अश्विनी वैष्णव
आपण जागतिक भविष्याबद्दल बोलतो, तेव्हा ते बोलणे, ती चर्चा प्राधानान्ये मानव केंद्रित दृष्टिकोन बाळगूनच व्हायला हवी, हे शब्द आहेत आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे. अलिकडेच झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या भविष्याविषयीच्या शिखर परिषदेत अर्थात ‘समिट ऑफ द फ्यूचर’ ला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला हा विचार दिला. त्यांच्या या शब्दांमधून कोणत्याही कृतीत जनतेला अग्रस्थानी ठेवण्याच्या भारताच्या दृष्टिकोनाचेच प्रतिबिंब उमटले आहे. नुकत्याच आखण्यात आलेल्या डिजिटल वैयक्तिक विदा संरक्षण नियम, २०२५च्या मसुद्याला आकार देण्याच्या प्रयत्नांमध्येही हेच तत्त्वज्ञान मार्गदर्शक ठरले आहे. या नियमांवर मान्यतेची अंतिम मोहर उमटल्यानंतर डिजिटल वैयक्तिक विदा संरक्षण कायदा २०२३ प्रत्यक्षात लागू होईल आणि नागरिकांच्या वैयक्तिक विदा संरक्षणाच्या अधिकाराचे रक्षण करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेलादेखील खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप प्राप्त होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा