राजकारणात युवकांनी पुढे आले पाहिजे. हे सर्वच राजकीय पक्षांतील नेते मंडळी म्हणत असतात. परंतु एखाद्या युवा नेत्याला महत्त्वाच्या पदावर बसविण्याची वेळ येत असते तेव्हा त्यास मात्र ती संधी मिळवून दिली जात नाही. महत्त्वाची पदे नेहमी नेत्यांच्या घरात किंवा त्यांच्या नातेवाईकांना दिली जात असतात. तळागाळात कार्य करणारा युवा कार्यकर्ता मात्र कुठे तरी पक्षाचा तालुकाध्यक्ष किंवा शहराध्यक्ष बनत असतो. एकाच तालुक्याचे अनेक अध्यक्ष, उपाध्यक्ष,जातीय समीकरणे जुळवून आणलेल्या विविध सेलचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संघटक यासारख्या विविध पदांवर त्याला समाधान मानावे लागत असते. या व्यतिरिक्त त्यास कोणतेही दुसरे महत्त्वपूर्ण पद दिले जात नाही. सर्वसामान्य जनतेतील जो युवा कार्यकर्ता व नेता असतो तो कार्यक्रमातून सतरंज्या उचलणे, खुर्च्यांची जुळवाजुळव करण्यापासून ते नेते, साहेब, कार्यक्रमात येईपर्यंत काम करत असतो. परंतु अशा धडपडणाऱ्या कार्यकर्त्याला एखाद्या जेमतेम एखाद्या बिनमहत्त्वाच्या पदापर्यंतच मजल मारू दिली जात असते. कार्यकर्ता असाच कुजविला जातो. अनुभव घेतलेले, अनेक वर्षांचा कालावधी गेलेले, अनेक पक्षांतील कार्यकर्ते पदाधिकारी मग पक्षाच्याच नावाने खडे फोडत असतात.

यावर कुणी अपवादांची उदाहरणे दाखवतील : एखाद्या धडपडणाऱ्या कार्यकर्त्यास पदापर्यंत नेले जाते. राजकीय मतांची गोळाबेरीज म्हणून त्याचे घर दार व त्याचा संसार चांगला चालेल या दृष्टीने त्यास आर्थिक सक्षमही केले जात असते.

Rahul Gandhi ashok chavan nanded
नांदेडमध्ये राहुल गांधींकडून चव्हाण कुटुंबिय बेदखल !
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
right to vote opportunity to create the future
मताधिकार ही भविष्य घडविण्याची संधी!
Loksatta chaturang Along with sensible profound partner family
इतिश्री: समंजस, प्रगल्भ सोबत
Assembly Elections 2024 Akkalkuwa-Akrani Assembly Constituency Congress
लक्षवेधी लढत: अक्कलकुवा: लोकसभेतील पराभवाचे उट्टे काढणार का?
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…
maharashtra assembly election 2024, Amravati District,
अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडी, महायुतीसमोर अस्तित्व राखण्‍याचे आव्‍हान

हेही वाचा – जुनी पेन्शन शक्य आहे!

पण सरपंच, आमदार, खासदार, मंत्री ही राजकीय प्रक्रियेतील महत्त्वाची पदे आहेत. ही पदे मिळवून देण्यासाठी कितपत प्रयत्न केले जातात? हे तर सोडाच, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे सदस्य होण्यासाठीसुद्धा संधीची दारे उघडली जात नाहीत. सर्वसामान्य युवा नेत्याने व कार्यकर्त्याने निवडणूक लढविण्यासाठी जो आवश्यक पैसा असतो तो आणायचा तरी कुठून? म्हणून मग अर्थातच, सर्वसामान्य युवा नेत्याला संधी मिळतच नाही. युवा नेते म्हणून नेत्यांच्या घरातीलच घराणेशाहीतून उगवलेल्या नेत्याला आपला नेता मानावे लागते. आपापल्या गावात असे युवा नेते प्रबळ उमेदवार बनून जातात. निवडून आणायला इथल्याच बाकीच्या युवा नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून कंबर कसली जात असते. नेत्यांच्या घरातील तसेच नातेवाईकांनाच संधी देण्यासाठी प्रयत्न केले जात असतात. हल्ली लोकशाहीवर राज्य करण्याची हुकूमत ही राजकीय घराणेशाहीच करत आहे. बाप झाला की मुलगा त्यांनतर नातवंडे पुढे येऊ लागली आहेत. ‘परिवारवादा’च्या विरुद्ध कितीही भाषणे द्या, आजही देशात घराणेशाहीचे राजकीय अस्तित्व वाढतच चाललेले आहे. जनतेच्या समस्यांपेक्षा घराणेशाहीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी राजकारणात कसरत केली जाते, हे आजही दिसते आहे.

