दोन हजारांच्या आसपास स्टॉल, प्रगती मैदानातले चार भलेमोठे हॉल, असंख्य पुस्तकं, भरपूर देशी आणि मोजके विदेशी प्रकाशक असा पसारा असलेला ‘नवी दिल्ली विश्व पुस्तक मेळा’ १० फेब्रुवारीपासून सुरू होतो आहे. दर दोन वर्षांनी भरणाऱ्या या मेळय़ाचं स्वरूप यूपीएच्या काळापासून वार्षिक मेळा असं झालं होतं, त्यामुळे यंदा या मेळय़ाची ५१वी खेप. पुस्तकं इतकी की, दिल्लीकर पुस्तकप्रेमी इथं चाकं असलेल्या मोठय़ा बॅगाच घेऊन येतात! पण यंदा प्रगती मैदानातल्या एक, दोन, तीन आणि पाच या चारच दालनांत हा मेळा आहे- जो एरवी पाच/सहा दालनं पसरलेला असायचा. किंवा यंदाचा ‘पाहुणा देश’ सौदी अरेबिया आहे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तिथला ग्रंथव्यवहार कितीसा असणार याला मर्यादा आहेत. दरवर्षीच्या तुलनेतले असे काही फरक असले, तरी दिल्लीत असलेल्या ग्रंथप्रेमींनी नक्की अनुभवावा असा हा सोहळा असतो. प्रकाशक मंडळीही अनुवादहक्क विकण्या/ विकत घेण्यात गर्क असतात. लहानांना १० आणि मोठय़ांना २० रुपयांचं तिकीट काढून सकाळी ११ ते रात्री आठ असे नऊ तास ग्रंथांच्या सहवासात घालवता येतील.