संजय देशपांडे, हेमांगी वर्तक, अनुज खरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आज वर्तमानपत्रात आणि समाज माध्यमांमध्ये ताडोबा बफरच्या जंगलामध्ये एक वाघीण प्लास्टिकची पाण्याची रिकामी बाटली तोंडात धरून जात आहे, असे छायाचित्र आणि ‘हे वन आणि आणि पर्यटन विभागाचे अपयश आहे’, अशा आशयाची वृत्ते प्रसिद्ध झाली आहेत. एखाद्या गोष्टीवरच्या अशा पद्धतीच्या प्रतिक्रियांमुळे वन्यजीव पर्यटनाचे नुकसान होते. प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर योग्य आहे किंवा हा फोटो चुकीचा आहे, असे आमचे म्हणणे नाही; पण जिथे गावकरी मुक्तपणे फिरू शकतात, तिथे म्हणजे या गोष्टी ताडोबाच्या बफरमध्ये किंवा कोणत्याही व्याघ्र प्रकल्पाच्या ठिकाणी अशा गोष्टी घडतात. कारण येथे २०० हून अधिक गावे आणि एक लाखाच्या आसपास लोकसंख्या आहे आणि त्यांच्यामध्ये ताडोबाच्या बफरमध्ये २०० वाघ आहेत. निमढेला बफरमध्ये (हे छायाचित्र तिथले असावे, अशी शक्यता आहे) अगदी ऐन जंगलामध्ये मध्य भागात मंदिरे आहेत आणि स्थानिक रहिवासी त्यांच्या इच्छेनुसार या मंदिरांना भेट देतात आणि वाघदेखील तिथे आसपास असतात. वाघ असेच जगणार आहेत, सहजीवनाने! याचा अर्थ असा नाही की पर्यटन थांबवा किंवा कचरा करा… पण काळजीही घ्या. अशा गोष्टींवर राग व्यक्त करण्यापेक्षा स्थानिक लोकांना जागृत करा. वनविभाग ही गोष्ट सतत करत आहे आणि पर्यटकांमुळेच तेथील स्थानिक लोक रोजीरोटी मिळवू शकतात.

म्हणून आपण आपले नियोजन करताना त्यामध्ये सर्व प्रजातींवर लक्ष केंद्रित करण्याचा विचार केला पाहिजे किंवा त्यावर भर दिला पाहिजे, तरच आपण त्यांच्यासाठी जागा तयार करू शकू. हा पैलू महत्त्वाचा आहे, कारण एकीकडे ताडोबातील वाघांची संख्या वाढली आहे (म्हणजे चंद्रपूरमधील), तर वाघांच्या मृत्यूंची संख्याही आतापर्यंतची सर्वाधिक आहे. देशामध्ये २०२३ या वर्षामध्ये जवळपास २०० वाघांचा मृत्यू झाला आहे. या वाघांचा मृत्यू वेगवेगळ्या प्रकारे झाला असला तरीही या सर्व मृत्यूंमागचे मूलभूत कारण एकच आहे ते म्हणजे वाघांसाठीची जागा कमी होणे. त्याचा अप्रत्यक्ष अर्थ असा होतो की वनक्षेत्र कमी होणे किंवा अधिवास नाहीसा होणे. हे वनविभागाचे अपयश नसून एक यंत्रणा म्हणून आपल्या नियोजनाच्या क्षमतेचे अपयश आहे. २०० वाघांच्या मृत्यूमध्ये काय एवढे मोठेसे, असे तुम्हाला वाटत असेल तर ही तुलना पाहा.

हेही वाचा : म्यानमारच्या सीमेवरले संभाव्य कुंपण कुणाला टोचणार?

