सिद्धार्थ खांडेकर

आपण खरोखरच किती पुढे सरकलो, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. तो करत असताना प्रथम एका फालतू सवयीचा त्याग करावा लागेल.

Nitish Kumar
नितीश कुमारांना ‘एनडीए’शी प्रामाणिक असण्याबाबत का वारंवार द्यावं लागतंय स्पष्टीकरण? ‘त्या’मागचं राजकारण काय?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Kolkata Rape Case
Kolkata Rape Case : “मुलीच्या वेदना आठवल्या तरी…”, कोलकाता प्रकरणातील पीडितेच्या आईची भावनिक प्रतिक्रिया; म्हणाल्या…
vasai police station
वसई: सावकारीचा गुन्हा दाखल होण्याची भीती, पती-पत्नीचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न
bombay hc impose fine of two lakhs to accused and victim while canceling the rape case
बलात्काराचा गुन्हा रद्द करताना आरोपी आणि पीडितेला प्रत्येकी दोन लाखांचा दंड; सैनिकांसाठी दंडाची रक्कम वापरण्याची सूचना
morality Act to impose restrictions on women by the Taliban government of Afghanistan
संपूर्ण शरीर झाकणारा पोशाख… मोठ्या आवाजात बोलणे नाही, गाणी नाही… महिलांसाठी अफगाण नैतिकता कायद्यातील अजब तरतुदी! 
Badlapur sexual assault case,
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण: आरोपीच्या चारित्र्याविषयी माहिती गोळा करण्याचे काम सुरू
Pune Police, Kalyani nagar accident, Juvenile Justice Board, Vishal Agarwal, prosecution, accident car, passport, court hearing, charge sheet, bail, judicial custody
कल्याणीनगर अपघात प्रकरण : मुलाविरुद्ध सज्ञान समजून खटला चालविण्याची पोलिसांची मागणी

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने अपेक्षेपेक्षा कमी अशी सहा पदके पटकावली आणि यंदा तर सुवर्णपदकानेही हुलकावणी दिल्यामुळे भारताचा क्रमांक ७१पर्यंत खाली घसरला. नीरज चोप्राचे एक रौप्यपदक आणि ५ कांस्यपदके ही कामगिरी टोक्यो २०२०च्या तुलनेत उजवी तर अजिबात म्हणता येणार नाही. किमान सहा प्रकारांमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर राहिला, म्हणजे ती हुकलेली सहा कांस्यपदके ठरतात. कुस्तीमध्ये विनेश फोगटच्या वजनावरून घोळ झाला नसता, तर आणखी किमान रौप्यपदक मिळाले असते. आणि नीरज चोप्राला पाकिस्तानच्या अर्शद नदीमकडून अनपेक्षित स्पर्धा उभी राहिली नसती, तर भारताला सुवर्णपदकासह दोन आकडी पदकसंख्या गाठता आली असती आणि भारताचा क्रमांक पहिल्या पन्नासात तरी लागला असता. तांत्रिकदृष्ट्या पॅरिसमधील कामगिरी भारताची तिसरी सर्वश्रेष्ठ कामगिरी ठरते. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताने १ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्य अशी सात पदकांची कमाई केली होती. तर लंडन २०१२मध्ये २ रौप्य आणि ४ कांस्य अशी सहा पदके भारताच्या नावापुढे नोंदवली गेली. त्यावेळी सहा आणि यंदाही सहा, मात्र त्यावेळी दोन रौप्यपदके होती. यंदा एकच रौप्यपदक आहे. त्यामुळे निव्वळ क्रमांकांच्या भाषेत बोलायचे झाल्यास भारताची ही सहा पदकांची कामगिरी अटलांटा १९९६ (१ कांस्य) आणि सिडनी २००० (१ कांस्य) या स्पर्धांच्या इतकीच मोलाची म्हणजे ७१व्या क्रमांकाची झाली. याचा अर्थ १९९६, २००० आणि २०२४ अशा तिन्ही स्पर्धांमध्ये भारत ७१व्या क्रमांकावर राहिला! त्या स्पर्धा आणि पॅरिस यांच्यात २५-३० वर्षांचा फरक आहे. पण ‘मेडल इन्फ्लेशन’चा विचार करता, भारताच्या ‘त्या’ एकल पदकांइतकेच यंदाच्या अर्धा डझन पदकांचे मोल ठरते. तेव्हा आपण खरोखरच किती पुढे सरकलो, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. 

