इ.स. १३१७ पर्यंत देवगिरीचे यादव राजघराणे हे त्या काळातील सर्वात मोठे साम्राज्य होते. या घराण्याचे मूळ नाव सेऊन असे होते. यादवांचे साम्राज्य नर्मदा नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंत पसरले होते. म्हणजेच यादवांचे राज्य महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि मध्य प्रदेशच्या काही भागांत पसरले होते. सेऊन घराणे हे मूळ द्वारावतीमधले (द्वारका). त्यांची राजधानी चंद्रादित्यापूर म्हणजे आताच्या नाशिक जिल्ह्यामध्ये होती. पण, शेजारील राज्यांच्या होणाऱ्या वारंवार हल्ल्यांनी यादवांनी आपली राजधानी (आताच्या संभाजीनगर जिल्ह्यातील) देवगिरीला हलविली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

देवगिरी गमावले

इ.स. १२७१ मध्ये राजा रामचंद्र म्हणजे रामदेवराय गादीवर आला. याच काळात महाराष्ट्र राज्याची भरभराट झाली. याच काळात ज्ञानेश्वरांनी ‘भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी)’ आणि ‘अमृतानुभव’ अशा ग्रंथांची रचना केली. ज्ञानेश्वरीत पसायदानानंतर याच राजा रामचंद्राचा स्तुतीपर उल्लेख येतो. इ.स. १२९६ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने मोजक्या आठ हजार सैन्यासह देवगिरीवर हल्ला चढवला. अचानक झालेला हल्ला आणि स्वकीयांनी केलेल्या फितुरीमुळे रामदेवरायाला पराभवाला सामोरे जावे लागले. परिणामी, सोने, मोती, हिरे, माणिक, पाचूसह मौल्यवान रत्ने, चांदी अशी खंडणी देत रामदेवरायाला खिलजीचा मांडलिक बनून राहावे लागले.

हेही वाचा : ‘लाडक्या बहिणी’ एकगठ्ठा मते देतात?

याच काळात सुमारे आठव्या शतकात स्थापन झालेल्या नाथपंथाला ज्ञानेश्वरांनी (ज्ञाननाथ) पंथाच्या उग्रतेमुळे जवळजवळ संपुष्टात आणले. इ.स. १२९६ मध्ये आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली. तेराव्या शतकापासून वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राची अखंड परंपरा झाली. पण वारकरी स्वभावाने शांत होते. परकीयांशी सामना करण्याची ताकद आणि मानसिकता त्यांच्यात नव्हती. याच काळात म्हणजे १३०७ आणि १३१८ मध्ये यादवांनी केलेले बंड खिलजीचा सरदार मलिक काफूरने मोडीत काढले आणि १३५ वर्षांचे यादवांचे साम्राज्य संपुष्टात आणले. महाराष्ट्राला बसलेला हा पहिला फटका.

शिवाजी महाराजांचा अंत

या घटनेनंतर तब्बल ३१२ वर्षांनी इ.स. १६३० मध्ये पुण्यातील जुन्नरजवळच्या शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. वयाच्या १६ व्या वर्षी, १९ फेब्रुवारी १६४५ रोजी त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली. त्यानंतर २९ वर्षांनी ६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा मराठा साम्राज्याचे राजे म्हणून राज्याभिषेक झाला. दरम्यानच्या काळात महाराजांनी तोरणा, पुरंदर, कोंढाणा, चाकण हे किल्ले जिंकले तर सुपे, बारामती, इंदापूर ही ठिकाणे ताब्यात घेतली. पुढे महाराज कोकणाकडे वळले आणि त्यांनी कल्याण ताब्यात घेतले.

१० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या भेटीत त्यांनी अफझलखानाचा वध केला. विजापुरी सैन्याचा पराभव करून कोकण, कोल्हापूरकडे कूच करत पन्हाळा किल्ला ताब्यात घेतला. १६६३ मध्ये शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाच्या छावणीवर धाडसी हल्ला केला. इ.स.१६६४ मध्ये महाराजांनी सुरत शहर आणि मुघलांचे व्यापरी केंद्र लुटून आपला खजिना वाढवला. राज्याभिषेकानंतर मराठ्यांनी विजापुरी, फोंड, कारवार, कोल्हापूर, कर्नाटक आदी भाग ताब्यात घेतले. पण, १६८० मध्ये शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्याने मराठा साम्राज्यावर आणि महाराष्ट्रावर दुसरा मोठा आघात झाला.

