जयदेव रानडे

क्षी जिनपिंग यांची १५ ते १७ नोव्हेंबरदरम्यान बायडेन यांच्याशी ‘अनौपचारिक’ चर्चा व्हावी, ही चीनची आणि अमेरिकेचीही गरज दिसते, ती कशी व का?

China is aggressive again after Taiwans war drills What are chances of war
तैवानच्या युद्धसरावाने चीन पुन्हा आक्रमक? युद्धाची शक्यता किती?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Donald Trump is advocating using economic pressure to annex Canada as part of the United States
Trump on Canada: अमेरिका कॅनडावर ताबा मिळवणार का?
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा, काय होऊ शकतात याचे परिणाम?
Donald Trump
Donald Trump : ‘हश मनी’ प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा! सर्व आरोपातून झाली बिनशर्त सुटका
Donald Trump
Donald Trump : आम्हीच अमेरिकेतली काही राज्ये विकत घेतो! कॅनडाच्या नेत्यानं डोनाल्ड ट्रम्प यांनाच दिली ऑफर
Image of a person holding a kite string or a bike with a caution sign
Chinese Manjha : चिनी मांजाने घेतला निष्पाप तरुणाचा जीव, कामावरून परतत असताना झाला घात
India redflags Chinas 2 new counties
चीनने गिळंकृत केला लडाखचा एक प्रदेश, काय आहे प्रकरण?

चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची वॉशिंग्टन-भेट पाच वर्षांच्या खंडानंतर अखेर २६ ते २८ ऑक्टोबर या दिवसांत पार पडली. या भेटीदरम्यान उभय देशांच्या संबंधांत काही प्रगती झाल्याचे भेटीबद्दलच्या अधिकृत पत्रकांतून दिसते. अमेरिका व चीनदरम्यान सागरी घडामोडी आणि शस्त्रास्त्र नियंत्रणावरील खलबते पुन्हा सुरू होतील आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग या नोव्हेंबरात ‘अ‍ॅपेक’ (एशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक को-ऑपरेशन) गटाच्या शिखर परिषदेसाठी सॅन फ्रान्सिस्कोला भेट देतील, हे महत्त्वाचे आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर क्षी व बायडेन या दोघांमधील ही दुसरी भेट ठरेल.

दरम्यानच्या काळात चिनी नेते व अधिकृत माध्यमांनी अमेरिकेवर सतत टीका केली आहे. बीजिंगने फिलिपाइन्स, जपान आणि तैवानविरुद्ध आक्रमक कारवाया सुरू ठेवल्या आहेत आणि क्षी जिनपिंग हे त्यांच्या ‘जागतिक सुरक्षा पुढाकार’, ‘जागतिक विकास पुढाकार’ आणि ‘जागतिक सभ्यता पुढाकार’ यांतून जगासाठी पर्यायी मार्ग देऊ करणारा त्यांचा अजेंडा आत्मविश्वासाने पुढे रेटत आहेत. गेल्या ३० ऑक्टोबर रोजीच, दहाव्या ‘बीजिंग शिआंगशान फोरम’मध्ये बोलताना, चीनच्या केंद्रीय लष्करी आयोगाचे उपाध्यक्ष जनरल झांग युक्सिया यांनी पुन्हा एकवार ‘तैवानला चीनपासून तोडण्याचे धाडस करणाऱ्यांचे प्रयत्न चीन कधीही खपवून घेणार नाही’, यावर भर दिला.

तरीसुद्धा वांग यी अमेरिकेत आले हे महत्त्वाचे. वांग यी हे चिनी सत्ताधारी पक्षाच्या (सीसीपी) पॉलिटब्युरोचे सदस्य आणि सीसीपीच्या केंद्रीय परराष्ट्र व्यवहार आयोगाचे संचालक आहेत. म्हणजेच ते, चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांचे सर्वात ज्येष्ठ मुत्सद्दी आणि परराष्ट्र धोरण सल्लागार आहेत. सॅन फ्रान्सिस्को येथे १५ ते १७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ‘अ‍ॅपेक’ शिखर परिषदेच्या दरम्यान जिनपिंग-बायडेन यांच्यातील संभाव्य भेटीवर चर्चा करण्यासाठी थेट वांग यी यांना चीनने वॉशिंग्टनला धाडले, हे अमेरिका आणि चीन यांच्यातील बिघडलेले संबंध सुधारण्याचा दोन्ही देशांचा इरादा असल्याचेच लक्षण ठरते.

