अमेरिकेच्या अध्यक्षाची निवडणूक ५ नोव्हेंबर रोजी होणार असून त्यात डेमोक्रॅटिक कमला हॅरिस आणि रिपब्लिकन डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सरळ लढत होणार आहे. सध्याचे अध्यक्ष जो बायडेन यांनी अध्यक्षीय नामांकनाच्या प्रक्रियेतील प्राथमिक निवडणुकीत विजय प्राप्त केला असला तरी त्यांनी पक्षाची अधिकृत उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच अध्यक्षीय निवडणुकीतून माघार घेतली होती. परिणामी १९ ते २२ ऑगस्ट दरम्यान शिकागो येथे झालेल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये बायडेन यांच्या ऐवजी कमला हॅरिस यांची पक्षाच्या अध्यक्षीय उमेदवार म्हणून अधिकृत घोषणा करण्यात आली.

दुसऱ्या बाजूने विस्कॉन्सिन राज्यातील मिलवॉकी येथे १५ ते १८ जुलै दरम्यान झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची पक्षाचा अध्यक्षीय उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली. सलग तिसऱ्यांदा अध्यक्षीय नामांकन प्राप्त करणारे ट्रम्प हे पहिले रिपब्लिकन ठरले आहेत. अध्यक्षपदासाठी ५ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार असली तरी ती निवडणूक अध्यक्षाच्या निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान करणाऱ्या मतदारांची निवडणूक आहे. अध्यक्षाच्या निवडणुकीत मतदान करणारा एक विशिष्ट मतदार वर्ग असतो. त्यालाच निर्वाचकगण- इलेक्टोरल कॉलेज म्हटले जाते. अर्थातच सामान्य मतदार अध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये सरळ मतदान करीत नाही. तो अध्यक्षाची नाही, तर अध्यक्षीय मतदारांची निवड करतो. तेथील अध्यक्षीय मतदारांची संख्या राज्यनिहाय निराळी आहे. अमेरिकेतील एकूण ५० राज्यातील अध्यक्षीय मतदारांची संख्या ५३५ आहे. परंतु अध्यक्षीय मतदारांची – निर्वाचकगणाची एकूण संख्या ५३८ आहे. त्यासाठी २३ वी घटनादुरुस्ती महत्त्वाची ठरली आहे. या दुरुस्तीला अनुसरून राष्ट्रीय राजधानी असलेल्या वाशिंग्टन, डी. सी. (डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया) साठी तीन अध्यक्षीय मतदार देण्यात आले आहेत. अर्थातच ही संख्या लहान राज्याच्या अध्यक्षीय मतदाराइतकी आहे. लहान राज्याची लोकसंख्या कितीही असली तरी त्यांची अध्यक्षीय मतदारांची संख्या तीन असते.

ajit pawar ncp searching president for pimpri chinchwad
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवडमध्ये शहराध्यक्ष मिळेना
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर…
Joe Biden comments at the Quad meeting that China is testing us
चीनकडून ‘आपली’ परीक्षा! ‘क्वाड’ बैठकीत बायडेन यांची टिप्पणी; ‘हॉट माइक’मुळे जगजाहीर
Prime Minister Narendra modi arrives in America for Quad conference
‘क्वाड’ परिषदेसाठी पंतप्रधान अमेरिकेत दाखल; संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेलाही संबोधित करणार
Joe Biden maintains Donald Trumps India-policy and takes it to the heights
बायडेन यांनी ट्रम्प यांचे भारत-धोरण राखले आणि उंचीवर नेले…
There is no anti encroachment team action of the Municipal Corporation against the welcome boards of CIDCO Chairman
सिडको अध्यक्षांच्या स्वागत फलकांनी बेलापूर विद्रूप; महापालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक गप्प
donald trump on pet animals of america (1)
खरंच अमेरिकेतील स्थलांतरित पाळीव मांजरी खातात? ट्रम्प यांनी वादविवाद सत्रात प्राण्यांचा मुद्दा का उपस्थित केला? नेमकं प्रकरण काय?
Kamala Harris, presidential debate,
विश्लेषण : अध्यक्षीय डिबेटमध्ये कमला हॅरिस यांची बाजी? ट्रम्प यांची कोणत्या मुद्द्यांवर कोंडी? निवडणुकीवर परिणाम किती?

आणखी वाचा-International Right to Information Day : महाराष्ट्रातील माहिती अधिकाराची सद्य:स्थिती

सध्याची अध्यक्षीय मतदारांची, निर्वाचकगणाची संख्या २०१० च्या जनगणनेवर आधारित आहे. त्याला अनुसरून ५० पैकी सात राज्यांची अध्यक्षीय मतदारांची संख्या तीन आहे. अध्यक्षीय मतदारांची निवड करण्याची पद्धत सांघिक संविधानानुसार सरळ संघ शासनाद्वारे नाही, तर प्रत्येक राज्याच्या विधिमंडळाद्वारा ठरविली जाते. बहुतांश राज्यात अध्यक्षीय मतदार निवडण्याची पद्धत सारखी असली तरी त्याला मेन व नेब्रास्का अशा दोन राज्यांचा अपवाद आहे. या दोन्ही राज्यातून अनुक्रमे चार व पाच अध्यक्षीय मतदार निवडून दिले जातात. या दोन्ही राज्यात राज्य काँग्रेस जिल्ह्यांची संख्या अनुक्रमे दोन व तीन आहे. या दोन्ही राज्यात अध्यक्षीय मतदार निवडताना वेगळी पद्धत अवलंबली जाते. वरील दोन्ही ठिकाणी राज्यात बहुमत प्राप्त करणाऱ्या पक्षाला प्रत्येकी दोन अध्यक्षीय मतदार दिले जातात आणि राहिलेल्या जागा दोन्ही राज्यातील प्रत्येक काँग्रेस जिल्ह्यामध्ये बहुमत प्राप्त करणाऱ्या पक्षाला दिल्या जातात. २०२० च्या अध्यक्षीय निवडणुकीत मेन राज्यात डेमोक्रॅटिक पक्षाला सर्वात जास्त मते मिळाली आणि त्या राज्यात असलेल्या दोन काँग्रेस जिल्ह्यांपैकी एकामध्ये बहुमत मिळाले होते. परिणामी राज्यातील बहुमतासाठी दोन व एका काँग्रेस जिल्ह्यातील बहुमतासाठी एक अशा तीन जागा डेमोक्रॅटिक पक्षाला मिळाल्या. एका काँग्रेस जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला बहुमत प्राप्त झाल्यामुळे अध्यक्षीय मतदाराची एक जागा रिपब्लिकन पक्षाला मिळाली होती.

याउलट स्थिती नेब्रास्का राज्याची होती. या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाला राज्यात आणि दोन काँग्रेस जिल्ह्यात बहुमत मिळाल्याने राज्यातील बहुमतासाठी दोन व काँग्रेस जिल्ह्यातील बहुमतासाठी दोन अशा अध्यक्षीय मतदारांच्या चार जागा मिळाल्या होत्या. एका काँग्रेस जिल्ह्यामध्ये डेमोक्रॅटिकला बहुमत मिळाल्याने ती एक जागा डेमोक्रॅटिकला मिळाली होती. वरील दोन राज्यांचा अपवाद सोडून बाकीच्या सर्व राज्यात जनतेच्या मतांचे बहुमत प्राप्त करणाऱ्या पक्षाच्या सर्व अध्यक्षीय मतदारांचे नामनिर्देशन केले जाते. या पद्धतीचा परिणाम म्हणून कधीकधी सर्व राज्यातील एकत्रित जनतेची मते सर्वाधिक मिळूनही अध्यक्षीय मतदारांच्या जागा कमी मिळतात आणि संबंधित पक्षाच्या अध्यक्षीय उमेदवाराचा पराभव होतो. आतापर्यंत असे पाच वेळा घडले आहे.

आणखी वाचा-अमेरिकेने भारताला ‘गिऱ्हाईक’ समजू नये…

याचे सर्वात अलीकडचे उदाहरण २०१६ च्या निवडणुकीचे आहे. या निवडणुकीमध्ये हिलरी क्लिंटन यांना जनतेची सर्वात जास्त म्हणजे सहा कोटी ५८ लाख ५३ हजार ५१४ मते मिळूनही अध्यक्षीय मतदारांच्या कमी म्हणजे २३२ जागा मिळाल्या आणि पराभवाचा सामना करावा लागला. याउलट ट्रम्प यांना जनतेची सहा कोटी २९ लाख ८४ हजार ८२८ मते मिळूनही अध्यक्षीय मतदारांच्या जास्त ३०६ जागा मिळाल्या आणि विजय प्राप्त करता आला. त्याआधी २००० मध्ये अल गोर, १८८८ मध्ये ग्रोवर क्लीवलँड, १८७६ मध्ये सैमुअल टिल्डेन आणि १८२४ मध्ये अँड्र्यू जॅक्सन यांना याच पद्धतीने पराभव पत्करावा लागला होता. नोव्हेंबरमध्ये अध्यक्षीय मतदारांची- निर्वाचकगणाच्या सदस्यांची निवड झाल्यावर ते डिसेंबर महिन्यातील दुसऱ्या बुधवारनंतरच्या पहिल्या सोमवारी अध्यक्षाच्या निवडीसाठी मतदान करतात. अर्थातच यावेळी हे मतदान १६ डिसेंबर रोजी होणार आहे.

साधारणपणे अध्यक्षीय मतदार आपल्याच पक्षाच्या अध्यक्षीय उमेदवाराला मतदान करत असले तरी तसे करणे त्यांना बंधनकारक नाही. संविधानानुसार अध्यक्षीय मतदार कोणत्याही अध्यक्षीय उमेदवाराला मत देऊ शकतात. त्यासाठी तांत्रिक अडचण नाही. काही अध्यक्षीय मतदार तसे करतात. जे अध्यक्षीय मतदार आपल्या पक्षाला सोडून विरोधी पक्षाच्या अध्यक्षीय उमेदवाराला मत देतात त्यांना फेथलेस इलेक्टोर्स असे म्हटले जाते. मागील निवडणुकीत असे सात मतदार होते. यामध्ये डेमोक्रॅटिकचे दोन आणि रिपब्लिकनचे पाच मतदार होते. अध्यक्षीय निवडणुकीत निर्वाचकगणाच्या (इलेक्टोरल कॉलेज) मिळालेल्या जागांवरून कोणता अध्यक्षीय उमेदवार निवडणुकीत विजयी होऊन अध्यक्ष होणार याचे चित्र स्पष्ट होत असते. अध्यक्षपदी निवडून येण्यासाठी निर्वाचकगणाच्या एकूण ५३८ सभासदांपैकी किमान २७० सभासदांची मते असावी लागतात. असे आवश्यक बहुमत प्राप्त करण्यामध्ये सध्याच्या निवडणुकीतील डोनाल्ड ट्रम्प की कमला हॅरिस यशस्वी होणार यासंबंधी आत्ताच निश्चित सांगता येणार नाही. त्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल.

प्राध्यापक व राज्यशास्त्र विभाग प्रमुख, श्री शिवाजी महाविद्यालय, अकोट

skayande09@gmail.com