हेही वाचा : भारतातील मानसिक आरोग्याचे धोरण आणि कायदे

पहिल्या बाजीरावाचा मृत्यू

महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराज गादीवर आले. पण त्यांना स्वकीयांच्या बंडाला सामोरे जावे लागले. रायगड पडणे हा स्वराज्याला बसलेला हादरा होता. आपल्या आठ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी स्वराज्याच्या सीमा वाढवल्या. पण, १६८९ मध्ये औरंगजेबाने फितुरीने त्यांची हत्या केली. त्यानंतर स्वराज्यात अस्थैर्य माजले. याच सुमारास शाहू महाराजांच्या दरबारी पंतप्रधान असणाऱ्या बाळाजी पेशवा यांच्या मृत्यूनंतर १७२० मध्ये पहिल्या बाजीरावाला पेशवाईची वस्त्रे मिळाली. पहिल्या बाजीरावाने निजाम, सिद्दी, पोर्तुगीज यांसारख्या शत्रूशी टक्कर देऊन मराठी राज्य स्थिर केले आणि मराठी फौजांच्या पराक्रमाची नवी क्षितिजे निर्माण केली. त्याच्या कारकीर्दीत मराठा साम्राज्य अधिक विस्तारले. १७४० मध्ये झालेला बाजीरावाचा अकाली मृत्यू हा मराठेशाहीला बसलेला तिसरा फटका होय.

पानिपतचा पराभव

पानिपतच्या तिसऱ्या युद्धाने मराठा साम्राज्याचा कणा पार खिळखिळा केला. १७६० मध्ये मराठा सैन्य पानिपतमध्ये पोहोचले. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे तीन महिने उत्तरेत कडाक्याची थंडी असते. थंडीत मराठा सैन्य गारठून गेले. या युद्धात सूर्याची दिशा निर्णायक ठरली. मराठे पानिपतहून दिल्ली म्हणजे दक्षिण दिशेला जात होते. त्यामुळे दुपारनंतर सूर्य दक्षिणेकडे झुकून मराठा सेनानी विंचुरकरांच्या तोफखान्याच्या डोळ्यांवर, डोक्यावर तिरीप येऊ लागली. त्यातच मराठी सैन्याला सरपण आणि पाण्याची भ्रांत सतावू लागली. पानिपत व आसपासच्या मैदानी व सपाट मुलखात मराठ्यांचा गनिमी कावा चालणार नसल्याने त्यांनी गोलाची लढाई करण्याचे धोरण अवलंबले. पण या प्रकारच्या लढाईची सवय नसल्याने मराठी फौज संकटात सापडली. त्यातच राजपुतांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे मराठा सैन्यातील काही सरदारांनी युद्धातून काढता पाय घेतला. पानिपत युद्धातल्या पराभवामुळे मराठा साम्राज्याचे कंबरडे मोडले. मराठ्यांचा उत्तरेकडील दबदबा अचानक संपला. मोठ्या संख्येने मराठा सैनिक मारले गेल्याने त्यांची ताकद कमकुवत झाली. हा महाराष्ट्राला बसलेला चौथा मोठा फटका होय.

शनिवार वाड्यावर युनियन जॅक

इ.स.१८०० च्या दशकांत मराठा साम्राज्य अनेक तुकड्यांत विभागले गेले होते. पुण्याचे पेशवे, ग्वाल्हेर संस्थानाचे शिंदे, इंदूरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड आणि नागपूरचे भोसले अशी तुकड्यांमुळे कमकुवत झालेली मराठा साम्राज्ये तेव्हा अस्तित्वात होती. यापैकी ग्वाल्हेर, इंदूर, बडोदा व नागपूर यांच्याशी ब्रिटिशांनी सौजन्याचा तह केला होता. इ.स.१८१८ मध्ये पुण्यातील कोरेगाव भीमा या गावात भीमा नदीच्या काठावर ब्रिटिश आणि पेशवा गटांत झालेल्या ऐतिहासिक लढाईत पेशव्यांचे नेतृत्व पेशवा दुसरा बाजीराव करत होता. इंग्रज-मराठ्यांमध्ये झालेली ही तिसरी लढाई होती. लढाईतील पराभवानंतर पेशव्यांची राजवट संपली आणि महाराष्ट्राला पाचवा मोठा फटका बसला. या लढाईनंतर शनिवार वाड्यावर युनियन जॅक फडकला.

