चॅट जीपीटीने लाँच झाल्यापासून पहिल्या पाच दिवसांत एक कोटी युझर्स मिळविले होते आणि तेव्हा तो एक विक्रम मानला गेला होता, पण ‘मेटा’च्या ‘थ्रेड्स’ने हा विक्रम मोडीत काढला आहे. थ्रेड्सने पहिल्या १८ तासांत तब्बल तीन कोटी युझर्स मिळवले. या तुफान प्रतिसादाचं गमक काय आहे?

आयतं वाढलेलं ताट

थ्रेड्सला मिळालेल्या प्रतिसादाचं सर्वांत मुख्य कारण आहे झटपट डाउनलोडिंग आणि साइन इन. एखादं ॲप डाउनलोड करायचं म्हणजे प्लेस्टोअर किंवा ॲपस्टोअरवर जा, साधारण सारखीच नावं आणि लोगोच्या गर्दीत हवं ते आणि खात्रीलायक ॲप शोधा. डाउनलोड करा. मग त्यावर साइन इन करा. मग नेमकं आपल्याला हवं ते युजरनेम उपलब्ध नसणं, पासवर्ड पुरेसा सुरक्षित नसणं अशा नाना भानगडींचे अडथळे पार करा. एवढ्या सोपस्कारांमध्येच उत्साह संपून जातो. पण ‘मेटा’ने ही समस्या अतिशय चतुराईने सोडवली. त्यांच्याच इन्स्टाग्रामकडे असलेल्या अब्जावधी युजर्सच्या डेटाचा कल्पकतेने वापर करत त्यांना इन्स्टाग्रामवरूनच अवघ्या १० सेकंदांत थ्रेड्सवर नेऊन पोहोचवलं. नव्या युझरनेमची शोधाशोध नाही, पासवर्ड कोणता ठेवू, तो लक्षात राहील का, असली डोकेदुखी नाही. शिवाय इन्स्टावरची मित्रयादी दिमतीला सज्ज! त्यामुळे त्यांनाही हाका मारून (रिक्वेस्ट पाठवून) बोलवत बसण्याची, ते गोळा होण्याची वाट पाहण्याची गरज नाही. सगळं अगदी ताटात वाढून मिळाल्यामुळे थ्रेड्सवर नेटिझन्सच्या अक्षरशः उड्या पडल्या.

Sudhir Mungantiwar, Sudhir Mungantiwar Nagpur,
काँग्रेसची सध्याची अवस्था ‘चाची ४२०’ प्रमाणे, मुनगंटीवार यांची टीका
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
Ritika Sajdeh salutes Aaron Finch for defending husband Rohit Sharma after Sunil Gavaskar comment
Ritika Sajdeh : सुनील गावस्करांच्या वक्तव्यावर रोहितच्या बायकोची जबरदस्त प्रतिक्रिया, सोशल मीडियावर चाहत्यांचे वेधलं लक्ष
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
aishwarya narkar slams netizen who writes bad comments
“आई आणि बायकोवरून…”, आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “महिलांचा…”
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
Viral video of disabled swiggy delivery boy doing food delivery by riding a cycle
परिश्रमाशिवाय पर्याय नाही! दिव्यांग असूनही करतोय फूड डिलिव्हरी, VIDEO पाहून वाटेल अभिमान

हेही वाचा – ‘समान नागरी कायद्या’ला विरोधाची खुसपटे..

मस्कची मदत

थ्रेड्सच्या यशात इन्स्टाग्रामच्या युजरबेसचा सिंहाचा वाटा आहेच, पण इलॉन मस्क यांनीही आपल्या या प्रतिस्पर्ध्याच्या यशाला बराच हातभार लावला. आधीच ट्विटर हाती घेतल्यापासून ब्लू टिकसाठी पैसे आकारणं, जे भरणार नाहीत त्यांचं टिक काढून घेणं, मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात अशा अजब निर्णयांची मालिकाच मस्क यांनी सुरू केली होती. त्यामुळे ट्विटरच्या निस्सिम भक्तांनीसुद्दा ट्विटरवर टीकेची झोड उठवत, तो मंच सोडण्याची भाषा सुरू केली होती. असंतोष दूर करण्याऐवजी मस्क तो दीर्घकाळ कायम राहील, वाढेल याची तरतुद सातत्याने करत राहिले. मेटाने हीच संधी साधली आणि लाँच होण्यापूर्वीच ‘ट्विटर किलर’ म्हणून चर्चेत आलेलं हे ॲप वापरून पाहू इच्छिणाऱ्यांची संख्या वाढवत राहिले.

त्यात भर पडली ‘केज मॅच’साठी शड्डू ठोकल्यामुळे. इलॉन मस्क आणि मार्क झकरबर्ग यांच्यातील स्पर्धा अख्ख्या जगाला पूर्वीपासून माहीत होतीच. ‘केज मॅच’च्या आव्हानानंतर त्याविषयीची चर्चा अधिकच रंगली आणि झकरबर्गने पहिला पंच मारला. त्याचा चांगलाच फटका मस्क यांना बसल्याचे सध्या तरी दिसत आहे.

वापरास सोपे

थ्रेड्स ही ट्विटरची कॉपी असल्याचा आरोप मस्क यांनी केला आहे. या मुद्द्यावरून मेटाविरोधात खटला भरण्याचा इशाराही ट्विटरने दिला आहे. थ्रेड्स आणि ट्विटरमध्ये खरोखरच बरेच साम्य आहे. मात्र थ्रेड्स तुलनेने अधिक युझर फ्रेंडली आहे. यात युझर्सना बरीच मोकळीक देण्यात आली आहे. सर्वांत मोठा फरक म्हणजे ट्विटरवर असणारी २८० अक्षरांची मर्यादा इथे तब्बल ५०० पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे एखाद्या विषयावर मत मांडताना आपण शब्दमर्यादा ओलांडत तर नाही ना, ही चिंता इथे तुलनेने बरीच कमी आहे. शिवाय ट्विटरवर अवघ्या दोन मिनिटं २० सेकंदांचा व्हिडीओ अपलोड करता येतो, ही मर्यादा थ्रेड्सने पाच मिनिटांपर्यंत वाढविली आहे. अर्थात ट्विटरच्या तुलनेत यात काही त्रुटीही आहेत. ट्विटरप्रमाणे यात डायरेक्ट मेसेजची सुविधा नाही आणि थ्रेड्सवर केलेली पोस्ट एडिट करता येत नाही. मात्र त्यामुळे युझर्सना फारसा फरक पडल्याचे दिसत नाही.

सुटसुटीत, आकर्षक, वेगवान

ॲप कितीही उत्तम असलं, तरीही ते वापरायला सोपं नसेल, तर त्याचा सार्वत्रिक वापर आणि मोठ्या प्रमाणात प्रसार होणं शक्य नसतं. वापरास किचकट, संथ गतीने चालणारी, शोधाशोध करण्यास भाग पाडणारी, १०० प्रश्न विचारणारी, वरचेवर हँग होणारी ॲप्स सहसा लोकप्रिय ठरत नाहीत. थ्रेड्सचा चेहरा-मोहरा अगदी साधा सोपा, तरीही आकर्षक आहे. सामान्यपणे कोणत्याही ॲपच्या डोक्यावर दिसणारी विविध टॅब्जची मालिका इथे नाही. लोगोच्या खालोखाल थेट फीड सुरू होतं. त्यामुळे युजर अजिबात विचलित न होता, फीडमध्ये रंगून जातो. सध्या तरी इथे जाहिरातींचा व्यत्यय नाही. आपल्या सर्चप्रमाणे फीडमध्ये नवनवे पर्याय मात्र सुचविले जातात. अगदी नवख्या युजरलाही कोणत्याही अडथळ्याविना सहज वापरता येईल, असं हे ॲप आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर अंगवळणी पडल्यामुळे इथे आलेला नवा वापरकर्ता अजिबात गोंधळून वगैरे जात नाही.

हेही वाचा – महामार्गावरील अपघात टाळता येतील… त्यासाठी आपल्याला थोडे बदलावे लागेल…

कुतूहल आणि अपडेट राहण्याची इच्छा

इन्स्टाग्राम हे तरुणांचं ॲप म्हणून ओळखलं जातं. जवळपास सर्वच तरुण तिथेच ‘जगतात’. डिजिटल विश्वात जे काही नवं येईल, ते ताबडतोब आणि आपल्या समवयस्कांच्या आधी अनुभवून पाहणं, त्याची पूर्ण चिरफाड करणं, आवडलं तर डोक्यावर घेणं आणि नाही तर लाथाळ्या झाडणं, त्यासाठी भरपूर वेळ खर्च करून खंडीभर मीम्स पोस्ट करणं ही त्यांच्यासाठी जवळपास जीवनावश्यक गरज झाली आहे. यात मागे पडण्यास ते तयार नसतात, त्यामुळे जागतिक स्तरावर (अर्थात युरोप वगळता) ज्याची एवढी चर्चा सुरू आहे, त्या ॲपच्या वापरात मागे राहणं त्यांना परवडणार नव्हतंच. त्यामुळे या ॲपवर पहिल्या दिवसापासूनच तरुणांच्या अक्षरश: उड्या पडल्या. आता हा उत्साह किती काळ टिकेल, थ्रेड्सही फेसबुक, इन्स्टाग्रामसारखी लांबलचक खेळी खेळेल की पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून लगेच बाद होईल, हे काळच ठरवेल.

समाजमाध्यमांकडे केवळ टाइमपास म्हणून पाहण्याचे दिवस भारतात तरी २०१४ पासूनच इतिहासजमा झाले. आता पुन्हा लोकसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत. प्रचारासाठी आता ट्वीटर, फेसबुकबरोबरच हा नवा मंचही आजमावून पाहिला जाऊ शकतो. मात्र सध्या तरी काही दिवस या धाग्यांची उकल करण्यातच तरुणाई व्यग्र दिसेल. यातून आपल्या व्यवसायवृद्धीशी संबंधित काही धागे-दोरे हाती लागतात का, हेदेखील पाहिलं जाईल…

(vijaya.jangle@expressindia.com)