सुनील चाफे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हिंदू नेता म्हणून जेवढी लोकप्रियता अटलबिहारी वाजपेयी- अडवाणींना नव्हती त्याच्या कैक पटीने अधिक बाळासाहेब ठाकरे यांना होती, आहे आणि राहील. कदाचित म्हणूनच बाळासाहेबांच्या पश्चात ही लोकप्रियता संपावी, त्यांच्या पुढच्या पिढयांना तिचा लाभ मिळू नये म्हणून गेल्या २५ वर्षांत षड्यंत्रे रचली गेली. अगदी भाजपच्या सहकार्याने ठाकरेंच्या पक्षात, कुटुंबात फूट पडण्यापासून ते भाजपच्या आजच्या नेत्यांच्या बळावर शिवसेनेचे अस्तित्वच हिरावून नेण्यापर्यंत यांची मजल गेली. दुर्दैव इतकेच की गेल्या २५ वर्षांत शिवसेनेतील ठाकरे यांच्या कुटुंबातील आणि आता तर पक्षातील किरकोळ लोकांपासून नेत्यांपर्यंत बहुतांश जण भाजपच्या या फोडा आणि राज्य करा आणि नेस्तनाबूत करा, बदनाम करा आणि संपवा या नीतीला बळी पडले.
भाजपच्या पूर्वीच्या नेत्यांबद्दल देशातील जनतेला आदर होता. श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज, कल्याण सिंग, जसवंत सिंग… आपल्या महाराष्ट्रातील वसंतराव भागवत, शरदभाऊ कुलकर्णी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, महादेव शिवणकर, नितीन गडकरी, एकनाथ खडसे असे लोकांना ज्यांच्याबद्दल आदर आहे असे कितीतरी नेते भाजपने दिले. त्यातले काही आजही कार्यरत आहेत तर काही जणांनी इहलोकाची यात्रा संपवली आहे. काही अडगळीत पडलेत तर काहींनी भाजपला सोडलंय. जी हुजुरी करणारे कार्यकर्ते सगळ्याच पक्षात असतात. पण त्यांना योग्य चौकटीमध्ये ठेवण्याचे काम त्या त्या काळातील नेतृत्वाचे असते. मात्र त्यांनाच पुढे करून आपल्या राजकारणाची पोळी भाजली तर भविष्यात पस्तावण्याची पाळी येते. भाजपची आजची नेतृत्वाची फळी पाहिल्यावर याची जाणीव होते.
बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपमध्ये सर्वाधिक प्रेम कोणावर केले असेल तर ते प्रमोद महाजन आणि त्यांच्या पाठोपाठ नितीन गडकरी यांच्यावर. मात्र बाळासाहेबांच्या पश्चात त्यांचे कुटुंब फोडणाऱ्यांना, शिवसेनेशी एकनिष्ठ न राहणाऱ्यांना भाजपने बळ दिले हेही तितकेच खरे. वाईट याचेच वाटते की बाळासाहेबांच्या कुटुंबातील सदस्यांना याची जाणीव कशी काय झाली नाही… बाळासाहेबांनी मराठी माणसांना सरकारी बँकांमध्ये, इन्शुरन्स कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळवून दिल्या. शासकीय कंत्राटांमध्ये आज मराठी माणूस जो छाती पुढे करून उभा आहे तो बाळासाहेबांमुळे. त्यांच्या मनात आलं असतं तर त्यांनी ठाकरे कुटुंबीयांच्या पुढच्या ५० पिढ्यांना पुरेल एवढी संपत्ती निर्माण करण्यात आपली उर्जा लावली असती. पण त्यांनी तो मार्ग स्वीकारला नाही.
आणखी वाचा – …अन् दिलीप कुमार व बाळासाहेब ठाकरे यांच्या मैत्रीमध्ये पडली होती फूट, नेमकं काय घडलं होतं?
शिवसैनिक हीच बाळासाहेबांची संपत्ती
बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःच्या बँका, दूध महासंघ, साखर कारखाने काढले नाहीत की स्वतःच्या शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण संस्था काढल्या नाहीत. त्यांची स्वतःची किंवा त्यांचे बंधू श्रीकांत ठाकरे यांची अशी कोणतीही भरभरून प्रॉपर्टीही नव्हती. त्यांची प्रॉपर्टी होती ती त्यांच्यासोबत असलेले शिवसैनिक. त्यांच्यासोबत विश्वासाने चालणारा प्रचंड जनसमुदाय. ती ओरबाडत कमी करण्याचा, त्यांच्याच कुटुंबात दुफळी माजवून त्यांची शक्ती कमी करण्याचा डाव भाजपने खेळला आणि त्यास त्या त्या वेळच्या राजकारण्यांनी खतपाणी घातले. मराठी माणसाची ही खासियतच आहे की तो कधीच एकसंघ राहत नाही. तो सतत मराठी माणसाचाच दुस्वास करतो. कदाचित हीच कमजोरी इतर भाषिक ओळखतात आणि मराठी माणसाला मराठी माणसाच्या विरोधात उभे करतात आणि संपवतात.
