानक खपाचा धुमाकूळ घातला. उन्हाळय़ातील सर्वाधिक वाचली गेलेली ही अमेरिकी कादंबरी पुढले वर्षभर ‘न्यू यॉर्क टाइम्स’च्या खुपविक्या यादीत पहिल्या क्रमांकावर राहिली. ती जुनी झाली नाही, तेव्हा २०२१च्या मे महिन्याच्या यादीत तिचीच ‘पीपल वी मीट ऑन व्हेकेशन’ ही आणखी एक कादंबरी तळपू लागली. गेल्या वर्षीच्या म्हणजे २०२२च्या मे महिन्यात ‘बुक लव्हर्स’ या तिसऱ्या कादंबरीनेही लक्षावधी प्रती खपाची किमया करून दाखविली. तिने रोमान्स कादंबरीचा नवा फॉर्म्युला राबवला म्हणजे काय केले, तर आपल्या पात्रांमध्ये पुस्तकवेडय़ांची, पुस्तकवेडाची आणि संदर्भाची दुनिया रिचवली. या पारंपरिक रोमान्सिक कादंबऱ्याच आहेत. खुमासदार-वेगवान-शैलीदार या वैशिष्टय़ांसह त्या परस्परभिन्न नायक-नायिकांना भेटवतात. त्यांच्यात अशक्य अशी जवळीक तयार करणारी परिस्थिती तयार होते. पण त्यांत वेगळेपण हे की, पुस्तकांचा आणि पुस्तकप्रेमी व्यक्तिरेखांचा वाटा मोलाचा राहतो.

‘बिच रिड’ कादंबरीमध्ये दोन रोमान्स कादंबऱ्या लिहिणारे एकमेकांचे कादंबरीकार प्रतिस्पर्धी अपघाताने एकमेकांच्या सान्निध्यात येतात. एकमेकांचा तिरस्कार करण्याच्या अनेक वाटा अजमावून पाहतात. त्यानंतर लेखनकुंठेवर चर्चा करत त्यांची एकमेकांप्रति प्रेमभावना तयार होते. यात लेखनाशी निगडित गोष्टी, प्रकाशन विश्वातील घडामोडी यांचा तपशील पुस्तकप्रेमालाही वाव देते. ‘पीपल वी मीट ऑन व्हेकेशन’मध्ये अनेक वर्षे उन्हाळसुट्टी एकत्र घालविणाऱ्या दोन भिन्नस्वभावी व्यक्ती एका सुट्टीत भांडणाचा कडेलोट करतात. एकमेकांचे तोंडही पुन्हा पाहणार नाही, यावर ठाम होतात; पण पुढली सुट्टी योगायोगाने एकाच ठिकाणी साजरी करीत असल्याने त्यांच्यातील संघर्षांला विराम मिळण्याची चिन्हे तयार होतात. यातील नायिका धाकडोत्तम, तर नायक पुस्तके खाणारा जीव. त्यामुळे पुन्हा पुस्तकांचा आणि वाचनाचा संदर्भ कादंबरीत लख्ख दिव्यासारखा तेवत राहतो.

लिटररी एजंटच्या नजरेतून..

‘बुक लव्हर्स’ या तिच्या तिसऱ्या कादंबरीची निवेदक-नायिका नोरा स्टिफन्स ही ‘लिटररी एजंट’ म्हणजेच लेखक-प्रकाशकातील मध्यस्थाचे काम करणारी करारी स्त्री. रोमान्स-गंमत-विनोद या घटकांत तिच्या कामाचा भाग म्हणजेच वाचनाचा परिसरही स्पष्ट होतो आणि पुस्तकांसह चालणारी रोमान्सिका वाचकाला अनुभवायला मिळते.

