उज्ज्वला देशपांडे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ब्रिटिश नागरिकत्व असलेले सुनक इंग्लंडचे पंतप्रधान होऊ शकतात आणि अमेरिकन कमला अमेरिकेच्या उपराष्ट्रपती होऊ शकतात ते, ते दोघेही त्या देशाचे नागरिक असतात म्हणून.
इंग्लंडमध्ये ऋषी सुनक पंतप्रधान झाल्यावर, अमेरिकेत कमला हॅरिस उपराष्ट्रपती झाल्यावर आणि आता त्या राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक लढवताना आपल्याला भारतामध्ये – वेगवेगळी समाजमाध्यमे आणि बरेच भारतीय नागरिक – अशा प्रकारे या घटनांबद्दल प्रतिक्रिया देताना दिसतात जसे काही एखादी भारतीय व्यक्तीच, इंग्लंडची पंतप्रधान किंवा अमेरिकेची उपराष्ट्रपती झाली आहे.
आपल्याला कोणत्याही भारतीय वंशाच्या व्यक्तीने काही नाव मिळवल्यावर – मग ते नोबेल पारितोषिकात असो वा मोठ्या आयटी कंपनीमध्ये किंवा राजकारणात – असे वाटते की जसे काही एका भारतीयानेच हे मिळवले आहे. या सर्व निश्चितच आदरणीय व्यक्ती आहेत आणि त्यांच्या कर्तृत्वाबद्दल सगळ्यांकडून अभिनंदनास पात्र आहेत.
पण आपण हे लक्षात घेतले पाहिजे की त्यांच्या आधीच्या पिढ्या या भारत / भारतीय नागरिकत्व सोडून परदेशात स्थायिक झाल्या आणि त्या-त्या देशाचे नागरिकत्व घेऊन / जन्माने मिळून त्या-त्या देशाच्या झाल्या. त्यामुळे ब्रिटिश नागरिकत्व असलेले सुनक इंग्लंडचे पंतप्रधान होऊ शकतात आणि अमेरिकन कमला अमेरिकेच्या उपराष्ट्रपती होऊ शकतात, ते त्या देशाचे नागरिक आहेत म्हणून. भारतीय वंशाचे आहेत म्हणून नव्हे.
हेही वाचा >>> अजित रानडे प्रकरणाने दाखवून दिली आपल्या शैक्षणिक प्रशासनाची इयत्ता…
त्यांना ती पदे मिळण्यामागे त्यांचे कष्ट, अनुभव, त्या-त्या देशाच्या लोकांना त्यांच्या कामाबद्दल वाटलेला विश्वास ही कारणे आहेत. इतर राजकारण्यांना पडणारे प्रश्न, येणाऱ्या समस्या त्यांनापण येत आहेत.
हे मांडायचं कारण म्हणजे वर्तमानपत्रात आलेल्या दोन बातम्या:
१. पुण्यात कसबा मतदारसंघ हा ब्राह्मण बहुल असल्याने या ठिकाणी ब्राह्मण समाजातील व्यक्तीला प्रतिनिधित्व द्यावे अशी एक बातमी.
२. दुसरी बातमी पुण्यात वडगाव शेरी मतदारसंघात १६ टक्के ख्रिश्चन समाज आहे त्यामुळे या मतदारसंघातून ख्रिश्चन उमेदवार द्यावा.
कसब्याच्या बाबतीत असे म्हटले आहे की ‘भाजप व शिवसेना शिंदे गट हिंदुत्ववादी प्रचार करत असल्याने त्यांनी विधानसभा निवडणुकीत राज्यभरात किमान ३० ब्राह्मण उमेदवार उभे करावेत’
हिंदुत्ववादी प्रचार म्हणजे फक्त ब्राह्मणांचे प्रतिनिधित्व का? ब्राह्मणेतर हिंदुत्ववादी नसतात का? असतात तर मग फक्त ब्राह्मणांचे प्रतिनिधित्व का?
आणि अशी मागणी करणारे पत्र ब्राह्मण संघटनेने प्रसिद्ध केले आहे.
ही संघटना भारत नाही, महाराष्ट्र नाही तर निदान पुण्यातल्या तरी सगळ्या (ब्राह्मणांच्या पोटजाती धरून) ब्राह्मणांचे प्रतिनिधित्व करते का?