म्हणून बाहेरील शक्तींचे फावते…
हे काही आजचे नाही… मराठी माणसांचा इतिहास चाळला जाईल तेव्हा तेव्हा हीच उदाहरणे दिसतील. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराजांपर्यंत आणि पेशव्यांपासून ते पानिपतपर्यंत हीच उदाहरणे पाहायला आणि ऐकायला मिळतात. पानिपत का झाले यापेक्षा पानिपतात मराठे का हरले याची कारणे पाहिली तर आपापसातील द्वेष हेच कारण समोर येते. अगदी बाळासाहेबांपर्यंत हीच उदाहरणे आहेत. बाळासाहेबांच्या कुटुंबातील सदस्य त्यांच्या हयातीतच स्वतंत्र सवतासुभा मांडतात. एवढा काय तो द्वेष आपल्याच काकाचा, की त्याच्या पावलावर पाऊल ठेवता ठेवता बाजूला व्हायचं आणि आपल्याच मराठी माणसांचं नुकसान करायचं. त्यांच्या मतांमध्ये फूट पाडायची आणि इतर पक्षांचा फायदा करून सतत त्यांना सत्ता आंदण द्यायची. नसती मिळाली गादी तर काय झाले असते? मरेपर्यंत सेवा केली असती काकाची तर बिघडले कुठे असते? पण तसे होत नाही म्हणून भाजपसारख्या बाहेरील शक्तींचे फावते.
शिवसेना स्वतःच्या जोरावर आणि भाजपच्या सहकार्याने महाराष्ट्रात सत्तेत आली. ती पूर्णपणे रसातळाला गेली ती भाजपमुळे. बाळासाहेब म्हणायचे कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू केव्हाही चांगला. बाळासाहेबांच्या दिलदार शत्रूनेच म्हणजे शरद पवार यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी का असेना पण उद्धव ठाकरे यांच्या मनातील मुख्यमंत्री होण्याचा बाळासाहेब ठाकरे यांना दिलेला शब्द पूर्ण करून दाखवला. भाजपला निरुत्तर करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काही जणांना शिवसेनेत अति महत्त्व दिले खरे पण तो धोरणाचा भाग होता. त्याचा परिणाम सगळ्यांनाच भोगावा लागला. इथपर्यंत ठीक होते. ठाण्याच्या बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना मात्र भाजपचा डावच कळला नाही त्यांना केवळ वापरलं जातंय हे आता कळत असलं तरी वळत नाही.
आणखी वाचा – तुरुंगातून बाहेर येताच थेट ‘मातोश्री’वर पोहोचला होता संजय दत्त, बाळासाहेबांना मिठी मारली अन्…
बाळासाहेबांनी भाजपवर विश्वास ठेवला होता. मात्र त्याच भाजपने त्यांच्या पश्चात उद्धव ठाकरे यांना नामोहरम केले. आता तर ते थेट त्यांच्या कमाईवर उठले आहेत. म्हणजे उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांनी एवढी संपत्ती आणलीच कुठून यावर थेट याचिका करायला भाग पाडली. बरे, याचिका करणारे कोण आहेत, त्यांची पार्श्वभूमी काय याचाही विचार त्यांनी केला नाही. याचिकाकर्त्यांची माहिती काढली तर लक्षात येते की उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांची संपत्ती शोधणाऱ्या गौरी भिडे आणि त्यांचे कुटुंबच अनेक प्रकरणांमध्ये फसवणूक केलेले आरोपी आहेत. तशा त्यांच्यावर केसेस आहेत. हा पाहा तपशील.
