रायगड : ‘श्यामची आई’चे लेखक म्हणून अवघ्या मराठी जगतामध्ये लोकप्रिय असणाऱ्या साने गुरुजींनी अनेक धडपडणारी मुले घडवली, मानवतेचा सर्वत्र प्रसार केला आणि आंतरभारतीच्या माध्यमातून विविध भाषकांना जोडण्याचे प्रयत्न केले. त्यांच्या या कार्याचा वसा घेतलेले कार्यकर्ते आपापल्या परीने त्यांचे काम पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातूनच रायगड जिल्ह्यामधील वडघर येथे ‘साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक’ उभे राहिले असून नवीन पिढी घडवण्याचे काम पोटतिडकीने केले जात आहे.

ने गुरुजींचा मानवतेचा मंत्र आणि आंतरभारतीची संकल्पना यांचा प्रसार करण्याचे काम राष्ट्र सेवा दल आणि साधना प्रकाशनाकडून केला जात आहे. त्या कार्याला गती देण्यासाठी राजगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात वडघर येथे ‘साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक’ गेल्या २५ वर्षांपासून काम करत आहे. मुख्यत: युवकांना घडवण्याचे, त्यांच्यामध्ये आधुनिक मूल्ये बिंबवण्याचे काम अव्याहतपणे सुरू आहे. युवक आणि विद्यार्थ्यांमध्ये स्वभान ते समाजभान निर्माण करण्याचे कार्य या स्मारकाच्या माध्यमातून केले जात आहे. त्याशिवाय आंतरभारतीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून विविध भाषांमधील साहित्यांचा अनुवाद करून देशविदेशांतील वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे.

caste census latest news in marathi
जातीनिहाय जनगणनेचे भय कशाला?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
loksatta editorial on union minister nitin gadkari says no more subsidies on electric vehicles
अग्रलेख : विजेला धक्का
loksatta editorial on tax on medical insurance premium issued in gst council meeting
अग्रलेख: आणखी एक माघार…?
Loksatta editorial on Gau rakshak killed Brahmin boy Aryan Mishra in Faridabad
अग्रलेख: वाद आणि दहशत
RSS chief Mohan Bhagwat remark on Manipur violence
अग्रलेख : सरसंघचालकांचे तरी ऐका…
Presvu Eye Drops
अग्रलेख : दावा, दवा, दुआ!
Prime Minister Narendra Modi visiting Ganapati puja at the home of Chief Justice of India Dhananjay Chandrachud
‘व्यक्तिगत’ पूजा- आरतीचे जाहीर प्रदर्शन झाल्यानंतर…

हेही वाचा >>> सर्वकार्येषु सर्वदा : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचा, वृद्धांचा निवारा

स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्र तसेच गुजरात, कर्नाटक यांसारख्या राज्यांमध्ये अनेक मेळावे घेतले गेले. सर्व भाषांतील साहित्याच्या प्रकाशनासाठी तसेच लेखक, कवी, विचारवंतांना एक व्यासपीठ मिळावे म्हणून साहित्य अकादमीसारखी स्वायत्त संस्थाही पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळात उभी केली. पण साने गुरुजींची ही संकल्पना महाराष्ट्र सरकार किंवा खासगी संस्था व्याख्याने आणि मेळाव्यांपलीकडे नेऊ शकल्या नाहीत. ही कमतरता भरून काढण्यासाठी वडघर येथे ‘साने गुरुजी राष्ट्रीय सामारका’ची मुहूर्तमेढ रोवली गेली.

साने गुरुजींच्या जन्मशताब्दी वर्षात म्हणजे १९९९ साली गुरुजींच्या साहित्य आणि विचारांवर प्रेम करणारे प्रकाशभाई मोहाडीकर, गजानन खातू, यशवंत क्षीरसागर, साने गुरुंजीच्या पुतणी सुधाताई बोडा, तुलसी बोडा, ज्येष्ठ कवी अर्जुन डांगळे, सुधीर देसाई, उमेश कदम यांच्यासारके कार्यकर्ते मधुकरराव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली एकत्र आले. त्या वेळी पालगड येथील साने गुरुजींच्या वास्तूचे स्मृतिभवन करण्याचा ठराव मांडला गेला. पण गजानन खातू यांना साने गुरुजींच्या नावाने राष्ट्रीय पातळीवरचे काम व्हावे असे वाटत होते. त्यासाठी जागा शोधणे, निधी उभा करणे अशा कामांसाठी अमोल पालेकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय स्मारक समिती स्थापन करून युवा शिबीर, अभिवादन यात्रासारखे उपक्रम सुरू करण्यात आले.

