निहाल कोशी, संदीप द्विवेदी

कुस्तीपटू असलेली विनेश फोगट आता राजकारणी बनू पहात आहे. जुलाना मतदारसंघात सध्या तिचा पहाटेपासून रात्रीपर्यंत प्रचार सुरू आहे. दिवसभरात ती जवळपास दहा प्रचारसभा घेते आहे. एकीकडे आपल्याला मिळत असलेल्या पाठिंब्याने ती भारावून गेलेली असली तरी दुसरीकडे थोडक्यात हुकलेल्या ऑलिम्पिक पदकाची जखम अजून ताजी आहे. तिच्याशी झालेल्या या गप्पा…

अरविंद केजरीवाल आणि 'आप'ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं? (फोटो सौजन्य पीटीआय)
अरविंद केजरीवाल आणि ‘आप’ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Pankaja Munde
Pankaja Munde : बीड जिल्ह्यातील तणावाच्या परिस्थितीवर पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, “मी गृहमंत्र्यांशी…”
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
akola ZP
वंचितची प्रतिष्ठा पणाला लागणार; अकोला जिल्हा परिषद निवडणुकीचे वेध, राजकीय पतंगबाजी रंगणार
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : सत्ताधाऱ्यांच्या लांगूलचालनाचे उदाहरण
भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत?
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला

ऑलिम्पिकमधलं पदक हुकल्यानंतरचा तुमचा राजकीय अनुभव कसा आहे?

मी खरं तर राजकारणात येणार नव्हते. पण ही मोठी लढाई (ब्रिजभूषण विरोधातील) लढताना मला जाणवलं की परिस्थिती बदलायची असेल तर राजकारणात गेलं पाहिजे. काही लोकांनी मला असंही सांगितलं की राजकारणात गेले तर मी लोकांची माझ्याबद्दल असलेली सद्भावना गमावून बसेन. पण तसं काही झालं नाही. मला भेटणाऱ्या लोकांच्या मनात मी त्यांची घरातली मुलगी किंवा सून आहे, अशाच भावना आहेत. मला भेटणाऱ्या स्त्रियांकडून मला मिळणारे प्रेम आणि आदर दिवसेंदिवस वाढतो आहे. आता मला असं वाटतंय की राजकारणात शिरणं हा माझा मोठा निर्णय होता. ती देवाचीच इच्छा होती. आता नशिबात जे असेल ते होईल.

तुमचं ऑलिम्पिकमधलं पदक थोडक्यात हुकणं आणि ब्रिजभूषण बरोबरचा संघर्ष… यातलं लोकांना आतपर्यंत काय खटकलं असं तुम्हाला वाटतं?

मला वाटतं की ब्रिजभूषण यांच्याबरोबचा संघर्ष. लोकांना वाटतं की आम्ही जे केलं, ते त्यांच्या मुलींसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी केले. ऑलिम्पिकमधलं यश ही वैयक्तिक गोष्ट आहे. पण आपण इतरांसाठी काही करतो तेव्हा लोक त्याची प्रेमाने परतफेड करतात. पण मला विचाराल तर मला लोकांकडून इतक्या प्रेमाची आणि समर्थनाची अपेक्षाच नव्हती. आम्ही आंदोलन करत होतो तेव्हा लोक येत-जात होते. आमचं आंदोलन शेतकरी आंदोलनासारखं जनआंदोलन बनलं नाही, ही गोष्ट खरी आहे. आमची लढाई ही प्रत्येकाची लढाई नव्हती हे आम्हाला कळलं. शिवाय लोकांच्या स्वतःच्या अडचणी असतात. त्यामुळेही ते मोठ्या संख्येने सामील झाले नसावेत.

आणखी वाचा- कुलगुरू पदाची अवनती जुनीच… डॉ. रानडे हे त्यातील नवे पान!