वांग यी यांच्या या भेटीची वेळ चिनी महत्त्वाकांक्षांसाठीही महत्त्वाची ठरते. युक्रेनमधील युद्धात तसेच इस्रायल-हमास संघर्ष मध्यपूर्वेत अन्यत्र पसरू नये यासाठी आटापिटा करण्यात सध्या गुंतून पडलेल्या अमेरिकेकडे ‘इंडो-पॅसिफिक’मध्ये हस्तक्षेप करण्यासाठी कितपत सामथ्र्य आणि क्षमता असू शकेल, याचे मूल्यांकन चीन करत असावा. एका बाजूला अमेरिकी क्षमतांचे हे मूल्यांकन आणि दुसरीकडे चीनची रशियाशी असलेली घट्ट मैत्री, इराणशी असलेले दृढ संबंध यातून काही आडाखे बांधले जाऊ शकतात. चीनला ‘रोखण्याचे’ प्रकार आम्ही करत नसल्याचे अमेरिका किंवा पाश्चिमात्य देशांनी कितीही सांगितले तरी खुद्द चीनमध्ये यावर लोकांचा आणि अधिकाऱ्यांचाही अविश्वासच दिसतो. जनरल झांग युक्सिया आणि इतर नेत्यांची विधाने ही पाश्चिमात्यांवरील अविश्वासालाच खतपाणी घालतात.

एवढे नकारात्मक वातावरण कायम असूनही, तणाव कमी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी अमेरिका आणि चीन यांच्या अधिकाऱ्यांच्या चर्चा-बैठका त्रयस्थ देशांमध्ये गेल्या काही वर्षांत अनेकदा झाल्या. इटली, स्वित्र्झलड, इंडोनेशिया आणि माल्टा इथे या बैठकांमध्ये अधिकाऱ्यांची बैठक झाली आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकेन यांनी जून २०२३ मध्ये चीनला भेट देऊन पहिले ठोस पाऊल उचलले. जानेवारी २०२१ मध्ये ब्लिंकेन यांनी पदभार स्वीकारल्यानंतरची ही पहिलीच चीन-भेट होती. मग जुलैमध्ये  अमेरिकेच्या अर्थमंत्री जानेट येलेन, अमेरिकी अध्यक्षांचे पर्यावरण-विषयक दूत जॉन केरी आणि ऑगस्टमध्ये अमेरिकेच्या वाणिज्यमंत्री जीना रायमोंडो हे चीनमध्ये येऊन गेले. चीनकडून मात्र केवळ एकदा, वाणिज्य उपमंत्री वांग वेनताओ मे २०२३ अमेरिकेला गेले, तेही ‘अ‍ॅपेक’च्या बैठकीसाठी.

मात्र नवी दिल्लीतील ‘जी- २०’ शिखर परिषदेदरम्यान चीनचे पंतप्रधान ली कियांग यांची बायडेन यांच्याशी संक्षिप्त चर्चा झाली होती, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सप्टेंबरात जाहीर केले.  त्या वेळी ‘ली कियांग यांनी चीनचा विकास हा अमेरिकेसमोरील आव्हानापेक्षा एक संधी आहे यावर भर दिला’, ‘चीन आणि अमेरिकेने देवाणघेवाण मजबूत केली पाहिजे’ असे कियांग म्हणाले आणि त्यावर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे उत्तर  ‘आम्हाला आशा आहे की चीनची अर्थव्यवस्था वाढत राहील आणि चीनच्या आर्थिक विकासास (अमेरिका) प्रतिबंध करणार नाही’ असे होते, असे शब्द चिनी परराष्ट्र प्रवक्त्याने ही माहिती देताना वापरले.

