मानव जात म्हणजे होमो सेपियन म्हणवली जाते. होमो सेपीयन म्हणजे शहाणी मानवजात. अगदी रानटी अवस्थेपासून मानवाने प्रगतीचे टप्पे गाठत आजची विकसित अवस्था प्राप्त केली आहे. अश्मयुगा पासून, शेती, अवजारे, यंत्रे, कळप, आर्थिक देवघेव, निसर्ग मित्र, धर्म संकल्पना, समाज वर्गीकरण, राज्य शासन, लोकतंत्र… अशा उंच सखल बहुढंगी मार्गावरून प्रवास करत मानवजात या आजच्या टप्प्यावर येऊन पोहोचली. कळपाने राहणारा समाज स्वतःच निर्माण केलेल्या गोष्टी वर जगतो आहे. धर्माचे नियम, जातीवर्ग संकल्पना,राज्यकर्ते शासन, आर्थिक विनिमय, गाव शहर राज्य देश यांच्या सीमा, पुरुष-स्त्री यांच्यातले लैंगिक व्यवहार, संपत्तीचे अधिकार, सुशासनाचे कायदे याची लिखित गोष्ट आहे. प्रत्येक व्यवहाराचे आखून दिलेले कथानक आहे. कधी ते धर्माच्या नीती नियमांतून पुढे येते, कधी लोकशाही व्यवस्थेतून पुढे येते, तर कधी व्यवसाय, व्यापार, नीती व्यवहार या चौकटीतून आपल्यावर अंमल करते. एका विशिष्ठ बंधनात पूर्ण समाजाला अडकवते!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोयीसाठी गेल्या एक दोन शतकांचा जरी मर्यादित विचार केला तरी मानवाची एकूण सामाजिक, आर्थिक, तांत्रिक, शैक्षणिक, व्यावसायिक प्रगती थक्क करणारी आहे. या प्रगतीचा वेग तर त्याहूनही अचंबित करणारा आहे. मानवजातीने विज्ञान तंत्रज्ञानाचा उपयोग करून, तार्किक बुध्दीचा वापर करून अनेक नवी रहस्ये शोधून काढली. आपल्याच जुन्या समजुती खोट्या ठरवत नव्या तर्कशुध्द प्रमेयांचा स्वीकार केला. अर्थातच हा विकासाचा प्रवास सोपा नव्हता. यात वर्ग संघर्ष होता, धार्मिक नीती नियमांचा अडसर होता. असे असले तरी एकूणच मानवजात समूहप्रेमी असल्याने, त्यांचा सहकारावर प्रचंड विश्वास असल्यामुळे सर्व अडथळ्यांवर मात करण्यात मानवजात यशस्वी ठरली, असे आपण म्हणू शकतो.

आणखी वाचा-मुंबईसाठी महाराष्ट्रातल्या जनतेनेच आता पुढे यावे लागेल…

प्रश्न हा आहे की विकासाचे इतके उंच उंच टप्पे गाठूनदेखील आपण सुसंस्कृत, सुशिक्षित शहाणे झालो आहोत का? या प्रश्नाचे उत्तर दुर्दैवाने ‘नाही’ असेच द्यावे लागेल! आपण शिकलो, प्रगती केली, गुंतागुंतीचे तंत्रज्ञान विकसित केले, अगदी परग्रहांवरदेखील जाऊन पोहोचलो, औद्योगिक क्रांती, संगणक क्रांती, माहितीचे मायाजाल, कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास असे थक्क करणारे संशोधनाचे टप्पे आपण पाहिले, अनुभवले. आपण सुशिक्षित झालो. ज्ञानी झालो, विकसित झालो, पण शहाणे झालो का? नाही. आपण शहाणे झालोच नाही. कसे ते बघू या…

शिकणे, मोठमोठ्या पदव्या मिळवणे, शोध लावणे, याने शहाणपण येत नाही. शहाणपणाचा संबंध समतोल बुध्दीच्या वापराशी आहे. विवेकशील विचार करण्याशी आहे. चांगले काय वाईट काय, ही समज म्हणजे विवेक. सुरीचा शोध आपण लावला, पण या सूरीचा उपयोग फळं कापण्यासाठी करायचा, आजार बरा करण्याकरता शास्त्रक्रियेसाठी करायचा की कुणाचा बदला घेण्यासाठी, एखाद्याचा खून करण्यासाठी करायचा याची जाण, हा विवेक म्हणजे शहाणपण. सुरुंगाचा शोध खनिज द्रव्ये शोधण्यासाठी, पर्वतातून मार्ग तयार करण्यासाठी करण्याऐवजी जर आपण दारूगोळा, बॉम्ब तयार करण्यासाठी करू लागलो तर त्याला शहाणपण म्हणता येणार नाही.

