महेश परब यांचे पत्र (लोकमानस, २८ नोव्हें.) वाचले. त्यांनी माझ्या २७ नोव्हेंबरच्या पत्राच्या उल्लेख केला होता; पण मी कुठेही आनंदला कमी लेखलेले नाही. त्याच्याबद्दल आदरच व्यक्त केला आहे. प्रत्येक सामान्य व्यक्तीला, प्रसार माध्यमांना आपल्या ‘आयकॉन्स’बद्दल टीका, प्रेम, विश्लेषण व्यक्त करण्याचा अधिकार आहे. महेश परब यांना माझ्या पत्राचा मूळ उद्देशच समजला नाही याचे वाईट वाटते. मी देहबोलीचे विश्लेषण व्हावे ही अपेक्षा व्यक्त केली होती आणि ती सयुक्तिक आहे. जेव्हा खेळाडू राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय सहभाग नोंदवतो तेव्हा तो जनतेच्या टीकेस आणि प्रेमास पात्र असणारच. बदलत्या काळात प्रत्येक बाबींचे विश्लेषण अनेक आधारांवर केले जावे ही अपेक्षा बाळगून, देहबोलीचे महत्त्व इतर उदाहरणांसह देण्याचा प्रयत्न मी केला.
आनंद हा बचावात्मक पवित्रा वापरून खेळत होता आणि तो तसाच खेळला यात अनेक विश्लेषकांचे एकमत आहे, (संदर्भासाठी तेव्हा प्रकाशित झालेल्या वृत्तपत्रीय विश्लेषणांचे वाचन करावे) त्याबद्दल मी माझे मत साधार मांडले.
विजेते आणि पराजित यात फक्त काहीच गुणांचे फरक असतात आणि त्यात जर देहबोलीचा वाटा असेल तर त्याचा अभ्यास व्हावा ही अपेक्षा बाळगणे यात काय चूक आहे? देहबोली-विश्लेषणाचे शास्त्र हे आज विकसित झाले आहे आणि त्याचा योग्य वापर केल्यास ते आपल्या अंगभूत गुणात भरच घालते हे दाखवून देणे मला आवश्यक वाटले.
आपल्या देशात काही लोकांचा छंदच आहे की क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळांना योग्य ते स्थान मिळत नाही; पण त्यांनी हे लक्षात घ्यावे की लोकसत्ताने दररोज याची बातमी अनेक नामवंत विश्लेषकांच्या मतांसह दिली.. ज्या काळात एका अतिव्यावसायिक आणि धनवान मंडळाने क्रिकेटचा खेळ चालवला होता, तेव्हा बुद्धिबळाला महत्त्व मिळाले.
कुणाची मते कुणावर बंधनकारक नसतात. आवडती आणि नावडती मते आपण ठरवू शकतो, नावडत्या मताबद्दल मतप्रदर्शन पण, तेही संयतपणे, हा एक सामान्य नियम आहे.
केतनकुमार पाटील, पुणे
विश्लेषणाची गरज कशी चुकीची ठरेल?
महेश परब यांचे पत्र (लोकमानस, २८ नोव्हें.) वाचले. त्यांनी माझ्या २७ नोव्हेंबरच्या पत्राच्या उल्लेख केला होता; पण मी कुठेही आनंदला कमी लेखलेले नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-11-2013 at 12:28 IST
मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How will be wrong analysis needed