जयराज साळगावकर

कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) ही काही नवी गोष्ट नाही. विकिपीडियाच्या व्याख्येनुसार, ‘कृत्रिम यंत्राने, बुद्धिमान व्यक्ती किंवा प्राण्याप्रमाणे केलेली कृती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता’, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता ही संगणक शास्त्रातील एक महत्त्वाची शाखा आहे. या शाखेमध्ये यंत्र शिक्षण, त्यांचे बुद्धिमान वर्तन, परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आदींचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ, नियोजन, संयोजन, प्रश्नांची उत्तरे शोधण्याची क्षमता, हस्ताक्षर, आवाज, ग्राफिक, चेहरा ओळखण्याची क्षमता इत्यादी.’

Kavadi for lord importance of kavadi price of a kavadi
लोक-लौकिक : ‘कवडी’मोल!
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Boy set fire to Akash Kandil
VIDEO: “ही कार्टी काय करतील त्याचा नेम नाही” खेळता खेळता चक्क कंदिल पेटवला; पुढे जे घडलं ते पाहून पोट धरुन हसाल
Shocking video of a Girl abuses and assualt auto driver over fare in up mirzapur video viral on social media
तुम्हीच सांगा चूक कोणाची? तरुणीने शिवीगाळ करत रिक्षाचालकाला केली मारहाण, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं
Little school girl driving jcb as passion video viral on social media dvr 99
लेक असावी तर अशी! शेतकरी बापाच्या मुलीची ‘ही’ कला पाहून तुम्हीही व्हाल अवाक, VIDEO एकदा पाहाच
Vloggers Surprise Blinkit Swiggy Delivery Riders With Gifts
एक ही दिल है, कितनी बार जीतोगे! ‘त्यांनी’ डिलिव्हरी बॉयला दिले हटके गिफ्ट; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Emotional video Due to high rates of ambulance father took son from his bike viral video
कोणत्याच बापावर अशी वेळ येऊ नये! पैसे नव्हते म्हणून मुलाला स्ट्रेचरवरून उचललं अन्…, पाहा काळजाला भिडणारा VIDEO
Marketing idea smart vegetable seller shows funny poster for ladies goes viral on social Media
PHOTO: “महिलांना फेसबूक, व्हॉट्सअॅपसाठी…” भाजी विक्रेत्यानं खास महिलांसाठी लावली अशी पाटी की वाचून पोट धरुन हसाल

AI चा वापर आतापर्यंत अनेक गोष्टींमध्ये होत होता. आता इंटरनेटच्या चॅटमध्ये AI चा अंतर्भाव चॅट-जीपीटीने (CHAT-gpt) केला आहे. त्यामुळे सर्चच्या मर्यादा अनंत झाल्या आहेत. माणसाच्या कल्पनेबाहेरच्या गोष्टी चॅट-जीपीटी करू शकते. बिल गेट्स आणि त्यांची मायक्रोसॉफ्ट कंपनी आणि त्यांचे बिंग (Bing) सर्च इंजिन हे गूगल या महाकाय सर्च इंजिनला आव्हान देऊ शकते आणि किंबहुना दिले आहे.

डिजिटल जगतातील सध्याचा चर्चेचा विषय म्हणजे ‘चॅट-जीपीटी’! हा चॅट-बॉट (रोबॉट) कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असून संवाद साधण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. चॅट-जीपीटीचा दिवसेंदिवस वाढता वापर या मॉडेलची उपयुक्तता सिद्ध करत आहे. ओपन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या कंपनीने हे तंत्रज्ञान विकसित केले असून चॅट-जीपीटीचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अमेरिकन उद्योगपती आणि तंत्रज्ञ सॅम अल्टमन यांनी या कंपनीची स्थापना केली. तर टेस्लावाले प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क हे या कंपनीचे सहसंस्थापक आहेत.

हा चॅट-बॉट तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतो, तुमच्या प्रश्नाला प्रतिप्रश्न करूनही उत्तर देतो, मजकुरात काही चुका असतील तर त्या सांगतो, चुकीचे संदर्भ निदर्शनास आणतो. बॉटची उत्तरे अधिकाअधिक अचूक आणि संवादात्मक व्हावीत यासाठी चॅट-जीपीटीने ‘आरएलएचएफ’ (रीइन्फोर्समेंट लर्निंग फ्रॉम ह्यूमन फीडबॅक) नावाची प्रणाली अंगीकारली आहे. इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या माहितीच्या प्रचंड खजिन्यातून तुम्हाला हव्या असणाऱ्या नेमक्या प्रश्नाचे उत्तर हा चॅट-बॉट देतो. पण ते उत्तर चुकणारच नाही, याची खात्री कंपनी देत नाही. एखादा प्रश्न विचारल्यानंतर बॉट त्यानुसार उपलब्ध माहितीतून तुम्हाला उत्तर देईल, पण तोच प्रश्न वेगळ्या प्रकारे विचारल्यास चॅट-जीपीटीला त्याचे बरोबर उत्तर देईल का, याविषयी अद्याप खात्री नाही. चॅट-जीपीटीचा हा चॅट-बॉट एकाच ब्राउझर टॅबपुरता मर्यादित आहे. तुम्हाला सतत हा चॅट-बॉट वापरावा लागणार असेल तर तुम्हाला तो टॅब कायम सुरूच ठेवावा लागेल.

जगातील सगळ्या सर्च इंजिनमधील ९० टक्के सर्च हे गूगलवर होतात. तर ९ टक्के सर्च हे बिंग (Bing) वर होतात. गूगलचा ६० टक्के महसूल हा सर्च इंजिनमधून येतो आणि जाहिरातीचे उत्पन्नसुद्धा सर्च इंजिनवरच अवलंबून आहे. त्याला जर धक्का लागला तर गूगल संकटात येऊ शकते. तीन वर्षांपूर्वीच गूगलचे संस्थापक सर्जी ब्रिन आणि लॅरी पेज यांनी गूगलमधून जणू संन्यास घेऊन सगळा कारभार सी. ई. ओ. सुंदर पिचाई यांच्यावर सोडला होता. सुंदर पिचाई यांची सीईओ पदावर नेमणूक झाली तेव्हा आपल्या पहिल्याच मुलाखतीत, त्यांना गूगलच्या भवितव्याविषयी विचारले असता ते म्हणाले होते, “आत्ता अगदी या क्षणी सिलिकॉन व्हॅलीमध्ये कुठल्या तरी गराजमध्ये गूगलचा प्रतिस्पर्धी निर्माण होतोय.” पिचाई यांची ही भविष्यवाणी खरी ठरली.

गूगलला कमी लेखण्यात अर्थ नाही. मात्र ओपन ए.आय.च्या चॅट-जीपीटीचा जन्म गूगल ट्रान्सफॉर्मरला प्रतिस्पर्धी म्हणूनच झाला आहे. गूगल सर्च या मोठ्या प्रकल्पात कोणत्याही प्रकारची चूक होणे हे गूगलला परवडणारे नाही. त्यामुळे गूगलची वाटचाल सेफ्टी फर्स्ट या दिशेने चालू होते, असे पिचाई म्हणतात. कदाचित त्यामुळे चॅट-जीपीटीने बाजी मारली असावी. फेसबुकला जी सदस्यसंख्या मिळवायला ५ वर्षे लागली ती चॅट-जीपीटीने अवघ्या २ आठवड्यांत मिळवली. यावरून चॅट-जीपीटीचा आवाका कळतो. शिवाय, अचूकतेची हमी चॅट-जीपीटी किंवा गूगल सर्च देऊ शकत नाही.

मधल्या काळात गूगलमधील अनेक इंजिनीअर्स बाजारातून पैसे उभे करून चॅट-जीपीटीसारखे मॉडेल आपल्या स्टार्टअपमध्ये बनवत आहेत. गूगल LaMDA हे मॉडेल या चॅट सर्च विषयाचे प्रमाण मानले गेले आहे. सर्च इंजिन ते ज्ञान साहाय्यक (नॉलेज असिस्टंट) ही दिशा या विषयाचे ध्येय आहे.

‘बिंग’ आणि चॅट-जीपीटीचे वेगळेपण म्हणजे, ते कीवर्डशिवाय संवाद करू शकतील. Bing DALL-E2 ची मदत नव्या ॲपसाठी घेत असून बिंग सर्च इंजिनही त्यात सहभागी करून घेण्यात येईल. यामुळे अस्तित्वात नसलेल्या इमेजसुद्धा नव्याने तयार करता येऊ शकतील. चॅट-जीपीटी, DALL-E2 आणि Bing हा त्रिकोण असे काही निर्माण करू शकतो की जे आजपर्यंत आपल्या कल्पनेतही नव्हते. सध्या असलेली सर्च इंजिन्स ही यथावकाश इतिहासात जमा होतील. अर्थात सर्चमध्ये ९० टक्के मार्केट शेअर असणारा गूगल तसा झटकन काळाच्या पडद्याआड जाणार नाही. पण विजेच्या गतीने डेटा प्रवास करणाऱ्या सर्च इंजिन तंत्रात बदलाची गतीसुद्धा तशीच असते, हे चॅट-जीपीटीने दाखवून दिले आहे.

व्यापार, तंत्रज्ञान, कला, साहित्य, संगीत, कायदा, वैद्यक, सर्जनशीलता, चित्रपट, विज्ञान आणि गणितशास्त्र अशा अनेक क्षेत्रात चॅट-जीपीटीने शिरकाव केला आहे. त्यामुळे इंटरनेटवरील सर्च, निवड, सुरक्षितता, नोकरीच्या संधी, उत्पादकता या बहुतेक सर्व क्षेत्रात गूगलची गेली २० वर्षे असणारी मक्तेदारी धोक्यात येणार आहे. गूगलवर अशी अस्तित्व टिकवण्याची परिस्थिती कधी येईल, असे वाटले नव्हते.

वाढती स्पर्धा :

चॅट-जीपीटीच्या प्रवेशामुळे आणि लोकांना झालेल्या त्याच्या परिचयामुळे सर्च क्षेत्रातील उत्सुकता आणि स्पर्धा वाढली आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये गूगलने ‘बार्ड’ नावाची प्रायोगिक सेवा सुरू केली आहे, जी त्याच्या LaMDA AI प्रोग्रॅमवर आधारित आहे. विचारलेल्या प्रश्नांना बार्ड वेबवर उपलब्ध असणाऱ्या माहितीतून संबंधित मजकुराच्या रूपात प्रतिसाद देतो. गूगलची भिस्त बार्डवर असली तरी ‘बार्ड’ अजून बाल्यावस्थेत आहे.

Baidu या चिनी शोध इंजिन फर्मने चिनी भाषेत Wenxin Yiyan किंवा इंग्रजीमध्ये ERNIE Bot नावाची चॅट-जीपीटी शैलीतील सेवा २७ मार्चपासून सुरू करणार असल्याची घोषणा गेल्या महिन्यात केली. ही सेवा Baidu ने विकसित केलेल्या भाषा मॉडेलवर आधारित असेल. NAVER या दक्षिण कोरियन सर्च इंजिनतर्फे २०२३ च्या पहिल्या सहामाहीत कोरियन भाषेत SearchGPT नावाची, तर Yandex या रशियन शोध इंजिनतर्फे वर्षअखेरीस YaLM 2.0 ही रशियन भाषेतील चॅट-जीपीटीसारखी सेवा सुरू करणार असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.

शत्रू की मित्र?

इंग्लंड आणि वेल्शमधील चार्टर्ड अकाउंटंट स्टुअर्ट कोबे यांनी चॅट-जीपीटी वापरून पाहिले. यासाठी त्यांनी सनदी लेखापाल महासंस्थेच्या नमुना परीक्षेतील प्रश्नांची उत्तरे चॅट-जीपीटीवर मिळवली. ही उत्तरे ऑनलाइन चाचणीत ‘अपलोड’ केल्यावर फक्त ४२ टक्के गुण मिळाले, जे उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ५५ टक्के गुणांपेक्षा कमी होते.

‘इनसाइड हायर एड’ या नियतकालिकातील प्रा. स्टीव्हन मिंट्झ चॅट-जीपीटीला आपला शत्रू नव्हे, तर मित्र मानतात. संदर्भ सूची बनवणे, मुद्दे तयार करणे, समीकरणे सोडवणे, त्रुटी शोधणे आणि शिकवणे यांसारख्या गोष्टी करून शैक्षणिक उद्दिष्ट साध्य करण्यास मदत मिळू शकते, असे त्यांना वाटते.

अर्थशास्त्रज्ञ टायलर कोवेन यांनी चॅट-जीपीटीच्या लोकशाहीवरील परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. एखाद्या व्यक्तीने स्वत: टिपणे/मसुदे काढण्याच्या क्षमतेवर याचा परिणाम होऊ शकतो, त्यामुळे नवीन नियमावलीच्या निर्णय प्रक्रियेत बाधा येऊ शकते असे ते सांगतात. तर ‘द गार्डियन’ या ब्रिटिश वृत्तपत्राच्या संपादकांनी चॅट-जीपीटीच्या वापरानंतर इंटरनेटवर उपलब्ध असणारी कोणतीही माहिती ‘खरोखर विश्वास ठेवता येईल का?’ अशी शंका व्यक्त करतानाच सरकारी नियमनाची मागणी केली. ऑस्ट्रेलियन खासदार ज्युलियन हिल यांनी राष्ट्रीय संसदेत एआयच्या वाढत्या वापरामुळे फसवणूक, नोकरी गमावणे, भेदभाव, चुकीची माहिती आणि अनियंत्रित लष्करी प्रयोग होऊन ‘सामूहिक विनाश’ होऊ शकतो, अशी भीती नुकतीच व्यक्त केली.

येणारे जग हे डिजिटल आहे. त्यात कृत्रिम बुद्धिमत्तेची भर पडली, की कमालीचा फरक पडणार आहे. उदा. जेव्हा स्मार्टफोन आणि इंटरनेट यांची जोडणी झाल्यावर जगभराच्या बहुतेक देवाणघेवाणीवर, मनोरंजनावर आणि माहिती तंत्रज्ञानाचे जग जसे पूर्णपणे बदलून गेले त्याच्या काही पट फरक चॅट-जीपीटीसारख्या तंत्रज्ञानातून अपेक्षित आहे. अर्थात, शेवटी हे किती अचूक आणि सोपे होईल त्यावर सगळे अवलंबून आहे.

jayraj3june@gmail.com

Story img Loader