कादंबरीला सुरुवात होते, ती रोमॅण्टिक कथानकांमधील सारखेपणाची नोराकडून खिल्ली उडविली जात असताना. या कादंबऱ्यांत नवे काहीच नसते. फक्त वेगवेगळय़ा परिस्थितींत भिन्न प्रकारे सादर केलेले तेच ते प्रकरण असते, हे ठामपणे सांगणाऱ्या या निवेदिकेच्या म्हणजेच नोराच्या प्रियकराकडून नातेमोडीचा प्रसंग अगदी साधारणपणे घडतो. या आधी अशा प्रकारचे तीन अनुभव असल्याने निगरगट्ट नोरा आपल्या रोजच्या कामास सुरुवात करते. तिथे एका प्रकाशन संस्थेच्या संपादकाबरोबर तिची नव्या पुस्तक प्रकाशनाबाबत चर्चा सुरू होते. चार्ली लास्ट्रा नावाचा हा प्रकाशक-संपादक नोराने आणलेले पुस्तक किती वाईट आहे, याचे पाढे वाचत तिला अपमानाचे चटके देतो. पुढल्या प्रकरणात दोन वर्षांनंतरचा कालावधी लोटलेला दिसतो. या काळात नोराचे ते अपमानयुक्त पुस्तक दुसऱ्या संस्थेतून प्रकाशित होऊन वर त्यावर सिनेमा येऊन प्रचंड लोकप्रिय ठरलेले असते. नोराचीही व्यावसायिक आणि आर्थिक प्रतिमा त्यामुळे वधारते; पण प्रकाशन विश्वात आणखी पुढे जायच्या महत्त्वाकांक्षेने तिला घेरलेले असते. अशात सुट्टी पाहून तिची रोमान्सिक कादंबरीप्रेमी गर्भवती बहीण लिबी उत्तर कॅरोलिना प्रांतात ‘सनशाइन फॉल्स’ इथं दोघींखातर महिन्यासाठी एक कॉटेज आरक्षित करते. रोमॅण्टिक कादंबऱ्यांतील कथानकाप्रमाणे (अनोळखी व्यक्तींसह मैत्री-प्रेम आणि ढिगाने गंमत) हा एक महिना दोघींनी जगायचा, असे त्यांच्यात ठरते; पण सनशाइन फॉल्समध्ये दाखल होऊन मौज-मजा करण्याच्या दुसऱ्याच दिवशी नोराला त्याच शहरात चार्ली लास्ट्रा हा संपादक-प्रकाशक दिसतो. अर्धे शहर, नोरा आणि लिबी राहत असलेल्या कॉटेजवर एक जुने पुस्तकदालन चार्ली लास्ट्राच्या मालकीचे असल्याचा शोध तिला लागतो. चार्लीने आधी केलेल्या अपमानाची परतफेड करण्याच्या कैक प्रयत्नांत नोराचे फासे उलटे पडायला लागतात. नोरा ज्या लेखिकेची लिटररी एजंट म्हणून प्रतिनिधित्व करीत असते, तीच लोकप्रिय लेखिका पुढली कादंबरी चक्क नोराच्या आयुष्यावर लिहायला घेते आणि त्याचे संपादन चार्लीकडे आपसूक येते; पण त्याआधीच पारंपरिक रोमॅण्टिक फॉर्म्युल्याबरहुकूम ‘बुक लव्हर्स’ कादंबरी पुढे सरकू लागते. यात शहरवर्णनाबरोबर पुस्तक प्रकाशकांच्या, संपादकांच्या, लेखकांच्या तऱ्हेवाईक वागण्याची अनेक निरीक्षणे लिटररी एजंटच्या नजरेतून आलेली आहेत. छोटय़ा शहरातील जुन्या पुस्तक दुकानातील ग्रंथांवर साचलेल्या धुळीचेही वर्णन जिवंत आणि दृश्यात्मक बनवले आहे. यात वाचलेल्या अन् वाचायच्या पुस्तकांचे संदर्भ येतात, तेही गमतीशीर पद्धतीने.

‘बुक लव्हर्स’ची कथा आईच्या निधनानंतर शहरात अनाथासारखे जगलेल्या दोन बहिणींच्या नातेसंबंधांची आहे. पुस्तकांच्या दुकानात काम करून लहान बहिणीचे शिक्षण आणि आपले आयुष्य घडविणाऱ्या वडीलबहिणीची आहे. छोटय़ा गावात राहून पुस्तकांचे दुकान आणि शहरातील प्रकाशन संस्था एकाच वेळी पाहणाऱ्या बलाढय़ श्रीमंत कुटुंबप्रेमी व्यक्तीची आहे. शिवाय अवघड परिस्थितीत फुलणाऱ्या प्रेमघटकाचीही आहे. एमिली हेन्रीची ही आणि इतर कादंबऱ्या थोर आणि प्रचंड साहित्यमूल्य असल्याचा दावा करणाऱ्या नाहीत. खूपविक्या कादंबऱ्यांची क्षणसमाधानाची परिपूर्ती त्या नक्कीच करतात. शिवाय त्यांतली पुस्तकाशी संबंधित असलेली लोक घेत असलेला प्रेमपवित्रा आपल्या बॉलिवूडी रोमान्स चित्रपटांमधील उत्कंठा वाढवून आनंद देण्याच्या धाटणीचाच भासतो. तो चांगला की वाईट हे ज्याचे त्याने ठरवूनच या रूढार्थाने ‘बुक्स ऑन बुक्स’ नसलेल्या पुस्तकांच्या वाटय़ाला जावे. पुस्तकांच्या विश्वातल्या तपशिलांसह रोमान्सिका साकारण्याचा हा यशस्वी प्रयोग आहे. चलाखीने लिहिलेला आणि कल्पकतेने सादर केलेला. तीन दिवसांनी म्हणजेच २५ एप्रिल रोजी एमिली हेन्रीची ‘हॅपी प्लेस’ नावाची नवी कादंबरी प्रकाशित होणार आहे. यंदाचा मे महिनाही एमिली हेन्री गाजविण्याच्या तयारीत आहे. आधीच्या तीन पुस्तकांची लोकप्रियता पाहता, ते तिच्यासाठी खूपच सोपे आहे.

Story img Loader