काही वर्षांपूर्वी, समाजमाध्यमे नसताना, अभिनेता आमीर खानचे एक वक्तव्य प्रसिद्ध झाले होते. “शाहरूख माझ्या पायाशी गोंडा घोळत आहे, माझे पाय चाटत आहे” अशा अर्थाचे तो काही बोलला होता. हे प्रसिद्ध झाल्यानंतर अपेक्षेप्रमाणे गहजब उडाला. नंतर, “शाहरूख हे माझ्या कुत्र्याचे नाव आहे”, अशी खुलासावजा सारवासारव आमीरने केली होती. पण शाहरूखचे चाहते नाराज झाले ते झालेच. आमीरच्या चाहत्यांनाही ते फारसे रुचले नव्हते. ‘आमीर नावाच्या मुस्लीम सुपरस्टारने आपल्या कुत्र्याचे नाव शाहरूख या दुसऱ्या सुपरस्टारच्या नावावरून ठेवले आणि त्यामुळे शाहरूखचे बहुसंख्य हिंदू चाहते नाराज झाले’, असा आचरट अर्थ कोणी लावला नव्हता, ना त्यावरून कोणी न्यायालयात गेल्याची माहिती आहे. पण आता काळ बराच बदलला आहे. कलाकारांचे जात आणि धर्म यावरून त्यांना जात-धर्माच्या राजकारणात ओढण्याचे प्रकार अलीकडे पाहायला मिळतात. त्यामध्ये आता प्राण्यांचीही भर पडली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा