सत्य केवळ सांगणे पुरेसे नसते, तर त्यावर विश्वास ठेवला जाणे आवश्यक असते, हा रुडॉल्फ व्हरबाचा अनुभव आज अगदी आपल्या देशातही लागू पडतो..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नितीन सखदेव

दुसरे महायुद्ध आणि त्यामध्ये झालेली ६० लाख ज्यूंची वंशहत्या या दोन महत्त्वाच्या घटना विसाव्या शतकात घडल्या. ३० लाख ज्यूंची जर्मनव्याप्त युरोपमधील अनेक छळछावण्यांमध्ये हत्या करण्यात आली. या सगळय़ात औश्विट्झ बर्कनॉव्ह छळछावणी सर्वात कुप्रसिद्ध आहे. तिथे ११ लाख ज्यूंना गॅस चेंबरमध्ये मारण्यात आले. ९२८ जणांनी पळून जायचा प्रयत्न केला. त्यात १९६ जणच यशस्वी झाले. पळून जाण्यात यशस्वी ठरलेल्या केवळ १२ जणांचा युद्धानंतर माग काढता आला. त्यांच्यापैकी सगळय़ात महत्त्वाचे नाव म्हणजे रुडॉल्फ व्हरबा. त्यांना पूर्वी वॉल्टर रोझनबर्ग म्हणून ओळखले जात होते.

‘गार्डियन’चे वार्ताहर जोनाथन फ्रीडलंड यांनी लिहिलेल्या ‘द एस्केप आर्टिस्ट’ या नवीन पुस्तकात रुडॉल्फ व्हरबा यांच्या अभूतपूर्व सुटकेच्या थरारक प्रवासाची इत्थंभूत कथा आहे. त्याचबरोबर त्यांच्या साक्षीचा उपयोग प्रत्यक्ष हंगेरीतील दोन लाख ज्यूंचे पुढील हत्याकांड थांबवण्यासाठी किती झाला याचे विश्लेषणही आहे. पुढील आयुष्यात ज्यू समाजात ते वाळीत पडल्यासारखे का झाले आणि २००६ मध्ये अज्ञातवासातच त्यांचा मृत्यू का झाला याचाही शोध त्यांनी घेतला आहे. 

११ सप्टेंबर १९२४ रोजी वॉल्टर रोझनबर्गचा जन्म नवनिर्मित झेकोस्लोवाकियाच्या टोपोलकॅनी या छोटय़ा गावात झाला. वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर त्याच्या आईने त्याला ब्राटीसलावीयामधील अनाथालयात ठेवले व उत्तम दर्जाच्या शाळेत घातले. १९३८ मध्ये हिटलर आणि  हंगेरीतील मित्र पक्षांमध्ये म्युनिच करार झाल्यावर वॉल्टरच्या आयुष्यातील सुखाचे दिवस संपले. वयाच्या १४ व्या वर्षी त्याला शाळेत जाण्यापासून रोखले गेले.

वॉल्टरप्रमाणे सगळय़ाच ज्यू लोकांचे आयुष्य कठीण झाले होते. अंगातील कपडय़ावर डेव्हिडचा पिवळा तारा लावून स्वत:ची ज्यू असल्याची ओळख देणे त्यांना बंधनकारक झाले. १९४२ च्या फेब्रुवारीमध्ये गोष्टी आणखीच बिघडल्या. ज्यूंच्या पुनर्वसनाचा हुकूम निघाला होता, पण पुनर्वसनाच्या नावाखाली ही हद्दपारी किंवा हकालपट्टीच होती. वॉल्टरने तो हुकूम मानला नाही, घरातून पळून जाऊन तो बुडापेस्टला पोहोचला. दुर्दैवाने तो रक्षकांच्या हाती सापडला व त्याची रवानगी नोव्हाकीतील तात्पुरत्या छावणीत झाली. पलायनाच्या आणखी एका अयशस्वी प्रयत्नानंतर त्याची पाठवणी लुबलीन शहराजवळच्या माजडानीक छळछावणीत केली गेली. तेथे काही दिवस काढल्यावर ३० जून १९४२ ला त्याला कुप्रसिद्ध औश्विट्झला पाठवण्यात आले, तेव्हा तो केवळ १८ वर्षांचा होता.