तुम्ही रस्त्यावर आंदोलन करत होता, तेव्हा इतर कुस्तीपटू ऑलिम्पिकची तयारी करत होते. असे असूनही, तुम्ही जपानी कुस्तीपटू युई सुसाकीचा पराभव केला आणि अंतिम फेरी गाठली…

ही देवाने दिलेली ताकद आहे. मी एखादी गोष्ट मनात ठरवली तर ते साध्य करण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही. मी ही अशीच आहे. मी आंदोलनात होते, दुखापती झाल्या पण मी कुस्ती सोडावी असे मला क्षणभरही वाटलं नाही. मला ऑलिम्पिकला जायचंच होतं.

तुम्ही ऑलिम्पिकमध्ये एकाही स्पर्धेत हरला नाहीत. तुम्ही त्याकडे कसं पाहता?

खरंतर यावेळी खूप कठीण परिस्थिती होती. २०२१ च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये मी हरले होते पण तीन-चार महिन्यांनंतर मी त्या धक्क्यातून बाहेर आले होते. रिओ ऑलिम्पिकमध्ये सामन्यादरम्यान माझ्या गुडघ्याला दुखापत झाली होती, त्यामुळे तिथं मी माझी पूर्ण क्षमता वापरली आहे की नाही, हेच मला माहीत नव्हते. इथेही मी सुवर्णपदक जिंकू शकले असते की नाही, हे मला माहीत नाही.

वजनकाट्यावर तुमचं वजन मर्यादेपेक्षा १०० ग्रॅम जास्त असल्याचं दिसलं तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय होती?

खरंतर क्षणभर मी सुन्न झालं. नंतर मी त्यांच्याकडे विनवण्या करायला सुरूवात केली. मी त्यांना सारखं सांगत होते – ‘पुन्हा तपासा… पुन्हा तपासा’. माझी स्पर्धक असलेली हंगेरियन मुलगी माझी मैत्रीणच आहे. माझ्यावर ओढवलेली परिस्थिती बघून तिच्याही डोळ्यात पाणी आलं. तीही मला म्हणायला लागली की याबाबत काहीतरी करता आलं असतं तर मी नक्की केलं असतं. त्यानंतर मला बधीर झाल्यासारखं झालं.

आंतरराष्ट्रीय कुस्ती संघटना, यूडब्ल्यूडब्ल्यूने कुस्तीगिरांना दुसऱ्या दिवसासाठी किमान एक किलो वजनवाढीची सवलत द्यावी असं तुम्हाला वाटतं का?

नक्कीच. अंतिम फेरीत पोहोचलेल्यांचं वजन पुन्हा तपासण्याची गरज नाही, असं मला वाटतं. किंवा त्यांना दुसऱ्या दिवशी वजन कमी करण्यासाठी थोडा वेळ द्यायला पाहिजे. त्यासाठी त्यांचं वजन थोड्या उशिराने केलं पाहिजे. विशेषत: महिलांसाठी ही सवलत आवश्यक आहे कारण त्यांची शरीररचना पुरुषांपेक्षा वेगळी असते. तंदुरुस्तीच्या सर्वोत्तम अवस्थेत असतात तेव्हा महिला एका दिवसात तीन किलोपेक्षा जास्त वजन कमी करू शकत नाहीत. कारण त्यांच्या शरीरातील चरबीची टक्केवारी आधीच खूप कमी झालेली असते. पुरुष पैलवान हे करू शकतात पण स्त्रिया करू शकत नाही कारण त्यांचं शरीर पाणी राखून ठेवतं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी वजन कमी करण्याचा मुद्दा सगळ्याच महिला खेळाडूंसाठी चिंतेचा असतो. पॅरिसमध्ये गेम्स व्हिलेजमध्ये, वेगवेगळ्या खेळातील किमान ५० खेळाडू मला येऊन भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की माझ्याबाबतीत जे झालं ते चुकीचं होतं.

आणखी वाचा-बदलापूर, पश्चिम बंगालसारख्या घटनांना पायबंद घालण्यासाठी एवढे करावेच लागेल!

जंतरमंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान तुम्ही या आंदोलनाबाबत पंतप्रधानांनी जे मौन धारण केलं होतं, त्यावर टिप्पणी केली होती…

कारण त्यांचं वागणं खूप निराशजनक होतं. ते एरवी खेळाडूंना भेटतात, त्याबद्दलचे फोटो वगैरे टाकत असतात. त्यांना खेळांबद्दल खरोखर मनापासून आस्था असेल आणि खेळाडूंवर प्रेम असेल, तर मग एवढी मोठी घटना (आंदोलन) घडल्यानंतर ते त्याबद्दल एक शब्द बोलू शकत नाहीत? सगळं माहित असतानाही काहीही न बोलणं हे काही खेळ किंवा खेळाडूंबद्दलचं प्रेम नाही. त्यांना फक्त आपली ताकद दाखवायची आहे.

तुमचं ऑलिम्पिक पदक गमावल्यानंतर ‘तुम्ही विजेत्यांच्या विजेत्या आहात’ असं पंतप्रधानांनी ट्विट केलं होतं…

हो, पण ते कधी? मी अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर त्या पूर्ण दिवसभरात त्यांनी एकही ट्विट केलं नाही. अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या इतर सगळ्या खेळाडूंना ते लगेचच फोन करतात आणि त्यांच्याशी बोलतात. वजनासंदर्भातला प्रसंग दुसऱ्या दिवशी घडला. मी अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर मला पंतप्रधानांचा फोन का आला नाही? कारण उघड आहे.

या सगळ्यावर तुमच्या आईची काय प्रतिक्रिया आहे? तुम्ही राजकारणात येण्याचा निर्णय घेतला तेव्हा ती काय म्हणाली?

मी राजकारणात येत असल्याचं माझ्या आईला सांगितलं नाही. मी काय करत असते ते सगळंच माझ्या आईला आधीच माहित असतं असं नाही. ती वृत्तवाहिन्यांवर पाहते आणि मग तिला कळतं. राजकारणात आल्यानंतर मी तिच्याशी बोलले नाही. पॅरिस ऑलिम्पिकनंतर घरी पोहोचल्यावर मी तिच्याशी शेवटचे बोलले होते. त्यानंतर वेळच मिळाला नाही. माझी आई म्हणाली की पॅरिसहून मी आले तेव्हा माझ्या स्वागतासाठी ती विमानतळावर आली होती तेव्हा तिने जणू काही त्या दिवशी माझं लग्न असावं असे कपडे घातले होते. त्या दिवशी तिला कुणीतरी विचारलं की मला पाहून कसं वाटलं. त्यावर ती म्हणाली की लोक तिच्या मुलीवर एवढं प्रेम करतात ही आनंदाची तिच्यासाठी गोष्ट आहे. पण आतून तिला एक प्रकारची पोकळी जाणवत होती.

तुमचं पदक हुकलं तेव्हा तिला कसं वाटलं?

तिला आणि अर्थातच माझ्या कुटुंबाला दु:खच झालं होतं. तुम्ही इतकी वर्षे ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न पाहता आणि मग असं होतं… माझ्या आईने माझ्यासाठी कितीतरी वेळा उपवास केला आहे आणि मग जेव्हा मी पदक जिंकू शकत नाही तेव्हा वाईटच वाटणार ना. मी १०० ग्रॅम वजन कमी करू शकले नाही त्या दिवसाबद्दल तर आम्ही बोललोच नाही. माझ्या आईने गेली अनेक वर्षे खूप संघर्ष केला आहे आणि मानसिक पातळीवर ती खूप खंबीर आहे. तो गुण माझ्यातही आहे.

आणखी वाचा-आता मराठवाड्यासह महाराष्ट्रात शेतीसाठी ‘जैविक संग्राम’ हवा!

तुमच्या भावाच्या पाठिंब्याबद्दल काय सांगाल?

माझा भाऊ लहान लहान गोष्टी खूप मनावर घेतो. त्यांचा त्याला ताण येतो. मला एखादी दुखापत झाली तर तो दोन-तीन दिवस खाणार नाही. माझी आई मात्र तशी नाही.

