पंतप्रधान गेल्या आठवड्यात – ३१ ऑक्टोबर रोजीच्या जाहीर भाषणात जे काही बोलले त्यातील काही गोष्टी ज्या मला चिंताजनक आणि थोड्या भीतीदायक वाटल्या. पंतप्रधान मोदी हे आपल्या खंडप्राय देशातले वैविध्य वारंवार दुर्लक्षित करतात, ही चिंताजनक बाब त्यांच्या या भाषणातून उघड झाली. एकसमानता हाच पुढे जाण्याचा मार्ग असून जो कोणी ‘एक राष्ट्र- एक नागरी संहिता/ एक रेशन कार्ड/ एक निवडणूक’ या त्यांच्या अजेंड्याला विरोध करील तो भारताच्या एकात्मतेच्या विरोधात आहे, असा या मुद्द्याचा सूर होता. हे भीतीदायकही आहे, कारण ही विधाने वास्तवापासून पार तुटलेली आहेत. सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचा त्यांचा नारा हा खरी धर्मनिरपेक्षता आणि सर्वांचा विश्वास यांवर आधारित कसा होता हेच मोदींनी याही भाषणात सांगितले. पण आता कुणीतरी त्यांना वास्तव सांगायला हवे की, गेल्या दहा वर्षांत बहुतेक मुस्लिम त्यांच्यापासून दुरावले आहेत आणि ‘सबका साथ, सबका विकास, सब का विश्वास’ या घोषणेवर अल्पसंख्याकांचा आता विश्वास उरलेला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘राष्ट्रीय एकता दिना’निमित्त पंतप्रधान बोलत होते, हा दिवस साजरा करण्याची सुरुवात मोदींनीच काही वर्षांपूर्वी केली, हे विशेष. सरदार पटेल यांच्या सन्मानार्थ उभारलेल्या अवाढव्य ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या पायथ्याशी हे भाषण झाले. लोकसभा निवडणुकीतल्या फटक्यानंतरही, आपणच भारताचे एकमेव नेते असल्याची प्रतिमा बळकट करण्यासाठी हल्ली मोदी पुन्हा सार्वजनिक व्यासपीठांवर एकटेच भाषण करू लागले आहेत, त्यापैकी हा प्रसंग होता.

हेही वाचा : बहुजन समाजातील संधीसाधूपणावर उपाय काय?

u

त्यानिमित्त आयोजित केलेला कार्यक्रम प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचीच छोटी आवृती शोभणारा होता. पारंपारिक वेशभूषेतील आदिवासी नर्तकांचे सादरीकरण, मग गुलाबी फ्रॉक घातलेल्या मुलींनी केलेला कसलासा ‘डान्स’, मोटरसायकलवर कलाबाजी आणि या सगळ्याच्या शेवटी भारतीय हवाई दलाचा फ्लाय-पास्टसुद्धा! त्यानंतर देशाला संबोधित करण्यासाठी मोदी सरसावले. त्यांचे भाषण फारच लांबले, कारण त्यांनी त्यांच्यामते गेल्या दहा वर्षांतील त्यांची वैयक्तिक कामगिरी कायकाय आहे, हे इथेही सांगितले. अचानक त्यांच्या आवाजाला ‘देशवासियांना इशारा’ देण्याची धार आली- ‘शहरी नक्षलवाद्यांना ओळखा आणि त्यांचा मुखवटा फाडा’- असा तो इशारा! मोदी पंतप्रधान असतानाच्या दशकात ‘शहरी नक्षलवाद्यां’चा खात्मा करण्याच्या नावाखाली कोणत्याही असंतोषाला निर्दयपणे चिरडले गेले आहे, हे ज्यांना माहीत आहे त्यांना हा इशारा चिंताजनकच वाटेल. या टप्प्यावर मला हे नमूद करायचे आहे की ‘शहरी नक्षल’ म्हणून तुरुंगात टाकलेले वयोवृद्ध प्राध्यापक, ख्रिस्ती धर्मगुरू आणि डावे विचारवंत हे भारतासाठी कोणत्याही प्रकारे धोका आहेत यावर माझा विश्वास नाही. जर देशाला या असल्या लोकांपासूनही धोकाबिका वाटत असेल, तर आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी जबाबदार असलेल्यांचे ते अपयशच ठरते. भारताची एकता साजरी करण्यासाठीच्या दिवशीसुद्धा आपले पंतप्रधान ‘शहरी नक्षलवाद्यां’बद्दल बोलताहेत, याची मला काळजी वाटली; याचे कारण ते पुन्हा एकदा काल्पनिक शत्रू तयार करून वास्तविक मुद्द्यांपासून लक्ष विचलित करत आहेत, हेच यातून उघड होत होते!