हेही वाचा >>> सर्वकार्येषु सर्वदा : अनाथ, मतिमंद आणि वयोवृद्धांसाठी मायेचा आधार

कविवर्य कुसुमाग्रज, मृणालताई गोरे, भाई वैद्या, पन्नालाल सुराणा यांच्यासारख्या लेखक-कार्यकर्त्यांचा पाठिंबा लाभलेल्या या उपक्रमात हळूहळू अनेक संस्था आणि त्यांचे कार्यकर्ते सहभागी झाले. पुढे मुंबईमधील शाळेतील विद्यार्थ्यांनी दिलेल्या एक-एक रुपयाच्या देणगीतून उभ्या राहिलेल्या पैशांमधून माणगावजवळील वडघर येथे ३६ एकर जमीन विकत घेतली गेली. सुरुवातीला तीन खोल्यांच्या एका कौलारू घरात ‘साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट’ उभे राहिले. पुढे या जमिनीवर मोठे केंद्र उभे करण्याचा आराखडा तयार करण्यात आला. त्याला मूर्त रूप देण्यासाठी लागणारा पैसा कुठून आणायचा हा प्रश्न होताच. त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि अर्थमंत्री जयंत पाटील यांनी सहयोग दिला. स्मारकातील युवा भवनामार्फत निरनिराळ्या युवा शिबिरांचे आयोजन केले जाते. यात युवा छावणी शिबीर, अभिव्यक्ती शिबीर आणि प्रेरणा प्रबोधन शिबिरांचा समावेश असतो. दरवर्षी दहा हजारांहून अधिक विद्यार्थी, युवक या शिबिरांमध्ये सहभागी होतात.

युवा छावणी शिबीर

स्मारकाच्या माध्यमातून दरवर्षी उन्हाळ्यात १ ते ७ मे या कालावधीत युवा छावणी शिबिराचे आयोजन केले जाते. त्यात महाराष्ट्रातील विविध भागांमधून येणाऱ्या १७ ते २५ वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश असतो. शिबारार्थींच्या निवास, भोजनाची व्यवस्था संस्थेमार्फत केली जाते. वेगवेगळ्या विषयांतील तज्ज्ञांमार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. युवकांमध्ये स्वभान ते समाजभान निर्माण करणे हा या युवा छावणी शिबिराचा उद्देश असतो. विचारांच्या पेरणीबरोबरच श्रम सहयोगाचे महत्त्व तरुणांना पटवून दिले जाते. नाटक, साहित्य, मानसशास्त्र, समाजवाद, विज्ञान, स्त्रीवाद, संविधान, तर्कवाद यांसारख्या विषयांवर प्रभुत्व असलेल्या तज्ज्ञांना बोलवून युवकांमध्ये वैचारिक घुसळण घडवून आणली जाते.

अभिव्यक्ती शिबीर

अभिव्यक्ती शिबिरात १० ते १४ वयोगटातील विद्यार्थी सहभागी होतात. पाच दिवसांच्या या शिबिरात मुलांच्या अभिव्यक्तीला चालना देण्याचा प्रयत्न केला जात असतो. मुले स्मारकातील बिनभिंतीच्या शाळेत पूर्वी कधीही न अनुभवलेल्या गोष्टी शिकतात. शेतीकाम, कुंभारकामांचा अनुभव घेतात, निसर्गाची सफर, आकाश दर्शन, अभिनय, मैदानी खेळ यांचे प्रशिक्षण या शिबिरातून दिले जाते.

प्रेरणा प्रबोधन शिबिर

दिवाळीनंतर तीन महिने स्मारकात प्रेरणा प्रबोधन शिबिरांचे आयोजन केले जात असते. पुणे, नाशिक, रायगड, मुंबई या जिल्ह्यांमधील २५ ते ३० शाळांमधील १३ ते १४ वयोगटातील विद्यार्थी या शिबिरात सहभागी होत असतात. मुलांच्या मनात परिवर्तनावादी विचारांचे रोपटे रुजवण्याचे काम या माध्यमातून केले जाते. महाराष्ट्रातील कुठलीही शाळा या अडीच दिवसांच्या शिबिरात सहभागी होऊ शकते. मुलांना शिस्त आणि स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न या शिबिराच्या माध्यमातून केला जात असतो. या शिबिरासाठी स्वयंसेवक म्हणून काम करणारे कार्यकर्ते हे स्मारकात छावणी शिबीर पूर्ण केलेले तरुण असतात.