१) गिरगाव अतिरिक्त न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात अभय वामन भिडे विरोधात निगोशियेबल इन्ट्रुमेंट कायदा (धनादेश न वटणे) या संबंधित खटला. सुनावणीची पहिली तारीख १८/१०/२००८
२) गिरगाव अतिरिक्त न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात अभय वामन भिडे विरोधात निगोशियेबल इन्ट्रुमेंट कायदा (धनादेश न वटणे) या संबंधित खटला. सुनावणीची पहिली तारीख ०५/०८/२०१०
३) अंधेरी न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात गौरी भिडे विरोधात निगोशियेबल इन्ट्रुमेंट कायदा ( धनादेश न वटणे) या संबंधित खटला. सुनावणीची पहिली तारीख ३०/०१/ २०१३
४) भोईवाडा न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात अभय भिडे विरोधात निगोशियेबल इन्ट्रुमेंट कायदा ( धनादेश न वटणे) या संबंधित खटला. सुनावणीची पहिली तारीख उपलब्ध नाही परंतु २०१५ सालची असल्याचे दिसते. अंधेरी आणि गिरगाव न्यायालयात भिडे प्रतिवादी असल्याचा उल्लेख आहे.
अभय भिडे विरोधात भा.दं.वि. ४०६ विश्वासाचा भंग करणे या दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा चारकोप पोलीस स्टेशन येथे १७/१२/२०२२ रोजी दाखल करण्यात आला. भा.दं.वि. समान उद्देश हे कलम लावण्यात आले आहे कारण एकापेक्षा अधिक आरोपी आहेत. अभय भिडे, अशोक अडवाणी व हिरू अडवाणी हे आरोपी होते. सदर प्रकरणात आरोपपत्र दाखल झाल्याचे दिसते. गुन्ह्याचे स्वरूप हे नमूद तिन्ही आरोपींनी त्यांच्या कंपनीत कार्यरत व्यक्तींच्या पगारातून भविष्य निर्वाह निधीची रक्कम कापली, मात्र ती त्यांच्या भविष्य निर्वाह निधीत भरणा केली नाही. या कारणास्तव नमूद तिन्ही आरोपींच्या विरोधात मार्च ते आँगस्ट २००१ या काळात एकूण रक्कम ९ लाख २२ हजार ७४० रुपयांचा गैरवापर केला. कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करून कायद्याने भरणा केलेला नाही असा गुन्हा भविष्य निर्वाह निधी अधिकाऱ्यांनी दाखल केला आहे. या प्रकरणात १२ जानेवारी २००३ रोजी न्यायालयाने ७५०० रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आरोपींना जामीन दिल्याचे दिसते. सदर गुन्हा हा उषा प्रिंटिंग प्रेस या आस्थापनेतील आहे. एकूण ३५ पाने असलेल्या आरोपपत्रात साक्षीदारांचे जवाब, कायदेशीर, अटकेची प्रक्रिया व गुन्ह्याची माहिती दिलेली आहे.
आणखी वाचा – हाफिज सईदला बाळासाहेब ठाकरेंना धडा शिकवायचा होता- हेडली
बोधी नोटेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत गौरी भिडे या एकूण तीन संचालकांपैकी एक संचालिका आहेत. इतर संचालक हे नामे विक्रांत पवार, सुमन गवाणकर आहेत. त्यांच्या वर नमूद कंपनीने कॉसमॉस बँकेकडून आरे मिल्क कॉलनी गोरेगाव येथील रुबी इस्ले येथील पाचव्या मजल्यावर स्थित २३८.५३ चौ. फुटांच्या फ्लॅटसाठी १४ लाख ४६ हजार २८/०३/२०१९ रोजी कर्ज घेतले. कर्जासाठी वर नमूद फ्लॅट तारण/ गहाण ठेवला. सदरहू कर्ज हे नियमित कर्जाची परतफेड न केल्याने ३१/०३/२०२१ रोजी एनपीए जाहीर करण्यात आले. त्या वेळी कर्जाची थकीत रक्कम ही १५ लाखांच्या वर गेलेली. संचालकांना नोटीस पाठवण्यात आली. परंतु त्याला योग्य प्रतिसाद मिळाला नाही. याच कारणास्तव बँकेने गहाण मालमत्ता ताब्यात मिळवण्यासाठी अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी एस. पलांडे यांच्या न्यायालयात अर्ज केला. न्यायालयाने १५/७/२०२२ रोजी सदर गहाण मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी आदेश देत न्यायालयीन कमिशनरची नियुक्ती केली. सदर प्रकरणात वर नमूद संचालकांवर न्यायालयाने कर्जाचे हप्ते न भरल्याचा उल्लेख केला आहे. म्हणूनच कलम १४ सरफेसी कायद्यांतर्गत गहाण मालमत्ता ताब्यात घेण्याच्या आणि ती ताब्यात घेताना अडवणूक झाल्यास पोलीस बळाचा वापर करण्याची मुभा दिलेली आहे.
(लेखक राजकीय अभ्यासक आहेत.)