सुहास शिवलकर

अजित पवारांची फूट उत्तरांपेक्षा प्रश्नच जास्त निर्माण करते. त्या अनुषंगाने पाहिले तर काय दिसते? जयंत पाटील यांच्यासारखा तगडा प्रतिस्पर्धी वाटेतून दूर करण्यासाठी अजितदादांना पक्षही ताब्यात हवा होता, यावरून काका-पुतण्यात एकवाक्यता नव्हती, हे बरोबर. पण प्रफुल्ल पटेल-अजित पवार कधीही एकमत न होणारे, अजित पवार-भुजबळ सख्य नसणारे, शरद पवार- प्रफुल्ल पटेल एकजिनसी, शरद पवार- वळसे-पाटील एकजिनसी इत्यादी. या पार्श्वभूमीवर हे सर्व अजित पवार यांच्याबरोबर विनातक्रार जातात, हे निश्चितच भुवया उंचावण्यास भाग पाडणारे ठरते.

ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
Satara , development work Satara, code of conduct Satara, Satara latest news,
आचारसंहिता संपल्याने साताऱ्यात दीडशे कोटींच्या विकासकामांना प्रारंभ
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक
loksatta readers feedback
लोकमानस: …त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी!
no final decision on how many ministerial posts will be distributed to BJP Shiv Sena and NCP print politics news
मंत्र्यांच्या संख्येवरून महायुतीत चर्चा सुरूच
abhijeet kelkar post for CM devendra Fadnavis
“एक दिवस असाही येईल, जेव्हा देवेंद्रजी आपल्या देशाचे…”, मराठी अभिनेत्याची पोस्ट; तर प्रवीण तरडे म्हणाले…

आता ‘फास्ट बॅकवर्ड’… कर्नाटकमधील नामुष्कीजनक पराभवामुळे मोदी- शहांना हिंदू- मुस्लिम भेद, मोदींचा करिष्मा या बाबी आता इतिहासजमा झाल्या आहेत हाच संदेश ठळकपणे दिला. त्याचबरोबर ‘४० टक्के कमिशन घेणारे सरकार’ म्हणून भाजपची बदनामीही या पराभवाला कारणीभूत ठरली. म्हणजे जनमानस अजूनही भ्रष्टाचाराबाबत संवेदनशील आहे, हाही संदेश त्या पराभवातून मिळतो. त्यामुळे मोदींनी भ्रष्टाचार हाच मुद्दा प्राधान्याने लावून धरायचे ठरवलेले दिसते. त्या अनुषंगानेच भोपाळच्या भाषणात मोदींनी पवार काका-पुतणे आणि ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार हा मुद्दा अधोरेखित केला. इथेच गडबड झाली. कुठेही असले तरी ज्येष्ठ पवारांचे कान दिल्लीतील जमिनीला सदैव लागलेले असतातच. त्यांना निश्चितच ‘सूत्रां’कडून खात्रीशीर माहिती मिळाली असणार, की ही सर्व खटल्यांच्या फाइल्स पुन्हा ओपन होणार.

हेही वाचा>>>‘राइट टू रिकॉल’च्या माध्यमातून लोकप्रतिनिधींवर अंकुश ठेवता येईल का?

पुतण्याला यावेळी अटक होऊन त्याला तुरुंगात टाकण्यापर्यंत केंद्र सरकार पुढे जाईल, याची कल्पना आल्यामुळेच पवारांनी घराण्याची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी पक्षप्रेम बाजूला ठेवून अजितने फुटायचे आणि भाजपशी युती करायची अशी आखणी केली असू शकते. त्याचवेळी दिल्लीतही शत्रूपक्षात आपला माणूस असावा म्हणून प्रफुल्ल पटेलांनाही अजित पवार यांच्याबरोबर पाठवले असू शकते.दुसरी, पण महत्वाची बाब म्हणजे विरोधकांची मोट पवारच बांधू शकतात आणि विरोधक एकत्र आले तर आपल्याला पुन्हा प्रचारकाच्या भूमिकेत जावे लागेल हे ओळखण्याइतपत शहाणपण मोदींत नक्कीच आहे. त्यात विरोधी पक्षांच्या ऐक्यात कॅटालिस्टिक एजंट किंवा प्रवर्तक किंवा समन्वयक शरद पवारच आहेत, त्यामुळे त्यांची राजकीय प्रतिष्ठा उद्ध्वस्त करणे हेच मोदींचे प्रमुख सूत्र असणार आहे.

हेही वाचा>>>राष्ट्रीय शैक्षणिक धोरण:आपली शिक्षण व्यवस्था भविष्यातील आव्हानांसाठी तयार आहे का?

