तवलीन सिंग

ईशान्येकडल्या तीन राज्यांचे निवडणूक निकाल गेल्या आठवड्यात पाहात होते तेव्हाच माझ्या स्क्रीनवर राहुल गांधी त्यांच्या अगदी नव्या अवतारात दिसले. ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान अस्ताव्यस्त वाढलेले त्यांचे आणि जंगली दाढीची जागा नीटनेटके केस आणि व्यवस्थित राखलेल्या दाढीने घेतली असल्याचे ती प्रतिमा सांगत होती… टीशर्टाऐवजी सुटाबुटात दिसत होते राहुल गांधी! भारत जोडो यात्रेदरम्यान आपण पाहिलेल्या दाढीवाल्यापेक्षा ते इतके वेगो दिसत होते की, ओळखायला मला एक क्षणभर नीट पाहावेच लागले…

Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का?
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
Radhakrishna Vikhe Patil On Balasaheb Thorat
Radhakrishna Vikhe Patil : “तेव्हाच सांगितलं होतं आधी निवडून तर या”, राधाकृष्ण विखेंचा बाळासाहेब थोरातांवर हल्लाबोल
News About Rahul Narwekar
Rahul Narwekar : विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची निवड निश्चित; अर्ज भरताच विरोधकांवर टीका “विरोधकांचा लोकशाहीवर विश्वास…”

… हे पाहातानाच पुढल्या क्षणी कळले की, राहुल गांधी भारतात नसून केम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या कुठल्याशा बिझनेस स्कूलमध्ये भाषण करत असतानाचे ते छायाचित्र आहे. समाजमाध्यमांवरील त्यांच्या समर्थकांकडून मला समजले की ते ‘एकविसाव्या शतकात ऐकण्याची कला’ या विषयावर भाषण देण्यासाठी आले होते. पण मी त्यांचे जे भाषण ऐकले ते भारतातली लोकशाही मरणपंथाला लागलेली असल्यावरच भर देणारे होते. आपल्या देशात सर्व लोकशाही संस्थांशी तडजोड करण्यात आली आहे आणि भारतीय प्रसारमाध्यमे ‘लक्ष्य’ होण्याच्या भीतीने याबद्दल बोलत नाहीत, असा त्यांच्या म्हणण्याचा सारांश होता. विरोधी पक्षाच्या नेत्यांना संसदेत बोलू दिले जात नाही, असाही उल्लेख राहुल गांधींच्या या भाषणात होता.

आणखी वाचा- भारताच्या लोकशाहीवर हल्ला, राहुल गांधी यांची ‘केंब्रिज’मधील व्याख्यानात टीका

पराभवानंतर हे परदेशात!

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून या सर्व वाईट गोष्टी घडल्या आहेत, याची आठवण त्यांनी उपस्थितांना करून दिली. या साऱ्यात तथ्य नाहीच असे नाही, पण याच गोष्टी भारतातील सर्वात शक्तिशाली राजकीय घराण्याच्या वारसदाराने – राहुल गांधी यांनी – यापूर्वीही अनेकदा सांगितल्या आहेत. शिवाय मला तरी प्रश्न पडला की, ज्या आठवड्यात त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमधून निकाल येणार होते तोच आठवडा त्यांनी परदेश दौऱ्यावर जाण्यासाठी का निवडला असेल? काँग्रेसचे निकाल निराशाजनक असण्याची शक्यता गृहीत धरून, निकाल जेव्हा येतील तेव्हा लांब पक्ष आणि पत्रकार यांच्यापासून लांब राहाणेच बरे, असे काही यामागे असावे का? भाजपच्या कार्यालयात मोदींचा सत्कार आणि सत्कार होत असताना, राहुल गांधी जर दिल्लीत असते तर त्यांना काँग्रेस कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचे उदास भावच पाहावे लागले असते, हे कारण तर या नियोजित परदेश दौऱ्यामागे नसावे ना?

निवडणुकीचे निकाल लागले रे लागले की भाजपच्या दिल्ली कार्यालयात नेहमीच जल्लोष असतो. पंतप्रधानसुद्धा नेहमीच तिथे येऊन, त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आदरांजली, प्रशंसा आणि सत्कार स्वीकारत असतात. या वेळी हा कौतुकसोहळा अधिकच सयुक्तिक होता कारण मोदी सत्तेवर आल्यापासूनच ईशान्येकडील राज्यांनी भाजपला मतदान करण्यास सुरुवात केली आहे. त्या राज्यांमधली मोठी ख्रिश्चन लोकसंख्या, तिथली गोमांसभक्षक खाद्यसंस्कृ़ती , अशा कारणांमुळे भाजप या राज्यांमध्ये परका मानला जाई. आतापर्यंत ही राज्ये, काँग्रेस पक्षाचा अभेद्य बालेकिल्ला समजली जात होती.

आणखी वाचा- “भारतात लोकशाही संकटात, पंतप्रधान नरेंद्र मोदी….” राहुल गांधी यांचं केंब्रिज विद्यापीठात वक्तव्य

मग मोदी यांच्या कारकीर्दीत असा काय फरक पडला की, इथल्या दोन निवडणुका भाजपनेच जिंकल्या? या प्रश्नाचे नेहमीचे उत्तर असे की त्यांच्या सरकारने कल्याणकारी, पोषण आणि आरोग्य योजना चांगल्या प्रकारे चालवल्यामुळे लोक त्यांना राजीखुशीने मते देतात. पण ईशान्येचे आकर्षण विशेषतः मोदींना अधिकच असल्याचे दिसते आणि एकेकाळी हिंसक चळवळींसाठी प्रसिद्ध असलेल्या या ‘अस्वस्थ ईशान्ये’मध्ये बदल घडवण्यासाठी त्यांच्या सरकारच्या काळात मोठी गुंतवणूक केली गेली आहे.