हेही वाचा >>> जम्मू-काश्मीर विधानसभेची निवडणूक कशी घेणार?

ते करत असताना प्रथम एका फालतू सवयीचा त्याग करावा लागेल. ही सवय अर्थातच तुलनेची. चीन, अमेरिका बघा किती पुढे गेलेत… गेला बाजार आफ्रिकेतले देश बघा कशी कामगिरी करतात… ते दूरचे देश सोडा, पण जपान-कोरियासारखे ‘आशियाई’ देश किती पदके मिळवतात ते तरी पाहा… युक्रेनसारखा युद्धजर्जर देश पदके मिळवतो मग आम्हाला काय झाले… पॅरिसमध्ये पहिल्या २० क्रमाकांच्या देशांवर नजर टाकली, तर उझबेकिस्तान, केनिया आणि ब्राझील वगळता सगळे देश हे श्रीमंत आणि पुढारलेले आहेत. चीन आज इतर अनेक क्षेत्रांप्रमाणे क्रीडा क्षेत्रातही महासत्ता आहे. कारण कितीतरी क्रीडा प्रकारांमध्ये या देशाची गुंतवणूक आणि गुणवत्ता आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोपिय देशांमध्ये वर्षानुवर्षे रुजलेली आणि जोपासलेली क्रीडा संस्कृती आहे. जपान-कोरिया हे देश वर्षानुवर्षांच्या प्रयत्नांती पहिल्या जगातले देश म्हणून वावरतात. शिवाय गेल्या तीन स्पर्धांमध्ये वेगवेगळ्या कारणांस्तव रशियाचे खेळाडू उतरलेले नाहीत. अन्यथा त्यांनीही ढीगभर पदके मिळवली असती आणि कदाचित भारताचा क्रमांक अधिक खाली घसरला असता. चीन-रशियासारखा हुकूमशाही वरवंटा आपण चालवू शकत नाही. जपान-कोरियासारखी शिस्तबद्ध व्यवस्था आपण राबवू शकत नाही. अमेरिका, युरोप आणि आफ्रिकी देशांप्रमाणे आपल्या पोषणात प्रथिनमूल्यांचे प्रमाण अत्युच्च नसते, त्यामुळे शारीरिक ठेवणीत मर्यादा येतात. मुद्दा असा, की या मर्यादा असूनही आपण सध्यापेक्षा उजवी कामगिरी करून दाखवू शकतो, याविषयी सर्वंकष गांभीर्याने विचारच होत नाही. 

यासाठी छोटी आणि मर्यादित उद्दिष्टे ठेवणे शिकावे लागेल. उदा. गतशतकात कोरियाने १९८६ आणि १९८८ असे अनुक्रमे आशियाई स्पर्धा आणि ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद भूषवले. त्यावेळी आपण जपानपेक्षा अधिक पदके मिळवली पाहिजेत असे माफक उद्दिष्ट ठेवले गेले. आजही त्यात फार फरक पडलेला नाही. पण पहिल्या दहात जपानप्रमाणेच कोरियादेखील दिसतो. २०१२मध्ये ब्रिटनने ऑलिम्पिक यजमानपद भूषवले, त्यावेळी इतर कोणत्याही देशांऐवजी ऑस्ट्रेलियापेक्षा अधिक पदके जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले. २०१२ ते २०२० अशा सलग तीन स्पर्धांमध्ये ब्रिटनने ऑस्ट्रेलियापेक्षा सरस कामगिरी करून दाखवली. यंदा ऑस्ट्रेलियाच्या नावावर अधिक सुवर्णपदके नोंदवली गेल्यामुळे त्यांचा क्रमांर वर सरकला. पण एकूण पदके ब्रिटननेच अधिक जिंकली.

हेही वाचा >>> Yogendra Yadav : राष्ट्रवाद, धर्म, संस्कृती हे मुद्दे भाजपकडून काढून घेणे हे खरे आव्हान!

