येत्या २ ऑक्टोबरला महात्मा गांधी यांचा १४४ वा जन्मदिन देशभर आणि देशाबाहेरही अनेक ठिकाणी साजरा केला जाईल. त्यानिमित्ताने प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांचे ‘गांधी बिफोर इंडिया’ हे पुस्तक प्रकाशित होत आहे.
गांधींविषयी-म्हणजे त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी आणि आणि त्यांच्या विचार-तत्त्वज्ञानाविषयी जवळपास दरवर्षी एक तरी पुस्तक प्रकाशित होतेच होते. पण गुहा यांच्या या पुस्तकाचे विशेष वेगळेपण आहे.
१८९३ ते १९१५ या काळात गांधी आफ्रिकेत होते. याच काळात गांधींमधील महात्मा आकाराला येत होता. गांधी तत्त्वज्ञान आकाराला आलं, ते या काळातच, हे या पुस्तकातून गुहा यांनी सप्रमाण मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यांनी यात गांधी यांच्या महात्मा बनवण्यामागची पाश्र्वभूमी उलगडून दाखवली आहे. अॅटर्नी, स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, पत्रकार आणि लेखक, या पाच भूमिकांमध्ये गांधींनी लीलया काम करायला सुरुवात केली ती दक्षिण आफ्रिकेत असताना. त्यांच्या तेथील वास्तवाविषयीची आजवर अज्ञात असलेली माहिती या पुस्तकातून समोर येणार आहे.
वयाच्या २३व्या वर्षी भारतात वकील म्हणून अपयशी ठरल्यानंतर गांधींनी आफ्रिकेत आपले बस्तान हलवले आणि त्यांच्यातील महात्मा घडायला सुरुवात झाली, याची ही कहाणी आहे.
फ्रंट शेल्फ
टॉप ५ फिक्शन
द किल लिस्ट : फ्रेड्रिक फॉर्सिथ, पाने : ३५२३९९ रुपये.
मॉम इन द सिटी : कौशल्या सप्तऋषी, पाने : ३४४२५० रुपये.
इट स्टार्टेड विथ अ फ्रेंड रिक्वेस्ट : सुदिप नगरकर, पाने : २२४१२५ रुपये.
द टिडेस ऑफ मेमरी : सिडनी शेल्डन, पाने : ४००२९९ रुपये.
१२ अवर्स-अॅन अॅन्थॉलॉजी ऑफ ब्यूटीफूल स्टोरीज : रोहित शर्मा-माही सिंग,
पाने : २६४१४० रुपये.
टॉप ५ नॉन-फिक्शन
माय जर्नी- ट्रान्सफॉर्मिग ड्रीम्स इन्टु अॅक्शन्स : ए.पी.जे. अब्दुल कलाम, पाने : १६०१९५ रुपये.
अ मॅटर ऑफ रॅटस- अ शॉर्ट बायोग्रफी ऑफ पाटणा : अमिताव कुमार, पाने : १४४२९५ रुपये.
व्हाय नेशन्स फेल : डॅरॉन अॅसोमोग्लू- जेम्स ए. रॉबिन्सन, पाने : ४६४/५९९ रुपये.
सेव्हॉर मुंबई- अ क्युलिनरी जर्नी थ्रु इंडियाज् मेल्टिंग पॉट : विकास खन्ना, पाने : ३३२८९५ रुपये.
द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली : रॉल्फ डॉबेली, पाने : ३३६२९९ रुपये.
गांधींचा महात्म्याआधीचा प्रवास
येत्या २ ऑक्टोबरला महात्मा गांधी यांचा १४४ वा जन्मदिन देशभर आणि देशाबाहेरही
आणखी वाचा
First published on: 21-09-2013 at 01:02 IST
मराठीतील सर्व वार्ता ग्रंथांची बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gandhis journey before being great soul