आत्मपरीक्षणाला इतका नकार कसा काय?

निवडणूक निकालांच्या वेळीच काँग्रेस पक्षाचा सर्वात महत्त्वाचा नेता एखाद्या परदेशी महाविद्यालयात व्याख्यान देण्यासाठी गेला नसता, तर कदाचित तो आपल्या कार्यकर्त्यांसोबत बसून प्रामाणिक आत्मपरीक्षण करताना दिसत असता. अर्थात कदाचितच… जर २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाचा पराभव झाल्यापासून असे आत्मपरीक्षण झाले असते, तर आतापर्यंत काँग्रेसने निवडणुका जिंकण्याची रणनीती तयार केली असती. राहुल गांधी भारतातील लोकशाही कशी मरणपंथाला लागली आहे हे पाहात असतात, पण लोकशाहीतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही पक्षाची ‘निवडणूक जिंकण्याची क्षमता’ हे त्यांच्या लक्षात आलेले दिसत नाही.

कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत चालणे ही कल्पना छानच आणि एवढा पल्ला गाठला गेल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते आणि समर्थक सर्वत्र उत्साहीसुद्धा असतील, पण त्या यशस्वी ‘भारत जोडो यात्रे’चा शाश्वत परिणाम काय होईल? – ‘शून्य’, हेच या प्रश्नाचे एका शब्दातले उत्तर. जरा सविस्तर उत्तर द्यायचे तर मला असे सुचते की, जिथे जिथे यात्रा पोहोचली, तिथे-तिथे छोटी भारत जोडो केंद्रे तयार करायला हवी होती- जिथे काँग्रेस कार्यकर्ते-नेते आणि तळागाळातील संघटना/ संस्थांचे कार्यकर्ते एकत्र येऊन मतदारांना पक्षात परत आणण्याचे मार्ग विकसित करू शकतील. ‘नेत्यांची कमतरता’ ही काही काँग्रेस पक्षाची समस्या नाही. राहुल आणि त्यांच्या बहिणीसारखे अनेक वारसदार नेते या पक्षात आजही आहेतच. असे वारसाहक्काने सार्वजनिक जीवनात उतरल्यावर आत्मपरीक्षणाची गरज ओळखू येते का, की आत्मसंतुष्टताच पुरेशी असते, हा मात्र प्रश्न आहे.

आणखी वाचा- “बुद्धी भ्रष्ट झालेल्या राहुल गांधींनी भारताचा अपमान…” केंब्रिजमधल्या मोदींबाबतच्या वक्तव्यानंतर भाजपाचा घणाघात

ईशान्येतील तीन राज्यांच्या ताज्या निवडणूक निकालांचे विश्लेषण करताना हे लक्षात ठेवण्यासारखे आहे की, मतदार आपल्या पक्षाला सतत का नाकारत आहेत हे समजून घेण्याचा गंभीर प्रयत्न काँग्रेस पक्षात गेल्या नऊ वर्षांत कधीही झाल्याचे दिसून आलेले नाही.

आत्मपरीक्षणाला इतका नकार कसा काय, हे समजून घेण्याचा मी जेव्हा-जेव्हा प्रयत्न करते, तेव्हा २०१८ मध्ये मुंबईत झालेल्या इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलणाऱ्या सोनिया गांधींची प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर तरळतेच… मला लख्ख आठवते की, सोनिया गांधी यांनी हिरवी साडी आणि पांढरी शाल घातली होती… त्या व्यासपीठावर आल्या तेव्हा उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले होते. मला सगळ्यात जास्त आठवते ते सोनिया गांधी यांनी ठाशीवपणे उच्चारलेले एक वाक्ये- “मोदी परत येणार नाहीत. आम्ही त्यांना येऊ देणार नाही.” त्या उद्गारांमध्ये असलेल्या आत्मसंतुष्टीच्या जाणिवेमुळे ते शब्द माझ्या मनात कोरले गेले आहेत! या भावनेनेच काँग्रेस पक्षाला आपले अपयश प्रामाणिकपणे तपासण्यापासून रोखले आहे.

आणखी वाचा- विश्लेषण : राहुल गांधींकडून थेट केंब्रिज विद्यापीठात ‘पेगासस स्पायवेअर’चा उल्लेख, जाणून घ्या नेमकं प्रकरण ज्यामुळे मोदी सरकार आलं होतं अडचणीत

पण ही आत्मसंतुष्टता गळून पडावी आणि आत्मपरीक्षण झडझडून घडावे… तसे ते घडण्याची गरज आपल्यालासुद्धा आहे, कारण सरकारवर अंकुश ठेवणारा विरोधी पक्ष असल्याशिवाय लोकशाही फार काळ टिकत नाही. देशभरात पाळेमुळे असलेला काँग्रेस हा एकमेव विरोधी पक्ष आहे आणि त्यामुळे २०२४ मध्ये आव्हान निर्माण करायचे असेल, तर आपल्याला खऱ्या अर्थाने काँग्रेसचे पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे.

Story img Loader