औश्विट्झचा कॅम्प भयानकच होता. त्याच्या बर्कनॉव्ह विभागात हजारो ज्यूंना गॅस चेंबरमध्ये मारण्यात येत असे. वॉल्टर सुदृढ होता. कॅम्पमध्ये अत्यंत अवघड परिस्थितीतही प्रामुख्याने कॅनडा या विभागात असल्यामुळे तो दोन वर्षे तगला. छळछावणीत पाऊल टाकता क्षणीच प्रत्येक ज्यू माणसाजवळ असलेले कपडे, सोने, दागदागिनेही तसेच अन्नपदार्थ काढून घेतले जात असत. कॅनडा विभागात काम करणारे कैदी या सगळय़ाची वर्गवारी करताना काही किमती वस्तू तसेच अन्नपदार्थ चोरत. अन्नपदार्थ खात व मौल्यवान वस्तू नाझी रखवालदारांना देऊन त्यांच्याकडून काही सवलती मिळवत. हे सगळे अचानक बंद झाले कारण जानेवारी १९४२ मध्ये वॉल्टरची रवानगी बर्कनॉव्हच्या छळछावणीत झाली.

१९४२ च्या जानेवारीत नाझींनी बहुतांशी युरोपियन ज्यूंना गॅस चेंबरमध्ये घालून मारण्याचा बेत केला. नाझीव्याप्त युरोपमधील विविध देशांतून हजारो ज्यूंची रवानगी  औश्विट्झला करण्यास  सुरुवात झाली. तिथे रेल्वेतून उतरल्यावर शारीरिक क्षमतेनुसार त्यांची वर्गवारी करण्यात येत असे. वयस्क, लहान मुले व लेकुरवाळय़ा स्त्रियांना सरळ गॅस चेंबरकडे पाठवले जाई. आगगाडीतून उतरणारे ९० टक्के लोक सरळ विषारी वायूला बळी पडत आणि केवळ दहा टक्के माणसे राबवण्यासाठी बाजूला काढली जात. वॉल्टरने या फलाटावर दहा महिने काम केले आणि हा निर्बुद्ध आणि अनाकलनीय संहार बघितला.

छळछावणीतील प्रवेशापासून गॅस चेंबरमधील मृत्यूपर्यंतच्या प्रक्रियेमध्ये एक शिस्तबद्धता होती. त्यात एक लबाडीही होती. स्थलांतरित करताना ज्यूंना तुम्हाला पूर्व युरोपमध्ये हलवले जात आहे असे सांगितले जाई. कसाईखान्याकडे  जाणाऱ्या मेंढरांसारखीच त्यांची अवस्था होती. गॅस चेंबरमध्ये जातानासुद्धा त्यांना आंघोळीसाठी साबण आणि ब्रश दिला जात असे. हे सगळे शिस्तीत पार पाडण्यासाठी ज्यूंकडून अत्यंत नम्र व शिस्तबद्ध वर्तनाची गरज होती. त्यांच्याकडून थोडा विरोध झाला असता तरी या संहार प्रक्रियेत गोंधळ उडाला असता असे वॉल्टरला वाटत असे. या छळछावण्यांचे सत्य जगजाहीर झाले असते तर ज्यूंनी स्थलांतरालाच विरोध केला असता. वॉल्टरने ठरवले की हे काम तोच करेल.

त्याने या शिस्तबद्ध हत्याकांडाची माहिती गोळा करायला सुरुवात केली. प्रत्येक रेल्वे कुठल्या गावाहून आली, प्रत्येक गाडीत किती लोक होते आणि त्यातील किती जणांची गॅस चेंबरमध्ये पाठवणी करण्यात आली हे तो लक्षात ठेवू लागला. त्याने अल्फ्रेड वेट्झलर या मित्राला आपला पलायनाचा विचार सांगितला. दोघे मिळून मार्ग शोधू लागले. छावणीच्या कुंपणात त्यांना फट सापडली नाही, पण त्यांना एक पळवाट दिसली. नाझींच्या वक्तशीरपणाचा आणि सुनिश्चित वागण्याचा अभ्यास करून त्यांनी एक साधा पण धाडसी बेत आखला. अनेक असफल प्रयत्नांनंतर शेवटी १० एप्रिल १९४३ ला त्यांनी औश्विट्झमधून पलायन केले. बाहेर आल्यावर कुठल्या दिशेने गेल्यास स्लोवाकियात पोहोचू याचा अगदी अंधूकसा अंदाज त्यांना होता. नाझीव्याप्त पोलंडचा जवळपास ५० किलोमीटरचा पल्ला त्यांनी पार केला. रात्रीअपरात्री जंगलातून, दलदलीतून डोंगरावरून आणि गोठलेल्या नद्या पार करून त्यांनी स्लोवाकिया गाठले.