अगदी गेल्या काही दशकांतील मानव जातीचे व्यवहार नीट तपासले तरी आपल्या शहाणपणाचे बिंग फुटले म्हणून समजा! जाती धर्मांवरून माणसातला द्वेष प्रचंड वाढला आहे. जात काही जात नाही. अन् आतवर रुजलेल्या धर्माचा कट्टरपणा देखील पुसला जात नाही. आपण तिसऱ्या महायुध्दाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. अनेक देशांत गेली काही वर्षे युद्ध सुरू आहेत. त्यात निष्पाप जीवांचे बळी जाताहेत. मुले अनाथ होताहेत. तरुण स्त्रिया विधवा होताहेत. स्त्रियांवर होणारे अत्त्याचार, बलात्कार तर माणुसकीला काळे फासणारे आहेत. वरवर दोन राष्ट्रांतले संबंध बरे दिसत- भासत असले तरी प्रत्यक्षात आतून आग धुमसते आहे. मानवी कौटुंबिक नातेसंबंधदेखील द्वेष, असुयेने, काळवंडले आहेत. कुणाचा कुणावर विश्वास राहिलेला नाही. रक्ताची नाती एकमेकांचा जीव घेण्यास उठली आहेत. हे शहाणपण निश्चितच नव्हे.

आणखी वाचा-‘बोअरिंग’ पंतप्रधानांची कर्तबगारी

राजकारणाचा चिखल तर बघवेनासा झाला आहे. त्या शिव्या, ती घाणेरडी भाषा, तो तिरस्कार, द्वेश हे पुढाऱ्यांच्या शहाणपणाचे लक्षण निश्चितच नव्हे. हीच नतद्रष्ट माणसे निवडून येताहेत. कायदे बनवताहेत अन् स्वतःच कायदे, नीति नियम पायदळी तुडवत आहेत. हे वेडे शहाणपणाचा आधार असलेल्या लोकतंत्राचे पाईक आहेत. केवढा मोठा विरोधाभास आहे हा! हे शहाणपण निश्चितच नाही!

समाजालाच फासवणारी, घातक ठरणारी समाज माध्यमे, माणसाला निरुपयोगी, निरोद्योगी बनविणारी कृत्रिम बुध्दिमत्ता, निसर्गाशी खेळणारे विकासतंत्र, पर्यावरणाचा ऱ्हास करणारे उद्योग, निसर्गाचे संतुलन बिघडविणारी काँक्रिटची जंगले, जलचर, तसेच वन्यप्राणी, यांच्या जीवावर उठलेला रानटी माणूस शहाणा कोणत्या मापाने म्हणता येईल? हवा, पाणी दूषित करणारा उद्योगिक विकास हे शहाणपण निश्चितच नव्हे.

मानवजातीच्या वेडेपणाची अशी अनेक उदाहरणे देता येतील. अन् पर्यायाने ज्याला आपण बौध्दिक विकास म्हणतो ते केवळ फसवे मायाजाल आहे हे सहज गणिती प्रमेयासारखे सिध्द करता येईल. हा वेडेपणा आता तरी थांबायला हवा. नव्या शतकाचे रौप्य महोत्सवी वर्ष सुरू होते आहे. या शतकाच्या रौप्य महोत्सवी वर्षात तरी आपण हा हिंसाचाराचा, द्वेषाचा, स्वार्थाचा, सत्ता लालसेचा, तिरस्कराचा वेडेपणा सोडण्याचा संकल्प करायला हवा. चला, नव्या वर्षात थोडे थोडे शहाणे होऊ या. अंधारातून प्रकाशाकडे जाऊ या. स्वतःच लहानसा सूर्य होऊ या.