आपण ब्रिटन किंवा कोरियाप्रमाणे एखाद्या देशाला लक्ष्य ठेवून कामगिरी सुधारावी अशी स्थिती नाही. पण मर्यादित क्रीडाप्रकारांवर लक्ष केंद्रित करून पदक जिंकण्याची क्षमता आणि शक्यता वाढवणे का जमू नये? स्वतंत्र भारताने केवळ आठ क्रीडाप्रकारांमध्ये आजवर पदके जिंकली आहेत. ते आहेत – हॉकी, कुस्ती, टेनिस, वेटलिफ्टिंग, नेमबाजी, बॉक्सिंग, बॅडमिंटन, अॅथलेटिक्स. यांतील टेनिसमध्ये पदक जिंकण्याची शक्यता नजीकच्या काळात शून्य. अॅथलेटिक्समध्येही नीरज चोप्रा वगळता इतरांकडून पदकांची अपेक्षाही ठेवणे अशक्य आहे. तिरंदाजी आणि टेबल टेनिसमध्ये आपण उपान्त्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचतो, पण पदक जिंकणे जमलेले नाही. बाकीच्या खेळांबाबत तर तेही दिसून येत नाही. यंदा ११७ जणांचे जंगी पथक आपण पाठवले. हा थाट कशासाठी आणि कोणासाठी? ही अशी पथके राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धांसाठी खुशाल पाठवावीत. या दोन्ही स्पर्धांमध्ये आपण गेली काही वर्षे पदकांचे विक्रम रचत आहोत. पण ते यश ऑलिम्पिकमध्ये परिवर्तित होत नाही हे वास्तव आहे. याबाबतीत फार दूरवर पाहायला नको. इराण, मंगोलिया, इंडोनेशिया हे देश मोजक्याच क्रीडा प्रकारांवर लक्ष केंद्रित करतात आणि सुवर्णपदक किंवा सुवर्णपदके जिंकून आणतात. मग आपणच कशासाठी उगीच दहा सुवर्णपदके जिंकून आणतील अशा थाटात जंबो पथके पाठवायची याविषयी गांभीर्याने विचार करायलाच हवा. नेमबाजांचे सध्या रास्त कौतुक होतेय, पण आधीच्या दोन स्पर्धांमध्ये आपली या खेळातली पाटी कोरी होती. यंदा बॉक्सिंग आणि बॅडमिंटनच्या बाबतीत हे घडले. कुस्तीच्या शेवटच्या दिवशी एक कांस्यपदक हाती लागले. म्हणजे आहे त्या खेळांमध्ये पदके राखताना जीव मेटाकुटीला येतोय. वेटलिफ्टिंगमध्ये २००० आणि २०२०मध्ये पदक मिळाले, ते यंदा नाही. नीरज चोप्राला आता प्रत्येक स्पर्धेत पाकिस्तानच्या नदीमकडून कडवी स्पर्धा मिळणार, तेव्हा त्याच्या सुवर्णपदकाची हमी नाही. अभिनव बिंद्रा आणि नीरज चोप्रा यांच्याव्यतिरिक्त सुवर्णपदक तरी कसे मिळणार याचा विचार कधी कोणी करते का? तो प्रयत्न कुस्ती, नेमबाजी, बॅडमिंटन, बॉक्सिंग अशा मोजक्या खेळांमध्येच दिसून यायला हवा. हॉकीमध्ये सुवर्णपदक मिळू शकेल, असे आश्वासक सातत्य भारताने दाखवले आहे. इतर खेळांमध्ये ते दिसून यायचे असेल, तर मोजक्याच खेळांवर ऑलिम्पिकपुरते लक्ष केंद्रित करावे लागेल. यासाठी फार तर सहा खेळ आणि ५० जणांचे पथक इतका जामानिमा पुरेसा आहे. नाही तर काही मीटरांचे कापड घेऊन जायचे आणि लंगोटीच नेसून परतायचे असा प्रकार सतत दिसत राहील. भारताने तुलना भारताशीच करावी. यशही दिसेल आणि फाजील अपेक्षाभंगाचे दुःखही कमी होईल. अन्यथा मग आहेच… दर वेळी कांस्यपदकांची लंगोटी नि तिला एखादे सोनेरी किंवा रुपेरी ठिगळ!        

siddharth.khandekar@expressindia.com