श्रीकृष्णदास निरंकारी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इराणमधील कॅस्पियन या समुद्राच्या किनाऱ्यावरील रामसर या शहरी पाणथळ प्रदेशाचे महत्त्व या विषयावर परिषद आयोजित करण्यात आली होती. वर्ष होते १९७१! सागरी आणि जमिनीवरील पर्यावरणातील पाणथळ प्रदेशांचे महत्त्व जगभरातील धोरणकर्त्यांपुढे मांडणे आणि या अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील भागांना संरक्षण मिळवून देणे हा या परिषदेचा हेतू होता. पुढे दरवर्षी २ फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ जागा दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.

पाणथ‌ळ कशाला म्हणतात?

पाणथळ प्रदेश म्हणजे नदी, तलाव, सागरी किनारे अशा ठिकाणी उथळ पाण्याने झाकलेल्या व अनेकविध प्रकारच्या गवतांनी आणि झुडपांनी भरलेल्या जागा. त्यामध्ये कृत्रिम तलाव व कालवे, मिठागरे, सांडपाण्याचे तलाव, मत्सशेती तलाव, शेततळी, भाताची खाचरे अशा मानवनिर्मित स्थळांचाही समावेश होतो. भूगर्भातील पाणी वर्षागणिक अधिकाधिक प्रमाणात उपसले जाऊ लागले आहे. अशा रित्या होणाऱ्या भूजलसाठ्यांचे पुनर्भरण करण्याचे काम असे प्रदेश करतात.

हेही वाचा : शिक्षणाच्या माध्यमातून जग बदलण्याचे स्वप्न बघणारा एक भूलतज्ज्ञ…

खारफुटी महत्त्वाच्या का?

अनेक जलस्रोतांच्या किनारी राडारोडा टाकला जातो, जलाशयांत घातक सांडपाणी सोडले जाते. पाणथळ जागी वाढणाऱ्या वनस्पतीच असे दूषित घटक गाळण्याचे काम करून पाणी शुद्ध करतात. उदा. कोलकात्यातून बाहेर टाकल्या जाणाऱ्या दूषित पाण्याचा काही भाग शुद्ध करण्यासाठी जवळच्या पाणथळ प्रदेशाचा वापर केला जातो. भातखाचरे आणि मत्सबीज उत्पादनासाठी बनवलेली तळी यादेखील पाणथळ जागाच असल्याने त्यांमधून जगभरातील ३ अब्ज लोकांना दररोजचे अन्न- भात आणि मासे मिळतात. सागरी किनारपट्टीवर असलेल्या अशा गवतयुक्त पाणथळ प्रदेशांमुळे लाटांमुळे होणारी किनाऱ्यांची धूप थांबते. वादळांमुळे होणारे नुकसानही घटते. शिवाय समुद्राचे आक्रमण थोपवून किनारी जमीन अतिक्षारयुक्त- निरुपयोगी खारपड होण्याच्या क्रियेचा वेगही तेथील खारफुटींमुळे कमी होतो.

नदीला पूर आल्यास किंवा अतिवृष्टी झाल्यास जास्तीचे पाणी किनारी पाणथळ प्रदेशांत मुरते व मानवी वस्ती जलमय होण्याच्या संभाव्य धोक्याचे प्रमाण कमी होते. महाराष्ट्राचा विचार केल्यास असे दिसते, की येथील महत्त्वाचे पाणथळ प्रदेश हे दख्खनच्या पठारावरील नद्या-उपनद्या, धरणांमागील जलाशय आणि पाझर तलावांच्या आसपासच्या परिसंस्था आहेत. यामुळे भूजलाचे पुनर्भरण आणि पाझर यात मोलाची मदत होते.

हेही वाचा : श्वेतपत्रिकेत ‘हे’ पण सांगाल?

पक्ष्यांचा अधिवास

बगळे, बदके, करकोचे, खंड्या तसेच शिकारी प्रजातींच्या व इतरही अनेक पक्ष्यांना या पाणथळ प्रदेशांतच अधिवास मिळतो. प्लवर सारख्या विशिष्ट प्रजातींची घरटी पाणथळ प्रदेशांत आढळतात. करकोचे, शराटी- इबिस, चमचा, रोहित- फ्लेमिंगो हे पक्षीही पाणथळ जागीच येतात. अगदी सायबेरियासारख्या प्रदेशांतूनही क्रेन आणि बदके इथे येतात. कारण इथे त्यांना अन्न मिळते. हे पक्षी या प्रदेशातील अन्नसाखळीतला एक महत्त्वाचा दुवा असतात. आज पाणथळ प्रदेशांकडे वाया गेलेली जमीन म्हणूनच पाहिले जाते, पण जैविक आणि पर्यावरणीय साखळीतील त्यांचे महत्त्वाचे स्थान लक्षात घेऊन त्यांचे जतन करून, तिथला कचरा दूर करून त्यांचा सजगतेने वापर करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून वैयक्तिक पातळीवर सुद्धा पाणथळ प्रदेश वाचविण्याचा प्रयत्न केला तरी या दिशेने एक ठोस पाऊल उचलले जाऊ शकते. आपल्या प्रत्येकाच्या खारीच्या वाट्याने पृथ्वीवरची ही महत्त्वाची समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकते आणि पर्यावरणाची बूज राखली जाऊ शकते.

