राजकारणात युवकांनी पुढे आले पाहिजे. हे सर्वच राजकीय पक्षांतील नेते मंडळी म्हणत असतात. परंतु एखाद्या युवा नेत्याला महत्त्वाच्या पदावर बसविण्याची वेळ येत असते तेव्हा त्यास मात्र ती संधी मिळवून दिली जात नाही. महत्त्वाची पदे नेहमी नेत्यांच्या घरात किंवा त्यांच्या नातेवाईकांना दिली जात असतात. तळागाळात कार्य करणारा युवा कार्यकर्ता मात्र कुठे तरी पक्षाचा तालुकाध्यक्ष किंवा शहराध्यक्ष बनत असतो. एकाच तालुक्याचे अनेक अध्यक्ष, उपाध्यक्ष,जातीय समीकरणे जुळवून आणलेल्या विविध सेलचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संघटक यासारख्या विविध पदांवर त्याला समाधान मानावे लागत असते. या व्यतिरिक्त त्यास कोणतेही दुसरे महत्त्वपूर्ण पद दिले जात नाही. सर्वसामान्य जनतेतील जो युवा कार्यकर्ता व नेता असतो तो कार्यक्रमातून सतरंज्या उचलणे, खुर्च्यांची जुळवाजुळव करण्यापासून ते नेते, साहेब, कार्यक्रमात येईपर्यंत काम करत असतो. परंतु अशा धडपडणाऱ्या कार्यकर्त्याला एखाद्या जेमतेम एखाद्या बिनमहत्त्वाच्या पदापर्यंतच मजल मारू दिली जात असते. कार्यकर्ता असाच कुजविला जातो. अनुभव घेतलेले, अनेक वर्षांचा कालावधी गेलेले, अनेक पक्षांतील कार्यकर्ते पदाधिकारी मग पक्षाच्याच नावाने खडे फोडत असतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा