डॉ. संजीव बोराडे
‘लोकसत्ता’च्या ‘विचारमंच’ विभागात माहितीपूर्ण लेख असतात, परंतु अलीकडेच आलेल्या एका लेखामुळे समाजात डॉक्टरांविषयी आधीच फैलावलेले गैरसमज वाढू शकतात व सोनोग्राफी विषयी नव्याने गैरसमज पसरू शकतात. त्याचे निराकरण करणे आवश्यक आहे म्हणून हे लिखाण. ज्या लेखातून हे गैरसमज पसरले असते तो आहे ‘गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके – गर्भपात करण्याचा नवीन व्यवसाय?’ – हा अतुल सोमेश्वर कावळे यांनी लिहिलेला. तो सामान्य माणसाच्या भूमिकेतून लिहिला आहे हे मान्य केले तर मग, प्रसूतीशास्त्रातील माझ्या ४० वर्षांच्या अनुभवातून सामान्यजनांना ‘गर्भाच्या हृदयाचे ठोके’ आणि ‘साेनोग्राफी’ यांबद्दल योग्य माहिती देणे हे मला माझे कर्तव्य वाटते.

वैद्यकशास्त्राबद्दल अकारण शंका – संशय घेणारे लिखाण आज तसेही भरपूर होत असते. पण असे लिहिणारे जर तज्ज्ञ नसतील तर त्यांनी काही लिहिण्यापूर्वी परिचित तज्ज्ञास विचारपूस करून योग्य माहिती मांडावी, ही अपेक्षा आहे. वैद्यक-शास्त्र हे संपूर्ण शास्त्र नाही. दररोज नवनवे आजार. निदानाच्या, उपचारांच्या नवीन नवनवीन पद्धती ,यंत्रे, चाचण्या, औषधी व नवीन कौशल्य यांची त्यात भर पडत असते .याचा अर्थ जुने सर्व चुकीचे होते असेही नाही. पण या नवनवीन शोधांमुळे वैद्यक क्षेत्रात दर्जा, सेवा व परिणाम यामध्ये सुधारणा होण्यास मदत होते.

congress politics in the name of cotton
‘कापूसकोंडी’तील काँग्रेस!
society and housing society
‘हाउसिंग सोसायटी’पासून समाजापर्यंत… स्वातंत्र्य हवं, जबाबदारी नको?
ancient Indian mathematician Bhaskaracharya
भारतीय अर्वाचीन गणिती: भास्कराचार्य
Manohar Sapre from Chandrapur Marathi cartoonist
चंद्रपूरचे मनोहर सप्रे
Air quality index in Delhi area
शिक्षा, काळ्या हवेची!
Indian culture from the perspective of Sane Guruji
साने गुरुजींच्या दृष्टिकोनातून भारतीय संस्कृति
dr Babasaheb Ambedkar amit shah
अमित शहांना आंबेडकर ‘फॅशन’च वाटणार!
A story of corruption in the name of religion
धर्माच्या नावे भ्रष्टाचाराची कहाणी
The profile of the city Book American journalism New journalism
शहराची सखोल दखल

याकरिता सर्वप्रथम सोनोग्राफी म्हणजे काय, हे थोडक्यात समजून घेतले पाहिजे. सोनोग्राफीमध्ये ‘अल्ट्रासाउंड’ म्हणजे ज्या मानवी कानाने ऐकू सुद्धा येत नाहीत अशा – २० हजार हर्ट्झ इतकी प्रचंड कंपने असलेल्या ध्वनिलहरी – मशीनद्वारे निर्माण केल्या जातात व त्या शरीराच्या भागावर आदळवल्या जातात. या ध्वनिलहरी शरीराच्या आतील अवयवांवर आदळतात आणि परत फिरतात. याला ध्वनिलहरींचे परावर्तन असे म्हणतात. आतल्या अवयवांच्या घनतेनुसार, संरचनेनुसार व आकारानुसार कमी जास्त प्रमाणात ध्वनिलहरी परावर्तित होतात. या परावर्तित ध्वनिलहरींच्या प्रमाणाानुसार व घनतेनुसार, मशीनमधील संगणक आतील अवयवांची एक सावलीसारखी प्रतिमा तयार करतो व याद्वारे शरीरातील पोकळीत पाणी, गाठ, सूज, इजा असल्यास त्यांची किंवा इतर अवयवांची रचना वगैरेबाबत माहिती मिळते. आताच्या प्रगत मशीनद्वारे तर अगदी त्रिमितीय (थ्री-डी)आकृती सुद्धा तयार होते.

बाळा गर्भाच्या हृदयाच्या ठोक्यांव्यतिरिक्त गर्भात असलेले व्यंग, काही आनुवंशिक आजार, गर्भावस्थेतील गुंतागुंतीचे आजार व स्त्रीरोगशास्त्रातील आतील अवयवाचे अनेक आजार या इत्यादींचे निदान सोनोग्राफीने होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आतापर्यंतच्या संशोधनानुसार या अतिविशिष्ट ध्वनिलहरी असल्यामुळे, यांचा मानवी शरीरावर व त्यातल्या त्यात माता आणि गर्भाच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत नाही असे आढळून आलेले आहे ( या उलट मोबाइलचे भरपूर दुष्परिणाम दिसून आले, पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी)

दुसरा मुद्दा, गर्भातील बाळाच्या हृदयांच्या ठोक्यांबाबत

साधारणतः गर्भधारणेनंतर सहा ते सात आठवड्यांमध्ये बाळाच्या गर्भाच्या हृदयाचे ठोके किंवा हृदयाची हालचाल सोनोग्राफीने ‘दिसायला’ सुरुवात होते. बहुतांश गर्भामध्ये सात आठवड्यानंतर ते पूर्णपणे दिसतात. गर्भाला आईच्या गर्भाशयातील वारेमधून (प्लॅसेन्टामधून) व नाळेमधून रक्तपुरवठा होत असतो. त्याद्वारे गर्भाला वाढीकरिता पोषक द्रव्य व ऑक्सिजन मिळत असतो. गर्भापर्यंत पोहोचलेला हा रक्तपुरवठा गर्भाच्या शरीरभर फिरवण्याचे काम हृदय करते. जर हृदयच बंद पडले किंवा निकामी असले तर, हा रक्तपुरवठा होणार नाही. पर्यायाने बाळाची वाढ खुंटेल किंवा थांबेल व कालांतराने गर्भ मृत होईल. गर्भ मृत झाल्यास गर्भपाताची प्रक्रिया सुरू होऊन गर्भाशय ते काढून टाकण्याचा प्रयत्न करेल. त्याला आपण आपोआप होणारा गर्भपात म्हणतो. पण तो प्रत्येक वेळी अगदी सहज व पूर्णपणे होईलच असे नाही. कधी कधी ही प्रक्रिया बरेच दिवस सुरू राहून खूप दिवस व अतिरिक्त रक्तस्राव होऊन, आईच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच यामध्ये गर्भाला ,गर्भाशयात व संपूर्ण आईच्या संपूर्ण शरीरात जंतुसंसर्ग (सामान्य भाषेत पॉयझनिंग किंवा विषबाधा) होऊन , आई गंभीररीत्या आजारी होऊ शकते व आईच्या जिवाला अपाय होऊ शकतो.

ही अशी लक्षणे स्पष्टपणे दिसली आणि गर्भवतीचा त्रास वाढला तरच, वेळी अवेळी आकस्मिक व जीवघेणा रक्तस्त्राव व जंतुसंसर्ग टाळण्याकरिता, डॉक्टर्स सुनियोजितरीत्या गर्भपाताचा सल्ला देतात. कोणताही डॉक्टर आज-काल गर्भपात कराच असा निर्णय किंवा आदेश देणार नाही. गूगलवरील माहिती, व्हाट्सअप युनिव्हर्सिटी वरील चुकीचे ज्ञान व अंधश्रद्धा व उपटसुंभ सल्यामुळे आरोग्य विषयी ज्ञान (अज्ञान) एवढे वाढले आहे की, डॉक्टर उरला फक्त सल्ल्यापुरता! संपूर्ण निर्णय पेशंटने घ्यायचे असतात. त्यामुळे डॉक्टर गर्भपात घडवून आणतात हा आरोप चुकीचा ठरतो.

खरे तर याला गर्भपात म्हणणेही चुकीचे कारण गर्भ तर आधीच मृत झालेला आहे .याला आपण गर्भपिशवी रिकामी करणे याचे ऑपरेशन म्हणू शकतो (‘डायलेटेशन’ किंवा ‘क्युरेटिंग’). डॉक्टर फक्त समुपदेशन करून ‘गर्भपाताचा’ सल्ला देतात व तो दिला आहे असे पेशंटच्या कार्डावर किंवा केस पेपरवर लिहून देतात. ‘गर्भपात’ करणे व न करणे हे पेशंटच्या स्वाधीन. नंतर होणाऱ्या सर्व दुष्परिणामांना पेशंट व त्यांचे नातलग सर्वस्वी जबाबदार राहतील.

या थोडक्या माहितीवरून लक्षात आले असेल की शास्त्रीय सत्य माहिती काय आहे. हृदयाची गती बंद पडून गर्भ मृत झाला असेल तर, गर्भपाताशिवाय दुसरी कोणती शास्त्रीय उपचार पद्धती किंवा मार्ग सध्या उपलब्ध नाही. तसेच ही प्रक्रिया (मृत गर्भाबाबतचा गर्भपात) न केल्यास होणाऱ्या दुष्परिणामांची गंभीरता एवढी भयंकर आहे की त्यापेक्षा सुरक्षित व सुनियंत्रितपणे गर्भपात केव्हाही चांगला ठरतो.

तसेही आरोग्याबाबत एक इंग्रजी म्हण आपणा सर्वांना माहितीच आहे ‘उपचारापेक्षा प्रतिबंधक उपाय चांगले’- प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर! पण या लेखामध्ये ‘ग्रामीण भागातील तसेच मुस्लिम स्त्रियांच्या बाबतीत ही समस्या फारशी जाणवत नाही’ हे विधान लेखकाने कोणत्या माहितीच्या किंवा संशोधनाच्या आधारे केले हे कळायला मार्ग नाही. भारतात तसेही , आरोग्य व शिक्षण हा कायम दुर्लक्षित व सर्वात कमी प्राधान्याचा विषय आहे. शासनातर्फे, समाजातर्फे कुटुंबातर्फे इतकेच काय, तर त्या पेशंटतर्फे सुद्धा कायम दुर्लक्षित राहिलेला विषय आहे. आता कुठे हळूहळू त्यात सुधारणेला सुरुवात झाली आहे. आजकाल गूगलवरील (अ)ज्ञान, ‘व्हाॅट्सॲप विद्यापीठा’ची (!) माहिती व अनेक स्वयंघोषित वैदू व समुपदेशक यांच्या आलेल्या पिकामुळे सामान्यजनांच्या अज्ञानामध्ये व अंधश्रद्धांमध्ये भर पडते आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या बाबींकडे बघायचा वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यास अडथळा येतो. ग्रामीण भाग हा आधीच अप्रगत, सुविधा व वैद्यकीय सेवांपासून वंचित आणि त्यातल्या त्यात स्त्रिया व मुस्लिम स्त्रिया असा भेदभाव करणे योग्य नाही. सामाजिक स्तरांच्या उतरंडीमध्ये त्या शेवटच्या पायरी वरील घटक आहेत. त्यांना अत्याधुनिक तर सोडाच पण मूलभूत सुविधा व उपचार मिळणे सुद्धा दुरापास्त आहे. त्यामुळे माता मृत्यू दर या स्तरांमध्ये जास्त आहे. हे सर्व टाळण्याकरिता फक्त डॉक्टरांवर चुकीचे दोषारोप करण्यापेक्षा, ग्रामीण भागातील व समाजातील पिचलेल्या स्त्रियांचे आरोग्य- संवर्धन व उपचार, सेवा आणि सुविधा यावर चर्चा व उपायोजना झाल्यास जास्त फायद्याची राहील.

या लेखाचा प्रपंच कुणा एका लेखाला दिलेले प्रत्युत्तर एवढाच नसून, सामान्यजनांना या विषयावर आरोग्य शिक्षण देऊन जनजागृती करणे हा आहे.

लेखक स्त्री रोग व प्रसूती शास्त्र तज्ज्ञ असून, अमरावती येथे स्थायिक आहेत. sanjioborade@gmail.com

Story img Loader