काही महिन्यांपूर्वी सुप्रसिद्ध समाजसेवक नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली. त्याचा तपास सुरू आहे. तपासातील संथ प्रगतीबद्दल विरोधी पक्ष सरकारवर तोंडसुख घेत आहेत. मुख्यमंत्री, गृहमंत्री व एकूणच महाराष्ट्रातील काँग्रेस व राष्ट्रवादीचे युती सरकार हे अकार्यक्षम आहे, असा सर्वाचा आरडाओरडा सुरू आहे. खरे पाहता एखाद्या गुन्ह्य़ाचा शोध किती काळात लागेल हे कुणीच सांगू शकत नाही. एखाद्या गुन्ह्य़ाचा शोध घ्यायला महिनोन् महिने लागू शकतात. कधी कधी अचानकच एखाद्या गुन्ह्य़ाचा शोध घेताना आधी घडलेल्या गुन्ह्य़ाचा शोध लागतो. दाभोलकर हे कुठल्याही सत्तास्थानावर नव्हते. केवळ एक समाजसेवक होते. मात्र दहा वर्षांपूर्वी गुजरातमध्ये राज्याचे गृहमंत्री असलेले हरेन पंडय़ा हे सकाळी फिरायला गेले असताना त्यांची हत्या झाली होती. त्याच्या चौकशीत काय प्रगती झाली आहे हे कळायला मार्ग नाही. मुळात एखाद्या राज्याच्या गृहमंत्र्याचा खून होणे ही गंभीर बाब आहे. राज्याचा गृहमंत्रीच जेथे सुरक्षित नाही तेथील सर्वसामान्य जनता किती सुरक्षित असेल, याची कल्पना करता येऊ शकते. तेही मोदींसारख्या कर्तव्यकठोर व कार्यकुशल मुख्यमंत्री असलेल्या राज्यात ही घटना घडावी हे मोदींना किती भूषणावह आहे, हे मोदी प्रशंसकांनीच ठरवावे. खोटय़ा चकमकी घडवून आणून निरपराध लोकांची हत्या केल्याबद्दल गुजरातमधील मोठमोठे पोलीस अधिकारी गजाआड आहेत. सर्वात जास्त पोलीस अधिकारी तुरुंगात असण्याचा मानसुद्धा गुजरातकडे जातो. याही बाबतीत गुजरात राज्य आघाडीवर आहे व हे सर्व अधिकारी कॉन्स्टेबल किंवा सबइन्स्पेक्टर दर्जाचे नसून उच्चाधिकारी आहेत. तेव्हा ‘नरेंद्र दाभोलकरांची ही हत्या ही दाभोलकर कुटुंबीयांवर ओढवलेली दुर्दैवी घटना’ असे म्हणताना, ते जास्त दुर्दैवी आहेत की पंडय़ा कुटुंबीय हे वाचकांनीच ठरवावे.
जास्त दुर्दैवी दाभोलकर की पंडय़ा कुटुंबीय ?
काही महिन्यांपूर्वी सुप्रसिद्ध समाजसेवक नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली. त्याचा तपास सुरू आहे. तपासातील संथ प्रगतीबद्दल विरोधी पक्ष सरकारवर तोंडसुख घेत आहेत. मुख्यमंत्री, गृहमंत्री व एकूणच महाराष्ट्रातील काँग्रेस व राष्ट्रवादीचे युती सरकार हे अकार्यक्षम आहे, असा सर्वाचा आरडाओरडा सुरू आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-02-2014 at 01:02 IST
TOPICSक्राईम न्यूजCrime Newsडॉ. नरेंद्र दाभोळकरDr Narendra Dabholkarमहाराष्ट्र सरकारMaharashtra Governmentसंपादकांना पत्रLetters To Editor
मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government not able to find any clue about dabholkars death