पाणथळ दिवस का साजरा करतात?

या ग्रहासाठी पाणथळ भूभागाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल जागतिक जागरूकता वाढावी, हे पाणथळ दिवस साजरा करण्यामागचे महत्त्वाचे कारण आहे. समुदाय रक्षक आणि पर्यावरणप्रेमी सर्वजण या दिवशी एकत्र येऊन निसर्गावरील त्यांचे प्रेम या उत्सवाच्या माध्यमातून साजरे करतात. कालांतराने मानवी बांधकामांमुळे पाणथळ प्रदेशांवर परिणाम करणाऱ्या विविध पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. लोकसंख्यावाढ आणि बांधकामामुळे पर्यावरण संवर्धन कमी झाले आहे. जगाचा नैसर्गिक फिल्टर आणि संरक्षक हरवण्याआधी मानवाने ही कोंडी ओळखली आणि फोडली पाहिजे. त्यासाठी या दिवसाच्या निमित्ताने जागतिक स्तरावर प्रयत्न केले जातात.

हेही वाचा : वित्तीय तुटीवर नियंत्रण चांगले, पण विकासदराचा समतोल गरजेचा!

रामसर दिनानिमित्त लोगो, पोस्टर्स, फॅक्टशीट्स, हँडआउट्स आणि मार्गदर्शक दस्तऐवज तयार केले जाता. ही सामग्री विविध भाषांत भाषांतरित करू सर्वत्र पोहोचविली जाते. महिनाभर चालणारी वेटलँड्स युथ फोटो स्पर्धा आयोजित करून तरुणांमध्ये या प्रश्नाविषयी जाणीवजागृती केली जाते. १९९७पासून रामसर संकेतस्थळाने सुमारे १०० देशांतील अहवाल पोस्ट केले आहेत.

जागतिक पाणथळ प्रदेश दिनाच्या संकल्पना

या दिवसासाठी दरवर्षी एक संकल्पना निवडली जाते. त्यावर आधारित व्याख्याने, परिसंवाद, निसर्ग पदयात्रा, मुलांच्या कला स्पर्धा, शर्यती, स्वच्छता मोहिमा, रेडिओ आणि दूरदर्शन मुलाखती आयोजित केल्या जातात. नवीन पाणथळ धोरणे, नवीन रामसर स्थळे जाहीर केली जातात. पाणथळ दिनाच्या आजवरच्या संकल्पना-

२०२३- वेटलँड्स रिस्टोरेशन

२०२२- लोक आणि निसर्गासाठी कृती

२०२१- ओलसर जमीन आणि पाणी

२०२०- पाणथळ प्रदेश आणि जैवविविधता

२०१९- पाणथळ प्रदेश आणि हवामान बदल

२०१८- शाश्वत शहरी भविष्यासाठी पाणथळ प्रदेश

२०१७- आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी पाणथळ जागा

२०१६- आमच्या भविष्यासाठी आर्द्र प्रदेश: शाश्वत उपजीविका

२०१५- आमच्या भविष्यासाठी वेटलँड्स

२०१४- पाणथळ जमीन आणि शेती: वाढीसाठी भागीदार

२०१३- पाण्याची काळजी घेण्यात पाणथळ जागांचे महत्त्व

२०१२- वेटलँड पर्यटन: एक उत्तम अनुभव

२०११- पाण्यासाठी जंगले आणि ओलसर जमीन

२०१२- आर्द्र प्रदेशांची काळजी- हवामान बदलाचे उत्तर

२००९- सर्वांना जोडणाऱ्या अपस्ट्रीम, डाउनस्ट्रीम: वेटलँड्स

२००८- निरोगी पाणथळ प्रदेश, निरोगी लोक

२००७- उद्यासाठी मासे?

२००६- जीविका धोक्यात

२००५- वेटलँड वैविध्यपूर्ण संपत्ती

२००३- पाणथळ नाही- पाणी नाही

२००२- पाणथळ प्रदेश: जलजीवन आणि संस्कृती

२००१- एक आर्द्र जग

२०००- आमच्या संघटना आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे पाणथळ प्रदेश

१९९९- लोक आणि पाणथळ जमीन- महत्त्वाचा दुवा

१९९८- जीवनासाठी पाण्याचे महत्त्व आणि पाणीपुरवठ्यात पाणथळ जमिनीची भूमिका

१९९७- पहिला पाणथळ दिन