तुम्ही सुवर्णपदकाच्या खूप जवळ होतात आणि त्यानंतर लगेचच तुम्ही तुमची निवृत्ती जाहीर केलीत. एखादी व्यक्ती तिच्या आयुष्यातील सर्वोत्तम फॉर्ममध्ये का निवृत्त होते?

पण कोणता खेळाडू ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचतो आणि रिकाम्या हाताने परततो? आणि त्यानंतर त्यासंदर्भातलं राजकारण… ज्या पद्धतीने माझ्याकडून पदक हिसकावून घेतलं गेलं… भारत सरकार, आंतरराष्ट्रीय संस्था, आयओसी… सगळीकडे राजकारण आहे. तुम्ही नेमकी कशाची आशा बाळगणार, कोणासाठी बाळगणार? हा सगळा प्रवास काही सोपा नाही. बाहेरून, सगळं वेगळं दिसत असतं. पण सरकारशी मी केलेल्या लढाया मला माहीत आहेत. तुमच्या ड्रिंकमध्ये कोणीतरी काहीतरी मिसळण्याची भीती असते. भावनिक पातळीवर माझी उर्जा संपली आहे. तीन ऑलिम्पिक मी खेळले आणि एकातही मला पदक मिळवता आलेलं नाही. मला असं वाटतं की मी आतून तुटले आहे आणि हे सगळं पुढं नेण्याची क्षमता माझ्यात नाही. माझ्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन मी मला शक्य होतं ते सगळं दिलं आहे. मला शक्य होती ती इतर सगळी पदकं मी जिंकली आहेत. आता मला असं वाटतं की जाऊ दे, ऑलिम्पिक पदक माझ्या नशिबातच नाही.

तू तुझ्या निर्णयाचा फेरविचार करणार आहेस का? तुझ्या गावी पोहोचल्यावर तू म्हणाली होतीस की तू कुस्तीत परत येशील…

मला वाटलंच तर मी येईनही परत. शरीरासाठी ही फार मोठी गोष्ट नाही, पण मनाला आणि हृदयाला कोण पटवून देणार? माझे मन आणि हृदय ही परिस्थिती स्वीकारू शकत नसेल तर तसे करण्यात काही अर्थ नाही. मला हवं असेल तर मी आणखी दोन ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊ शकते. मला आतून जाणवलं तर मी कोणत्याही अडथळ्यावर विजय मिळवू शकते. आज तसं होत नाहीये, म्हणून त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. २०२८ च्या ऑलिम्पिकमध्ये मी भाग घेईन याची मला २०० टक्के खात्री होती. आणि मी शारीरिकदृष्ट्या ठीक असेन तर २०३२ चं ऑलिम्पिकही मला शक्य होतं. पण आता माझं आयुष्य ३६० अंश कोनातून बदललं आहे.

राजकारण हेही तुमच्यासाठी मोठंच वळण आहे. पूर्णवेळाचं काम आहे ते…

होय, आहे. राजकारणात विश्रांती नसते. पण जवळपास दोन वर्षांपूर्वी (आंदोलन) आम्ही ज्या परिस्थितीतून गेलो, ती पाहता आम्हाला राजकारणात येणं भाग होतं. आम्ही दोन वर्षे त्यात पाय रोवून उभे आहोत. आता एकतर आम्ही बुडू शकतो किंवा तरू शकतो. आम्ही पोहलो तर अनेकांना वाचवू शकूत. हे करणं ही आमची जबाबदारी आहे आणि सत्तेत असल्याशिवाय काहीही करता येत नाही. ऑलिम्पिकमध्ये एखादा खेळाडू शंभर पदकं जिंकेल, पण राजकीय ताकदीसमोर त्यांना काहीच किंमत नाही. शून्यवत आहे ते. एका रात्री नोटाबंदी जाहीर झाली आणि संपूर्ण देश ठप्प झाला. राजकीय ताकदच हे करू शकते. आमच्याकडे माघार घेण्याचा पर्याय नाही.