हे गृहीत धरले तर पुढील जिगसॉ पझलचे तुकडे व्यवस्थित बसतात. या पार्श्वभूमीवर मोदींच्या भोपाळमधील भाषणानंतर ४८ तासांत असे काय घडले, की पत्रकारांनी इतके महिने लावून धरलेल्या ‘अजित पवार नाराज’ या बातमीचा अचानक स्फोट झाला? संघटनेत काम करायचे म्हणून दादांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. संघटनेत काम करायला ते उतावीळ झाले होते व त्या अनुषंगाने शरद पवार यांनी पक्ष कार्यकारिणीची बैठकही आयोजित केली होती. मग अजित पवार यांना पलीकडे उडी मारायची इतकी घाई का झाली? सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राच्या प्रभारी केल्याने दादांची कोणती गैरसोय होणार होती? कारण सुप्रिया सुळे यांनी जाहीर सांगितले होते, की महाराष्ट्रात दादांचा शब्द अंतिम असणार. आता संघटनेत काम करण्यासाठी उपमुख्यमंत्रीपद दुसऱ्याला देऊन दादा पक्षसंघटनेचे अध्यक्षपद स्वीकारणार आहेत का?

त्यामुळे वरवर अजितदादांची नाराजी दाखवली गेली तरी यावेळी यामागे वेगळेच कारण आहे, हेच दिसते. फडणवीसांना राजकारणात लांबचे दिसत नाही हे तर त्यांनी शिंदेंबरोबर युती करून दाखवून दिले आहेच. आज १५ महिने झाले तरी हे सरकार मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घेऊ शकत नाही, कारण भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेविरुद्ध उद्धव यांच्या शिवसेनेचेच प्राबल्य असल्याचे विविध अहवाल दर्शवत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पहिल्या टर्ममध्ये आपल्याला अडचण नको म्हणून जाणीवपूर्वक राज्यातील भाजपची नेतृत्वाची पंकजा मुंडे, विनोद तावडे इत्यादींची दुसरी फळी नेस्तनाबूत केली. त्यामुळे भाजपकडे मुख्यमंत्रीपदाकरता फडणवीस यांच्याशिवाय दुसरा चेहरा नाही. त्यात फडणवीस आज ना उद्या दिल्लीला गेल्यावर इथल्या भाजपचे काय? शिंदे मुख्यमंत्री म्हणून छाप पाडू शकले नाहीत. ते तर आताच भाजपसाठी ‘जबाबदारी’ ठरले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी तोलामोलाचा चेहरा भाजप युतीकडे नाही. विखे-पाटील नगरबाहेर कोणालाही माहीत नाहीत. त्यामुळे मराठा समाजातील बलवान चेहरा असलेले अजित पवार सर्वार्थाने या समीकरणात बसतात. त्यांनाही ‘महाराष्ट्र घडवण्यासाठी’ मुख्यमंत्रीपद हवे आहे. इथून मिळाले वा तिथून, काय फरक पडतो? या सर्व गोष्टी दाखवून देतात की पवार कुटुंबियांची मान ईडी, सीबीआयच्या पाशातून अलगद सोडवली गेली आहे. शिवाय राष्ट्रवादी पक्ष म्हणून तरला आहेच.

हेही वाचा>>>राजकारणी जिंकले, राज्य हरले!

अडीच वर्षांपूर्वी मविआ स्थापनेच्या वेळी राष्ट्रवादीच्या अजित पवार, छगन भुजबळ आदींनी आम्ही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली काम करणार नाही, असा हट्ट धरल्याने विधानसभा पक्षनेते- पर्यायाने मुख्यमंत्री- म्हणून शिंदेचे नाव दिलेले पत्र उद्धव यांना मागे घ्यावे लागले होते आणि स्वतःच घोड्यावर बसावे लागले होते. आता तेच अजित पवार, भुजबळ शिंदेंच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात विनातक्रार सामील झाले आहेत, हा अजित पवार प्रभृतींचा आणखी एक बेगडी मुखवटा गळून पडला आहे. यापुढेही हे दोघे एकमेकांविरुद्ध काहीही बोलणार नाहीत.

आसाममध्ये सरमा, मणिपूरमध्ये बीरेनसिंह हे काँग्रेसचेच मोहरे. त्यामुळे अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यात भाजपचे सोवळे काही ओवळे होत नाही. आणि झाले तरी इतिहासाचे ओझे नसलेल्या मोदींना याचे सोयरसुतक नाहीच.

निष्कर्ष – अजित पवार मुख्यमंत्री होणे ही काही दिवसांची किंवा महिन्यांचीच बाब राहिली आहे. मुख्यमंत्री झाल्यावर सिल्व्हर ओकवर जाऊन अजित पवार सर्वप्रथम शरद पवार यांच्या पाया पडतील. त्याचबरोबर स्वयंभू असणारे अजित पवार मोदी-शहांबरोबर मतभेद झाल्यावर त्यांनाच कसे कोलतात, हे पाहणेही मनोरंजक ठरेल.

(हा लेख उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या ५ जुलै रोजीच्या भाषणाआधी लिहिलेला आहे.)

Story img Loader