आपल्या देशामध्ये माणसांची संख्या १५० कोटी आहे तर वाघांची संख्या ३,७५० आहे. म्हणजेच जवळपास चार लाख माणसांच्या मागे एक वाघ आहे व वर्षभरात २०० वाघांचा मृत्यू म्हणजे वर्षभरात जवळपास आठ कोटी माणसांचा मृत्यू होण्यासारखे आहे. आता तुम्हाला या आकड्यांचे गांभीर्य समजू शकेल. तुम्ही असे म्हणू शकता की ही तुलना मूर्खपणाची आहे किंवा मला वेड लागले आहे. परंतु प्रत्येक प्रजातीला जगण्यासाठी आणि भरभराट होण्यासाठी त्यांची स्वतःची जागा असेल, अशा एका जगाची निर्मिती करण्यात आपण अपयशी ठरलो आहोत, ही वस्तुस्थिती बदलणार नाही. आपल्या नियोजनामध्ये केवळ माणसांवरच लक्ष केंद्रित केल्यामुळे, आपण इतर प्रजातींना संपवत आहोत. कारण आपण केवळ माणसांच्या गरजांसाठी नियोजन करत आहोत. माणसांमुळे दररोज केवळ वाघांनाच नव्हे तर बिबटे, हरीण, गेंडे व हत्ती व अशा सर्व प्रजातींना प्रचंड धोका निर्माण झाला आहे. कारण आपण अक्षरशः त्यांच्याच वाट्याचे अन्न खात आहोत, त्यांचे पाणी पीत आहोत व आपल्या गरजांसाठी (म्हणजे हव्यासासाठी) त्यांची घरे नष्ट करत आहोत. केवळ वन्यजीवनच नाही, आपल्या १५० कोटींहून अधिक जनतेला राहण्यासाठी जागा हवी आहे, म्हणून आपण आपल्या नद्या, तलाव, टेकड्या, समुद्राचा विनाश करत आहोत.

हेही वाचा : नॅक मूल्यांकनात झालेले बदल शैक्षणिक गुणवत्ता वाढवतील का?

आपण ताडोबा अभयारण्यातील वाघांची संख्या वाढविण्यात यशस्वी ठरलो आहोत ही चांगली बातमी आहे. परंतु त्यांना जगण्यासाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध करून देण्यात आपण अपयशी ठरत आहोत हा मुद्दा आहे व त्यासाठी आपण केवळ वन विभागाला जबाबदार धरू शकत नाही. वन विभाग त्याला जे करणे शक्य आहे ते सर्व काही करत आहे. त्यासाठी त्यांनी ताडोबामध्ये केलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणसांना वाघांसोबत जगायला लावले आहे. आपल्याला वन्यजीवनाबाबत असलेली आपली जबाबदारी झटकता येणार नाही, कारण आपण दररोज वाघांच्या मालकीची जागा शक्य त्या सर्व प्रकारांनी कमी करत आहोत हे कटू सत्य आहे. लोकहो विचार करा, एखाद्या माणसाचे कुटुंब टूबीएचके सदनिकेमध्ये राहत असेल, त्यांना एक मूल असेल व कुटुंबात आणखी एका सदस्याचा जन्म झाला, तर नव्या सदस्यासाठी जागा व्हावी म्हणून थ्रीबीएचके घेता आला नाही तर आपण दोन्ही भावंडांना एकच खोली वाटून घ्यायला लावतो व आपण त्यांना तसे जगायला शिकवतो. याचे कारण आपण माणसे आहोत व तो आपला स्वभाव आहे. परंतु वाघाचे कुटुंब आपण जगतो त्याप्रकारे निसर्गामध्ये राहू शकत नाही. वाघांना आपल्या कुटुंबाचाच एक सदस्य बनवून घेण्याची व त्यांनी आपली संस्कृती किंवा जगण्याच्या पद्धती शिकाव्यात अशी अपेक्षा करण्याऐवजी त्यांना त्यांच्या स्वभावानुसार जगता यावे यासाठी प्रयत्न करण्याची वेळ आली आहे. भावनाप्रधान होण्यापेक्षा या गोष्टींचा विचार करून मगच अशा बातम्यांवर प्रतिक्रिया व्यक्त करावी असे वाटते.

smd156812@gmail.com