व्यक्तिकेंद्रित राजकारणाच्या- म्हणजे हुकूमशाहीच्या दिशेने ही आपली लोकशाही घेऊन चालली आहे. हुकूमत ही कोणत्याही लोककेंद्री राजकारणासाठी घातकच असते. ती लोकांच्या आशाआकांक्षांचे अस्तित्व नष्ट करणारी विनाशकारी शक्ती असते. जगातील अनेक देशांमध्ये लोकशाहीतूनच हुकुमशाहीचा उदय झालेला आहे. लोकशाही असलेल्या देशात आणि हुकुमशाहीचा स्वीकार केलेल्या देशांतूनही ‘राजकीय स्थिरता’, ‘राजकीय अस्थिरता’ किंवा ‘अराजकता’ यांचा विचार होत असतो.

ही ‘स्थिरता’ टिकवण्यासाठी लोकांचा विचारच केला जात नाही. राजकारण, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक या प्रत्येक क्षेत्रात एका विशिष्ट कंपूंनीच आपली मक्तेदारी निर्माण केलेली आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणात प्रत्येक क्षेत्रातून घराणेशाहीचे चांगलेच स्तोम माजलेले आहे. काही प्रस्थापित घराण्यातच सत्तेच्या चाव्या दिल्या जात असतात. काही उमेदवार हे लायक नसतानाही निवडणुकांच्या रणसंग्रामात उतरलेले असतात. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेलेले उमदेवारही शेवटी आपली घराणेशाही दुसरीकडेही जपत असतात. एकीकडे बाप तर दुसरीकडे मुले पक्षांच्या वळचणीला गेलेले असतात. त्यामुळे याचा परिणाम त्यांच्यावर काहीच होत नसतो. एकमेकांच्या विरोधात राहिलेले उमेदवार कोणीही जिंकले तरी ते प्रतिनिधित्व पिढ्यानपिढ्या राजकारणात असलेल्या घराण्याकडेच जात असते.

हेही वाचा – चिनी धमक्यांपुढे तगणारा तैवान!

परंतु एकनिष्ठपणा या तत्त्वावर कायम ठामपणे कार्यरत असणारा कार्यकर्ता तरुण हा मात्र दुर्लक्षित झालेला असतो. ‘तरुणांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली पाहिजे’- असे म्हणत घरातीलच तरुण उभा करणे म्हणजे सर्वसामान्य घरातील तरुण उमेदवारच मिळेनासे झाला, याची कबुली देणे. वास्तवात असे काहीही नाही, कारण आपली घराणी राजकीयदृष्ट्या मजबूत करण्याची मानसिकता ही लोकशाहीस व्यक्तिपूजेच्या, हुकुमशाही मान्य करण्याच्या प्रवृत्तीकडे घेऊन जाते. अशा टोकाच्या व्यक्तिपूजेमुळे लोकशाही ही पूर्णपणे घातक मार्गावर मार्गक्रमण करीत चाललेली आहे. ‘घराणे म्हणजे निवडून येण्याची शंभर टक्के शाश्वती’ हा भ्रम प्रत्येक पक्षात निर्माण झाला आहे.

थोडक्यात घराणेशाहीला जपण्याचेच काम स्वार्थी चेले आणि शिव्या देणारी जनता ही करीत असतात. ग्रामपंचायतच्या सरपंच पदापासून ते सर्वोच्च पदांपर्यंत घराणेशाहीचाच विषय चांगला चर्चेत येत असतो. लोकशाहीप्रमाणे लढल्या गेलेल्या निवडणुकांमध्ये घराणेशाहीला स्वीकारायचे नसेल तर उमेदवाराला प्रश्न विचारण्याची धमक मतदारांनी कमावली पाहिजे, ती धमक आहे की नाही हे शेवटी मतदारांच्याच हातात असते. ती धमक दिसली तरच क्वचित एखादा सर्वसामान्य घरातील बुद्धिवादी उमदेवार हा एखाद्या ठिकाणी घराणेशाहीला वैतागलेल्या जनतेतून निवडून येत असतो.

sushilgaikwad31@gmail.com