लोकसभेत पूर्ण बहुमत गमावल्यानंतरचे काही महिने मोदी जरा शांत दिसत होते… तेव्हा मला असे वाटले की कदाचित मोदींना लोकशाहीची ताकद समजली असेल, मतभेद हे लोकशाहीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असते, हे सत्य स्वीकारण्यास तयार होत असतील. पण ‘राष्ट्रीय एकता दिना’च्या त्या भाषणानंतर, लोकशाहीचा एकच अर्थ आणि तो म्हणजे निवडणुका जिंकणे, हाच त्यांचा विश्वास दिसून आला. भारताने एकसंध आणि मजबूत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे एकसमानता, हे चुकीचे गृहीतकच पुन्हा उगाळण्यापर्यंत आता मजल गेलेली आहे.

हेही वाचा : स्थगिती विरुद्ध प्रगती!

एकसूत्रता नसणे हीच भारताची खरी ताकद आहे. भाषा, बोलीभाषा, खाण्यापिण्याच्या सवयी, कपडे आणि परंपरा इथे इतक्या बदलतात की जे इथे पहिल्यांदा येतात त्यांना ही विविधताच भुरळ घालते… मग पाहुण्यांना उमगते की भारतीय संस्कृती किंवा भारतीय पाककृती यासारखी कोणतीही एकच एक गोष्ट नसते… डोसाही भारतीय असतो आणि पराठाही भारतीयच असतो! माझ्यासारखीच्या आयुष्यातली बहुतेक वर्षे ‘जुन्या’ भारतात गेलेली आहेत. मी कबूल करते की त्यात अनेक गोष्टी चुकीच्या होत्या; पण त्यासोबत अनेक चांगल्याही गोष्टी होत्या आणि त्यापैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विविधता आणि मतभेद यांचा इथे आदर केला जाई. याउलट मोदींनी ‘नवीन’ भारतात या वैविध्यालाच नव्याने एकसाची आकार देण्याचा आटोकाट प्रयत्न चालवलेला आहे.

जर एकसाची ‘नवा भारत’ घडवणे हेच मोदी आणि त्यांच्या हिंदुत्ववादी सहप्रवाशांचे उद्दिष्ट असेल, तर हे उद्दिष्ट असाध्य आहे आणि त्याहीपेक्षा ते अयोग्यसुद्धा आहे, हे त्यांना कुणीतरी सांगायला हवे. देशभक्त, देशाभिमानी भारतीय होण्यासाठी आपल्याला ‘पूर्ण गणवेश’ घालण्याची गरज नाही, परंतु ही गोष्ट मोदींना कधीच समजली नसावी… किंवा कदाचित ही गोष्ट त्यांना समजून घ्यायचीच नसावी. रा. स्व. संघात मध्ये आपली उमेदीची वर्षे घालवल्यानंतर, त्यांना कदाचित विविधता हाच धोका वाटत असावा. या विविधतेपायीच धर्म वा राजकीय विचारसरणीच्या नावाखाली भारत पुन्हा खंडित होईल, अशी चिंता त्यांना वाटत असावी.

पण वास्तव नेमके याउलट आहे. जर भारत खरी लोकशाही राहण्यात यशस्वी झाला असेल तर त्याचे कारण म्हणजे आपण आपली विविधता आणि आपले मतभेद साजरे करायला शिकलो आहोत. या लोकसभेत पूर्ण बहुमत मिळवण्यात अपयशी होण्यामधून मोदींनी एक गोष्ट शिकायला हवी होती, ती म्हणजे द्वेषाची भाषा कमी केल्यास ते अधिक लोकप्रिय झाले असते. भारताला एकत्र धरून ठेवणारा ‘गोंद’ हा कुठला एखादा धर्म नसून आपली विविधताच आपणा सर्वांना ‘भारतीय’ म्हणवण्याची मुभा देते, हे आपले वैशिष्ट्य आहे.

हेही वाचा : तुमचा स्मार्टफोन पाहा- गरज ओळखून शिका… किंवा शिकलेले विसरा!

आपल्या अनेकरंगी भूमीत अस्तित्त्वात असलेल्या विविध संस्कृती आणि श्रद्धा आपण साजरे करत राहिलो तर भारत एकसंध राहील. एकसमानता, एकसाचीपणा ही भारतासाठी गरजेची गोष्ट नाही, म्हणून पंतप्रधान महोदर, तुम्ही ‘एक राष्ट्र, एक कायदा/ एक शिधापत्रिका’ या विषयावर फुंकर घालणे कृपया थांबवू शकता का? ते निरर्थक आहे. तुम्हाला आणि आपणा सर्वांनाच आणखी महत्त्वाच्या गोष्टी साध्य करायच्या आहेत.

((समाप्त))