आंतरभारती अनुवाद केंद्र

पाश्चात्त्य देशातील अनेक लेखक अनुवादाच्या मार्फत भारतीय वाचकांपर्यत पोचले आहेत. पण विविध भारतीय भाषांत साहित्यनिर्मिती करणारे समर्थ लेखक सर्वसामान्यांपर्यंत आजही सहज पोहोचत नाहीत. त्यासाठी भाषेचा पूल बांधणे आवश्यक होते. यासाठी संस्थेच्या माध्यमातून आंतरभारती अनुवाद केंद्राची सुरुवात करण्यात आली. रामदास भटकळ यांच्या संकल्पनेतून हे अनुवाद केंद्र सुरू झाले. आज साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टचा अत्यंत महत्त्वाचे उपक्रम म्हणून हा ओळखला जात आहे. सुरुवातीला केवळ अनुवादासाठी सुविधा निर्माण करण्याचे काम करण्याचा मानस असलेल्या या केंद्राने पुढे चांगले अनुवाद व अनुवादक तयार करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची पावले टाकायला सुरुवात केली.

कोणत्याही देशाची, प्रांताची संस्कृती म्हणजे केवळ धर्म आणि कर्मकांडे नसतात तर त्या संस्कृतीत आपले साहित्य, तत्त्वज्ञान, शिल्पकला, चित्रकला यांसारख्या विविध कला आणि लोककला, विविध प्रकारचे संगीत आणि भाषेचाही समावेश असतो. हे विसरत चाललेल्या समाजात सध्या आपण राहतो आहोत. अशा काळात या देशाच्या सांस्कृतिक वस्त्राची वीण उसवत जाणे स्वाभाविक आहे. ही वीण अधिकाधिक घट्ट करण्यासाठी आंतरभारतीसारखे उपक्रम मोलाचे ठरत आहेत.

महत्त्वाची बाब म्हणजे ही गरज साने गुरुजींनी स्वातंत्र्यपूर्व काळातच ओळखली होती. त्यामुळेच त्यांनी सुरुवातीला प्रांतभारतीची आणि नंतर आंतरभारतीची कल्पना मांडली. प्रत्येक प्रांताबरोबर बदलणारी खाद्यासंस्कृती असेल की वस्त्र-प्रावरणातील विविधता असेल, नृत्यातील पदलालित्य असेल की संगीतातील रागदारी असेल या साऱ्यालाच एका धाग्यात बांधण्याचा प्रयत्न ‘साने गुरुजी स्मारका’च्या माध्यमातून केला जात असल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रमोद निगुडकर सांगतात. साने गुरुजींनी मांडलेला आंतरभारतीचा विचार या देशात रुजायला हवा. त्याची चळवळ बनायला हवी. लोकांपर्यंत हे काम पोचायला हवे. यासाठी समाजानेही दातृत्व भावनेने समोर यायला हवे.

साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट

Sane Guruji Rashtriy Smarak Trust

ऑनलाईन देणगीसाठी तपशील

बँकेचे नाव : कॉसमॉस बँक, गोरेगाव पूर्व, मुंबई शाखा

खाते क्रमांक : 1020501034089

आयएफएससी कोड : COSB0000102

या नावाने धनादेश काढावा. धनादेशामागे किंवा त्याबरोबर देणगीदाराने आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच भ्रमणध्वनी क्रमांक लिहावा. संस्था ८०-जीकरसवलतपात्र आहे.

संस्थेपर्यंत कसे जाल

साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक रायगड जिल्ह्यात आहे. मुंबई-गोवा महामार्गाने माणगाव मार्गे वडघर येथे पोहचता येऊ शकते. तर कोकण रेल्वे मार्गाने माणगाव अथवा गोरेगाव स्थानकात उतरून वडघर येथे पोहोचता येते.

धनादेश येथे पाठवा…

एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे लोकसत्तात प्रसिद्ध केली जातील.

दिल्ली कार्यालय

संपादकीय विभागद इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१. ०१२०- २०६६५१५००

मुंबई कार्यालय

लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, ०२२-६७४४०२५०

महापे कार्यालय

संपादकीय विभागप्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०. ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय

संपादकीय विभागफ्लॅट नं.५, तिसरा मजला, होशबानो मेनशन, तनिष्क शोरूमच्या वरती, गोखले रोड, नौपाडा ठाणे (प.) ४००६०२. दूरध्वनी क्रमांक – २५३८५१३२

पुणे कार्यालय

संपादकीय विभागएक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे- ४११००४. ०२०-६७२४११२५

नागपूर कार्यालयसंपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, अॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ – २२३०४२१