चीनच्या अधिकृत माध्यमांमध्ये अमेरिकेबद्दलची नकारात्मकता नेहमीचीच, पण अलीकडे त्यांचाही सूर लक्षणीयरीत्या अधिक सामंजस्यपूर्ण दिसतो. अमेरिका-चीन संबंधवृद्धी समितीच्या वार्षिक मेजवानीनिमित्त क्षी जिनपिंग आणि बायडेन या दोघांनी पाठवलेल्या अभिनंदनपर संदेशांचे वृत्त ‘द पीपल्स डेली’ने  २७ ऑक्टोबरच्या अंकात दिले. जिनपिंग यांनी बीजिंगभेटीस आलेले कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांच्याशी २६ ऑक्टोबर रोजी चर्चा केल्याची, त्याआधी ९ ऑक्टोबर रोजी अमेरिकी सिनेटचे नेते चक शूमर यांच्या चीन-भेटीची बातमी चिनी वृत्तपत्रात सकारात्मक सुरातच आली. शिनहुआ या सरकारी वृत्तसंस्थेने ‘‘दोन्ही देशांत सामायिक हिताचे मुद्दे अनेक असल्याची भूमिका चीनने कायम ठेवली असल्यामुळे मतभेद आणि मत्सरस्पर्धा यांना थारा असू नये,’’ असे जिनपिंग यांनी शूमर यांना सांगितल्याचे वृत्त दिलेच, पण शूमर यांची त्यावरील भूमिका ही ‘अमेरिका चीनशी संघर्ष करू इच्छित नाही किंवा चीनला एकटे पाडण्याचाही (डीकपिलग) प्रयत्न करीत नाही’ तसेच ‘अमेरिका चीनशी खुले आणि स्पष्ट संवाद वाढवून त्याद्वारे संबंध मजबूत आणि स्थैर्यपूर्ण करण्यासाठी इच्छुक आहे..’  अशी असल्याचेही शिनहुआने नमूद केले. 

वांग यी हे २७ ऑक्टोबर रोजी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना भेटलेच, पण त्यापूर्वी २६ आणि २७ ऑक्टोबर रोजी वांग यी यांनी अँटनी ब्लिंकेन यांच्याशी बंद दरवाजाआड, गोपनीय बैठकीच्या दोन फेऱ्याही पार पाडल्या, असे अधिकृत (चिनी) आणि अन्य माध्यमांचे म्हणणे आहे.  ब्लिंकेन यांच्या भेटीपूर्वी वांग यी यांनी ‘चीन आणि अमेरिकेने संवाद पुन्हा सुरू करणे आणि चीन-अमेरिका संबंध स्थिर करणे आवश्यक आहे’ अशा शब्दांत चीनच्या भूमिकेचा ‘पुनरुच्चार’ केला, यावर चिनी माध्यमे भर देत आहेत. तर अमेरिकी परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने ‘ही चर्चा द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक मुद्दय़ांवर होती व त्यात सहकार्य तसेच मतभिन्नतेच्या क्षेत्रांचाही ऊहापोह झाला,’ असे सांगितले आहे. खुद्द ब्लिंकेन म्हणतात की, ‘आमचे हित आणि मूल्ये तसेच आमचे मित्र आणि भागीदार यांच्यासाठी आम्ही उभे राहू’.. पण माजी पंतप्रधान ली केकियांग यांच्या निधनाबद्दल ब्लिंकेन यांनी आवर्जून शोकही व्यक्त केला.

एक प्रमुख जागतिक महासत्ता बनण्याच्या आणि हिंदू-प्रशांत महासागरी प्रदेशावर वर्चस्व गाजवण्याच्या आपल्या धोरणावर चीन लक्षणीयपणे ठाम राहिला असून भारत आणि संबंधित क्षेत्राबद्दलची आक्रमक धोरणे चीनने अजिबात कमी केलेली नाहीत. चीनमध्ये देशांतर्गत असंतोष वाढत असल्याचे पुरेसे संकेत आहेत. क्षी जिनपिंग यांनी अमेरिकेशी संबंध चुकीच्या पद्धतीने हाताळल्यामुळे आपली आर्थिक अडचण वाढली, असाही सूर या चिनी जनक्षोभात आहे. लष्करी साहसाचा (तैवान, दक्षिण चीन समुद्र आदींमध्ये) प्रयत्न करून लोकांचे लक्ष वळवण्याची संधी जिनपिंग यांच्यासाठी कमी होते आहे. अशा वेळी वांग यी यांच्यामार्फत अमेरिकेची चाचपणी चीनने सुरू केली आहे. चीनला ‘खिळवून’ ठेवण्याच्या अमेरिकेच्या महत्त्वाकांक्षेलाही वाव कमीच आहे. वॉशिंग्टन चीनशी केवळ आर्थिक स्पर्धेचे धोरण अवलंबत आहे हे खरे, पण ते फार ताणल्यास चीनही  आर्थिक आणि लष्करी सामथ्र्य दाखवण्यासाठी जागतिक प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करणार, हे उघड असल्यामुळे सध्या ही ‘संबंधवृद्धी’ सुरू असल्याचे दिसते.

Story img Loader