निनाद कर्पे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारताच्या साहसी भांडवल क्षेत्राला या वर्षात कोणते नवे कल चालना देतील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान निर्माण करण्यासाठी कोणती पावले उचलावी लागतील, याविषयी…

भारत झपाट्याने विस्तारत असलेले जागतिक कल्पकता केंद्र आहे. हे केंद्र सध्या आपल्या साहसी उद्याम भांडवल व्यवस्थेत लक्षणीय स्थित्यंतर अनुभवत आहे. हे क्षेत्र जागतिक कल आणि स्थानिक गतिशीलता यांचा मिलाफ घडवून त्या माध्यमातून नवीन संधी मिळवण्यासाठी वाटचाल करत आहे, पण त्याचबरोबर या क्षेत्रासमोर नवनवी आव्हाने उभी ठाकली आहेत. या आव्हानांवर मात करण्यासाठी सक्षम होण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. नव्या वर्षात या व्यवस्थेत परिवर्तनास कारण ठरणारे तीन नवे कल दिसू लागले असून हे कलच या व्यवस्थेच्या वर्षभरातील वाटचालीची दिशा निश्चित करतील. भांडवल कसे वापरले जाते, तंत्रज्ञानाचा वापर कसा वाढवला जातो आणि लोकसंख्येमुळे मिळणाऱ्या लाभांचा कसा उपयोग करून घेतला जातो यावर वर्षभरातील चित्र अवलंबून असणार आहे.

(१) क्षेत्र-विशिष्ट निधी: व्याप्तीपेक्षा अचूकता महत्त्वाची

भारतातील नवउद्यामांची व्यवस्था परिपक्व होत असताना, मर्यादित भागीदार (एलपी) क्षेत्र- विशिष्ट साहसी उद्याम भांडवल निधीकडे (फंड) आकर्षित होताना दिसते. हे उच्च वाढीच्या संभाव्य क्षेत्रांसह तंत्रज्ञानाधारित कृषी सेवा, वित्तीय मंच, आरोग्य सेवा, शैक्षणिक सेवा आणि हवामानविषयक मंचसारख्या विशिष्ट बाजारपेठांच्या गुंतवणुकीसंदर्भातील गरजा पूर्ण करतात. हे स्थित्यंतर व्यापक गुंतवणूक रणनीतींपासून काहीसे दूर जात व्यवसाय शाखेतील सखोल कौशल्याला प्राधान्य देत अचूक दृष्टिकोन निर्माण करते.

हेही वाचा >>> नामविस्तारानंतर आंबेडकरी चळवळीची वाढ खुंटलेली कशी?

क्षेत्र-विशिष्ट फंडांचे अनेक फायदे असतात. एखाद्या विशिष्ट उद्याोगाचा अभ्यास असलेले फंड व्यवस्थापक नवउद्यामाचे मूल्यमापन करण्यासाठी, त्या क्षेत्रातील उदयोन्मुख कल ओळखण्यासाठी आणि धोरणात्मक मार्गदर्शनासाठी अधिक सुसज्ज असतात. उदाहरणार्थ, भारतात वेगाने विस्तारत असलेल्या विजेवरील वाहनांच्या व्यवस्थेने स्वच्छ ऊर्जा आणि दळणवळणासंदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी निधी उभारण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचप्रमाणे, तंत्रज्ञानाधारित आरोग्य सेवानिधींनी भारताच्या वैद्याकीय सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या डिजिटल परिवर्तनाचा लाभ घेतला आहे. त्यात टेलिमेडिसिन मंचांपासून ते कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित निदानापर्यंतच्या शोधांचा समावेश आहे.

हे फंड त्यांच्या भागभंडारात समन्वय साधतात. एकाच क्षेत्रातील नवउद्यामांत सहकार्य वाढवून, ते सामूहिक मूल्यनिर्मितीला प्रोत्साहन देतात. उदाहरणार्थ, तंत्रज्ञानाधारित वित्तीय मंच पैसे भरण्याच्या संदर्भातील नवउद्यामाला कर्ज देणाऱ्या मंचाशी जोडून एकात्मिक आर्थिक व्यवस्था उभारू शकतात. हा दृष्टिकोन विशेष ज्ञानाचा लाभ मिळवून देतो. जोखीम कमी करतो आणि उच्च-वाढीच्या उद्याोगांच्या माध्यमातून जास्तीत जास्त परतावा देतो.