आणखी वाचा-शिक्षणावर जनरेटिव्ह एआयचा प्रभाव

तुम्ही राजकीय नेता झालात, तर तुमच्यासाठी मुख्य अजेंडा काय आहे… महिला सुरक्षा आणि क्रीडा पायाभूत सुविधा?

सुविधांचा मुद्दा सध्या बाजूला ठेवूया. क्रीडा महासंघात समस्या आहेत. मी, बजरंग (पुनिया) किंवा साक्षी (मलिक) आमच्याकडे राजकीय ताकद असेल आणि काही चुकीचं घडत असेल तर युवा खेळाडू नक्कीच आमच्याशी संपर्क करतील. आम्ही अशा स्थितीत असू की आम्ही काहीतरी मदत करूत. ही गोष्ट महत्त्वाची आहे.

लोक मला बिगर सरकारी संघटना सुरू करायला सांगत होते. मला कोट्यवधींच्या ऑफर्स (प्रायोजकत्व) येत होत्या. अशा पैशाने कुटुंबाची काळजी घेता येते. पण इतरांना आपल्याला हव्या त्या पातळीवर जाऊन मदत करता येत नाही. मला असे पैसे घेऊन घरी बसायचे नाही. कारण मग बाकीच्या मुलींचं काय? आमच्या आंदोलनात सहभागी झालेल्या पैलवानांना महासंघ अडथळे आणत आहे. त्यांना स्पर्धेत भाग घेऊ देत नाही. मी हे कसं सोडवू? पैशाने ते होऊ शकत नाही. त्यासाठी राजकीय ताकदच हवी.

त्यासाठी राजकीय व्यवस्थेत प्रवेश करावा लागेल. ब्रिजभूषण राजकीयदृष्ट्या ताकदवान असल्याने टिकून आहेत. त्यांच्याशी लढायचं तर आपणही सामर्थ्यवान असले पाहिजे. आमच्याकडे सत्ता नसेल तर आमच्या दोन वर्षांच्या संघर्षावर पाणी फेरलं जाईल.

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्याला जितके पैसे मिळतात तितके पैसे तुम्हाला द्यायला हरियाणा सरकार तयार आहे, असं वृत्त आहे …

मी सुवर्णपदक जिंकेन, अशी आशा संपूर्ण देशाला वाटत होती. सुवर्णपदक विजेत्याएवढे पैसे देऊ असं सरकारनं म्हटलं असतं, तर ते मनापासून म्हटलं आहे, असं वाटलं असतं. पण हे असं म्हणण्यात राजकारण आहे. ते असं की आम्ही तुम्हाला रौप्यपदक विजेते म्हणून पुरस्कार देऊ आणि तुमचा सन्मान करू. वास्तविक मी सुवर्ण पदक विजेती आहे, हीच भावना देशभर होती. त्यामुळे मी कुणालाही भावनांचे राजकारण करू देणार नाही. एक कार्यक्रम (सत्कार) होईल असं आधी मी ऐकलं होतं. मी चेक परत केला असता. मग ते खात्यात पैसे येतील म्हणाले. पण खात्यात काहीच आलं नाही. निवडणुका तोंडावर आल्याने ही केवळ चर्चा होती. मला सहभागासाठी फक्त १५ लाख रुपये मिळाले.

डावे पक्ष, आप, काँग्रेस असे अनेक राजकीय पक्ष तुमच्या आंदोलनाला आले होते. मग राजकीय प्रवेशासाठी काँग्रेसचीच निवड का केलीत?

दीपेंद्र भाईसाब (हुड्डा), अरविंद केजरीवालजी, ममता (बॅनर्जी) मॅडम… माझा कोणत्याही राजकारण्यांशी संबंध नव्हता. हरियाणात दीपेंद्र हुड्डा यांनी नेहमीच खेळांना प्रोत्साहन दिले आहे. टोकियो ऑलिम्पिकनंतर मला पहिला कॉल त्यांचा आला. देशात आणि हरियाणामध्ये भाजप आणि काँग्रेस असे दोनच मोठे पक्ष आहेत. राजकारणात शिरायचंच असेल, तर ज्यांनी साथ दिली त्यांच्याच बरोबर गेलं पाहिजे.