वॉल्टर आणि वेट्झलरला ज्यूंच्या संघटनेने बुडापेस्टला आणले. तेथे संघटनेच्या ज्येष्ठ सभासदांनी त्यांची सखोल चौकशी केली. त्यांना माहीत असलेली औश्विट्झबद्दलची माहिती त्यांनी दिली. या ३२ पानी अहवालात छळछावणीची नकाशासहित सविस्तर माहिती होती. हा मसुदा वॉल्टरला फारसा पसंत नव्हता कारण नजीकच्या भविष्यात हंगेरीतील ज्यूंच्या संभाव्य संहाराच्या धोक्याबद्दल त्यात वाच्यता नव्हती. नाराजीनेच वॉल्टर आणि वेट्झलर यांनी अहवालाला संमती दिली.  त्यानंतर दोघांना बनावट ओळखपत्रे देण्यात आली; वॉल्टर रोझनबर्ग बनला रुडॉल्फ व्हरबा व अल्फ्रेड वेट्झलर बनला जोसेफ क्लानीक.  दोघेही भूमिगत झाले, पण त्यांचा अहवाल मात्र व्हरबा-वेट्झलर अहवाल या नावाने वेगवेगळय़ा राजधान्यांकडे प्रवास करू लागला.

व्हरबाला वाटले होते त्याप्रमाणे अहवालावर तातडीने कारवाई झाली नाही. सुरुवातीचा प्रतिसाद अविश्वासाचा आणि पूर्वग्रहदूषित होता. संपूर्ण युरोपभर हजारो वर्षे ज्यूंविरोधी भावना असल्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत, त्यामुळे शासनदरबारी खूप जणांना हा ज्यूंच्या कल्पनेचा खेळ वाटला. लंडनस्थित परदेशी कार्यालयातही काहींना हे ज्यूंचे अतिशयोक्त रडगाणे वाटले. निष्क्रियतेत जाणारा प्रत्येक दिवस हजारो ज्यूंना औश्विट्झच्या दिशेने ढकलत होता याची जाणीव व्हरबाला होती. दोन महिन्यांनंतर २२ जूनला अहवाल ब्रिटिश पत्रकार वॉल्टर गॅरेटच्या हाती पडला. त्याने तो ब्रिटिश वर्तमानपत्रात आणि ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये प्रसिद्ध केला. औश्विट्झचे सत्य उजेडात आले, पण प्रसिद्धी अहवालाचे एवढेच प्रयोजन नव्हते. दोस्त राष्ट्रांनी छळछावणीकडे किंवा अंतर्गत दहनभूमीकडे जाणारा लोहमार्ग लष्करी कारवाईने उद्ध्वस्त करावा अशी काहींची अपेक्षा होती. अहवाल विविध सरकारी कार्यालयांमध्ये पोहोचला असला तरी राजकारण आणि उदासीनतेमुळे परिणामशून्य ठरला. लोहमार्ग उद्ध्वस्त करण्याचे आदेश दिले गेले, पण पुढे काहीच झाले नाही. ब्रिटिश हवाई दल फक्त रात्रीच हल्ले करत असल्याने ही जबाबदारी अमेरिकन हवाई दलावर आली, पण त्यांनीही हल्ले केले नाहीत.

दोस्त राष्ट्रांना ज्यूंच्या वंशविच्छेदाबद्दल किती आणि कधी कळले होते आणि ते थांबवण्यासाठी अगदी कमी प्रयत्न का झाले याबद्दल बरीच मतभिन्नता आहे. ब्रिटिश इतिहासकार मार्टिन गिल्बर्ट याने ‘औश्विट्झ अँड अलाइज’ या नावाचे अप्रतिम पुस्तक लिहिले आहे. दोस्त राष्ट्रांना याबद्दल  बरेच माहीत होते, पण त्यांनी फार काही केले नाही असे अभ्यासपूर्ण मत त्याने पुस्तकात मांडले आहे. व्हरबा व वेट्झलरचा अहवाल वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर त्याविरोधात सर्वत्र जनक्षोभ उसळला तेव्हा मात्र मित्र राष्ट्रांनी छळछावणीवर हल्ला करण्याचा विचार केला. तोपर्यंत ज्यूंचे तथाकथित स्थलांतर आणि हनन चालूच होते. २ जुलैला अमेरिकेने बुडापेस्टवर हल्ला केल्यावर हंगेरीचा राजा मिल्कॅास हारतीच्या लक्षात आले की आता अंत जवळ आला आहे. त्याने ज्यूंचे  स्थलांतर थांबवले. २० जुलैला औश्विट्झला शेवटची रेल्वे पोहोचली. ४.३ लाख हंगेरियन ज्यूंना औश्विट्झमध्ये मरण आले असले तरी व्हरबा-वेट्झलर अहवालानंतर झालेल्या राजकीय निर्णयामुळे बुडापेस्टमधील कमीत कमी दोन लाख ज्यूंचे प्राण वाचले. व्हरबा आणि वेट्झलरनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले.