हेही वाचा : नव्या सरकारी संसारात ‘नांदा सौख्यभरे’

१८५७ चा उठाव

या लढाईच्या ३९ वर्षांनी इ.स. १८५७ मध्ये ब्रिटिशांचे जुलमी शासन, कंपनीच्या सैन्यातील एकाच पदावर असलेल्या ब्रिटिश आणि भारतीय सैनिकांमध्ये केला जाणारा भेदभाव, नीळ, अफू अशी पिके घेण्यासाठी केली जाणारी सक्ती, शेतकरी आणि कामगारांकडून करवसुली अशा अनेक कारणांनी भारतातील सत्ताधारी, सैनिक, कामगार, शेतकरी, रयतेने एकत्र येत १८५७ चा उठाव केला. या उठावात दुसरा बाजीराव पेशव्यांचा दत्तक पुत्र नानासाहेब दुसरे यांनी सहभाग घेतला. या उठावाचे नेतृत्व, नियोजन आणि अंमजबजावणी कोण करत होते, याबाबत स्पष्ट माहिती नसली तरी इतिहासकारांनी या उठावाचे सूत्रधार म्हणून नानासाहेब पेशव्यांचे नाव अग्रस्थानी ठेवले होते. हा उठाव ब्रिटिशांनी मोडीत काढून महाराष्ट्राला सहावा घाव दिला. पुढे ब्रिटिशांनी संपूर्ण भारतात पश्चिम, मध्य आणि दक्षिणेपर्यंत आपली सत्ता पसरवली.

गांधीहत्या

महाराष्ट्राला बसलेला अखेरचा सातवा फटका म्हणजे गांधीहत्या. ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसेने गांधीजींची गोळ्या घालून हत्या केली. या प्रकरणी झालेल्या न्यायालयीन सुनावणीत ८ जणांना दोषी ठरवून हत्येचा कट रचणाऱ्या गोडसे आणि नारायण आपटे या दोघांना १९४९ मध्ये फाशी देण्यात आली. मात्र गांधीहत्येचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले. या हत्येनंतर मुंबईत दंगल उसळली. पुणे, वाई, पाचगणी, सांगली, कोल्हापूर येथे ब्राह्मणांवर हल्ले करून त्यांची घरे, दुकाने, शाळा, हातमाग, गिरण्या जाळण्यात आल्या. या हत्येनंतर महाराष्ट्रात ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर अशी दुफळी निर्माण झाली. पुढे ही दुफळी वाढतच गेली.

गांधीहत्येशिवाय या दंग्याचे दुसरे एक कारण सांगितले जाते, ते म्हणजे सावकारी करणाऱ्या काही लोभी ब्राह्मण सावकारांनी सुपीक असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चढ्या दराने दिलेली कर्जे होय. त्यातील काही कर्जे चक्रवाढ व्याजावर दिली गेली होती व मुद्दल- व्याज वसूल न झाल्यास ऋणकोची जमीन जप्त होत होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. त्याचा उद्रेक होऊन, जाळपोळ झाली. हे सात फटके कधीही युद्धावर जाण्यासाठी तत्पर असलेल्या महाराष्ट्राला दुर्बल बनवून गेले.

हेही वाचा : लेख : घोंघावणारी आर्थिक वादळे!

१९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. त्या वेळी कार्यरत असलेल्या यशवंतराव चव्हाणांसारखे निष्कलंक, धोरणी मुख्यमंत्री, स. गो. बर्वे यांसारखे सक्षम सनदी अधिकारी आणि आचार्य अत्र्यांसारखे चैतन्यमयी संपादक असे पुण्यात्मे पुन्हापुन्हा जन्मत नसतात. पुन्हा त्या ताकदीची माणसे एकाच वेळी निर्माण झाल्याखेरीज महाराष्ट्राचे लिलिपुटीकरण आणि ऱ्हास थांबण्याची शक्यता दुर्दैवाने नाही. पुढचा आठवा फटका बसायच्या आत हे घडून येवो, अन्यथा आकुंचनाची प्रक्रिया सर्वनाशापर्यंत घेऊन जाईल अशी भीती वाटते, ती खोटी ठरो!

लेखक प्रकाशन व्यवसायात आहेत. jayraj3 june@gmail.com