भारतात साहसी उद्याम भांडवल क्षेत्र आणि क्षेत्र-विशिष्ट फंड सध्या स्पर्धात्मक बाजारपेठांमध्ये पुढे राहण्याची संधी देतात. त्या-त्या श्रेणीत अग्रस्थानी राहू शकणाऱ्यांचा लवकर शोध घेऊन तसेच त्यांना त्यांच्या गरजांनुसार आवश्यक ते साहाय्य करून हे फंड नवउद्यामांच्या वाढीच्या प्रवासात अपरिहार्य सहयोगी म्हणून स्वत:चे स्थान निर्माण करतात. मर्यादित भागीदारांची गुंतवणुकीची वाढती मागणी लक्षात घेता क्षेत्र-विशिष्ट फंड भारताच्या साहसी उद्याम भांडवल धोरणाचा आधारस्तंभ होण्यासाठी सज्ज झाले आहेत.

(२) तंत्रज्ञान प्रगती : युनिकॉर्नसाठी ऊर्जा

भारत एका तांत्रिक क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा आहे, नवनवीन शोध उद्याोगांना आकार देत आहेत आणि नवीन बाजारपेठ निर्माण करत आहेत. पाच परिवर्तनीय तंत्रे या बदलाच्या शीर्षस्थानी असून युनिकॉर्नची पुढची नवीन लाट निर्माण करण्याचे संकेत देत आहेत.

उत्पादनक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता

भारतीय नवउद्याम आरोग्य, शिक्षण आणि वित्त यांसारख्या क्षेत्रांना अनुरूप कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित उपाय विकसित करण्यासाठी स्थानिक विदासंचाचा वापर करत आहेत. या अॅप्लिकेशन्समध्ये या क्षेत्रात येण्याच्या संधींचे लोकशाहीकरण करण्याची, कार्यक्षमता सुधारण्याची आणि खर्च मर्यादित राखण्याची क्षमता आहे आणि त्यामुळेच उत्पादनक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता परिवर्तनाचा हुकुमी एक्का ठरत आहे.

रोबोटिक्स

रोबोटिक्ससह एआयचे एकात्मिकीकरण दळणवळण आणि उत्पादन क्षेत्रात क्रांती घडवत आहे. स्वयंचलनात प्रावीण्य असलेले नवउद्याम लक्षणीय गुंतवणूक आकर्षित करत आहेत, कारण ते उत्पादकता वाढवण्यासंदर्भात आणि जोखमीच्या क्षेत्रातील कामगारांचा तुटवडा कमी करण्यासाठी वचनबद्ध आहेत.

स्वयंचलित ईव्ही

भारताची महत्त्वाकांक्षी विद्याुतीकरण उद्दिष्टे पाहता विजेवर चालणाऱ्या स्वयंचलित वाहनांच्या तंत्रज्ञानाकडे नवनवीन नवउद्यामी आकर्षित होत आहेत. मोटारींच्या ताफ्याच्या स्वयंचलित प्रणालीद्वारे व्यवस्थापनापासून वाहनचालकांना साहाय्य करणाऱ्या अत्याधुनिक सॉफ्टवेअरपर्यंत काहीही करण्याची क्षमता या क्षेत्रात आहे.

ब्लॉकचेन

यूपीआयने भारताच्या तंत्रज्ञानाधारित वित्त क्षेत्रात क्रांती घडवल्यानंतर आता ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे साध्य करण्यात आलेले नावीन्य या क्षेत्रातील पुढील लाटेला पाठबळ देईल, अशी स्पष्ट चिन्हे आहेत. नवउद्याम आता सीमापार व्यवहार, स्मार्ट करार आणि विकेंद्रित वित्तकारणासाठी ब्लॉकचेनचा शोध घेत आर्थिक क्षेत्रातील नवनव्या क्षमता आणि शक्यता उलगडून दाखवत आहेत.

जैवतंत्रज्ञान

भारताचे भक्कम औषधनिर्माण क्षेत्र आणि जनुक चिकित्सा जैवतंत्रज्ञातील प्रगती हे साहसी उद्याम भांडवलातील गुंतवणुकीसाठी एक आशादायक क्षेत्र आहे. अचूक औषध, औषध संशोधन आणि जैव अभियांत्रिकीतील संशोधन यात आरोग्यसेवेत परिवर्तन घडवण्याची अफाट क्षमता आहे. या तंत्रांनी केवळ नवीन युनिकॉर्न तयार केले नाहीत, तर पारंपरिक बाजारपेठेतही मोठी उलथापालथ घडविली आहे. उदाहरणार्थ, उत्पादनक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता आशयनिर्मितीच्या मूळ व्याख्येतच परिवर्तन घडवून आणू शकते, तर ब्लॉकचेन तंत्रज्ञान पुरवठा साखळी व्यवस्थापनातील त्रुटी दूर करू शकते. या संशोधनांना पुढे नेण्यात, त्यांच्या सक्षम मापनात आणि जागतिक समर्पकता प्राप्त करण्याविषयी विश्वास निर्माण करण्यात भारतीय साहसी उद्याम भांडवलाची भूमिका महत्त्वाची आहे.

(३) भारताची लोकसंख्या: अंतिम उत्प्रेरक

भारताचा लोकसंख्याशास्त्रीय लाभांश ही आपली सर्वात महत्त्वाची जमेची बाजू आहे. तरुण, तंत्रज्ञानात तज्ज्ञ असलेले नागरिक आणि वाढत्या मध्यमवर्गासह, देश नावीन्यपूर्ण उत्पादने आणि सेवांसाठी आपला देश एक अतुलनीय ग्राहकवर्ग निर्माण करतो. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राष्ट्र म्हणून, भारत नव्या उत्पादन आणि सेवांसाठी एक अफाट बाजारपेठ ठरतो.

‘स्टार्टअप इंडिया’ आणि ‘अटल इनोव्हेशन मिशन’सारख्या उपक्रमांच्या पाठबळामुळे भारतातील तरुणांची उद्याोजकता संशोधन आणि नावीन्यासाठी एक सुपीक जमीन तयार करत आहे. परवडणाऱ्या आरोग्यसेवांपासून शाश्वत कृषी तंत्रज्ञानापर्यंत भारतीय संदर्भातील अनन्य आव्हानांना सामोरे जाण्याचे नवनवे मार्ग नवउद्याम निर्माण करत आहेत. या शोधांत आणि नावीन्यपूर्ण पर्यायांत जागतिक स्तरावर स्वत:चे स्थान निर्माण करण्याची क्षमता असल्यामुळे भारत जागतिक दर्जाच्या समस्यासमाधानाचा आरंभ बिंदू ठरतो. या लोकसंख्याशास्त्रीय फायद्याचा लाभ घेण्यासाठी, भारताने साहस उद्याम भांडवलाला या गतिमान लोकसंख्येच्या गरजा आणि आकांक्षांशी सुसंगत असलेल्या धोरणांचा अवलंब करणे गरजेचे आहे. निर्माण होणारी उत्पादने आणि सेवांचे पर्याय सर्वांना उपलब्ध असतील, परवडणारे असतील आणि मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्याजोगे असतील, याची काळजी घेणे गरजेचे आहे.

भारतातील विविधतेमुळे संधीमध्ये भरच पडली आहे. जागतिक बाजारपेठांशी मजबूत संबंधांसह हे वैविध्य भारतीय नवउद्यामांना आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्यासाठीचा एक दुवा म्हणून काम करते. नवउद्यामांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत संधी मिळतील, भांडवल उपलब्ध होईल याची खात्री करून, सीमेपलीकडे व्यवसाय विस्तार सुलभ करण्यासाठी भारतीय साहसी उद्याम भांडवलदार या विविधतेचा उपयोग करून घेऊ शकतात.

प्रगतीचा मार्ग तयार करणे

नवनवे शोध, नवकल्पना आणि आर्थिक वाढीच्या एका नव्या युगात भारताची दमदार वाटचाल सुरू असताना साहसी उद्याम भांडवल व्यवस्थादेखील नव्या स्थित्यंतरासाठी सज्ज आहे. फक्त या नव्या संधी ओळखण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे. मजबूत व्यवस्था तयार करण्यासाठी त्यात सहभागी असणाऱ्या सर्वांचे सहकार्य महत्त्वपूर्ण आहे. संशोधन आणि कल्पकतेला चालना देणारे, नियमांचा जाच कमी करणारे आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारे धोरणात्मक आराखडे हा वेग आणखी वाढवू शकतात. याव्यतिरिक्त, भारतीय साहसी उद्याम भांडवलदारांनी स्थानिक बारकावे समजून घेत जागतिक दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. हा समतोल साधल्यास भारताच्या नवउद्यामांना जागतिक नावीन्यपूर्ण रचनेत नवीन उंची गाठत शाश्वतता साध्य करण्याची खात्री बाळगता येऊ शकते.

२०२५ हे वर्ष भारताच्या साहसी उद्याम भांडवल उद्याोगासाठी एक महत्त्वपूर्ण वळण ठरणार आहे. अचूकता, नवीन संधी उलगडणारे प्रगत तंत्रज्ञान आणि अतुलनीय वाढीची क्षमता प्रदान करणारी लोकसंख्या यासह क्षेत्र-विशिष्ट फंडामुळे परिवर्तनाच्या दशकासाठी पार्श्वभूमी तयार झाली आहे. ही भारतीय साहसी उद्याम भांडवलदारांना केवळ या प्रवासात सहभागी होण्याचीच नाही तर जागतिक गुंतवणूक समुदायासाठी मापदंड ठरून त्याचे नेतृत्व करण्याचीही संधी आहे.

(अध्यक्ष, पश्चिम क्षेत्र, सीआयआय स्टार्टअप समिती आणि उपाध्यक्ष ‘१००एक्स’)