व्हरबाच्या आयुष्यावर औश्विट्झमधील वास्तव्याची गडद छाया कायम राहिली. ग्रेटा सिडोनोवा या बालमैत्रिणीशी लग्न आणि पुढे घटस्फोट या घटनाही त्याच्या आयुष्यात घडल्या. शेवटी तो कॅनडातील व्हँकुवहर येथे स्थायिक झाला. ते औश्विट्झपासून पाच हजार मैल दूर  असले तरी ते अनुभव त्याच्या मनातून कधीही पुसले गेले नाहीत. 

चर्चिल आणि रुझव्हेल्ट या महानायकांनी नाझींच्या जाचातून ज्यूंची सुटका केली, असे दुसऱ्या महायुद्धाचे नैतिकदृष्टय़ा स्वच्छ चित्र लोकांना हवे होते. पण व्हरबाने  रंगवलेले चित्र कधीच इतके नेटके नव्हते. ज्यूंच्या अवस्थेची कल्पना असूनही त्यावर काहीच कारवाई न करणाऱ्या उच्चपदस्थांना तो कधीही माफ करू शकला नाही. त्याला एखाद्या कार्यक्रमात बोलण्याची विनंती केली जाई तेव्हा तो अनेक अवघड आणि अडचणीत आणणारे प्रश्न विचारी आणि अधिकारातील व्यक्तींकडे बोट दाखवी. तो फक्त नाझींनाच खलनायक ठरवत नव्हता, त्यामुळे त्याचे कथन नैतिकदृष्टय़ा पचण्यासारखे नव्हते. होलोकॅास्टच्या स्मृतीप्रीत्यर्थ होणाऱ्या समारंभांना त्याला बोलवले जात नसे. त्याच्या साक्षीमुळे अनेक नाझींना शिक्षा सुनावली गेली, पण ऐतिहासिक कथनासंदर्भातील त्याच्या वेगळय़ा दृष्टिकोनामुळे तो दुर्लक्षित राहिला. जेरुसलेममधील  होलोकॅास्टच्या मुख्य संग्रहालयातसुद्धा औश्विट्झचा अहवाल लेखकांच्या नावाशिवायच ठेवला गेला आहे.  

सध्याच्या पर्यायी सत्याच्या (अ’३ी१ल्लं३्र५ी ळ१४३ँ) युगात व्हरबाची गोष्ट खूप काही शिकवते. लोक ते पेलू शकत नाहीत अशा सत्यावर विश्वास ठेवायला तयार नसतात. त्यामुळे केवळ सत्य शोधून काढणे पुरेसे नसते. केवळ माहिती मिळणे पुरेसे नसते; तिच्यावर विश्वास बसणे गरजेचे असते. विश्वास नसेल तर चेतावणी देऊनदेखील ती आतपर्यंत ऐकू येत नाही. दुर्दैवाने, सध्या आपण मिळालेल्या खऱ्या माहितीला बेदखल करायला शिकलो आहोत. हे कोविडकाळातही दिसून आले आहे. लसीकरणाविरुद्धच्या मोहिमेला आधार आणि लोकप्रियता मिळण्याचे कारण शास्त्रीय माहितीवरील अविश्वास हाच होता. लसीकरणाला विरोध केल्यामुळे अनेकांना कोविडची लागण झाली आणि हकनाक जीव गमवावा लागला. नकाराचा परिणाम प्रत्यक्ष दिसणारे आणखी एक क्षेत्र पर्यावरण बदलाचे. गेली ३० वर्षे शास्त्रज्ञ आपल्याला चेतावणी देत आहेत आणि शास्त्रीय सत्य समजावून सांगत आहेत, पण राजकारणी, खनिज तेल उद्योजक आणि इतर अनेक  लोकांनी ते ऐकून न ऐकल्यासारखे केले आहे. आपल्याकडे रोखून बघणाऱ्या सत्यावर विश्वास ठेवला नाही आणि त्याप्रमाणे वागलो नाही तर ज्यूंप्रमाणे आपलीही रवानगी अतिशीघ्र नाशाकडे होईल. शास्त्रज्ञांनी  दिलेल्या धोक्याकडे लक्ष देऊन त्याप्रमाणे कृती करणे हीच रुडाल्फ व्हरबा यांच्या कार्याला खरी श्रद्धांजली ठरेल.