मी काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांना भेटलो आहे. त्यांची एखाद्या व्यक्तीशी बोलण्याची, संवाद साधण्याची पद्धत खूप वेगळी आहे. त्यांच्याशी बोलताना मला मी माझ्या आईवडिलांशी बोलते आहे, असंच मला वाटतं. आम्ही धरणं धरलं होतं, तेव्हा काँग्रेसने आमचं म्हणणं नीट समजून घेतलं. दरम्यान, प्रियंका गांधींनी आमच्यासाठी जेवण पाठवलं. आम्ही ठीक आहोत की नाही हे पाहण्यासाठी त्यांचे पती आंदोलनादरम्यान तीन ते चार वेळा येऊन गेले. कोणताही गाजावाज न करता अत्यंत शांतपणे त्यांनी हे केलं.

आणखी वाचा-मणिपूर: चंद्राची अंधारलेली बाजू?

नुकतेच तुम्ही राहुल गांधींना भेटायला गेलात तेव्हा त्यांच्याशी तुमचा संवाद कसा होता?

तो अतिशय चांगला माणूस आहे. ते अत्यंत सरळ आहेत, मनात असतं ते थेट बोलतात.

तुम्हीही तशाच आहात?

मी पण थेट बोलणारी आहे. त्यामुळे खरंतर राजकारण हे माझ्यासाठी अवघड ठरू शकतं. त्यामुळे तिथं टिकण्यासाठी मला खूप मेहनत करावी लागेल. हा मोठा पल्ला आहे.

तुमच्या त्या आंदोलनाच्या वेळी आणि आताही तुम्हाला पाठिंबा द्यायला इतर क्रीडाप्रकारातले खेळाडू पुढे येताना दिसत नाहीत. असं का? यात त्यांच्या काही मर्यादा आहेत का?

होय. लोभी असणं किंवा घाबरणं हा जीवन जगण्याचा मार्ग आहे, असं मला वाटत नाही. स्वार्थी असणं चांगलं नाही. खेळाबाबतची महान गोष्ट ही की खेळ तुम्हाला पराभव स्वीकारायला आणि जिंकल्यावर नम्र व्हायला शिकवतो. पण खेळाने शिकवलेली ही गोष्ट तुम्ही दैनंदिन जीवनात वापरत नाही, असा त्याचा अर्थ आहे.

तुम्ही १० ते २० वर्षे खेळ खेळाल, पण त्यानंतर काय? खेळाडू म्हणून कारकीर्द दिवस संपल्यानंतर लोक तुमचं कौतुक का आणि कसं करतील? पुढच्या सगळ्या आयुष्यभर, मी पदक जिंकले म्हणून मला मान द्या, असं तुम्ही म्हणू शकत नाही. त्यानंतर तुम्ही लोकांना काहीतरी परत द्यायला हवं किंवा इतरांसाठी काहीतरी करायला हवं. अन्यथा तुमचं कौतुक फक्त तुमच्या कुटुंबातच राहील. तुम्हाला लोकांकडून प्रेम आणि आदर हवा असेल तर तुम्हाला त्यांच्यासाठी काहीतरी करावं लागेल. इतर खेळाडू काहीच बोलत नसल्याचा फायदा सत्तेत असलेले लोक घेत आहेत. प्रत्येकाकडे हिम्मत नसते, हे समजण्यासारखं आहे. लहान खेळाडूंकडे धैर्य नसतं हेही समजण्यासारखं आहे. ऑलिम्पियन किंवा ऑलिम्पिक पदक विजेते म्हणून कारकीर्द घडवलेल्या खेळाडूकडे हा आत्मविश्वास आणि ताकद असायला हवी.

Story img Loader