इतर जाती-धर्माचे लोक त्या-त्या मतदारसंघात राहतात, त्यांच्याही समस्या आहेत, राजकीय प्रतिनिधींकडून अपेक्षा आहेत. त्या लोकांनी काय करायचं?
उमेदवारही एका विशिष्ट जाती-धर्माचे आहेत म्हणून ‘मला तिकीट द्या’ म्हणतात तेव्हा ते विसरतात की आपल्या मतदारसंघात इतर जाती-धर्माचे मतदारही आहेत आणि त्यांचे मतही जिंकण्यासाठी महत्त्वाचे आहे.
हेही वाचा >>> सहानुभूतीचे राजकारण नाकारणारा काँग्रेसी
माझ्या जाती-धर्माच्या उमेदवाराला सोडून इतरांना माझ्या मतदारसंघातल्या अडचणी सोडवता येणार नाहीत का?
आतापर्यंत जर त्याच जाती-धर्माचे राजकीय प्रतिनिधी असूनही त्या मतदारसंघाच्या समस्यांचे निराकरण जर झाले नसेल, तर परत फक्त त्याच जाती-धर्माचे म्हणून असे उमेदवार उभे करा म्हणणे कितपत योग्य आहे?
आपल्याला आपल्या सामाजिक, आर्थिक समस्यांचे निराकरण करणारे, शांतता सलोखा ठेवणारे, वेगवेगळी महत्त्वाची विकास कामे वेळेत मार्गी लावणारे, तरुणांना मार्गदर्शक असे प्रतिनिधी मागितले पाहिजेत. मग ते कोणत्याही जाती-धर्माचे असूदे.
यात जाती-धर्माबरोबरच, स्त्री उमेदवारांबद्दल खूप खालच्या स्तरावर जाऊन भाषणांमध्ये सर्वपक्षीय नेते बोलताना दिसतात. मग ते अमेरिकेत ट्रम्प असोत किंवा आपल्याकडे महाराष्ट्रात संजय राऊत किंवा वसंत देशमुख. निवडणुकीत आपल्या-आपल्या मतदारसंघात उमेदवार मागताना नागरिकांनी सभ्य, मर्यादाशील उमेदवाराची मागणी करणे उचित असेल. श्रीरामांसारखा राजा आपल्याला पूजनीय असतो, शिवाजी महाराज आपल्याला आदरणीय असतात; पण प्रत्यक्षात राजकीय पक्ष दुर्योधन / दु:शासनांना सुद्धा लाजवतील असे उमेदवार उभे करतात तरी आपण गप्प राहतो. निदान वर्तमानपत्रातून तरी त्याविषयी आपण सामान्य नागरिकांनी याविषयी निषेध नोंदविला पाहिजे.
मी स्वतः दहा वर्षे कसब्यात राहिले आहे, प्राध्यापक असताना जनगणनेचे कामही कसब्यातच केले आहे. गेल्या ४० वर्षात कसब्याची परिस्थिती बकाल झाली आहे. वडगाव शेरीची परिस्थितीही काही वेगळी नाही.
त्यामुळे सुनक आणि कमला यांना त्यांच्या कामासाठी जसे निवडून दिले गेले आहे तसेच आपणही राजकीय प्रतिनिधी निवडून देताना ते काम कसे करतात याचा विचार केला पाहिजे. इंग्लंड, अमेरिकेतपण संकुचित बेटे तयार झाली असती तर सुनक आणि कमला निवडणूकच काय, नागरिकत्वही मिळवू शकले नसते.
सोईस्कररित्या सुनक आणि हॅरीस यांचे कौतुक करणे आणि आपल्या इथे मतदानासाठी उमेदवार मागताना मात्र माझ्याच जातीचा, माझ्याच धर्माचा मागणे हे चुकीचे आहे.
भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक आहे. ‘लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या’ माध्यमातून भारतीय मतदारप्रणित लोकशाहीचा एक अविभाज्य भाग असतात. मतदार जितक्या विवेकाने मतदान करतील तितकी लोकशाही बळकट होईल.
ujjwala.de@gmail.com